नियोजन - हायस्कूल नंतरच्या शिक्षणासाठी

Submitted by स्वाती२ on 5 April, 2012 - 17:24

अमेरिकेत हायस्कूल पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असलेले पर्याय तसेच शैक्षणीक खर्चाच्या नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी हा धागा.

उपयुक्त लिंक्स:
http://www.savingforcollege.com/
http://www.sec.gov/investor/pubs/intro529.htm
AP course बद्दल अधिक माहिती http://www.collegeboard.com/student/testing/ap/about.html

उपयुक्त माहिती असलेल्या पोस्ट्स:

स्वाती_दांडेकर | 6 April, 2012 - 16:21
अमेरिकेत कॉलेज शिक्षणासाठी पैशांची तजवीज करायला पर्याय बरेच असतात, पण खात्रीपूर्वक मार्ग असे नसतात. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कॉलेजची फी सतत वाढत असते आणि आईवडिलांची बचत करण्याची कुवत कधीकधी त्यापुढे कमी पडू शकते.

मुलांच्या किंवा आईवडिलांच्या अपेक्षांना थोडा लगाम घालणे हा एक उपाय आहे, तसेच बरीचशी स्थानिक मुले साधारण ११वी १२वी पासून कसलीतरी लहानसहान कामे करून पैसे साठवतात हाही एक मार्ग आहे. त्यामुळे त्यांना पैसे खर्च करताना विचार करण्याची सवय लागते. स्कॉलर्शिप किंवा इतर ग्रँट अंडरग्रॅडला फारच थोड्या उपलब्ध असतात. पण युनिवर्सिटीत छोटीछोटी कामे उपलब्ध असतात, तिथे थोडे काम करून जेवणाचा खर्च किंवा रहाण्याचा खर्च भागू शकतो. अर्थात अभ्यास सांभाळून नोकरी कठीणच असते, पण शिकण्याची जिद्द असली तर काही मुले असे करतात. माझ्या माहितीत काही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत फुलटाईम नोकरी करून वर्षाच्या जेवणाच्या खर्चाची तजवीज करतात. या नोकर्‍यांमधला अनुभव त्यांना इतर ठिकाणी उपयोगीही पडतो. उदाहरणार्थ, शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी.

बचत आणि गुंतवणुकीसाठी मी वापरलेले काही पर्यायः
१. UTMA/UGMA - ५२९ प्लॅनच्या पूर्वी हा एकच मार्ग होता - दर वर्षी मुलाच्या नावे प्रत्येक पालक, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक $१३००० पर्यंत रक्कम जमा करू शकतात. Custodian मूल statutory vesting वयाचे होईपर्यंत मालक असतो, नंतर मुल स्वतः या अकौंटचा मालक असते. इतर कुठल्याही गुंतवणूकीसारखेच पर्याय असतात, व नुकसानीची शक्यता असते. मुलाच्या नावे टॅक्स रिटर्न भरल्यास रेट कमी असू शकतो -फक्त व्याज किंवा capital gain वर दर वर्षी टॅक्स लागू होतो. पैसे काढताना ते मुलाच्या नावाने असल्याने त्याच्या नावे बँक अकाउंट असल्यास थोडे सुलभ होते. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.

२. Educational Coverdell IRA - $२००० पर्यंत जमा करू शकतो ते आईवडिलांच्या उत्पन्नावर दरवर्षी बदलते. गुंतवणूकीचे बरेच पर्याय असतात. पैसे काढल्याच्या वर्षी १०९९Q हा आणखी एक फॉर्म मुलाच्या टॅक्स रिटर्नमधे जोडावा लागतो. शिक्षणासाठी वापरल्यास टॅक्स माफ असतो. कॉलेजची फी, पुस्तके, रहाणे, जेवण ह्यापैकी कोणताही खर्च करू शकतो. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.

३. ५२९ प्लॅन - दरवर्षी $१३००० पर्यंत प्रत्येक पालक किंवा नातेवाईक जमा करू शकतात. किंवा एकरकमी जमा केल्यास चार वर्षाचे जमा एकदम धरता येतात. गिफ्ट टॅक्सचे नियम याला लागू होतात. गुंतवणूकीचे बरेच पर्याय आहेत. अकौंट पालक आपल्या नावावर ठेवू शकतात. पैसे काढताना थोडे फॉर्म जास्त भरावे लागतात. काही स्टेट्समधे स्टेट टॅक्स मधे सवलत मिळते. काढताना शिक्षणासाठी वापरल्यास कर माफ - १०९९Q फॉर्म जोडावा लागतो. एका मुलाने न वापरल्यास दुसर्‍याला किंवा इतर नातेवाईकाला, नातवंडाला देता येतात. शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर खर्चासाठी काढल्यास वाढीव रकमेवर टॅक्स लागू होतो. कोणत्याही कॉलेजसाठी उपयोग करता येतो.

