मायबोली पुस्तकखुणा (बूकमार्क)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

Bookmark 1.jpg

मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा साहित्याशी बराच जुना संबंध आहे. तो अजून दृढ कसा करता येईल, या विचारात असताना पुस्तकखुणा (bookmarks) तयार करण्याचे सुचले.

या पुस्तकखुणांवर मायबोलीकर कवींच्या कविता असणंच उत्तम, असं वाटलं आणि मायबोलीकर कवींना याबद्दल विचारल्यावर त्यांनीही लगेच परवानगी दिली. त्यातून तयार झाला पुस्तकखुणांचा हा पहिला संच.

या उपक्रमात आपल्या कवितांचा समावेश करू दिल्याबद्दल पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली आणि बेफिकीर यांचे मनःपूर्वक आभार.

Bookmark 4.JPG

विषय: 
प्रकार: 

स्वतःला पाहिजे ते बूकमार्क मिळतील का पुस्तकं विकत घेतल्यावर? की तुम्ही जे भेट द्याल तेच घ्यावे लागतील?

जबरीच !!! Happy

पण पुस्तकं विकत घेणं कंपल्सरी आहे का? Sad

एखाद्याला भेट म्हणून देण्यासाठी हे बुकमार्क्स विकत घ्यायलाही आवडले असते Sad

एखाद्याला भेट म्हणून देण्यासाठी हे बुकमार्क्स विकत घ्यायलाही आवडले असते >>>
अगदी अगदी.

झकास कल्पना आहे. एकदमच मस्त!!
त्या त्या कवी/ कवयित्रीचा लेखन ट्रॅक देण्याची कल्पनाही मस्तच आहे.

योडी, ललीला अनुमोदन.
केवळ बूकमार्कही विक्रीसाठी उपलब्ध करावेत. Happy

मस्तच!!

अतिशय सुंदर कल्पना. नुसते बूकमार्क्स विकत मिळाले तर मजा येइल. गिफ्ट देण्यासाठी ही आयडीया आवडली.

सुंदर उपक्रम तितकेच छान बुकमार्क्स!

पेशवा, मिल्या, नीधप, जयवी, श्यामली ताई आणि बेफिकीर यांचे मनापासून अभिनंदन Happy

छान कल्पना...

अवांतरः आधी मला वाटलं की निवडक १० सारखं ऑनलाईन माबो बुक्मार्क्स चालु केलेत की काय.. त्याचीपण गरज होतीच मला..

पुस्तकं घ्या, बुकमार्क मिळवा! खूप जमले की वाटा!
>>
मलाही हेच सुचलं होतं पण बकरा कोण पकडायचा इतकी पुस्तकं घेणारा असं म्हणुन गप्प राहीले होते. Proud

Pages