प्रिय बाबासाहेब ,

Submitted by dr.sunil_ahirrao on 14 April, 2012 - 01:01

प्रिय बाबासाहेब,आज आम्ही आपलीच १२१ वी जयंती उत्साहाने,धुमधडाक्याने साजरी करतोय. बघाना,तुमची मोठमोठाली पोस्टर्स, होर्डिंग्स लावलीयेत सगळीकडे ! तुमच्या प्रतिमेजवळ ते बघा, तुमचे नाव सुद्धा उच्चारण्याची ज्यांची लायकी नाही- ते हरामखोर पुढारी,गल्लीबोळातले विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि गावगुंड,मवाली ,भामटे,भुरटे कसे येऊन बसलेत ! तुमच्या फोटोपेक्षाही त्यांचे फोटो मोठाले आहेत. जणू काही त्यांचीच जयंती आहे,आणि तुम्ही त्यांना अभिवादन करताहात...फार वाईट वाटलं बाबासाहेब. या हरामखोरांची किळस वाटली.अरे थूत या मुर्ख प्रसिद्धीलोलुपांच्या जिंदगानीवर!!!

तुमच्या जयंती आणि पुण्यतिथीला तुमची कोणालाच अलर्जी नसते बाबासाहेब.सारे वर्ग,धर्म,पंथ,जाती,सारे पुढारी सगळेच तुमच्या नावाचा आधार घेतात. आज जवळजवळ प्रत्येक शहरात,गावात तुमचा पुतळा आहे. रस्ते ,पत्ते समजण्यासाठी पुतळ्यांचा चांगला उपयोग होतो,हे भारतीय सरकार आणि नागरिकांना खूप पूर्वीच कळले आहे. मग भले तिथे वर्षभर कावळ्यांचा वास असतो. मात्र तुमच्या जयंती,पुण्यतिथीला हे मानवी कावळे तुमच्या पुतळ्याकडे धाव घेतात.कधी नव्हे ते तुमच्या पुतळ्याला घासून पुसून साफ करतात.(ही अवस्था फक्त तुमचीच नाही बाबासाहेब,इथेही सर्वधर्मसमभाव आहेच ना ! शिवाजी महाराजांची,गांधीजींची,सुभाषबाबूंची,सावरकरांची सगळ्यांचीच अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही ;तर ते असो.)

.....ते बघा पुढारी आलेत सोबत पत्रकार,फोटोगाफ्रर. बघा कसे हसून पोज देताहेत हे लोक तुमच्या पुतळ्याला हार घालताना; उद्याच्या पेपरात येईल ना तो ! बघालच तुम्ही उद्या तुमच्याच पायाशी उडत आलेला एखादा रद्दी पेपर..कोणत्याच पुढाऱ्यांची कोणत्याही विषयावरची भाषणे तुमच्या उल्लेखाशिवाय पूर्ण नाही होत,बाबासाहेब. कारण जातीभेद मनातल्या मनात पाळायचे असतात,हे सर्व पुढाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. फार दु:ख वाटते बाबा सांगताना, रडायला येतय..आजही तुम्ही अस्पृश्यच आहात बाबा...!

आणि तुमचे तथाकथित अनुयायी काय करताहेत? तुमच्या नावाची ढाल पुढे करून तुमचीच मूल्ये पायदळी तुडवत आहेत. तुम्ही तुमच्या अनुयायी आणि तमाम पुढारी मंडळींसाठी भक्तीपेक्षा राजकारणातले चलनी नाणे बनून गेलात बाबा !

असे असूनही,तुम्ही सगळीकडे भरून राहिला आहात, कायद्याच्या पानापानांतून भारतीय राज्यघटनेवर,नव्हे भारताच्या जीवनपद्धतीवर,भारताच्या संविधान नावाच्या धर्मावर! तुमच्या राज्यघटनेचा रथ या बैलांना नाही पेलवत बाबा! म्हणून आता कदाचित आम्हाला नवीन अश्व आणावे लागतील.आणि नवीन सारथी! जिथे जिथे सामाजिक न्यायाचा प्रश्न उद्भवेल,तिथे तुमच्याशिवाय पर्यायच नाही बाबा ! तुमच्याच म्हणण्याप्रमाणे हा देश कधीतरी जाती,धर्म,पंथभेद सोडून एक होईल.या देशावर तुमची कृपादृष्टी असू द्या !
आपला,
आपल्याच संविधानातल्या,
भारतीय नागरिकाच्या व्याखेत सामील होण्यासाठी धडपडणारा एक सामान्य मनुष्य....