४. Prepaid Tuition Plan - प्रत्येक स्टेटचे नियम व तारखा वेगवेगळ्या आहेत. मोठ्या मुलासाठी तो १२ वर्षाचा असताना तेव्हाच्या स्टेट युनिवर्सिटीच्या फीइतकी रक्कम जमा केल्यास तो कॉलेजला गेला तेव्हाची फी कॉलेजला भरली गेली - जवळजवळ ३०% रिटर्न! स्टेटमधल्या कोणत्याही स्टेट युनिवर्सिटीत ट्युशनसाठी ही रक्कम वापरू शकतो. रहाण्या/जेवणाचा/पुस्तकांचा खर्च वेगळा. मूल प्रायवेट किंवा स्टेटबाहेरील कॉलेजला गेल्यास साधारण फेस व्हॅल्यूला पैसे वापरता येतात किंवा दुसर्‍या मुलासाठी किंवा नातवंडासाठी ठेवता येतात. आमच्या त्यावेळच्या अकलेनुसार दोन वर्षाची फी अशी भरली. असा फायदा पैसे एकरकमी भरल्यासच होतो, मासिक प्लॅनमधे भरल्यास फारसा फायदा झाला नाही अशी उदाहरणे बघितली आहेत. मोठा मुलगा स्टेट युनिवर्सिटीत गेला व त्याच्या दुसर्‍या वर्षासाठी फी यातून भरली. आणखी एक वर्षाची कधी वापरायची ते तो किती क्रेडिट घेणार आहे त्यावर ठरवणार आहे.

आणखी पर्याय नंतर लिहीन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५२९ आणि UTMA असे दोन पर्याय माझ्या एका मित्राने मला बघ म्हणून सांगितलंय्..मी सध्या वाचतेय फक्त्...कुणालाही त्याबद्दल काही विशेष माहिती आहे का?
५२९ बद्द्ल जे मी वाचलंय (जे राज्याराज्यांप्रमाणे वेगळं असतं) आमच्या राज्यात तरी साईटवर लिहिलं आहे की तुम्ही हा पैसा देशात कुठेही किंवा परदेशात वापरू शकता...फक्त परदेसाईंनी आधीच्या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे जर हे पैसे शेयर मार्केटप्रमाणे बुडणार असतील तर कठीण आहे..
मला वाटलं होतं की असे काही पर्याय असायला हवेत ज्यात तुम्ही आतापासून पैसे (थोडे थोडे करून) टाकले तर तुमची मुलं मोठी होईस्तो साधारण त्यांना लागतील त्यासाठी पैसे उपलब्ध होतील्..म्हणजे व्याज इ. मिळून्..असे कुठले पर्याय उपलब्ध आहेत??

वेका,
UTMA त घातलेले पैसे हे मुलाच्या मालकीचे होतात. म्हणजे मुलाने ते पैसे शिक्षणासाठी वापरणे बंधनकारक नाही. काही स्टेट मधे हे वय १८ आहे. काही स्टेटमधे मुलाच्या ताब्यात पैसे कधी येणार यावर बंधन घालता येते. त्याबद्दल चौकशी करा.
मला ५२९ हा पर्याय ठीक वाटला. मी age based asset allocation घेतले नाही. सुरुवातीला vanguard 500 index मधे गुंतवले. नंतर २००७ मधे मनी मार्केट पर्याय घेतला. जोडीला आयबॉन्ड घेतले. कवरडेलसाठी वॅनगार्ड वेलिंगटन हा बॅलन्स फंड घेतला.

529 च्या बहुतेक Plan मधले पैसे कुठल्याही राज्यात वापरता येतात, पण गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करावी.
पैसे शेयर बाजारात लावल्याशिवाय फारशी वाढ होऊ शकत नाही (CD चे दर १% पेक्षा कमी आहेत).
शेयर बाजार म्हणजे त्यात Risk आलीच, आणि ५२९ प्लॅनमधले पैसे रोज्-रोज फिरवता येत नाहीत.
तेव्हा Van-guard, F. Templeton, T Rowe Price वगैरेच्या Conservative funds मधे टाकले तर Risk कमी होऊ शकते.
I-Bonds चे व्याजदरही लक्षात घ्यायला हरकत नाही, त्या व्याजावर, अभ्यासासाठी वापरल्यास कर भरावा लागत नाही.

