प्रिय बाबासाहेब,आज आम्ही आपलीच १२१ वी जयंती उत्साहाने,धुमधडाक्याने साजरी करतोय. बघाना,तुमची मोठमोठाली पोस्टर्स, होर्डिंग्स लावलीयेत सगळीकडे ! तुमच्या प्रतिमेजवळ ते बघा, तुमचे नाव सुद्धा उच्चारण्याची ज्यांची लायकी नाही- ते हरामखोर पुढारी,गल्लीबोळातले विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि गावगुंड,मवाली ,भामटे,भुरटे कसे येऊन बसलेत ! तुमच्या फोटोपेक्षाही त्यांचे फोटो मोठाले आहेत. जणू काही त्यांचीच जयंती आहे,आणि तुम्ही त्यांना अभिवादन करताहात...फार वाईट वाटलं बाबासाहेब. या हरामखोरांची किळस वाटली.अरे थूत या मुर्ख प्रसिद्धीलोलुपांच्या जिंदगानीवर!!!
तुमच्या जयंती आणि पुण्यतिथीला तुमची कोणालाच अलर्जी नसते बाबासाहेब.सारे वर्ग,धर्म,पंथ,जाती,सारे पुढारी सगळेच तुमच्या नावाचा आधार घेतात. आज जवळजवळ प्रत्येक शहरात,गावात तुमचा पुतळा आहे. रस्ते ,पत्ते समजण्यासाठी पुतळ्यांचा चांगला उपयोग होतो,हे भारतीय सरकार आणि नागरिकांना खूप पूर्वीच कळले आहे. मग भले तिथे वर्षभर कावळ्यांचा वास असतो. मात्र तुमच्या जयंती,पुण्यतिथीला हे मानवी कावळे तुमच्या पुतळ्याकडे धाव घेतात.कधी नव्हे ते तुमच्या पुतळ्याला घासून पुसून साफ करतात.(ही अवस्था फक्त तुमचीच नाही बाबासाहेब,इथेही सर्वधर्मसमभाव आहेच ना ! शिवाजी महाराजांची,गांधीजींची,सुभाषबाबूंची,सावरकरांची सगळ्यांचीच अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही ;तर ते असो.)
.....ते बघा पुढारी आलेत सोबत पत्रकार,फोटोगाफ्रर. बघा कसे हसून पोज देताहेत हे लोक तुमच्या पुतळ्याला हार घालताना; उद्याच्या पेपरात येईल ना तो ! बघालच तुम्ही उद्या तुमच्याच पायाशी उडत आलेला एखादा रद्दी पेपर..कोणत्याच पुढाऱ्यांची कोणत्याही विषयावरची भाषणे तुमच्या उल्लेखाशिवाय पूर्ण नाही होत,बाबासाहेब. कारण जातीभेद मनातल्या मनात पाळायचे असतात,हे सर्व पुढाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. फार दु:ख वाटते बाबा सांगताना, रडायला येतय..आजही तुम्ही अस्पृश्यच आहात बाबा...!
आणि तुमचे तथाकथित अनुयायी काय करताहेत? तुमच्या नावाची ढाल पुढे करून तुमचीच मूल्ये पायदळी तुडवत आहेत. तुम्ही तुमच्या अनुयायी आणि तमाम पुढारी मंडळींसाठी भक्तीपेक्षा राजकारणातले चलनी नाणे बनून गेलात बाबा !
असे असूनही,तुम्ही सगळीकडे भरून राहिला आहात, कायद्याच्या पानापानांतून भारतीय राज्यघटनेवर,नव्हे भारताच्या जीवनपद्धतीवर,भारताच्या संविधान नावाच्या धर्मावर! तुमच्या राज्यघटनेचा रथ या बैलांना नाही पेलवत बाबा! म्हणून आता कदाचित आम्हाला नवीन अश्व आणावे लागतील.आणि नवीन सारथी! जिथे जिथे सामाजिक न्यायाचा प्रश्न उद्भवेल,तिथे तुमच्याशिवाय पर्यायच नाही बाबा ! तुमच्याच म्हणण्याप्रमाणे हा देश कधीतरी जाती,धर्म,पंथभेद सोडून एक होईल.या देशावर तुमची कृपादृष्टी असू द्या !
आपला,
आपल्याच संविधानातल्या,
भारतीय नागरिकाच्या व्याखेत सामील होण्यासाठी धडपडणारा एक सामान्य मनुष्य....
मग नासलेल्या दुधाचे करा
मग नासलेल्या दुधाचे करा काहीतरी पनीर वगैरे !
