करियर आफ्टर अ गॅप्..मदत हवी आहे

Submitted by sneha1 on 28 March, 2012 - 13:25

नमस्कार्..मला थोडी माहिती हवी आहे.

लग्न, मुलगी, अमेरिकेत येणे अशा अनेक कारणांमुळे माझ्या जॉब मधे चांगलीच गॅप पडली आहे. आणि आता EAD मिळाल्यामुळे पुन्हा सुरुवात करायची आहे. तर मला असे प्रश्न आहेत,
१. ही गॅप कव्हर लेटर मधे एक्स्प्लेन करावी की नाही?केल्यास कशी?
२. कव्हर लेटर लिहिण्यास मदत करणार्‍या साईट्स सुचवू शकेल का कोणी?

धन्यवाद..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा अगदी लेटेस्ट अनुभव. गॅप विचारात घेतली जात नाही, जर तुम्ही त्या गॅपमधे घरबसल्या काही कन्स्ट्रक्टीव्ह काम अथवा कोर्सेस केले असतील तर (हे क्षेत्रानुसार बदलू शकते) मला या जॉबच्या इंटरव्युमधे "मुलगी लहान असल्याने आणि सांभाळायला कुणी नसल्याने" गॅप घेतली या उत्तरानंतर पुढचाच प्रश्न "गॅपमधे काय काय केले?" हा विचारला गेला होता. मी फ्रीलान्सिंगपासून ते कथालेखन-अनुवाद वगैरे सर्व गोष्टी सांगितल्या. खेरीज ऑनलाईन कोर्सेस वगैरेंचादेखील उल्लेख केला.

नौकरी, मॉन्स्टर, लिंक्ड इन वर रजिस्टर केले आहे का? कधी कधी कम्माल के जॉब्स अवेलेबल असतात पण आपल्यास माहीतच नसते.

अश्विनीमामी मी या तिनही साईट्सवर रजिस्टर आहे. मॉन्स्टरवरुन तर खरच कम्माल के ऑफर्स येतात, म्हणजे अस की माझ्या सीव्ही मध्ये माझ लोकेशन पुणे अस स्पष्ट लिहीलेल असुन मला सगळ्या ऑफर्स मुंबईच्या येतात. त्यात खाली एक प्रश्न असतो Is this job relevant to you? आणि खाली Yes No अशी बटन्स असतात. आजपर्यंत ३ वेळा No वर क्लिक करुन मी लोकेशन रिलेव्हंट नाही असा फीडबॅक दिला आहे. पण उपयोग नाही...

"गॅपमधे काय काय केले?" >> हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुले सांभाळणे महत्त्वाचे पण त्या धबडग्यातून कुणी स्वतःसाठी एक तास नियमितपणे काढू शकले नाही तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेत, वेळ व्यवस्थापन कौशल्य आणि सामाजिक सपोर्टसिस्टीम मध्ये (नवरा, घरचे लोक आणि शेजारपाजार/चर्च, कम्युनिटी इ) नोकरीच्या दृष्टीने मोठा दोष आहे हे दिसून येते. अशी व्यक्ती पुढे नोकरीमधील काल-काम-वेगाचे चढ उतार सहन नाही करू शकणार. तेव्हा "गॅपमधे काय काय केले?" ह्याचे उत्तर आपल्या मनाशी तयार असले पाहिजे. 'मी गॅपमधे काही केले नाही' असे उत्तर येत असेल तर ती "गॅप" लवकर संपणार नाही. किंवा नशिबाने संपली तरी तो दुसर्या "गॅप" कडे जाणारा प्रवास ठरेल ('मुले' असे नाही काहीही दुसरे कारण निघेल.). तेव्हा सध्या नोकरी हा अक्खा जिना चढायचा विचार करण्यापेक्षा 'अर्थपूर्ण गॅप' हि पहिली पायरी गाठायला हवी.
(हे अजय यांचेच पोस्ट पण जरा वेगळ्या मानसिकतेतून)

मला वाटत ही गॅप खूप मोठी संधी असते. जरा थांबून स्वतःकडं बघण्यासाठीची आणि स्वतःला घडवण्यासाठीचीही. तसेच क्षेत्रबदल किंवा व्यवसाय करायचे मनात घोळत असेल तर याहून चांगली संधी नाही. थोडे थांबून तुम्हाला नक्की काय करायचे आहे हा प्रश्न स्वत:ला विचारून उत्तर मिळवावे. मग त्या उत्तराकडे वाटचाल करावी. अडथळे येतीलच. पण कोर्स, फोरम्सवरचे डिस्कशन, सर्टीफिकेशन, भेटीगाठींनी ते पार करता येइल का ते पहावे. गुड लक!

Pages