गुलमोहर: 

.(ही अवस्था फक्त तुमचीच नाही बाबासाहेब,इथेही सर्वधर्मसमभाव आहेच ना ! शिवाजी महाराजांची,गांधीजींची,सुभाषबाबूंची,सावरकरांची सगळ्यांचीच अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाही ;तर ते असो.)>>>>>

या लेखात आपण माझ्यासारख्या अनेकांच्या मनातील भावना अगदी अचूक व्यक्त केल्या आहेत.अस म्हणतात की महापुरुषांना दोनदा मृत्यू येतो. एकदा जेव्हा ते शरीर त्याग करतात अन दुसरा जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीच्या विपरीत वर्तन करतात. आपल्या महापुरुषांची अशी संभावना कराणारे असे करंटे जगात कुठेही नसतील. Sad

@श्रीकांत
"अस म्हणतात की महापुरुषांना दोनदा मृत्यू येतो. एकदा जेव्हा ते शरीर त्याग करतात अन दुसरा त्यांच्या अनुयायांकडून ..... >>>>>

अतिशय खरे आहे

आज काल बाबासाहेबांच्या आणि इतर थोर व्यक्तींच्या नावाने जी जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते तिला आळाच घातला पाहीजे......वर्गणीच्या नावाने अक्षरशः खंडणीच वसुल केली जाते ... ११०००/- २५०००/- असाच आकडा असतो.. अश्या कार्यक्रमांना बंदीच घातली पाहीजे.. जागो जागी कसले मुर्खपणाचे बॅनर लागलेले असतात..४० फुटी ५० फुटी बॅनर ... आणि त्यावर कोणाचे फोटो..? खंडणी बहाद्दरांचे.. २री-३री तल्या पण मुलांचे फोटो लावलेले असतात... अक्षरशः किव येते असल्या मुर्ख लोकांवर.......... महापालिकेने अश्या बॅनर वर बंदी घालायला हवी.. नाहीतर जबर फी आकारण्यात यावी....

महापुरुषांचा पराभव असा एक धडा होता नववी किंवा दहावीला.. त्यात महापुरुषांचे अनुयायीच कसा त्यांचा पराभव करतात ह्याचे उत्तम विश्लेषण होते...

चान्गले लिहीलय Happy
>>> तुमच्या राज्यघटनेचा रथ या बैलांना नाही पेलवत बाबा! <<< सहमत

>>> म्हणून आता कदाचित आम्हाला नवीन अश्व आणावे लागतील.आणि नवीन सारथी! <<< कुठून आणणार? आहेत ते बैल देखिल तुमच्याआमच्यातुनच निवडून जातात ना? त्यामुळे शन्का येते की तुम्ही जे नविन अश्व अन सारथी आणायचे म्हणताय ते आयात असणारेत का?

आजच्या सकाळ मध्ये अहमदपूरची बातमी आहे , तेथील भंते काल भर दुपारी उन्हात डॉ. बाबासाहेबांच्या
पुतळ्यासमोर बसले व डॉल्बीवर इतर गाण्यांऐवजी भीमगीतेच मिरवणुकीत लावली जातील व दारु विरहीत मिरवणुकीचे आश्वासन मिळवून त्यांनी धरणे सोडले.

असेच प्रत्येक गावात व सगळ्याच मिरवणुकांमध्ये (इतर महापुरुष) झाले तर किती बरे होईल .

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दिला होता. त्याप्रमाणे त्यांचे अनुयायी वागतात का?