दूध तयार व्हायला शेतकरी,
दूध तयार व्हायला शेतकरी, म्हैस, गवत, पाणी , बैल (!) असे ढीगभर फ्याक्टर कारणीभूत असतात. पण नासवायला मिठाचा एक खडाही पुरतो... चांगले घडायला अनेक फ्याक्टर कारणीभूत असतात.. पण वाइट घडायला एखादाच फ्याक्टर अगदी कमी क्वांटीटीत असला तरी पुरतो!.
----- मिठ हे केवळ दुधच नासवते हेच का लक्षात येते त्याच मिठा शिवाय कुठल्याही अन्नाला चव येत नाही.
>>> चांगले घडायला अनेक
>>> चांगले घडायला अनेक फ्याक्टर कारणीभूत असतात.. पण वाइट घडायला एखादाच फ्याक्टर अगदी कमी क्वांटीटीत असला तरी पुरतो!.
+१००
धाग्याचा कोणताही विषय असला, कितीही चांगला विषय असला, कितीही चांगली चर्चा सुरू असली आणि आपल्याला त्या विषयातलं अजिबात गम्य नसलं, तरी यांच्यासारखी एखादीच विकृत व्यक्ती, धागा नासवायला पुरेशी असते.
>>>
>>> सध्या-मी-ज्या-गावात-राहाते-तिथे-ब्राह्मण-मुठभरही-नाहीत.त्यांचा-सामाजिक-आर्थिक-आणि-राजकीय-इतकेच-काय-पण-धार्मिक-जीवनावरही-काडीमात्र-प्रभाव-नाही.
). १८८०/९० च्या दरम्यानच परदेशात जाऊन शिकुन पहिली महिला डॉक्टर झाली ती देखिल ब्राह्मणच. तिला अन तिच्या नवर्याला काय सहजासहजी साध्य झाले का ते? पण त्याचे (चांगल्या बदलाचे) सर्वस्वी नाही तरी काही प्रमाणात अनुसरण करीत असल्यानेच १९१०-२० च्या दरम्यान्ची कोकणातल्या केतकीबिवली या अतीदुर्गम भागातील माझी आज्जी दुसरी इयत्ता पास होती. तर पुढे १९३०-४० च्या दरम्यानची माझी आई फायनल (७वी) पास होती. सध्याचे मी बोलत नाही. नजरेसमोर आहेच प्रत्येकाच्या. तर मुद्दा असा कि या सर्वान्ना कष्ट पडलेच नाहीत, गरीबी नव्हती असे काही नाही. दोन काय, एकवेळच्या खाण्याचि देखिल मारामार, अन खाणारी तोन्डे खूपच, जोडीला शेतीवाडी वगैरे उत्पन्नाचे काडीचेही साधन नाही, अन तरीही ही लोक, कुणाला दुसर्यान्ना दोष न देता/परिस्थितीला दोष न देता, प्रयत्नपूर्वक परिस्थितीवर मात करीत राहीली. (श्यामची आई हे पुस्तक यामुळेच माझ्या अतिशय आवडीचे) का नाही बाकिच्यान्ना गेल्या शेसव्वाशे वर्षात याचे अनुकरण करता आले? ज्यान्नी केले ते पुढे गेले, न केले ते .... असो.
बहुतांश-समाजास-कोणतीही-धार्मिक-कार्ये-करायला-ब्राह्मण-लागत-नाही.
किंबहुना-ब्राह्मण-म्हणून-जगण्यातच-फार-अडचणी-आहेत.आणि-ही-आजची-स्थिति-नाही.
किमान-५००-वर्षांपासूनची-आहे. <<<
साती, तुमची सम्पुर्ण पोस्टच वास्तवाला अचूक स्पर्ष करणारी आहे.
अन वर उल्लेखिल्याप्रमाणे धार्मिक म्हणाल, तर ज्यान्नी हिन्दूधर्माचा त्यागच केला, त्यान्च्यावर ब्राह्मण कस्ला डोम्बलाचा प्रभाव टाकणार?
ब्राह्मणान्नी "अडकवलेले ज्ञान" वगैरे जे पाल्हाळ लोकान्ना भडकविण्याकरता सान्गितले जाते, ते "ब्राह्मणान्चे वैदिक ज्ञान" वापरुन तेव्हाही व आत्ताही कोणी पोटे भरु शकते आहे काय? ते ज्ञान तेव्हाही व आजही "व्यावसायिक मूल्य" असलेले कधीच नव्हते, नसणार.
