भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड

Submitted by क्ष... on 20 September, 2007 - 14:46

तयारीसाठी वेळ - साधारण १०-१५ मिनीटे
वाफ़वण्यास लागणारा वेळ - १५ मिनीटे
फलाफल -
साहित्य -
१ जुडी मेथी (बारिक चिरुन) किंवा फोझन मेथी २ वाट्या
१/२ वाटी कणिक (चपातीचे पीठ)
१/२ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ चमचा जिरे
१/२ चमचा हळद
१/२ वाटी दही
चविप्रमाणे मीठ

कृती -

* गॅसवर चाळणी ठेवता येईल इतक्या पातेल्यात साधारण १ ते दीड लिटर पाणी तापायला ठेवावे.
* मिरची, लसुण, मीठ, आणि जिरे एकत्र बारीक करुन घ्यावेत.
* परातीमधे किंवा मोठ्या बाउलमधे मेथी मधे दही घालुन बारीक केलेले वाटण घालुन नीट मिसळुन घ्यावे.
* त्यात हळद आणि तांदुळाचे पीठ घालावे.
* थोडी थोडी कणिक घालत मळावे. भाजी फ़क्त एकत्र मिळुन यावी इतपत घट्ट असावे. खुप पीठ घालु नये.
* शेवटी हाताला थोडे पाणी लावुन ते नीट गोळा करावे.
* ह्या पीठाचे छोटे छोटे मुटके करुन तेल लावलेल्या चाळणीत घालुन ती चाळण उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी.
* त्यावर झाकण ठेवुन १५ मिनीटे वाफवुन घ्यावेत.

इतर साहित्य -
१ काकडी चकत्या करुन
१-२ टोमॅटो चकत्या करुन
१ वाटी चिरलेला लेट्युस (असेल तर)
१ वाटी दही
१ काकडी खिसुन पाणी पिळुन काढुन फक्त खीस घ्यावा
१/२ चमचा जिरेपुड
चविप्रमाणे मीठ, साखर
टोमॅटो केचप जरुरीप्रमाणे
३ पीटा ब्रेड (शक्यतो whole wheat) किंवा ३ पोळ्या अगर टॉर्टीया

Assembly -
(हे अगदी खाण्याच्या वेळेला करावे)

* वाफवलेल्या मुटक्यांच्या १ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात
* दही, काकडीचा खीस, मीठ, जीरेपूड, साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे
* पीटा ब्रेडला मधे कापुन अर्धा भाग पोकळ करुन त्यात मेथीच्या मुटक्याच्या ३-४ चकत्या घालाव्यात.
* त्याच्या कडेने २-२ काकडीच्या चकत्या, १-१ टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात.
* त्यात थोडे केचप आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर घालावी
* वरुन चिरलेला लेट्युस घालावा आणि सर्व्ह करावे.

काकडीची कोशिंबीर सोबत असेल तर पूर्ण मील होते. उरलेले मुटके पण नुसते खाता येता.

टीप -

* मेथी निवडायला वेळ लागतो तो या रेसीपी मधे धरलेला नाही.
* फ्रोझन मेथीमुळे तो वेळ वाचतो. फ्रोझन मेथी घेताना रूम टेंपरेचरला आल्यावर पिळुन घ्यावी. ते पाणी टाकुन द्यावे.
* काकडीचे पाणी टाकुन न देता मीठ, जिरेपुड घालुन पिण्यास वापरावे.
* मेथीच्या ऐवजी पालक वापरला तरी हरकत नाही.
* पीटा ब्रेड मिळत नसेल तर टॉर्टीया किंवा पोळ्या वापरुन wrap करता येतो. त्यासाठी पोळी पसरुन त्यावर मुटक्याच्या चकत्या टोमॅटो, काकडी, लेट्युस, केचप, कापडीची कोशिंबीर घालुन गुंडाळावी.

सॅलड
१ टोमॅटो - मोठे तुकडे करुन
१ काकडी - मोठे तुकडे करुन
२ वाट्या - लेट्युस मोठा कापुन
२ चमचे ऑलिव्ह ऑईल
१ चमचा लिंबाचा रस
चिमुट्भर मीठ, साखर, मिरीपुड

कृती - लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपुड, तेल एकत्र करुन फोर्क ने १-२ मिनिटे फेटुन ठेवावे.
काकडी, टोमॅटो, लेट्युस एकत्र करुन एका पसरट बाऊल मधे ठेवावे.
वाढण्यापुर्वी त्यावर एकत्र केलेले सॅलड ड्रेसिंग घालुन हलक्या हाताने मिसळावे.

टीप - ह्या सॅलडमधे ढबु मिरची, शिजलेल्या बीटचे तुकडे, खिसलेले गाजर घालता येते.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग DJ इथे पण जाहिरात? शो ना हो
Lol

उलट छानच. मायबोलीचा फायदा मायबोलीकरांना होत असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे.

सपशेल मान्य admin!
दिपाने केलेल्या sponsorship ची कल्पना देखील आहे मला.
मी आपलं कोपरखळी मारल्यासारखं केलं झालं Happy

असो. फलाफल छान हो अगदी

पुढच्या GTG चा तुझा पदार्थ ठरला

- महागुरु

मस्तच आहे रेसिपि
सोपि आणि नविन

क्ष,
LOL..ऐकावं ते नवल, मी कोणाला काय sponsor केलं म्हणे?:))
मलाच कोणी sponsorer मिळाला तर सांगः))
ती website link माझ्या signature मधे टाकली होती , म्हणून आली इथे.
अत्ता कळले edit/delete पण करता येते ते:)

Btw, thanks admin:)

फलाफल म्हणल्यावर मला वाटल की कायतरी फलज्योतिष बितिषावर असेल!
हे तर भलतच "फलाफल" निघाल :)) DDD

फलाफल म्हणल्यावर आधीच तोंडाला पाणी सुटलं... हे वरचं वाचून अजूनच.
लग्गेच उतरवून घेण्यात आलीये रेसिपी. केली की कळवते.
बर असं देशी हमस पण करता येतं का?
त्याचीही रेसिपी असेल तर प्लीज सांगा. इथे नाही रेसिपीच्या बीबीवर!!
-नी

छान आहे ही रेसिपी. खुप दिवसानी काहीतरी वेगळे खायला... सॉरी वाचायला मिळाले :ड
बनवुन बघते आणि कळवते.
-प्रिन्सेस...