बोगोर बुदुर .. भाग ८

Submitted by अविनाश जोशी on 26 March, 2012 - 06:45

बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369
--१६--

आठ दहा दिवसातच तारीचा खटला उभा राहीला. सरकारी वकील कदम निष्णात होते. लवकरच १०० फाशीच्या शिक्षा पुर्ण करणार अशी जनतेला खात्री होती.

मेरीने धावपळ करुन जेम्स नावाचा वकील दिला होता. थोडा विक्षीप्त होता पण लढणारा होता. त्याला जे नावानेच लोक ओळ्खायचे. न्यायाधीश काळे होते. हुशार आणी आरोपीला संशयाचा फायदा देणारे होते.

पहील्याच दिवशी खटला सुरु होउन सुरवातीचे सोपस्कार झाल्यावर कदम उभे राहीले.

" मिलॉर्ड . हा खटला फार सरळ आहे. आरोपी खुनाच्या वेळी तेथे गेला होता. त्याची प्रेयसी मयताबरोबर गेल्यामुळे तो त्याचा पाठलाग करत होता. प्रेयसीबरोबर भांडुन तो पार्कींग मधे आला आणी त्याने शहाचा खुन केला. आरॊपीचे ठसे शहाच्या कारच्या दरवाजावर सापडले आहेत. आरोपीकडे सापडलेल्या रिव्हॉल्वरनेच शहाचा खुन झाला आहे. तपासणीत रक्ताने माखलेला शर्ट आहे आणी तो ब्लड ग्रुप मयताशी जुळत आहे. ह्या सर्व पुरांव्यावरुन हा खुन आरोपीने केला हे सिद्ध होत आहे. हे सर्व पुरावे आपल्यापुढे आम्ही सादर करणार आहोत "

" जेम्स तुम्हाला काही बोलायचे आहे ?"

" मिलॉर्ड गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. " जे

कदमांनी पहील्यांदा गुरख्याची साक्ष घेतली. त्याचे रजीस्टरही पुरावा म्हणुन सादर केले.

" बहादुर. तु हे रजीस्टर व्यवस्थीत ठेवतोस ? " कदम

" हो "

" तु रात्री ड्युटीवर असताना बाहेरचे दार उघडे असते ? "

" नाही. त्याला मी कुलुप लावतो. सर्व रहीवाशांकडे माझा मोबाइल आहे. आत बाहेर करताना ते मला फोन करतात. "

" कुणी पाहुणे असले तर ?"

" बाहेर जाताना त्यांना फ्लॅट मालकाकडुन फोन करायला लागतो. आत येताना बाहेर बेल दाबुन CCTV कॅमेरा समोर उभे रहावे लागते. ज्याच्याकडे जायचे असेल त्याने कॅमेरा बघुन परवानगी मिळाल्यावरच दार उघडल जात. "

" म्हणजे या रजीस्टर च्या बाहेरची कुणीही व्यक्ती आत बाहेर जाउ शकत नाही?"

" नाही साहेब. "

" दॅटस ऑल युवर ऑनर "

जे उलटतपासणीला उभा राहीला.

" बहादुर तु असताना नेहमीच दाराला कुलुप असते ?"

" हो "

" तु आत बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवतोस ?"

" हो"
" पण यात मेरीची नोंद नाही "

" फ्लॅटच्या मालकाबरोबर असे कुणी असेल तर आम्ही एक पाहुणा म्हणून नोंद करतो. "

" हल्ली सगळ्या गाड्या एसी असतात. मागे कुणी झोपले असेल तर तुला दिसणे शक्य नाही"

" ऑब्जेक्शन :" कदम

" ओव्हर रुल्ड "

" बहादुर माझा प्रश्न कळला ना ?"

" हो . तशा स्थीतीत पाहुणा आत बाहेर करु शकतो "

" आणी त्याची नोंद तुझ्या रजीस्टर मधे नसेल. "

" नाही "

" दॅटस ऑल युवर ऑनर "

त्यानंतर कदमांनी राणेंच्या एका तपास अधीकाऱ्याची साक्ष घेतली. त्याने प्रेताचे फोटो, गाडीचे फोटो, गाडीतल्या व शहाच्या खिशातल्या वस्तुंची यादी असे पुराव्यात सादर केले.