स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण लोक शिकले. त्यांना खुल्या गटात स्पर्धा करावी लागल्यामुळे संघर्ष आपसूकच करायला लागला. जागतिकीकरणामुळे उत्पन्न झालेल्या अनेक संधी बऱ्याच ब्राह्मणांनी पटकावल्या. असे इतर जातीचे लोकही आहेत, पण तुलनेने कमी. हे सगळं अजिबात संघटन न करता. संघटित झाले असते तर बरंच वेगळं चित्रं पाहायला मिळालं असतं. तर मग ब्राह्मण (आणि एवंगुणविशिष्ट अन्यजातीय लोक) हीच खरी आंबेडकरी जनता म्हणावयास पाहिजे.

याउलट तथाकथित दलित पुढारी शिकले ते केवळ अक्षरओळखीपुरते. संघर्ष केला तो केवळ स्वार्थ साधण्यापुरता. समाजाला संघटित केलं ते नुसत्या वैयक्तिक शक्तीप्रदर्शनासाठी. यामुळेच की काय, रिपब्लिकन पक्ष महार/नवबौद्ध यापलीकडे विस्तारला नाही. दलितांबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगून म्हणावंसं वाटतं की आज त्यांना दुसऱ्या बाबासाहेबांची गरज आहे. हे शिवधनुष्य उचलणारा कोणी आहे का माईका लाल?

-गा.पै.

तुमच्या आमच्या मनातला आक्रोश आपण प्रभावीपणाने व्यक्त केला आहे. धन्यवाद!
>>हा देश कधीतरी जाती,धर्म,पंथभेद सोडून एक होईल<<
आशावादी राहावे एवढेच आपल्या हाती दिसते. बाकी या समाजाचे जितके तुकडे करता येतील तितके करणे हेच जणू आपले ध्येय आहे असेच वातावरण आहे.

आज त्यांना दुसऱ्या बाबासाहेबांची गरज आहे.

काही गरज नाही. बाबासाहेबांनी दलितांना एक नवी दृष्टी दिलीय. आता त्याचा वापर करून पुढे काय करायचे हे प्रत्येकाने ठरवायचे. प्रत्येकवेळी दुसरा कुणी येऊन आमचा उद्धार करेल ही अपेक्षा का? आता अम्हीच आमचा उद्धार करू घेऊ ही जाणीव का नको?
बाकी सगळे दलित रिपब्लिकनाना वोट करतात असे मुळीच नाही. किंवा रिपब्लिकनाना वोट करणारे १०% ही नाहीत.

आणि तुमचे तथाकथित अनुयायी काय करताहेत? तुमच्या नावाची ढाल पुढे करून तुमचीच मूल्ये पायदळी तुडवत आहेत. तुम्ही तुमच्या अनुयायी आणि तमाम पुढारी मंडळींसाठी भक्तीपेक्षा राजकारणातले चलनी नाणे बनून गेलात बाबा !
------- भावना समजतो... दुर्दैवाने ते थोडेबहुत सर्वच महान-मानवांच्या बाबत लागू पडते.

घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन.

मी आत्ताच आंबेडकर जयंतीनिमित्त चौकाचौकात उभारलेले ओपन डिस्कोथेक बघून आलो.... काय एकेक अनुयायी बाबासाहेबांच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचत होते... व्वा!

तुमच्याच म्हणण्याप्रमाणे हा देश कधीतरी जाती,धर्म,पंथभेद सोडून एक होईल. >>> तसं झालं तर भारतात एक सोनेरी पर्व सुरु होईल .कधी येईल का तो दिवस ?

नाचत होते तर नाचू द्या ना.. एक दिब्वस नाचलं तर बिघडलं कुठं? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही तोच डिस्को गणपतीला आणा आणि तुम्हीही नाचा .. Happy

नाचणे म्हणजे आनंद व्यक्त करण्यात यांत गैर काय आहे ? नव्हे त्यांनी नाचावे, यथेच्च नाचावे... त्याच सोबत त्यांचे काही गुण पण शिकता येतील का या साठी प्रयत्न करावेत.

जरा उघड्या डोळ्याने बघा ते अंगविक्षेप... आनंद कसला डोंबलाचा आणि बरेच काही काही व्यक्त होत होते!
लोकांच्या पैश्याने स्पीकरच्या थप्प्या रचून आजूबाजूच्या रहिवाश्यांना शक्य होइल तितका त्रास देण्यात कुठला हिडिस आनंद?
आणि पुन्हा वरुन काही बोलायचे चोरी.... झुंडीने झोडपायला सोकावलेलीच असती ही भरकटलेली तरुणाई!

