मायबोलीवर अमराठी गोष्टींवर चर्चा करण्यासाठी नक्की निकष काय?

Submitted by HH on 9 April, 2012 - 13:56

बी यांनी वाचू आनंदे मधे उघडलेला अमराठी कवितांवरचा धागा बंद झालेला दिसला. त्यामुळे हा प्रश्न मनात आला. जिथे हा धागा बंद केला आहे त्याच ग्रुपमध्ये हॅरी पॉटर वर तब्बल ६००+ पोस्ट आहेत. डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकांवर गप्पा असाही धागा दिसतो. ईतरही अनेक अमराठी पुस्तकांवर चर्चा आहे. गायनी कळा ग्रुप मधे हार्डरॉक कॅफे तर पूर्ण इन्ग्रजी गाण्यांवरच आहे. उपग्रह वाहिनी या ग्रुप मधे बीबीसी व ईतर अमेरिकन सिरियल्स अशा नावाचा बीबी उघडण्यात आला होता तोही जिवंत आहे. चित्रपट ग्रुप मधेतर ९०% चित्रपट धागे हिंदी चित्रपटांवर आहे. हे सगळे चालते तर अमराठी कवितांचा बीबी का नाही चालला? नक्की निकष काय आहेत?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेबमास्तर, तुमच्या दोन्ही पोस्ट पटल्या. बीच्या धाग्यावर एकदमच धागा बंद करण्याआधी जर 'इथे ओळी लिहिणं अपेक्षित नसून रसग्रहण केल्यास चालेल, अन्यथा धागा बंद करण्यात येईल' अशी पूर्वसूचनाही देता आली असती.

नात्या, चांगलं लिहिलं आहेस.

वेमा, पुर्णपणे नाही पटलं. असो.

एक विचारतो -
ध्येय धोरणं ठरलेली असतात, असावीत ती बदलणं कठिण होतं. ती स्पष्टपणे कुठे लिहिलेली आहेत? असे धोरणांशी सुसंगत नसलेले धागे उघडलेच जाणार नाहीत असा काही कोड बनविता येणार नाही का?

यापूर्वीही या विषयाशी निगडीत विषयांवर झालेली चर्चा. म्हणूनच हा विषय या पूर्वी झाला आहे असे मी म्हटले होते.

इथेच का नको.....
http://www.maayboli.com/node/16454

>असे धोरणांशी सुसंगत नसलेले धागे उघडलेच जाणार नाहीत असा काही कोड बनविता येणार नाही का?>
नाही. हे तांत्रिकदृष्ट्या शक्य दिसत नाही. आणि जरी शक्य झाले तरी तो धागा नंतर दुसरीकडेच वाहणार नाहीच असे नाही.

Pages