ओळखा पाहू : हे वाक्य / उतारा कुठल्या पुस्तकातला आहे ?

Submitted by विस्मया on 18 March, 2012 - 03:33

एक खेळ खेळूयात का ?
खेळाचा उद्देश हसत खेळत मराठी पुस्तकांची माहिती शेअर करणे हा आहे. इथं गाजलेल्या मराठी पुस्तकातील एखादं वाक्य / उतारा द्यायचा आणि तो इतरांनी ओळखून दाखवायचा. उत्तर देतानाच त्या पुस्तकाची थोडक्यात माहिती, त्या पुस्तकासंबंधी असलेली एखादी आठवण द्यायची.

लक्षात असू द्या.

१. आपण देणार असलेलं वाक्य / उतारा शक्यतो अगदीच अडगळीत गेलेल्या अपरिचित पुस्तकातून देऊ नये.
२. कुणालाच उत्तर न आल्यास प्रश्नकर्त्याने खूप ताणून न धरता उत्तर द्यावे.
३. इथं मराठी भाषेतल्याच पुस्तकांतील उतारे अपेक्षित आहेत.
४. पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या सिनेमा / नाटकातील उतारेही चालतील.
५. आपण जर एक दोन ओळी देणार असू तर त्या ओळखता येतील याची खात्री हवी. थोडक्यात त्या गाजलेल्या हव्यात, त्यातून लेखकाची शैली दिसून यायला हवी. अशी खात्री वाटत नसेल तर एक गंमतीदार क्ल्यु द्यावा. या क्ल्यु मुळे खेळाची रंगत वाढायला मदत होईल. थोडक्यात काय, वाक्य ओळखलं गेलं नाही तरी हा क्ल्यु लक्षात रहावा.
६. उतारे दिले तर ओळखायला सोपं जातं. याचाही विचार व्हावा.

उदा : आठवणी हत्तीच्या पायांनी येतात. खूप खोलवर आपला ठसा उमटवून जातात.

उत्तर - श्री शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या गाजलेल्या पुस्तकातील हे वाक्य. त्या वेळी घराघरातून हे पुस्तक रामायण-महाभारतच्या जोडीने असायचं. भारतातल्या अनेक भाषांमधे ही कादंबरी अनुवादित झाली. लहानपणी भाषा समृद्ध करणारी एक संस्कारक्षम कादंबरी म्हणून तिचं मराठी भाषिकांमधलं स्थान अबाधित राहणार असं वाटतं.

उत्तर आलंच पाहिजे हा खेळाचा हेतू नाही. खूप दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या चांगल्या साहीत्यकॄती या निमित्ताने एकमेकांत शेअर केल्या जातील, कुणासाठी ती वाचायची राहून गेली असल्यास एक रिमांईडर म्हणूनही उपयोग होईल.. आणि खेळ तर आहेच !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री रणजित देसाई यांच्या मृत्युंजय या गाजलेल्या पुस्तकातील हे वाक्य>>>

मी मेलो...............

माफ करा मैत्रेयी, मृत्यूंजय शिवाजी सावंतांनी लिहीले आहे. अभ्यासपूर्ण खेळ खेळायचा असेल तर असल्या चुका अक्षम्य गणल्या जाऊ शकतील

विदिपा Sad
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आवश्यक तो बदल केला आहे. क्षमस्व ..

जेम्स बाँड : हा धागा फक्त मराठी भाषेतल्या ग्रंथांसाठी आहे. इतर भाषेसाठी आपण वेगळा धागा उघडू शकता Happy

विदिपा

बरोब्बर उत्तर. खूप गाजलेली कादंबरी ! भेट देता येण्यासारखी..
तुम्ही विचारा आता प्रश्न

उत्तर चुकू शकतं. हसत खेळत खेळायचाय हा खेळ. चुकलं तर... असं टेण्शन वगैरे घ्यायचं नाही Happy

फिरली मर्जी, फिरला वारा !
फिरल्या नजरा, फिरल्या धारा !!

[ विरामचिह्ने माझी ]

आ.न.,
-गा.पै.

तिकडे तापी तिरावर एक जटाधारी योगी थयाथया नाचत होता. त्याच्या अंगा-खांद्यावर रुद्राक्षाचे मळे उगवले होते मळे योगी उंच आसनवर बसला होता.

@ वेताळ पंचविशी
मी तर हरलो बुवा...

(स्वगत : कुठली पुस्तकं वाचायला हवी हे कळायला छान मदत होईल असं वाटतंय. )

गामा पैलवान - युगाचे उत्तर बरोबर आहे का ?
वेताळ२५ - नाही माहीत उत्तर..
विदिपा - तुमच्याकडून सहभाग अपेक्षित आहे. मृत्युंजय कुणी लिहीलेय हे चांगलेच लक्षात आहे. त्यातल्या काही ओळी न वाचताही न वाचताही इथे देता येतील मला. पण श्रीमान योगीतला उतारा उदाहरण म्हणून द्यावा कि छावामधला या विचारात असताना अचानक ही ओळ सुचली. आपण राग मानू नये ही विनंती..

हसत खेळत योगदान द्यावे.

अचानक असं काहिच घडतं नसत, आपल्याला मगचा पुधचा संदर्भ माहित नसतो एवधेच.

ओळखा कशातल वाक्य आहे ते?

Maitreyee Bhagwat, उशिराबद्दल क्षमस्व!

युरी, तुमचं उत्तर चुकलंय. Sad
मात्र छत्रपतींचा संदर्भ बरोबर आहे. Happy

येत्या २४ तासांत अचूक उत्तर मिळाले नाही तर ते उघडे करीन.

आ.न.,
-गा.पै.

प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नव्हे.तो रक्तात असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.

ओळखा पाहु? Happy सोप्पंय खरंतर.

आता मी देते.

कधी कधी अनेकांच्या वाटा चुकतात! मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्यातरी युगायुगांच्या वाटा बेमालुम जुळुन जातात.

म्हणायच मंगळ्सुत्र, मग त्याचा रंग काळा का ?...
ते धवलसुत्र का नाही, म्रुत्युचा रंग काळा, जीवन बहुरंगी असत, मरण सगळे
रंग पुसुन टाकते..बालपण बहुरंगी, सासर एकरंगी, आणि वार्धक्य बेरंगी...
हे सातत्याने स्त्री च्या लक्शात रहावे म्हणुन त्याचे मणि काळे............. ओळ्खा पाहु..

मनोरंजक खेळ आहे हा. Happy पण २४ तास वगैरे नको. लगेच तासादोनतासात उत्तरं आली तर पटापट पुढे सरकेल हा बाफ.

योडीचं वाक्य खांडेकरांचं वाटतं. (किंवा मग राजे/राजाध्यक्ष/देवधर/गोडबोले या स्त्री लेखिकांचं. Proud :दिवा:)

१) ही पल्सपेक्षा इंपल्सवर चालणारी व्यक्ती असेल असं वाटलं..
२) एक क्षण भाळण्याचा, उरलेले सारे सांभाळण्याचे..
(आता हे दोनच सेकंदात ओळखता येईल. मग 'दोन क्षण रागावण्याचे, चार क्षण गावण्याचे..' 'एक भिडू सोकावलेला, दोन गडी कावलेले..' अशी आपापल्या सर्जनशील वृत्तीला वाट करून देण्याचा खेळ खेळता येईल. Proud हे झालं की मग पुढचं वाक्य.)
३) एकंदर आयुष्याला कुठच्याही कोष्टकात बसवता येत नाही, हेच खरं.

Pages