गेले काही दिवस वर्तमानपत्रात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेसंबंधी बातमी गाजत आहे. मुलगाच हवा या हव्यासापोटी बंगळूरूमधे एका बापाने मुलगी झाली म्हणून नाराज होऊन त्या मुलीला सतत शारिरीक क्लेश दिल्याने तिचा मृत्यू झाला. तपशीलात फार अधिक लिहीणे मला अशक्य आहे. तसेच बातमी जगजाहीर असल्याने उगाच पाल्हाळही नको.
मला सगळ्यात चीड आली ती पुढील बातमीत त्या पत्रकाराने किंवा संपादकाने जे प्रकाशचित्र छापायचा निर्णय घेतला ते बघून. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात तारतम्य म्हणजे काय ते शिकवत नसतील असे नव्हे, पण मग ते काय परीक्षा दिली की तिथेच ठेऊन बाहेर पडायचं का? अभ्यासक्रमात शिकवो न शिकवो, काही गोष्टी यांना समजत नाहीत का? की सवंग लोकप्रियता आणि जास्तीतजास्त खपाच्या हव्यासापोटी वर्तमानपत्रांनी अक्कल गहाण टाकली आहे? कुठले फोटो फोटो छापायचे याची अक्कल कधी येणार या लोकांना?
या ठिकाणी फोटोत फक्त रडणारी आई दाखवून भागलं नसतं का? हा असा छापला असता तर?
त्या बातमीचा दुवा - पूर्ण फोटो तिथेच बघायला मिळेल:
http://punemirror.in/article/4/20120412201204120315256874dc42755/Baby-Af...
ते प्रकाशचित्र पाहिल्यावर मी इतका हादरलो की संपादकांना पुढील प्रतिसाद लिहीला आहे:
Story is really hard rending, but I sincerely wish Pune Mirror stop carrying photographs of dead babies. It is not appropriate, in addition to being extremely disturbing. I hope the editor understands what I am trying to say here.
तुमच्यापैकी कुणी याच्याशी सहमत असल्यास कृपया अशा अर्थाचा प्रतिसाद तिथे लिहावा.
बातमीच्या खालीच प्रतिसादाचा फॉर्म आहे. तिथे आपण आपला प्रतिसाद लिहू शकता.
लोकांची सत्य माहीती असूनही ते
लोकांची सत्य माहीती असूनही ते स्वीकारायची मानसिकता नसते. हा फोटो काही संवेदनशील लोकांना त्रासदायक ठरला असेलही पण कित्येकांची मानसिकता अशी आहे की हा फोटो छापला नसता तर काही बिघडले असते का...यामागे नक्की कारण काय आहे...वाचकाभोवतीचे सुरक्षित उबदार वातावरण खसकन ओरबाडून वास्तव जगातील भयाण वास्तव अतिशय बटबटीतरित्या सामोरे आणल्याची नाराजी आहे का?
>> याला अनुमोदन. आशुचँपची पूर्ण पोस्ट उत्तम आहे.
फोटो पाहून त्रास होतोय ना??? तो व्हायलाच हवा. तुमचे मन अजून मुर्दाड झालेले नाही, याची ती साक्ष आहे. आता पुन्हा कधी अशी घटना दिसलीच तर त्या घटनेविरूद्ध आवाजदेखील उठवता आला पाहिजे. तर त्या बातमीने तुमच्या मनावर योग्य तो परिणाम केलाय. नाहीतर दोन क्षण हळहळण्याव्यतिरिक्त दुसरे काही नाही. मात्र, असं काही घडतच नाहीत म्हनून शहामृगासारखे मान लपवून बसणे हेच वाचकाना जास्त आवडते. घडलं तरी "आमच्या मनाचा विचार करून मग फोटो छापा" हा खरोखर भाबडेपणा आहे. रेशमाचा रडणारा आक्रोश बघून कुणाला काही फरक पडणार नाही. हातात बाळाचे प्रेत घेतलेल्या आईचा फोटो बघून मात्र जीव तुटतोय. हाच परीणाम अपेक्षित आहे संपादकाला. टॅब्लोईड हे सेन्सेशनल बातम्या छापणारच की. धंदा आहे तो त्यांचा.
मंदार, जाहिरातदाराच्या प्रभावाखाली हे फोटो छापलेत असे माझे विधान नाही. कृपया गैर अर्थ नकोत. मी पहिल्या पोस्टमधे दिलेली लिंक पूर्ण वाचणे.
असा नियम आहे की बलात्कारित स्त्रीची ओळख पटेल असा मजकूर किंवा छायाचित्र येता कामा नये. आणि बहुतांशी वृत्तपत्रे कटाक्षाने तो पाळतातही.>> नियम नाही, तो कायदा आहे. त्यामुळे पाळावाच लागतो.