>> फार दु:ख वाटते बाबा सांगताना, रडायला येतय..आजही तुम्ही अस्पृश्यच आहात बाबा...!
अगदी खरे... भेद कधीच मीटला नाही व राजकारनी लोकांनी तो कधी मिटू दिला नाही.

जागो - या लेखातुन फक्त तेवधेच घ्यावसे वाटावे !!!!

>>राजकारनी लोकांनी तो कधी मिटू दिला ना>>>>
उगा राजकारणी लोकांवर कशाला खापर फोडायचे, ज्यांना वर यायचे असते ते कश्याही परिस्थितीतुन येतात आणि अशी अनेक उदाहरणे आहेत पण ज्यांना पुर्वापार झालेला अन्याय वगैरे कुरवाळत बसायचे असते त्यांना बाबासाहेब काय कुणीच सुधारु शकणार नाही!

गणपती काय किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने होणार्‍या चुकिच्या गोष्टींची चर्चा चालली आहे.

सर्व समाज सहभागी होऊ शकेल अशी नवी अनुकरणीय पध्दत जर आणली तर हा चुकिचा पायंडा बंद होईल.

केवळ टिका करुन प्रश्न सुटणार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मण लोक शिकले. त्यांना खुल्या गटात स्पर्धा करावी लागल्यामुळे संघर्ष आपसूकच करायला लागला. जागतिकीकरणामुळे उत्पन्न झालेल्या अनेक संधी बऱ्याच ब्राह्मणांनी पटकावल्या.

वा! कायपण प्रगतीच्या कल्पना! आंतररष्ट्रीय/ बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी! आणि शेतीची कामे, गुरे वळणे, देशात सरकारी नोकर्‍य करणे, सैन्यात जाणे यात असलेले बहुजनांचे योगदान याना दिसत नाही! पैलवानममा, सगळेजण मायक्रोसॉफ्टात नोकरी करत बसले, तर लोकाना अन्न निर्माण करणे, सैन्यात जाणे, ही कामे कोण करनार? तुमच्या दृष्टीने हे योगदान कमी महत्वाचे बहुतेक नै का! हा काय आधुनिक वर्ण विचार का हो?

दलितांचे नेते स्वार्थासठी लोक जमवतात म्हणे! मग तुमचे कमळवाले लोक देशप्रेमासाठी लोक जमवतात काय हो?

रान डुक्कर,

उदारीकरण झाल्यानंतर सरकारी माध्यमांनी भारताची लूट सुरू होणार असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र भारतीय लोक भारतात राहूनही जागतिक आव्हाने पेलू शकतात. हे ज्या लोकांनी दाखवलं त्यात बरेच ब्राह्मण आहेत.

अन्न कोण पिकवणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याबद्दल दुमत नाही. मात्र काँग्रेस सरकार शेतकर्‍यांना काय लायकीने तोलतंय ते दिसतं! सैन्यात जाऊन भारताचं रक्षण करणे हेही महत्त्वाचं कार्य आहे. मात्र सरकारच जर इथे भेकडकसाबला पोसत असेल तर अद्ययावत सैन्याचा काय उपयोग?

केवळ सरकारी जाच नको म्हणून भारताच्या फायद्याचीच पण वेगळी वाट चोखाळली तर काय चुकीचं आहे? ब्राह्मणांना अन्न पिकवता येत नाही वा सैन्यात भरती होण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे हा त्यांचा गुन्हा नाही. तरीही आपण याला आधुनिक वर्णविचार म्हणणार असाल तर खुशाल म्हणा.

आ.न.,
-गा.पै.