त्यानंतर बॅलॅस्टीक एक्स्पर्टच्या साक्षीत त्याने शहाच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या आणी तारीकडले सापडलेले रिव्हॉल्वरने झाडलेल्या गोळ्या ह्यातील साधर्म्य दाखवले. त्याच्या प्रमाणे त्याच ह्त्याराने शहाचा खुन झाला होता.

दोन्हीवेळेला जे ने उलटतपासणी घेतली नाही. दिवसाचे कामकाज संपल्यामुळे कोर्ट थांबले. सोनल साक्षीदार म्हणुन आणी कुणाल वार्ताहर म्हणुन उपस्थीत होते.

समीरही एक चक्कर टाकुन गेला होता. त्याने भंगारमधुन ८/९ मुर्ती घेतल्या होत्या आणी सर्व मुर्ती तपासासाठी ASI ला दिल्या होत्या. कुणाल सोनल जोडीलाही त्याने जेवणाचे आमंत्रण दिले होते. रोज कोर्टात यायची त्याला जरुर नव्हती. कुणाल त्याला विशेष गोष्टी सांगणार होता.

--१७--

दुसऱ्या दिवशी फोरेन्सिक साक्ष होती. कदमांनी प्रथम डॉ गुणेंची क्वालीफीकेशन अनुभव वदवुन घेतले आणी मग मुख्य मुद्याला हात घातला.

" मयताचे पोस्ट तुम्ही केलेत ? "

" हो. "

" मयताच्या अंगात किती गोळ्या सापडल्या ? "

" तीन. एक कपाळातुन मेंदुत गेली होती. दुसरी मानेतुन आत घुसली होती आणी तीसरी खांद्यात "

" कुठली प्राणघातक होती?"

" मेंदुतली. काही सेकंदातच त्या गोळीने प्राण घेतला असावा "

" म्हणजे पहील्याच गोळीने"

" गोळ्या झाडल्याचा सिक्वेन्स सांगणे शक्य नाही. मी फक्त एक क्र दिलेली गोळी एवढेच म्हणु शकतो. "

" किती अंतरावरुन झाडल्या गेल्या "

" दहा ते पंधरा इंचावरुन "

" कशावरुन ?"

" मयताच्या चेहऱ्यावर बंदुकीच्या दारुचे डाग होते. जवळुन गोळ्या झाडल्या तरच असे डाग पडु शकतात."

"मृत्यु किती वाजता झाला ?"

" साडे अकराच्या आसपास"

"कशावरुन? "

" पोटातील अन्नाच्या स्थीतीवरुन. साधारणत: एका तासापुर्वी जेवण झाले असावे. पोटात तंदुरी चीकन व पनीर मसाला व नान ह्यांची स्थीती. "

" दॅटस ऑल युवर ऑनर " जे उलट तपासणीला उठला.

" एकच प्रश्न . मृत्यु साडेअकराला झाला कशावरुन ?"

" मी सांगीतल्याप्रमाणे अन्नाच्या स्थीतीवरुन. जेवणानंतर सुमारे एक तासाने . जेवण साड्दहाला झाल्यामुळे मी वेळ सांगीतली."

" तुम्हाला जेवणाची वेळ कशी कळली ?"

गुणे गप्प.

" मिलॉर्ड ! Proper foundation was not laid. Request to remove entire testimony of this witness"

कदमांना झटकाच बसला.

" खुनाची वेळ साडे अकरा असल्याचा भाग फक्त काढुन टाकावा अशी कोर्ट आज्ञा देत आहे"

कदम उठुन म्हणाले

"मिलॉर्ड एवढ्याच गोष्टीकरता मी तपासाधीकारी आणी रेस्तॉरंटच्या स्टुअर्टला बोलावतो. तोपर्य़ंत कोर्टाने सुट्टी घ्यावी अशी विनंती आहे "

" जेम्स तुमचे काय म्हणणे आहे "

" मिलॉर्ड पुढचा विट्नेस बोलवावा " कदमांना ब्रेक कशाकरता हवा आहे हे जे ने ओळखले होते.

