जेवणानंतर काही गोडधोड - चायना ग्रास मसाला टॉवर्स

Submitted by मामी on 9 April, 2012 - 11:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ब्लूबर्ड (किंवा इतर कोणत्याही कंपनीची) चायना ग्रासची पाकिटं. किमान दोन फ्लेवर्स. प्रत्येक फ्लेवरची दोन टेबलस्पून चायना ग्रास पावडर. मी व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी हे दोन फ्लेवर्स वापरले आहेत.

दूध २ मेझरिंग कप, १०-१२ मारी बिस्किटे, अमुल बटर (१०० ग्रॅम), सजावटी करता केक स्प्रिंकल्स.

आणि सगळ्यात महत्त्वाचं - तीन प्रकारचे मसाले : दालचिनी, वेलची आणि जायफळ पावडर.

खास उपकरणी - ३ कप केक मोल्डस किंवा कुल्फी मोल्ड्स

क्रमवार पाककृती: 

मारी बिस्किटे मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात रूम टेंपरेचरला आणलेलं अमुल बटर थोडंथोडं करत मिक्स करता. बिस्किटांच्या चुर्‍याचा लाडू वळता आला की बटर घालणं बंद करा.

तीनही कपकेक मोल्ड्सना आतून बटरचा एक हात लावा आणि तळाशी केक स्प्रिंकल्स घाला. या स्प्रिंकल्सवर बिस्किटाच्या मिश्रणाचा एक थर द्या. पातळ चालेल फार जाड नको. (बिस्किटाचे तीन आणि चायनाग्रासचे दोन असे एकूण पाच थर एकूण असणार आहेत.) हे मोल्डस फ्रीजमध्ये ठेवा.

तीन बोलमध्ये तीनही प्रकारचे मसाले थोडे थोडे घाला. हवंतर बाऊल वेगवेगळ्या रंगाचे घ्या म्हणजे गोंधळ होणार नाही. नाहीतर चाखून पहायची सोय आहेच. Wink

आता एका सॉसपॅनमध्ये एक कप दूध घेऊन ते उकळे पर्यंत गरम करा. त्यात स्ट्रॉबेरी फ्लेवरचे दोन चमचे चायना ग्रास घालून मिश्रण घट्टसर होईपर्यंत ढवळा. गॅसवरून खाली काढून थोडं गार होऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा नाहीतर ते सेट होईल. जरा गार झालं की वरील तीन मसाल्यांच्या बोल्समध्ये थोडं थोडं घालून मसाला आणि ते मिश्रण चांगलं एकत्र करा. फ्रीजमधून तीन मोल्डस काढून त्यात एका मोल्डमध्ये एक मसाला या तत्वानुसार या तीन वेगवेगळ्या चायनाग्रासचा थर द्या.

इथे पुन्हा कोणत्या मोल्डमध्ये कोणत्या मसाल्याचा थर दिला आहे हे लक्षात ठेवा. या थरावर अजून दोन बिस्किटाचे आणि एक चायनाग्रासचा थर येणार आहे हे लक्षात ठेवा. पुन्हा हे मोल्डस फ्रीजमध्ये जाऊ द्यात.

दोनेक मिनिटांत चायना ग्रास सेट होईल. मग हे मोल्डस काढून त्यात एक बिस्किटांचा थर द्या की पुन्हा रवानगी फ्रीजमध्ये!

आता दुसर्‍या सॉसपॅनमध्ये उरलेलं एक कप दूध उकळवून व्हॅनिला फ्लेवरचं चायना ग्रास घाला. आधीच्याप्रमाणे मिश्रण दाटसर झाल्यावर खाली उतरवा. पुन्हा वेगळे तीन बोल्स तीन मसाले घालून तयार ठेवा आणि थोडंथोडं व्हॅनिला चायना ग्रास त्या बोल्स मध्ये घाला आणि एकत्र करा. मोल्ड्स काढून त्यात आधीच्या वेलची स्ट्रॉबेरीच्या बोलमध्ये वेलची व्हॅनिला फ्लेवर, दालचिनी मध्ये दालचिनी आणि जायफळात जायफळ असे चायनाग्रासचे दुसरे थर द्या.

पुन्हा दोन मिनिटांकरता फ्रीज दाखवून आणा आणि मग शेवटचा बिस्किटांचा थर देऊन फ्रीजमध्ये पाठवणी करा.

