सृष्टी धुक्याची...... नवलाईची ......

Submitted by पुरंदरे शशांक on 31 March, 2012 - 06:42

सृष्टी धुक्याची.......
........नवलाईची ........

सृष्टी धुक्याची....
नवलाईची
थेंब ढगांची
जरतारीची
मंद्र गतीची
द्रुत लयीची
अति सुखाची
मृदु स्पर्शाची
छाया वैभव उकलण्याची
अवगुंठनी मिरवण्याची
दिसे ना दिसे जादूगिरीची
गूढ गूढ तरी हवीहवीशी
शब्दी कधी ना गवसायाची
अनुभवण्याची नवलाईची
सृष्टी धुक्याची.....

45_0.jpg

रंग धुक्याचे क्षणाक्षणाला बदलत होते
..........रुप धरेचे मधेच चमकून तरळत होते
पदर धुक्याचा झिरझिरीत का जरा जाडसर
...... जरा उचलूनी कोण निरखते पुन्हा पुन्हा ते

55.jpg90.jpg92.jpg94_0.jpgडोंगर माथ्याला
धुक्याचे मुंडासे
हिरव्या रानाचे
मधे कवडसे

99.jpg6000.jpg6002.jpgक्षणाक्षणाला पालटणारे.... अंग धुक्याचे
हिरवाईने सजीव झाले..... रुप धरेचे

गुलमोहर: 

छान

सुरेख प्रचि आणि कविताही सुंदर आहे. उन्हाळ्यामधे धुक्याचा फोटो पाहुनही छान वाटलं. पहिल्या प्रचिमधल्या रस्त्यावरुन लांब लांब चाल्त जायला काय मस्त वाटेल.

कुठे आणि कधी काढले आहेत हे प्रचि?>>>> किल्ले पुरंदर, श्रावण महिना...... संपूर्ण पावसाळ्यात (३-४ महिने) महाराष्ट्रातील सर्व किल्ले अतिशय सुंदर दिसतात, पण पुरंदर जरा जास्तच....... अखेर माझं गावंच ना ते........

धुक्यातला कुठलाही गड इतका अप्रतिम अनुभव देतो........ क्षणाक्षणाला सगळा परिसर वेगवेगळा भासतो....... झाडांच्या खोडावरही शेवाळं चढलेलं असतं..... सगळी रानफुले फुललेली......... सर्वत्र हिरवेगार...... मधूनच अंगावर छान दंवाची मऊ मऊ वृष्टी होत असते....... आता आता अंगावर आलेली धुक्याची चादर एकदम दूर जाते तर मधेच केव्हा लपेटून टाकते कळतही नाही............ कधी कधी शांत उभे राहिले तर डोक्यावर... इतकेच काय अगदी पापण्यांवरही नाजुक दंवबिंदू पडलेले अनुभवता येतात.... अगदी वेगळ्या विश्वात नेउन सोडतं हे सारं आपल्याला.......

गडाचे सौंदर्य बघण्याकरता पावसाळा संपता संपता जरुर कुठल्यातरी गडाला भेट द्या...... या फोटोंमधे काही बाहीच पकडू शकलोय........ खरा आनंद प्रत्यक्ष अनुभवण्यातच........

सुंदर सुंदर अभिप्रायाकरता सर्वांचे मनापासून आभार...............

<< धुक्यातला कुठलाही गड इतका अप्रतिम अनुभव देतो........ >> धुक्याचा जादुई हात फिरल्यावर गड, डोंगरदर्‍याच नाही तर सारी सृष्टीच रूप पालटत असावी. कोंकणातला माझा अनुभव माझ्या रांगड्या तर्‍हेने शब्दांत मांडण्याचा व चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न मीं इथंच पूर्वी केला होता [ http://www.maayboli.com/node/25655 ]. त्यातलं नारळी-सुपारीच्या बागेतून जाणार्‍या नदीकडच्या वाटेचं धुकं पांघरलेलं हें चित्र सादर करायचा मोह आवरत नाही -

tareecheevaaT.JPG

कुठे आणि कधी काढले आहेत हे प्रचि?>>>> किल्ले पुरंदर >>>>
व्वा पुरंदरे ! गड सर केलात की !!! Happy
फोटो आणि कवितेतून वर्णन दोन्ही छान.

Pages