Submitted by अनिल तापकीर on 21 March, 2012 - 09:37
रूप सावळे सुंदर मनोहर |
भक्तांसाठी उभे असे विटेवर |
नासाग्री दृष्टी, हात कटेवर |
गळा शोभतसे तुळशीचा हार|
कपाळी केशरी गंधाचा टिळा|
छातीवरी रुळे वैजयंतीमाला |
कासे शोभतसे पिवळे पितांबर |
किती वर्णू रूप सुंदर...सुंदर....|
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आमच्या घराण्यात जन्माला आला
आमच्या घराण्यात जन्माला आला कि पाचवीच्या दिवशी गळ्यात तुळशीची माल घालण्याची परंपरा आहे.आणि हि परंपरा पाच पिढ्या पासून चालत आली आहे म्हणून मला विठलाचे ते मनमोहक रूप पहिल्यापासून खूपच आवडते