" ठीक आहे. कदम "

--१८--

कुणालची साक्ष कदमांनी काढली.

" आपले नाव"

"कुणाल कोहली"

" व्यवसाय ?"

" खबरचा वार्ताहर "

" तुम्हाला बॉडी सापडली ?"

"ऑब्जेक्शन. लीडींग प्रश्न आहे . कारण ह्यात कुणालने पाह्यच्या अगोदर शहा मेला होता असे गृहीत आहे. "

" सस्टेन्ड"

" तुम्ही कुठे राहता " कदम

" वरळीला सागर मंझील मधे "

" खुनाच्या दिवशी तुम्ही काय पाहीलेत ?"

"ऑब्जेक्शन. खुनाची वेळ अजुन ठरायचीय "

" सस्टेन्ड"

" बारा तारखेला रात्री तुम्ही घरी किती वाजता पोहोचलात?"

" साडे अकरा बारा"

" तुम्ही गाडी पार्क करताना काय झाले "

" ३/४ वेळा मोबाइलची रिंग ऐकु आली. शहाच्या गाडीतुन ती आल्यासारखे वाटले म्हणुन मी त्याच्या गाडीकडे गेलो"

" मग काय झाले ?"

" गाडीची काच उघडी होती. शहा एकटाच आत होता. तो शुद्धीत नसावा असे वाटत होते. तेवढ्यात परत फोन वाजला. शहाला जागे करावे म्हणुन मी त्याला हलवला तर तो समोरच्या सीटवरच आडवा झाला"

" तो मृत आहे हे केंव्हा कळले?"

" मला वाटले त्याला दारु जरा जास्त झालि आहे. म्हणुन मी कारचा दरवाजा उघडुन त्याला हलवले. प्रतीसाद मिळत नाही म्हणल्यावर मी नाडी बघीतली. तोपर्यंत त्याच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात आले होते."

" मग तुम्ही काय केलेत"

" मी दार लावले. त्या अगोदर काच लावुन घेतली. गुरख्याला फोन करुन बोलावले. त्याला थांबायला सांगुन मी वर फ्लॅटवर गेलो. कंट्रोल रुमला फोन करुन सांगीतले आणी खाली जाउन गुरख्याला दारावर पाठवुन दिले"

" दॅटस ऑल युवर ऑनर "

जे ने कुणालची उलट्तपासणी घेतली नाही.

" मिलॉर्ड मी आता कोहीनुरच्या स्टुअर्ट्ला बोलावतॊ"

" त्याची जबानी जर खाण्याबद्दल आणी वेळेबद्दल असली तर सरकारी वकीलांनी तसे प्रतीपादन करावे . आम्ही त्याला अनुमोदन देउ. "

कदम चडफडत बसले. त्यांनी घड्याळाकडे पाहीले. कोर्ट संपायला अजुन बराच अवकाश होता.

त्यांनी सोनलला बोलावले.

" आपले नाव ?"

" सोनल गोखले "

" आपण काय करता ?"

" मी जश मधे श्री माखांनीची असीस्टंट आहे "

" आपण त्या रात्री शहांकडे कशाला गेला होतात ?"

" शहांनी माखानींकडे काही अकाउंट्स आणी एक्स्प्लनेशन्स मागीवली होती. आयत्यावेळी माखांनीच्या आइला हॉस्पीटलमधे ऍड्मीट करायला लागले. तेंव्हा माखानीनी मला कागदपत्र घेउन शहांकडे पाठवले"

" मग ?"

" मी नउच्या आसपास पोहोचले. मला चहा देउन नोकर निघुन गेला. मी शहांची वाट पहात थांबले "

" मग "

" दोन तास थांबल्यावर मी निघणार होते, तेवढ्यात मेरी आली. मी तीला ओळखत नव्हते. पण मी काही विचारायच्या आतच तारी आला आणी त्या दोघांचे जोरात भांडण सुरु झाले. शहा वर येतच होते. मी तमाशा नको म्हणुन त्या दोघांना आतल्या खोलीत ढकलले. पंधरा मीनीटात तणतण करीत तारी निघुन गेला."