मुलांची ११/१२वी आली की असलेले पैसे जास्त Conservative , low risk मधे फिरवणे महत्वाचे.
मुलं लहान असताना सुरूवात केलीत (५००$ महिना) तर व्याज वगैरे धरून लाखाच्या जवळपास पोहोचता येईल.
शक्यतो, In-state आणि State Uni. मधे मुलं गेली तर तेवढे पैसे कमी लागतील. (तुमच्या State चे नियम बघा). पण ते नेहमीच होऊ शकेल असं नाही. बहुतेक मुलांना Ive-league ची हौस असते. त्यांच्याशीही जरा लवकरच बोलून त्यांना कल्पना द्यायला हवी.
(आत्ता NYU सारख्या Uni. चा वार्षिक खर्च ५५/६० हजार आहे). Harward, Yale, Princeton चेही खर्च तसेच आहेत.
दोन पैकी एका पालकाला Uni. मधे नोकरी असेल तर फायदा होऊ शकतो.. Happy
एकाच वेळी २ मुलांच्या कॉलेजच्या फिया भरत असलात तर काही Discount मिळते (म्हणे).

माझ्या एका USA च्या मित्रने co-op (किवा असेच काहितरी) चा पर्याय वापरुन degree घेता येते असे सन्गितले होते. ह्या scheme मध्ये ४ ऐवजी ५ वर्ष लागतात.

पहिली २ वर्ष झाल्यावर एका कंपनीत part time काम करुन grad. complete करता येते

ह्या scheme मध्ये univercity चा खर्च निम्म्यने कमी होतो.

ह्याबद्दल कुणाला माहिति आहे का?

co-op वापरुन डिग्री घेता येते. या पर्यायाबाबत त्या त्या युनिवर्सिटीच्या साईटवर अधिक माहिती असते. तुमचे फिल्ड आणि इकॉनॉमी या दोन गोष्टी याबाबत विचारात घ्याव्या लागतील.

शैक्षणीक खर्चा साठी घर विकुन लहान घरात मुव्ह होणे जास्त सोयिस्कर, मुले घराबाहेर जातील तेव्हा मोठे घर कशाला पाहिजे?

http://money.usnews.com/money/retirement/articles/2010/04/19/7-reasons-t...

५२९ ला Roth IRA हा पण एक पर्याय आहे.

साधारण ४५-४७ वर्षाच्या आईवडीलांनी मुलांच्या शिक्षणासाठी रहाते घर विकून लहान घर घेणे मलातरी पटले नाही. मुलांना शैक्षणीक खर्चासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. रिटायरमेंटमधे डाउनसाईझ करायचे म्हणून ६५+ असताना लहान घर घेणे ठीक आहे पण मुलांच्या शैक्षणीक खर्चासाठी हा पर्याय मलातरी पटत नाही.

ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी मधे अशी सोय आहे . पहिले वर्ष पूर्ण क्लासवर्क असते. त्यापुढे तीन तीन महिन्यांच्या क्वार्टर्स असतात. दोन क्वार्टर्स कोर्सेस अन दोन क्वार्टर्स नोकरी असे पुढची चार वर्षे करतात.
या भागातल्या बर्‍याच कंपन्या दर सहा महिन्यांनी नित्यनेमाने २५-३० को ऑप्स घेत असतात ड्रेक्सेलमधून .
ग्राफिक डिझाइन, मास कॉम , कॉम्प साय, कॉम्प ई, डबल ई इत्यादी मेजर असलेली मुलं मुली माझ्या कंपनीत पण येतात. बर्‍याच मुला मुलींना जिथे को ऑप केलंय तिथेच फुल टाइम नोकरी पण मिळते शिकून संपल्यावर.

जेवढे कोर्सेस कराल तेवढी फी भरावीच लागते, शिवाय को ऑप म्हणून नोकरी करताना खर्‍या नोकरी इतका पगार मिळत नाही. कामावर जाण्याकरता कार- गॅस- इंशुरंस किंवा बस / ट्रेन चा खर्च, नोकरीच्या ठिकाणी ड्रेस कोड असेल तर त्याचा खर्च हे वाढीव खर्च होउ शकतात.