'डिग्निटी ऑफ अ डेड बॉडी' हा विचार करून तसे फोटो छापत नाहीत हा संकेत असल्याचं वाचलं होतं>> हा खूप जुना संकेत आहे. तेव्हा फोटोशॉप वगैरेनी भाग धुसर करणे शक्य नव्हते. मुळात वर्तमानपत्रात फोटो छापणे हे तेव्हा फार मोठी बाब असायची. तेव्हादेखील नेत्यांची अथवा प्रसिद्ध व्यक्तीची "अंतिम दर्शन" फोटो अवश्य छापले जात. कारण, वाचकाना ते फोटो बघायचे असत. अपघातग्रस्त/रक्ताळलेले/अवयव तुटलेले असे फोटो छापू नयेत हा संकेत बर्याचदा पाळला जातो. अपवाद आर्थात टॅब्लॉईड्स आणि पोलिस टाईम्स व तत्सम वर्तमानपत्रे.
तुलनेने आपल्याकडे ईलेक्ट्रॉनिक माध्यमे नविन असल्याने त्यामधे अजून असे नियम्/कायदे केले गेले नाहीत.
आता पुन्हा कधी अशी घटना
आता पुन्हा कधी अशी घटना दिसलीच तर त्या घटनेविरूद्ध आवाजदेखील उठवता आला पाहिजे. तर त्या बातमीने तुमच्या मनावर योग्य तो परिणाम केलाय. नाहीतर दोन क्षण हळहळण्याव्यतिरिक्त दुसरे काही नाही. मात्र, असं काही घडतच नाहीत म्हनून शहामृगासारखे मान लपवून बसणे हेच वाचकाना जास्त आवडते. घडलं तरी "आमच्या मनाचा विचार करून मग फोटो छापा" हा खरोखर भाबडेपणा आहे. रेशमाचा रडणारा आक्रोश बघून कुणाला काही फरक पडणार नाही. हातात बाळाचे प्रेत घेतलेल्या आईचा फोटो बघून मात्र जीव तुटतोय. हाच परीणाम अपेक्षित आहे संपादकाला. टॅब्लोईड हे सेन्सेशनल बातम्या छापणारच की. धंदा आहे तो त्यांचा.
>>>>>>>>>>>>>>>
१००% अचूक पोस्ट.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12656796.cms >>>>>>>>>>>
घ्या ही बातमी......... मुलीला सोडुन निघुन गेले पालक.......अश्यानां पण शिक्षा झालीच पाहीजे
मी वर लिहिलेच आहे कि, असे
मी वर लिहिलेच आहे कि, असे फ़ोटो बघून विचलीत होणारी हि तूम्हा
लोकांची शेवटची पिढी असेल..
लोकसत्तामधील, चतुरंग पुरवणीतील, करिअरिस्ट मी, या सदरातील डॉ. वसुधा आपटे,
यांच्या परिचयपर लेखातील, त्यांचे हे दोन अनुभव वाचा. त्यातली भीषणता पोहोचते
कि नाही, तेसुद्धा केवळ शब्दातून .
या अनवट वाटेवरून चालताना मन विषण्ण करणारे अनुभव येणं अपरिहार्य होतं. एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या २७-२८ वर्षांच्या तरुण स्त्रीची बॉडी शवचिकित्सेसाठी आली. ही बाई राहत होती त्या चाळीची दुरुस्ती सुरू होती. कठडे तुटले होते. पहाटे अर्धवट झोपेतच ती केर टाकायला म्हणून गॅलरीतून वाकली आणि काय होतंय ते कळायच्या आत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिच्या मरणोत्तर चिकित्सेचं काम माझ्याकडे आलं. त्या वेळी ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटातलं पूर्ण वाढ झालेलं मूलही अर्थातच मृत झालं होतं. ते दृश्य बघून आम्ही डॉक्टरच नव्हे, तर पोस्टमॉर्टेम बघायला उभे असलेले मेडिकल कॉलेजचे विद्यार्थीही हळहळले. तिच्याबरोबर जो जमाव आला होता, त्यापैकी बहुतांश स्त्रिया होत्या. त्यातील एका प्रौढ स्त्रीने पहिला प्रश्न केला, ‘पोटात मुलगा होता की मुलगी?’ तो मुलगा होता हे कळल्यावर त्यांनी मोठा गळा काढून रडायला सुरुवात केली. एवढी तरणीताठी मुलगी गेली त्याचं त्यांना काहीच सोयरसुतक नव्हतं.