अन जी बारा बलुत्याची, पक्षी उदरभरणाचे व्यावसायिक धन्दे व त्याचे शिक्षण यात ब्राह्मणान्नी कधी आडकाठी केली? हे शिक्षण ब्राह्मण कधी देत होते वा द्यायचे कधी अडकवले? उलट बापालाच गुरू मानुन शिक्षण घ्या असा संस्कार तेवढा फक्त ब्राह्मण देत होते, व जे हा संस्कार अमान्यच करतात ते सर्व शूद्र असा भेद होता. (पण स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्थेची रचनाच इन्ग्रजान्चे राजवटीस त्यान्चे यन्त्रयुगातील प्रगती व तयार मालविक्रीमुळे कोलमडत गेली, याकडे तेव्हान्च्या विचारवन्तान्नी लक्ष वेधलेच होते, स्वदेशीचा पुरस्कारही केला होता, गान्धीजिन्नी तर कंठशोष करुन सान्गितले होते की स्वयम्पुर्ण ग्रामव्यवस्था बिघडू देऊ नका, तीच भारताची खरी ताकद आहे. पण प्रत्यक्षात का घडले/ स्वतन्त्र भारतात घडवताहेत हे नजरेसमोर आहेच.)
इतकेच काय, तर शेसव्वाशेवर्षान्पूर्वीच्या यच्चयावत स्त्रीशिक्षणासहितच्या शिक्षण संस्था ब्राह्मणान्नीच काढलेल्या होत्या. अगदी महात्माफुलेन्ना जो वाडा मिळाला तो देखिल "भिडे" या ब्राह्मणाचाच अन ज्या केशवपन होणार्या/अत्याचाराला बळी पडणार्या स्त्रियान्चा फुलेन्ना कळवळा आला त्यादेखिल ब्राह्मणाच्याच! (बाकी समाजाकरता मात्र अजुनही शेसव्वाशे महात्माफुले जन्मायला हवेत
किमान ५०० वर्षे पासून ब्राह्मण म्हणून जगणेच खरे तर अवघड, हा भारीच मुद्दा तुम्ही मान्डला आहे. ते सत्यच आहे. समाजान्तर्गत वा बाह्य, शत्रू कुठलेही असोत, त्यान्चा पहिला प्रकट वा अप्रकट हल्ल्ला ब्राह्मणान्ना नेस्तनाबुत्/नष्ट करण्याकडेच कायम राहिला आहे. इतिहासात काय की आजच्या एकविसाव्या शतकात काय. अन म्हणुनच ब्रिगेडी/नक्षली वगैरे लोकान्चे टारगेट देखिल आधी ब्राह्मण आहे. असो. मूळ धागा वेगळाच आहे. आपण नन्तर कुठेतरी चर्चा करू.
लिंबू, जरा तुझा पहिला
लिंबू, जरा तुझा पहिला परिच्छेद मान्य करण्यासारखा वाटेपर्यंत ब्राह्मणांची घाऊक तारीफ असलेला दुसरा आला
ब्राह्मण, किंवा इतर बहुतेक जातीचे लोक असे एकजिनसीपणाने चांगले किंवा वाईट काहीच करत नाहीत. घाउक द्वेष चुकीचा आहेच पण अशी घाऊक तारीफही चुकीची आहे.
"ब्राह्मणांनी...." पासून सुरू होणारी सर्वच्या सर्व वाक्ये - चांगुलपणा अथवा वाईटपणा दाखवणारी- पूर्णपणे चुकीची आहेत. जरा धाडसी विधान आहे पण खरे आहे. कोणत्याही साईटवरची, कोणत्याही पेपरमधली, कोणत्याही पुस्तकातली.
फारेन्डा, उडदामाजी काळेगोरे,
फारेन्डा, उडदामाजी काळेगोरे, हे मी कधीच अमान्य केलेले नाही. करणारही नाही.
हा या बीबीचा विषय नाही.
पण कशामधले किती काळेगोरे, याचे प्रमाणच प्रचण्ड व्यस्त असेल, तर त्याची दखल घ्यावीच लागते.
असो.
विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन
पि.ह., आपल्याला इथे येऊन वट्ट
पि.ह.,
आपल्याला इथे येऊन वट्ट ५९ मिनिटे ५० सेकंद झाले आहेत. आपले मायबोलीवर स्वागत असो!
आपण आपले चित्र गजेंद्रमोक्षाचे लावले आहे. त्या वेळी तो हत्ती पिसाळलेला नव्हता तर अगतिक होता.

आ.न.,
-गा.पै.
@मास्तुरे@>> +१
@मास्तुरे@>> +१
गाडीच्या सावलीचा स्वतः फायदा
गाडीच्या सावलीचा स्वतः फायदा घ्यायचा आणि गाडीच आपल्यामुळे चालत आहे हा वर दावाही करायचा!
+१
भ्रमवृंद
भ्रमवृंद

>>> ज्यांना वर यायचे असते ते
>>> ज्यांना वर यायचे असते ते कश्याही परिस्थितीतुन येतात आणि अशी अनेक उदाहरणे आहेत पण ज्यांना पुर्वापार झालेला अन्याय वगैरे कुरवाळत बसायचे असते त्यांना बाबासाहेब काय कुणीच सुधारु शकणार नाही!