मुलं समजूतदार असली तर काटकसरीने राहून पुढच्या सेमेस्टरच्या राहण्या जेवण्याचा खर्च भागेल इतकी बचत करू शकतात. पण को ऑप केल्याने युनिव्ह चा खर्च निम्मा होत असेल असे मला वाटत नाही.

परदेसाई उत्तम माहिती....पुन्हा एकदा आभार...
तळ्यात मळ्यात वाल्या लोकांसाठीही काही टिप्स आहेत का? म्हणजे समजा मायदेशात परत गेलं आणि मुलांना शिक्षणासाठी अमेरीकेत यायचं असेल तर्..आणि अर्थात देशातही एन आर आय म्हणजे त्यांना सगळीकडे जास्त फी असणार्...सगळंच नियोजनावर अडकणार नाहीतर त्यांची त्यांना कर्ज काढून करा तुमचं असं अमेरीकन स्टाइलने बोलायची वेळ यायची...
घर डाउनसाइज इ. पर्याय अमेरीकेचा इकोनोमीवर आहे नं..म्हणजे तुमचं अडीचशेचं घर तेव्हाही अडीचशेचं तरी राहील का इथुन सुरूवात आहे....सध्या तर घर हे सगळ्यात मोठं डाउन मार्केट आहे....

घर डाउनसाइज इ. पर्याय अमेरीकेचा इकोनोमीवर आहे नं..म्हणजे तुमचं अडीचशेचं घर तेव्हाही अडीचशेचं तरी राहील का इथुन सुरूवात आहे....सध्या तर घर हे सगळ्यात मोठं डाउन मार्केट आहे... >> बरोबर. घरात जर कमी लोक रहात असतील तर लहान कंडो पण पुरेसा आहे, अर्थात जर ह्यात कमीपणा वाटत नसेल तरच Happy त्यासाठी ६५+ ची वाट का पहायची? तळ्यात मळ्यात वाल्या लोकांसाठीही तर हा पर्याय उत्तम आहे, घर विकुन भारतात जाण्यासाठी.

अमेरिकेत कॉलेज शिक्षणासाठी पैशांची तजवीज करायला पर्याय बरेच असतात, पण खात्रीपूर्वक मार्ग असे नसतात. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कॉलेजची फी सतत वाढत असते आणि आईवडिलांची बचत करण्याची कुवत कधीकधी त्यापुढे कमी पडू शकते.

मुलांच्या किंवा आईवडिलांच्या अपेक्षांना थोडा लगाम घालणे हा एक उपाय आहे, तसेच बरीचशी स्थानिक मुले साधारण ११वी १२वी पासून कसलीतरी लहानसहान कामे करून पैसे साठवतात हाही एक मार्ग आहे. त्यामुळे त्यांना पैसे खर्च करताना विचार करण्याची सवय लागते. स्कॉलर्शिप किंवा इतर ग्रँट अंडरग्रॅडला फारच थोड्या उपलब्ध असतात. पण युनिवर्सिटीत छोटीछोटी कामे उपलब्ध असतात, तिथे थोडे काम करून जेवणाचा खर्च किंवा रहाण्याचा खर्च भागू शकतो. अर्थात अभ्यास सांभाळून नोकरी कठीणच असते, पण शिकण्याची जिद्द असली तर काही मुले असे करतात. माझ्या माहितीत काही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत फुलटाईम नोकरी करून वर्षाच्या जेवणाच्या खर्चाची तजवीज करतात. या नोकर्‍यांमधला अनुभव त्यांना इतर ठिकाणी उपयोगीही पडतो. उदाहरणार्थ, शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी.

बचत आणि गुंतवणुकीसाठी मी वापरलेले काही पर्यायः
१. UTMA/UGMA - ५२९ प्लॅनच्या पूर्वी हा एकच मार्ग होता - दर वर्षी मुलाच्या नावे प्रत्येक पालक, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक $१३००० पर्यंत रक्कम जमा करू शकतात. Custodian मूल statutory vesting वयाचे होईपर्यंत मालक असतो, नंतर मुल स्वतः या अकौंटचा मालक असते. इतर कुठल्याही गुंतवणूकीसारखेच पर्याय असतात, व नुकसानीची शक्यता असते. मुलाच्या नावे टॅक्स रिटर्न भरल्यास रेट कमी असू शकतो -फक्त व्याज किंवा capital gain वर दर वर्षी टॅक्स लागू होतो. पैसे काढताना ते मुलाच्या नावाने असल्याने त्याच्या नावे बँक अकाउंट असल्यास थोडे सुलभ होते. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.

