हरवलेल पुणे

Submitted by जयन्ता on 24 March, 2012 - 01:23

पुणे. एके काळाचे सायकलींचे, वाड्यांचे शहर. आता वाडे पण गेले आणि सायकली सुद्धा. पण त्यान बरोबर पुण्याने आपला चेहरा तर गमावला नाही ना..?
IMG_0176.png

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ओसरी, वाडा, बिर्‍हाडे, लाघवी भाडेकरू
हे पुणे नाहीच माझ्या आठवांचे गाव ते

Sad

धन्यवाद या चित्राबद्दल, जुन्या आठवणी उजळवल्याबद्दल

-'बेफिकीर'!

पुण्यातले सदाशीव पेठ, नारायण पेठ येथील तैलबुद्धीचे लोक येथील अनागोंदिला कंटाळुन परदेशात स्थाईक झाले. त्यांच्या बुद्धीची पुण्याला गरज आहे त्यांनी परतावे, पुण्याला गतवैभव तेच मिळवुन देऊ शकतात.जसे पुणे साठच्या दशकात पुढे होते याला कारण प्रतिभेचे केंद्रीकरण.आमच्या पेठा हा आमचा स्वाभिमान आहे.

मामी +१

प्रत्येक वाढत्या जागेचा चेहरा बदलत जाणे हे अपरिहार्य आहे. नॉस्टॉल्जिक होऊन सुस्कारे सोडत रहायचं की आधीच्यातलं आणि बदलातलंही सकारात्मक तेवढं घेऊन पुढे बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.
प्रत्येक बदल हा वाईटच असतो असे नव्हे. पण तसं मानणे हे खास मराठीपणाचं लक्षण आहे की काय असं अनेकदा वाटतं. हे सगळं केवळ अनुषंगाने आठवलं म्हणून. वरच्या चित्रावरची किंवा त्यातल्या म्हणण्यावरची कॉमेंट नव्हे.

आता इथे लवकर भारत विरूद्ध अमेरिका सामना रंगावा अशी व्यवस्था झालेली दिसलेली आहे वरच्या प्रतिसादात तेव्हा आम्ही पॉपकॉर्न घेऊन सज्ज आहोत आमच्या खुर्चीत.. हवंतर एखादी पेटती काडी पण सोडून देऊ अधून्मधून.. Proud

गरजूंनी Light 1 घ्यावा. (तोही पेटताच आहे म्हणा! ;))

मला माझ्या बालपणीच्या पुण्याची आठवण झाली(आमच्यावेळी अस नव्हत Wink ) आणि अजून कोणाला लहानपणीच्या आठवणीतला एखादा कवडसा देता आला तर पाहावं म्हणून हे छायाचित्र. "सकारात्मक" बदलांना नाक मुरडायचा माझा काही विचार नाही.

खूप भावलं, मीं पुण्याचा नसूनही !
पुण्यात झालेला बदल चांगला कीं वाईट हा प्रश्न दुय्यम; मनात ठसलेलं पुणं पुसलं जातंय याची खंत तर असणारच ना ! पुण्याचंच काय, प्रत्येक शहराच्या, गांवच्या आठवणी जपणार्‍या सगळ्याच मनांत ही भावनिक रुखरुख असतेच असते !!

रच्याकने, ना. गोपाळ कृष्ण गोखल्यानी पुण्यात बांधलेल्या त्यांच्या वाड्यावरचा एक छान वाचनीय लेख कालच्या [दि. २४-३-'१२] लोकसत्ताच्या ' वास्तुरंग ' पुरवणीत आहे .

आन्द्यात्री काय हे ! एकच फोटो ?? आणखी टाका हो.

माझ्या बालपणी १९५९ ते १९६६ मी माझ्या आजोबांबरोबर अनेकदा पुण्याला (भिकारदास मारुती देवळासमोर)
येऊन राहिलोय. खूप आवडायचं पुणं त्यावेळचं. त्यामुळे पुणे म्हटलं की कधी कधी नॉस्टेल्जिक व्हायला होतं.
जुन्या/बदलेल्या खुद्द पुण्यातल्या विभागांचे फोटो टाका.
पुण्याला जायला जमलं नाही गेल्या काही वर्षांत .... निदान फोटोवर समाधान. Happy

हा पुण्यातला फोटो वाटत नाही. कुठल्यातरी खेड्यातला असावा. पुण्यातला असता तर एकावर एक अशा किमान ३-४ सायकलींची उतरंड दिसली असती आणि ती सुद्धा भिंतीच्या दोन्ही बाजूला. इथे एकच सायकल आहे आणि ती एकाच भिंतीला टेकलेली आहे.

चेन्ज इज इनएव्हीटेबल असे म्हणणे आणि मानणे या वेगवान जगात आत्यंतिक गरजेचे झाले आहे. मी पिंपरीत जन्मले आणि वाढलेही इथेच. पुण्यातील बदल मला आणि माझ्या बरोबरीच्या इथल्या मैत्रिणींना कधी जाणवले नाही कारण फोटोतील पुणे आम्हाला कधी पाहायला मिळालेच नाही. तीच गोष्ट पिंपरी परिसरातील उद्योगधंद्याच्या गर्दीतील आणि त्या अनुषंगाने वाढत गेलेल्या संस्कृतीची. उद्या कदाचित लवासासम बदल या परिसरातही झाल्यावर आम्ही अन्यत्र गेल्यावर आमच्या मनी रुजलेल्या आठवणी आजच्या स्थितीतीलच असणार आणि त्या आम्ही नॉस्टॅल्जिक तत्वावर जपू.

'चेहरा गमावणे' याचा एक अर्थ पूर्वीची शांतता गमावली असाही होऊ शकतो. आमच्या पिढीला परिसर शांतता हीच टर्म कधी वाट्याला न आल्याने अशा आठवणी संदर्भातील काही मिळविणे किंवा गमावणे यातील सूक्ष्म फरक कधी कळणार नाही असे म्हणावे लागेल.

बाकी निवडलेल्या प्रकाशचित्रासमवेत विषय संबंधित अधिक आठवणीही वाचायला आवडेल.

वर्षा