ईशानी ची चित्रे

Submitted by चित्रा on 10 April, 2012 - 05:36

ईशानी ९ वर्षांची असून तिने या वर्षी ४ थी ची परिक्षा दिली आहे. हि चित्रे तिने केवळ पाहुन काढली आहेत.
अजून तरी आम्ही तिला चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही. या वर्षी मात्र ते द्यायचं असं ठरवलेलं आहे. Happy

IshaaniSutar-1.jpgIshaaniSutar-2.jpg

गुलमोहर: 

सुंदर आहेत चित्र.
अजून थोडा काळ तिच्या मनाप्रमाणे चित्रं काढू देत, मग नियमित क्लासला जाऊ देत.
त्या क्लासमधे जे शिकवतात, ते स्मरणचित्र, मुक्तहस्त चित्र, स्थिरचित्र, निसर्गचित्र
हे प्रकार पण आपल्या मनानेच काढू देत तिला.

बॉर्न कलाकार आहे ईशानी - तिला तांत्रिक ज्ञान देण्याचे मनावर घ्या - अगदी पैलू पाडलेल्या हिर्‍याप्रमाणे झळकेल भावी आयुष्यात - खूप शुभेच्छा तिला व तुम्हालाही.....

खुपच सुंदर चित्रे काढली आहेत लेकीने. स्ट्रोक्स अतिशय आत्मविश्वासाने काढलेले दिसताहेत. कृपया तिला योग्य मार्गदर्शन द्या जेणेकरुन तिच्यातला कलाकार बहरत जाईल.

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !!!

@ मोहन की मीरा, जागू, सुलेखा, निम्बुडा, जयू, सृष्टी, धनश्री - खूप खूप थांक्यू..

@दिनेशदा - मी आपला सल्ला नक्की लक्षात ठेवीन.

@ मामी, मिनू - मी जिथे क्लासची चौकशी केली आहे ना तिथले टीचर अगदी हेच म्हणाले होते Happy

@ आर्या आणि अंजली - कौतुका बद्दल खूप खूप धन्यवाद !!

@ शशांक - तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार !!

सुंदर.. हरीण फारच गोड काढलयं.. बोटात कला आहे तिच्या.
ईशानी (नाव पण मस्त आहे) ला खूप खूप शुभेच्छा!!!

Pages