परसदारातले पक्षी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आमच्या घराच्या बाल्कनीमधून दिसलेले काही पक्षी....

काही फोटो जरा धूसर आलेले आहेत... नवीन कॅमेरा असल्याने अजून पूर्णपणे हात बसलेला नाही... अजून चांगले फोटो जसे काढले जातील तसे इथे येतीलच..

शशांक आणि भुंग्याने सगळ्यांची नावे सांगितल्या बद्दल धन्यवाद...

१. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

२. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

३. गोल्डन ओरिअल (आम्रपक्षी/हळद्या मादी)

४. गोल्डन ओरिअल (आम्रपक्षी/हळद्या मादी)

५. क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट (तांबट/पुकपुक्या)

६. क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट (तांबट/पुकपुक्या)

७. कोकिळ

८. कोकिळ

९. कोकिळ

१०. सूर्यपक्षी

११. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

१२. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१३. घार

१४. घार

१५. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१६. व्हाईटब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या)

१७. मैना

१८. हा आज सकाळी दिसला.. प्रचंड धावपळ करत होता.. तरी कसाबसा फोटोत सापडला...

पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक)

शब्दखुणा: 

हिम्सकूल - आता "कवडी" च्या (हडपसरच्या थोडे पुढे, सोलापूर रोड) वार्‍या सुरु कर - भरपूर पक्षी दिसतील व माणसांना सरावलेले असल्याने अगदी जवळून फोटो काढता येतील (रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून जाणे).

शप्पथ, खंड्या परसदारी ?>>> तळ्या काठी गाती लाटा च्या ऐवजी नदी काठी गाती लाटा असे असल्यामुळे दिसतो खंड्या.. जवळपास रोजच.. .आणि एकच नाही बरेच असतात..

मस्तच Happy

अरे हिम्या... कसला लकी आहेस यार......... काय दंडकारण्यात राहतोस काय????

पॅरेडाईज फ्लायकॅचर परसदारात....... लक्की यू.... Happy

लकी आहात. माझ्या घराभोवतीही अंदाजे २०-२५ वेगवेगळे पक्षी दिसतात. पण बुरखा हळद्या, स्वर्गीय नर्तक व खंड्या आजवर कधीही दिसले नाहीत.

खंड्या दिसतो कुठेही.

स्वर्गीय नर्तक घरातल्या बाल्कनीतुन दिसला म्हणजे भाग्यच. Happy

केप्या.. तुला बोलवे पर्यंत त्याच्याशी बोलून त्याला थांबवून ठेवतो.. "बाबारे माझा एक वाईचा मित्र तुझा फोटो काढायला येतो आहे तेव्हा जरा वाईच बस इथेच आणि विश्रांती घे..." Happy

Pages