+१
>>> अन हे जर खरहे सहमत होण्याइतपत, की ३ टक्के सगळेच्च्यासगळे कामास लागले तरी त्यान्च्या जिवावर काही चालत नाहीच, तर मग केवळ ३ टक्केन्च्यामुळे दुरितावस्था आली, अन साठ वर्षानन्तरहि दूर झाली नाही हा कान्गावा तरी कशासाठी? नै का?
+१
>>> स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण लोक शिकले. त्यांना खुल्या गटात स्पर्धा करावी लागल्यामुळे संघर्ष आपसूकच करायला लागला. जागतिकीकरणामुळे उत्पन्न झालेल्या अनेक संधी बऱ्याच ब्राह्मणांनी पटकावल्या.
+ १
>>> उदारीकरण झाल्यानंतर सरकारी माध्यमांनी भारताची लूट सुरू होणार असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र भारतीय लोक भारतात राहूनही जागतिक आव्हाने पेलू शकतात. हे ज्या लोकांनी दाखवलं त्यात बरेच ब्राह्मण आहेत.
+१
>>> ब्राह्मणांना अन्न पिकवता येत नाही वा सैन्यात भरती होण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे हा त्यांचा गुन्हा नाही.
-१
सैन्यात अनेक ब्राह्मणसुद्धा आहेत. ब्राह्मणांना अन्न पिकविता येत नाही हा गैरसमज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातले अनेक ब्राह्मण शेती करत होते. त्यांच्या जमिनी बळजबरीने हिरावून घेतल्या गेल्या. आजच्या काळातही शेती करणारी अनेक ब्राह्मण कुटुंबे मला माहिती आहेत.
<<<पण कशामधले किती काळेगोरे,
<<<पण कशामधले किती काळेगोरे, याचे प्रमाणच प्रचण्ड व्यस्त असेल, तर त्याची दखल घ्यावीच लागते.>>>
लिंबूनाना, तुमच्या या निरीक्षणा/मताबद्दल सावरकर काय म्हणतात बघा.
It is wrong to assume that an entire caste is either evil or innocent. To do so would amount to accepting the principle of heredity.
कटु मतं पचवण्याची क्षमता अंगी
कटु मतं पचवण्याची क्षमता अंगी बाणवणे हा एक गुण असतो. तो गुण अर्थातच समाजात राहील्याने विकसित होतो. समाजापासून तोडलेल्या लाचार गुलामांमधे बाबासाहेबांनी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली. आपल्यावर काञ अन्याय होत होता याचीच जाणीव नसलेल्यांना गुलामीची जाणीव करून दिली. केवळ सहाशे वर्षे मुघलांची राजवट आल्याने संपूर्ण मुस्लिम धर्मियांना उठता बसता शिव्या घालणा-यांनी आपण आपल्याच धर्मियांवर काय बंधनं लादली होती याचा विचार प्रातःसमयी करून विवेकबुद्धीने प्रतिवाद केले तर तो एकमेकांशी मैत्री होण्यासाठी सुदिन असेल.
सुदैवाने, सारासार विचार करणारे अनेक लोक सगळ्या जाती धर्मात आहेत. पण नेटसारख्या ठिकाणी जेव्हां वावटळ उठते तेव्हां ते शांत बसणे पसंत करतात. या मौनाचा अर्थ आता समजलेला असल्याने आणि डिक्की वा इतर अनेक माध्यमातून होणारं प्रचंड कार्य जवळून पाहत असल्याने आरोपांची देवाणघेवाण करणं टाळलेल बरं.
उत्सवाचे बाजारीकरण या विषयावर वेगळा विचार करूच. त्यात अपवाद करता येईल असा कुठला उत्सव राहीले आहे असे वाटते का ?
किरण +१
किरण +१
वा! वा! भरत, तुम्हाला एखाद्या
वा! वा! भरत, तुम्हाला एखाद्या मुद्द्याबाबत तरी सावरकरांची मते जाणून घ्यावीशी वाटली हे स्वागतार्हच आहे. पण भारतीयांच्या हितासाठी सावरकरांनी "वरं जनहितं ध्येयं, न केवला जनःस्तुति:" हे व्रत घेऊन आणखीही खूप कांही लिहिलेले आहे आणि तेही वाचले पाहिजे याचाही विसर पडू देऊ नये.
बाबासाहेबांच्या स्मृतीस
बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
भरकटलेल्या प्रतिक्रिया...
भरकटलेल्या प्रतिक्रिया...
Pages