आयत्यावेळेस एक पातळ सुरी मोल्डसच्या आतील कडांवरून फिरवून हलकेच सोडवून घ्या. आणि प्लेटमध्ये आपटून काढा. चायना ग्रास मसाला टॉवर्स तय्यार!

हे साहित्य. केशरी बोलमध्ये मारी बिस्किटांचा चुरा आहे.

ch1.jpg

हे मारी बिस्किटांचा चुरा आणि बटर यांचं मिश्रण :

ch8.jpg

तीन प्रकारचे मसाले - वेलची, जायफळ आणि दालचिनी

ch2.jpg

हे मोल्ड्स. उंचीचा अंदाज येण्याकरता :

ch5.jpg

मोल्डमध्ये केक स्प्रिंकल्स घालून आणि मग बिस्किट+बटर चा थर देऊन :

ch6.jpg

स्ट्रॉबेरी फ्लेवर चायना ग्रास, सॉसपॅनमध्ये :

ch3.jpg

तीन मसाल्यांच्या तीन बोल्समध्ये चायना ग्रास :

ch7.jpg

तयार चायना ग्रास मसाला टॉवर्स :

ch9.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रकारे तीन टॉवर्स तयार होतात.
अधिक टिपा: 

१. चायनाग्रास जरी लहान मुलांना आवडतं तरी हे टॉवर्स मोठ्या लोकांनाही वेगळ्या चवीमुळे आवडू शकतात.
२. एक टॉवर एका मसाल्याचा बनवण्या ऐवजी चायनाग्रासचे दोन वेगळे थर वेगळ्या मसाल्यांचेही बनवू शकता. वरील कृतीत एकाच जातीतलं लग्न आहे तर या प्रकारे इंटरकास्ट लग्न होऊ शकेल.

माहितीचा स्रोत: 
प्रेरणा: भारतीय मास्टरशेफ मध्ये लसणाचा डेझर्ट बनवताना केलेला वापर. बाकी कल्पना आणि कृती पूर्णपणे माझी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त लिहिले आहेस आणि फोटो पण छान.
तूला स्वतःचे फ्लेवर्स चायना ग्रास मधे हवे आतील तर फाइव्ह स्टार या कंपनीचे अनफ्लेवर्ड चायना
ग्रास मिळते. पण ते फारच कमी दुकानात असते. तिखट किंवा आंबट गोड पदार्थ करायला ते छान.
दूधाची गरज नसते.

धन्यवाद लोक्स. Happy

शँकी, मला काही टॅग्ज दिसत नाहीयेत.

दिनेशदा, हो का? मी कधी पाहिलं नाहीये अनफ्लेवर्ड चायना ग्रास.

मामी खालील बोल्ड आणि इटॅलिक्स मधली ओळ बघा
>>>>>>>>>
लागणारे जिन्नस:
डेझर्ट, दूध, दुधाचे प्रकार, चायना ग्रास, गोड पदार्थ, बिस्कीटे

ब्लूबर्ड (किंवा इतर कोणत्याही कंपनीची) चायना ग्रासची पाकिटं. किमान दोन फ्लेवर्स. प्रत्येक फ्लेवरची दोन टेबलस्पून चायना ग्रास पावडर. मी व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी हे दोन फ्लेवर्स वापरले आहेत.

>>>>>>>>>

मस्त Happy

वाहवा!! बाळगोपाळांना उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटू देण्यासाठी करता येण्यासारखा मस्त पदार्थ आहे हा... घरी भरपूर बच्चापार्टी असेल तेव्हा नक्कीच करेन आणि इथे फोटोही चिकटवेनच Happy

हा हा हा .... थांबा लोक्स! बच्चेकंपनीला टॉवर्स खाऊ घालायचे इमले रचू नका. आजच्या पिढीचा एक प्रतिनिधी माझ्याही घरात आहे आणि एका चमच्यात तिनं हा प्रकार मोडीत काढलाय.

त्यातल्या त्यात सकारात्मक प्रतिसाद म्हणजे लेकीनं चमचा तोंडात घातल्याघातल्या .... "यक, चायनाग्रासमध्ये मसाले का घातलेयस?" असं म्हटलं म्हणजे मसाल्याची चव व्यवस्थित येत होती. (परिक्षक, यामुळे माझे पॉइंटस वाढतील ना? Wink )

मोठ्या लोकांकरता हा बाळखाऊ समजा आणि त्यांच्याकरताच बनवा. कारण माझ्या मोठ्या गिनीपिगला आवडला. मैत्रिणींनाही आवडला.