२. Educational Coverdell IRA - $२००० पर्यंत जमा करू शकतो ते आईवडिलांच्या उत्पन्नावर दरवर्षी बदलते. गुंतवणूकीचे बरेच पर्याय असतात. पैसे काढल्याच्या वर्षी १०९९Q हा आणखी एक फॉर्म मुलाच्या टॅक्स रिटर्नमधे जोडावा लागतो. शिक्षणासाठी वापरल्यास टॅक्स माफ असतो. कॉलेजची फी, पुस्तके, रहाणे, जेवण ह्यापैकी कोणताही खर्च करू शकतो. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.

३. ५२९ प्लॅन - दरवर्षी $१३००० पर्यंत प्रत्येक पालक किंवा नातेवाईक जमा करू शकतात. किंवा एकरकमी जमा केल्यास चार वर्षाचे जमा एकदम धरता येतात. गिफ्ट टॅक्सचे नियम याला लागू होतात. गुंतवणूकीचे बरेच पर्याय आहेत. अकौंट पालक आपल्या नावावर ठेवू शकतात. पैसे काढताना थोडे फॉर्म जास्त भरावे लागतात. काही स्टेट्समधे स्टेट टॅक्स मधे सवलत मिळते. काढताना शिक्षणासाठी वापरल्यास कर माफ - १०९९Q फॉर्म जोडावा लागतो. एका मुलाने न वापरल्यास दुसर्‍याला किंवा इतर नातेवाईकाला, नातवंडाला देता येतात. शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर खर्चासाठी काढल्यास वाढीव रकमेवर टॅक्स लागू होतो. कोणत्याही कॉलेजसाठी उपयोग करता येतो.

४. Prepaid Tuition Plan - प्रत्येक स्टेटचे नियम व तारखा वेगवेगळ्या आहेत. मोठ्या मुलासाठी तो १२ वर्षाचा असताना तेव्हाच्या स्टेट युनिवर्सिटीच्या फीइतकी रक्कम जमा केल्यास तो कॉलेजला गेला तेव्हाची फी कॉलेजला भरली गेली - जवळजवळ ३०% रिटर्न! स्टेटमधल्या कोणत्याही स्टेट युनिवर्सिटीत ट्युशनसाठी ही रक्कम वापरू शकतो. रहाण्या/जेवणाचा/पुस्तकांचा खर्च वेगळा. मूल प्रायवेट किंवा स्टेटबाहेरील कॉलेजला गेल्यास साधारण फेस व्हॅल्यूला पैसे वापरता येतात किंवा दुसर्‍या मुलासाठी किंवा नातवंडासाठी ठेवता येतात. आमच्या त्यावेळच्या अकलेनुसार दोन वर्षाची फी अशी भरली. असा फायदा पैसे एकरकमी भरल्यासच होतो, मासिक प्लॅनमधे भरल्यास फारसा फायदा झाला नाही अशी उदाहरणे बघितली आहेत. मोठा मुलगा स्टेट युनिवर्सिटीत गेला व त्याच्या दुसर्‍या वर्षासाठी फी यातून भरली. आणखी एक वर्षाची कधी वापरायची ते तो किती क्रेडिट घेणार आहे त्यावर ठरवणार आहे.

आणखी पर्याय नंतर लिहीन.

स्वाती,
अतिशय उपयुक्त माहिती. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
मुलांच्या किंवा आईवडिलांच्या अपेक्षांना थोडा लगाम घालणे हा एक उपाय आहे,>>> हे पण पटलं. U/G साठी प्रायव्हेट युनिव्हर्सीटी मधे न जाता स्टेट युनिव्हर्सीटी मधे U/G केलं तर फरक पडेल ना? मास्टर्सला I V league किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सीटीचा ऑप्शन असू शकतो.

स्वाती, अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिलीत.

स्वाती(२) अशी महत्त्वाची माहिती तुम्ही बाफाच्या डोक्यावर चिकटवाल का, म्हणजे पुढे आणखी पोस्टी आल्यावर शोधत बसावं लागणार नाही.

दोन वर्षे कम्युनिटी कॉलेज आणि नंतर क्रेडिट ट्रान्सफर हा पर्याय माझ्या माहितीत काही अमेरिकन कुटुंबांनी स्विकारलाय. तुम्हाला पुढे काय करायचे आहे त्यावर हा ऑप्शन घेणे न घेणे अवलंबून आहे.