प्रत्येक काम हे महत्वाचे आहे. मग ट्रक, रिक्षा चालवणे, शेतीची कामे, सैन्यात जाणे, रस्ता साफ करणे, शिक्षक/ प्राध्यापक आणि आजच्या काळात बहुराष्ट्रिय कंपनी मधे.... सैन्य आणि शेतीची कामे महत्वाची आहेतच त्याच प्रमाणे आधुनिक खते, बियाणे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बहुराष्ट्रिय कंपन्या चालणे चालवणे पण देशहिताचे आहे. बहुराष्ट्रिय कंपन्या देशातील जनतेच्या गरजेच्या वस्तू (खते, बियाणे, मोबाईल फोन, दुरदर्शन संच किंवा संगणक असेल, उर्जेसाठी लागणारे युरेनियम असेल) पुरवण्याचे कार्य करत आहेत.... ते पण महत्वाचेच आहे. सर्व कामे एकमेकांवर पुरक असे आहे.

कुठलेही काम कमी महत्वाचे नाही आहे हा दृष्टिकोन का स्विकारला जात नाही. माझ्या मते, एखादी व्यक्ती निव्वळ काम करत (घरांत भांडे घासणे, पोळ्या करणे हे पण माझ्यासाठी कामच आहे) आहे हेच आदराला पात्र ठरते.

सरकारी नोकर्‍या जनतेच्या संख्येच्या मानाने अत्यंत कमी आहेत, घरी शेती नाही, सैन्यात भरती होण्यासाठी काही निकषे असतांत ते सर्वांकडेच नाही आहेत तर अन्य काही मार्ग शोधणे गरजेचेच आहे.... गरजवंतांची गरज सहानभुतीने समजायला काय हरकत आहे?

मनाची नाही तरी जनाची लाज बाळगा...गामा..
घरचे संस्कार काय आहेत दिसून येते....
टीमकी वाजवण्याची सवय गेली नाही ..? Happy

उत्तम लेख, कळकळ पोचली.

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

महापुरुषांचा पराभव असा एक धडा होता नववी किंवा दहावीला.. त्यात महापुरुषांचे अनुयायीच कसा त्यांचा पराभव करतात ह्याचे उत्तम विश्लेषण होते...>>>>>>>>>> +१
पण हे चित्र ही आपण च बद्लायची गरज आहे Happy

मात्र भारतीय लोक भारतात राहूनही जागतिक आव्हाने पेलू शकतात. हे ज्या लोकांनी दाखवलं त्यात बरेच ब्राह्मण आहेत.

Proud

Biggrin

एक कुत्रं असतं. ते एका बैलगाडीखालुन चाललेलं असतं. गाडी पुढे गेली की कुत्रंही पुढं जात असतं. वास्तविक त्या गाडीच्या सावलीचा फायदा कुत्र्याला होत असतो. पण कुत्र्याला उगाच्च वाटत असतं.. की गाडी आपल्यामुळेच चालत आहे. कारण आपण पुढे गेलो की गाडीही पुढे जाते हे त्याचं गृहीतक! Proud

पैलवानमामा, तुमच्यात/ 'भ्रम'वृंदात आणि त्या कुत्र्यात फारसा फरक नाही... तुमची ब्रह्मवृंदाची एकूणच संख्या- सगळी म्हातारी कोतारी, बाळं वगैरे धरुन भारताच्या ३ टक्के सुद्धा नाही... हे सगळेच्या सगळे जरी जिवापाड काम करतात असे मानले, तरी डोमेस्टिक काय आणि इंटरन्याशनल काय, कुठलेच मार्केट यांच्या एकट्याच्या जिवावर कसे चालेल? पण खोट्या भ्रमाची ब्रहमानंदी टाळी लागली की त्या कुत्र्यासारखी अवस्था होते. Proud गाडीच्या सावलीचा स्वतः फायदा घ्यायचा आणि गाडीच आपल्यामुळे चालत आहे हा वर दावाही करायचा! गाडी ओढणारे बैल आणि फिरणारी चाकं वेगळीच! Rofl Biggrin Proud

मात्र भारतीय लोक भारतात राहूनही जागतिक आव्हाने पेलू शकतात. हे ज्या लोकांनी दाखवलं त्यात बरेच ब्राह्मण आहेत.

हे-खूप-पोटँशियल-स्फोटक-असलेले-वाक्य-आहे.

ब्रह्मवृंदाची एकूणच संख्या- सगळी म्हातारी कोतारी, बाळं वगैरे धरुन भारताच्या ३ टक्के सुद्धा नाही... हे सगळेच्या सगळे जरी जिवापाड काम करतात असे मानले, तरी डोमेस्टिक काय आणि इंटरन्याशनल काय, कुठलेच मार्केट यांच्या एकट्याच्या जिवावर कसे चालेल?
-सहमत.