" मग. ?"

" आम्ही दोघी थांबलो. मेरी मला ओळखत होती. मी तीची ओळख करुन घेतली. खर म्हणजे मला तीची दया आली होती. शहाचे शॊक मला चांगलेच माहीती होते."

" पुढे ?"

" बराच वेळ वाट पाहुनही शहा साहेब आले नाहीत. मी त्यांच्या मोबाइलवर तीन चारदा कॉल दिला. ते त्यांनी उचलले नाहीत. काही वेळाने राणे आणी कुणाल आला आणी आम्हाला खुन झाल्याचे कळले "

जे ने तीचीही उलट तपासणी घ्यायला नकार दिला. आता मात्र कदम पेचात पडले होते. शेवटी कोर्टानेच काम थांबवुन त्यांची सुटका केली. खटल्यात अजुनही काही दम नव्हता. आता मेरी, फ़ींगरप्रीन्ट एक्स्पर्ट आणी राणे ह्यांच्याच महत्वाच्या साक्षी होत्या.
--१९--

सोनल आणी कुणाल त्या दिवशी संध्याकाळी खास बोलावण्यावरुन समीरच्या घरी पोहोचले. दोघेही समीरचा राजेशाही थाट पाहुन भारावुन गेले. समीरने थोड्याच वेळात दोघांना बोलते केले.

" सोनल तु शहांकडे जायला घाबरली नाहीस." समीर

" शहा तसे घाबरट होते. आणी माझे वडील नेव्हीत असल्याने मला सेल्फ डीफेन्स पुर्ण येतो. "

कुणाल सोनलकडे हपापलेल्या नजरेने पहात होता. सोनल त्या मानाने कूल वाटत होती.

" सोनल तुमच्या रीसेप्शन मधे कसला गणपती आहे?"

" माहीत नाही. शहांना असा नाद होता "

" कुणाल कधी गेलास तर तीथला फोटो आण रे " समीर " आणी काय मीडीयाला काय वाटतय खटल्या बद्दल ?"

" अजुन तरी काही दम वाटत नाही. तारी सुटेलस वाटत. त्यातन मेरी वरुन तो खुन करणार नाही. उलट शहालाच त्याने पेचात पकडल असते."

" बिचारी मेरी !" सोनल " ती पॅकींग मधे आहे. कुठुन शहाच्या नजरेस पडली कोण जाणे? मुलगी सालस आहे आणी तारीवर जीव लावुन बसलीय "

"एकदा भेटायला पाहीजे. "

" सांगते तुम्हाला भेटायला. येइल उद्याच "

" सोनल तुमच्या कंपनीत गुंतवणुक करायची इच्छा होती. तुमच्या कंपनीचे फायदे अवाढव्य आहेत."

" हो ना आमच्या कंपनीची प्रगती फारच जोरात आहे. आणी हो तुम्हाला त्या गणपती विषयी एवढी उत्सुकता का आहे? "

" काही नाही. वेगळाच वाटला. आणी मला सुंदर आणी नवीन गोष्टी नेहमीच आवडतात. " समीर सरळ आव्हान देत म्हणाला.

" पण अशात डेंजर असु शकते "

" आणी डेंजर असले तर खेळायला मला अधीकच आवडते. बर तु राहतेस कुठे? "

" बोरीवली इस्टला आमचा एक छोटा बंगला आहे. तीथे मी आणी माझी बहीण मीनल दोघेच राहतो"

" म्हणजे श्रीमंत दिसताय"

" नाही हो. बंगला नावाला. वडील नेव्हीत होते. त्यांनी हॊसेने रिटायर झाल्यावर जागा घेतली पण बंगला पुर्ण व्हायच्या आतच त्यांचा मृत्यु झाला. बंगला अर्धवटच राहीला आणी आम्ही अजुन कर्जच फेडतोय."

" बहीण काय करते?"