खर्च कमी करायचा अजून एक उपाय म्हणजे AP courses. यात ४ किंवा ५ स्कोर आला तर त्याचे कॉलेजसाठी क्रेडिट मिळते. तसेच dual credit course हायस्कूल मधे घेतल्यास ज्या युनिव्हर्सिटीशी याबाबत हायस्कूलने कोऑर्डीनेशन केले असेल तिथे आणि स्टेट मधल्या इतर पब्लिक युनिवर्सिटीत क्रेडिट मिळते. माझ्या मुलाने हे दोन्ही मार्ग वापरलेत. त्याने सोफोमोर असताना केमिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री या दोन विषयांसाठी AP दिली. त्याच वेळी केमिस्ट्रीचे IU dual credit केले. यावर्षी त्याने AP eng Lit, AP US History घेतलेय. त्यातील US History IU dual credit आहे. पुढील वर्षी तो ४ AP courses घेणार आहे.

AP course बद्दल अधिक माहिती http://www.collegeboard.com/student/testing/ap/about.html

खूपच उपयुक्त माहिती.
दोन्ही स्वातींचे आभार.
लिंक्स पाहते.
परदेसाईंनी वार्षिक खर्चाचा (साधारण) अकडा देऊन मोठी मदत केली आहे (आणि घाबरवले आहे.;))

मला h1b visa मिळाला असुन माझे कुटुम्ब १ Oct २०१३ ला अमेरिकेत एणार आहोत. माझ्या मोठ्या मुलाने CBSC १० केली आहे आणी अमेरिकेत ११वी ला admission घेणार आहे. तर...

१> अमेरिकेत शाळा २६ ऑगस्ट ला चालु होतात. मुलाची ४० दिवस शाळा बुडेल. Is it going to be big impact? Do we need him to get prepared? How? He is free for next 5 month.

2> H1B stamping वर घर भाड्याने मिळेल का ? कारण social security मिळयला १० दिवस जातिल ? मुलाना चान्गल्या सरकारी शाळेत घलायला त्या district मध्ये घर घेणे आवश्यक आहे असे मी एकलय.

३> मुलाना पासपोर्ट वर h4 चा stamp वर social security शिवाय शाळेत admission मिळु शक्ते काय?

काही tips ?

>>अमेरिकेत शाळा २६ ऑगस्ट ला चालु होतात. मुलाची ४० दिवस शाळा बुडेल. Is it going to be big impact? Do we need him to get prepared? How? He is free for next 5 month.>>

तुम्ही ज्या राज्यात येणार आहात तेथील dept of edu ला संपर्क करा. ते लोकं नक्की काय करावे लागेल ते सांगू शकतील. शिवाय त्यांच्या वेबसाईटवर बरीच माहिती मिळेल. तसेच तुम्ही ज्या भागात घर घेण्याचा विचार करत आहात तेथील हायस्कूलला संपर्क करा. प्रिन्सिपॉल आणि गायडन्स ऑफिस मदत करतील. हायस्कूल्सच्या वेबसाईटवर फोन नं., इमेल वगैरे मिळेल.

>>> H1B stamping वर घर भाड्याने मिळेल का ? कारण social security मिळयला १० दिवस जातिल ? मुलाना चान्गल्या सरकारी शाळेत घलायला त्या district मध्ये घर घेणे आवश्यक आहे असे मी एकलय.>>

h1 stamp वर घर भाड्याने मिळू शकेल. या संदर्भात तुमच्या एम्प्लॉयरची मदत घेता येइल.

>>मुलाना पासपोर्ट वर h4 चा stamp वर social security शिवाय शाळेत admission मिळु शक्ते काय?>>
हो. इमिग्रेशन पेपर्स आणि इम्युनायझेशनचे रेकॉर्ड लागेल.

Is it going to be big impact? Do we need him to get prepared? How? He is free for next 5 month.>> >> एक अनुभवी पालक म्हणून सांगावेसे वाट्ते की ११ वीच्या लेव्हलला ४० च काय ४ दिवस शाळा मिस झाली तरी फार फरक पडू शकतो. त्या वर्षी सगळी मुलं सॅट परीक्षा(कॉलेज एंट्रस) देतात. शाळेच्या अभ्यासाबरोबरच हाही अभ्यास असतो. एकंदरीतच , हायस्कूलच्या चार वर्षात हे ११वीचं वर्ष खूप महत्वाचं मानलं जातं. तेव्हा बाकी फॅमीली मागून आली तरी ११वीतल्या मुलाला शाळा चालू होइल तेव्हा आणता आलं तर त्याला खूप फायदा होईल.
अमेरिकेत स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा!

Pages