>>>> ब्रह्मवृंदाची एकूणच संख्या- सगळी म्हातारी कोतारी, बाळं वगैरे धरुन भारताच्या ३ टक्के सुद्धा नाही... हे सगळेच्या सगळे जरी जिवापाड काम करतात असे मानले, तरी डोमेस्टिक काय आणि इंटरन्याशनल काय, कुठलेच मार्केट यांच्या एकट्याच्या जिवावर कसे चालेल?
-सहमत. <<<< Lol Lol Lol
अन हे जर खरहे सहमत होण्याइतपत, की ३ टक्के सगळेच्च्यासगळे कामास लागले तरी त्यान्च्या जिवावर काही चालत नाहीच, तर मग केवळ ३ टक्केन्च्यामुळे दुरितावस्था आली, अन साठ वर्षानन्तरहि दूर झाली नाही हा कान्गावा तरी कशासाठी? नै का? Proud

>>>> ब्राह्मणांना अन्न पिकवता येत नाही वा सैन्यात भरती होण्याची त्यांची क्षमता मर्यादित आहे हा त्यांचा गुन्हा नाही. तरीही आपण याला आधुनिक वर्णविचार म्हणणार असाल तर खुशाल म्हणा. <<<
गामा, मूळ गृहितकालाच असहमती. ब्राह्मणाला अन्न पिकवता येत नाही वा सैन्यात जात नाहित यासच मी असहमति दर्शवितो. पण बीबीचा मूळ विषय भिन्न असल्याने यावरचे अनुभवसिद्ध विचार इथे मान्डत नाही. विपुत डकवतो. असो.

लिंबुभाऊ,

दूध तयार व्हायला शेतकरी, म्हैस, गवत, पाणी , बैल (!) असे ढीगभर फ्याक्टर कारणीभूत असतात. पण नासवायला मिठाचा एक खडाही पुरतो... चांगले घडायला अनेक फ्याक्टर कारणीभूत असतात.. पण वाइट घडायला एखादाच फ्याक्टर अगदी कमी क्वांटीटीत असला तरी पुरतो!. त्यामुळं इतराना दुरितावस्था आली तर त्याला भ्रमवृंद कारणीभूत नाही, ( कारण कमी क्वांटिटी) हे पटणारे नाही.

मग केवळ ३ टक्केन्च्यामुळे दुरितावस्था आली, अन साठ वर्षानन्तरहि दूर झाली नाही हा कान्गावा तरी कशासाठी? नै का?

याच्याशी-डबल-सहमत.

दुरितावस्था-का-आली-याचा-माझ्या-परीने-शोध-घेणे-चालूच-आहे.

खालच्या-मानल्या-गेलेल्या-जातींच्या-दुरितावस्थेविषयी-फक्त-आणि-फक्त-ब्राह्मण-जबाबदार-आहे-हा-दृष्टिकोन-कधीच-पटला-नाही.
रादर-आपणच(त्या-जातीतील-लोकच)-जबाबदार-आहोत-असंच-वाटतं.अभ्यास-चालू-आहे.

सध्या-मी-ज्या-गावात-राहाते-तिथे-ब्राह्मण-मुठभरही-नाहीत.त्यांचा-सामाजिक-आर्थिक-आणि-राजकीय-इतकेच-काय-पण-धार्मिक-जीवनावरही-काडीमात्र-प्रभाव-नाही.
बहुतांश-समाजास-कोणतीही-धार्मिक-कार्ये-करायला-ब्राह्मण-लागत-नाही.
किंबहुना-ब्राह्मण-म्हणून-जगण्यातच-फार-अडचणी-आहेत.आणि-ही-आजची-स्थिति-नाही.
किमान-५००-वर्षांपासूनची-आहे.
तरिही-खालच्या-जातींची-संकल्पना,प्रचंड-जातीभेद,जातीधारित-राहाण्याच्या,अगदी-पाणी-पिण्याच्या-व्यवस्था-हे-आहेच.

Pages