याउलट एकदा एक वेश्या पूर्ण दिवस भरल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. तिला झालेला मुलगा गुटगुटीत आणि तिच्यासारखाच देखणा होता, पण जेव्हा तिला कळलं की मुलगा झाला तेव्हा ती धाय मोकलून रडायला लागली. म्हणत होती, ‘आमच्या धंद्याला मुलाचा काय उपयोग?’ नॉर्मल डिलिव्हरी झाल्याने तीन दिवसांत ती घरी जाणार होती, पण जायच्या आदल्या दिवशी वॉर्डात एकच आरडाओरडा झाला. ती बाई मोठमोठय़ाने ‘माझं बाळ, माझं बाळ’ करीत आकांत करू लागली. वॉर्ड सिस्टरने बघितलं तर जवळच्या पाळण्यात तिचं बाळ होतं, पण ते मरण पावलं होतं. नियमाप्रमाणे बाळाला तपासणीसाठी घेतलं तेव्हा ती बाई अस्वस्थ झाली. म्हणू लागली, ‘याची काय गरज आहे. माझं बाळ तर गेलेलंच आहे.’ शवचिकित्सेनंतर एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला की, ‘बाळाचा गुदमरून मृत्यू झाला होता.’ बाळाचा ओठ आतल्या बाजूने मुडपला होता. त्यावर हिरडीचे व्रण होते. त्याला तोंडावर उशी दाबून त्याच्या जन्मदात्रीनेच मारलं होतं. मनाला दगड करणारे असे असंख्य अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=217452:...
deleted.
deleted.
>>टॅब्लोईड हे सेन्सेशनल
>>टॅब्लोईड हे सेन्सेशनल बातम्या छापणारच की. धंदा आहे तो त्यांचा.
अनुमोदन. असल्या वर्तमानपत्रांकडून यापुढे तरी अपेक्षा ठेवणार नाही. पण चुकीचं वाटल्यास निषेध आणि/किंवा तक्रार करणारच.
>>शहामृगासारखे मान लपवून बसणे हेच वाचकाना जास्त आवडते. घडलं तरी "आमच्या मनाचा विचार करून मग फोटो छापा" हा खरोखर भाबडेपणा आहे.
बरं बाबा. छापा काय छापायचंय ते. आम्ही मात्र असल्या प्रकारांचा निषेध व्यक्त करणारच.
>> रेशमाचा रडणारा आक्रोश बघून कुणाला काही फरक पडणार नाही.
काहीच्या काही. असं कोण म्हणालं? जे घडलं ते वाईटच आहे. ते फक्त तिचा फोटो छापल्यामुळे पोहोचलं असतं की!!!
>>हातात बाळाचे प्रेत घेतलेल्या आईचा फोटो बघून मात्र जीव तुटतोय. हाच परीणाम अपेक्षित आहे संपादकाला.
कुणावर परिणाम होणार आहे?? मी आधीच्या पोस्ट मधे जे बोललोय ते पुन्हा वाचणे. शोधण्याचे कष्ट नको म्हणून पुन्हा देतोय:
स्त्री-भ्रूणहत्या चुकीची आहे याची जाणीव ज्यांना आहे त्यांना आहेच, त्यांना ह्या फोटोचा त्रासच होणार - तो का व्हावा, त्यांची मते आणि आचार चांगला असताना???!! आणि ज्यांना नाही ही जाणीव, त्यांना या बातमीमुळे तर सोडूनच द्या, पण फोटोमुळेही काहीही फरक पडणार नाही. नराधम ते नराधमच राहणार. यासाठी लहानपणापासून होणारे संस्कार आणि पुढे झालेलं प्रबोधन या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. "मुलगा झाला तरी आनंद, मुलगी झाली तरी आनंद" अशी मानसिकता संपूर्ण समाजात जो पर्यंत तयार होत नाही, तो पर्यंत असले हजार फोटो छापले तरी समाजात काडीमात्र फरक पडण्याची शक्यता नाही. ही बातमी दाखवूनही "मुलगाच हवा, मुलगी असेल तर पाडून टाकू" अशी प्रतिक्रिया देणारे महाभाग मी शोधून दाखवतो. आत्ता बोला.
त्यामुळे असले फोटो छापल्यामुळे समाजात काही क्रांती वगैरे होते असा हास्यास्पद समज, निदान आम्हा पामर वाचकांचा तरी नाही.
वाचकांना शहामृगाची उपमा देणार्यांकडून अधिक अपेक्षा नाहीच. हेमाशेपो.
@भुंग्या
नुसतं अनुमोदन? तुझी काही स्वत:ची मतं असली तर दे की.
मंदार, संस्कृतमध्ये एक
मंदार, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा ' रत्नाने कोंदणाला आणि कोंदणामुळे रत्नाला शोभा येते. रत्नजडीत कोंदणाने हाताला शोभा येते' याचा अत्यंत निगेटीव्ह अर्थ लाऊन बघ इथे. झालेला प्रकार इतका भयानक आहे आणि त्या भयानकपणाची तिव्रता जाणवून देण्यासाठी निव्वळ धारधार शब्द पुरेसे नाहीत तेवढेच परीणामकारक छायाचित्र पण हवे.
पापभिरु माणसांना होणार्या त्रासाबद्दल म्हणशील तर आपण ज्या समाजात रहातो त्या समाजात जेंव्हा एखादी घटना घडते तेंव्हा त्याचे पडसाद आपल्यापर्यंत येणारच. चांगल्या घटनेचे चांगले पडसाद असतील तर वाईट घटनेचे वाईट पडसाद. भयानक घटनेचे पडसाद भयंकरच असतीलच.
Pages