" इंटीरीअर डिझायनर आहे "

" बर एक खाजगी प्रश्न . तु आणी बहीणीनी लग्न का नाही केले ? "

" तस काही खास कारण नाही " कुणाल कडे एक चोरटा कटाक्ष टाकीत सोनल म्हणाली.

दोन तीन तास घालवुन दोघे बाहेर पडली. समीरला अजुन दिशा सापडत नव्हती. सकाळी मेरी भेटायला येणार होती तोपर्य़ंत थांबणे भाग होते.

--२०--

सकाळी दहा वाजता मेरी भेटायला आली.
ती दबुन जाउ नये म्हणुन समीर साध्या कपड्यात व्हरांड्यातच बसला होता.

" ये मेरी . चहा घेणार का ?"

" नको साहेब. "

" अग घे ग. हव तर टोस्ट सांगतो. का ऑम्लेट खाणार आहेस ?"

मेरी रडायला लागली.

" साहेब एवढा चांगुलपणा कोणी दाखवत नाही हो. God Bless You!"

" बर मेरी तु काय काम करतेस ?"

" मील मधे पॅकींग सेक्शन्मधे दिवसपाळीला "

" बर"

" रात्रपाळीला सर्व पुरुष असतात आणी सर्व जड काम म्हणजे बेल्स तयार करणॆ. स्ट्रॅप करणे हे रात्रपाळीला होत. आम्हाला त्यावर लेबल्स चिटकवणे वगेरे काम असतात"

" त्या दिवशी तु शहा बरोबर कशी गेलीस "

" सकाळी शाहांनी मला फ़्लोअर वर बघीतले. थोड्या वेळाने केबीनमधे बोलावुन घेतले आणी संध्याकाळी वरळी नाक्यावर बोलावले "

" मग "

" मी बरीच कारणे सांगीतली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी नोकरीचा प्रश्न आहे. "

" सोडुन द्यायची"

" साहेब आमच्या सारख्यांचे हातावर पोट असते. आणी सोडल्यावर दुसरीकडे लगेच कुठे मिळणार "

"ते खरच आहे. पण म्हणुन तु त्याच्या ईच्छेला मान तुकवलीस ?"

" नाही हो. पण जाण भागच होते. नंतर काय होते ते बघु असा विचार केला."

" आणी तशी वेळ आली असती तर ? "

" मग काय साहेब झक मारत देह त्याच्या हवाली केला असता. पण नंतर तारीला तोंड दाखवले नसते. लग्न तर दुरच राहीले"

" तुझी आणी तारीची ओळख कशी ?"

" शहा हा काही माझ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारा पहीलाच न्व्हता. रात्रपाळीच्या बऱ्याच कामगार माझ्याकडे त्या नजरेने बघत "

" त्यात तारीही ?"

" नाही, नाही. उलट एकदा एकाने काम करताना माझा हात धरला तर तारीने त्याची ह्जामत केली आणी तेंव्हापासुनच त्याची आणी माझी ओळख झाली. "

" तारी काय काम करतो?"

" तो काहीवेळेला रात्रीच्या शिफ्टला असतो तर काहीवेळेला माखानींची कामे करतो. बऱ्याच वेळेला तो मुंबई बाहेर असतो."

" तुला तो काय करतो माहीत नाही?"

" नाही. पण तो माझ्याबाबतीत अगदी सरळ आहे. आणि सगळी त्याला घाबरुन असतात. "

" ठीक आहे. जपुन रहा. आणी तुमच्या ऑफीसमधे एक मोठा गणपती रिसेप्शनमधे आहे, त्याबद्दल तुला काय माहीत आहे का ?"

" नाही साहेब, पण महीन्याभरापुर्वी मला असाच एक छोटा गणपती मीलमधे पॅकींगच्या कचऱ्यात सापडला तो मी तारीला दिला होता. "

" कचऱ्यात ?"

" हो साहेब. "

" मग तो गणपती कुठे आहे ?"

" तारीलाच माहीती साहेब. "

" ठीक आहे. आज तुझी साक्ष आहे. कधीही खोट बोलु नकोस. ये आता"

मेरी गेल्यावर समीर गणपतीच्या गुपीतात बुडुन गेला.

क्रमशः

गुलमोहर: