Submitted by झकासराव on 14 March, 2012 - 04:17
आज असाच विषय निघाला चित्रकलेचा आणि मी माझी चित्रकला कशी वाइट होती ह्याचे अनुभव लिहिले पिचि बाफ वर. तर तिथे "माझिया जातीचे" अजुन काहि होते :फिदी:. त्यानी त्यांचेहि किस्से ऐकवले.
असे किस्से शेअर करण्यासाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चेंबूर हायस्कूलमधे आम्हाला
चेंबूर हायस्कूलमधे आम्हाला श्री कारेकर चित्रकला शिकवत असत. ते दोन्ही हाताने एकाचवेळी चित्र काढत असत.
दोन कोंबड्यांची झुंज ( एका हाताने एक कोंबडा अशी ) एवढी अप्रतिम चितारत कि आम्ही बघतच बसू. आणि तीसुद्धा मोठ्या फळ्यावर !
अर्थात तसे चित्र काढणे आम्हाला कधी जमले नाही.
. परीक्षेत ६०-७० बास्स!!>>>
. परीक्षेत ६०-७० बास्स!!>>> खुप झाले की.
मी नेहमी ५०-५५.
बाकी विषयात ७०-७५-८० ह्या रेन्ज मध्ये.
पण चित्रकलेमुळे बरच मागे पडायचो.
कचा
माझा आवडता प्रकार म्हणजे
माझा आवडता प्रकार म्हणजे वहीच्या पानाची मधोमध घडी करायची आणि ४-५ थेंब शाई ओतून पान दुमडून टाकायचे.
मस्त सिमेट्रिक डिझाइन तयार.
नंतर ग्रेड परीक्षेला बसलो. तिथं आमचे सर आमचीच एखाद्याची वही घ्यायचे आणि आम्हाला शिकवता शिकवता स्वतःच चित्र काढण्यात गुंग होऊन जायचे. मग त्यांनी आपली वही घ्यावी म्हणून आमची गर्दी व्हायची.
त्यांनी ड्रायब्रश शिकवायसाठी काढून दिलेली जास्वंदाची कळी कितीतरी दिवस मी जपून ठेवली होती.
माझी स्वतःची चित्रकला म्हणजे एक भलं मोठं झाड. त्याच्या सावलीत घर. मग बाहेर झाडापेक्षा उंच फुगेवाला माणूस. त्याच्या कडून फुगा घेणारी घरापेक्षा उंच आणि झाडाएवढी तगडी दोन रिबिनी लावलेली, शाळेच्या फ्रॉकमधली पाठमोरी मुलगी. मग उडते बगळे, डोंगर वगैरे. आजूबाजूला काँग्रेस गवत वाटावं अशा उंचीची आणखी झाडं. असं सगळं.
इंजिनियरिंग मधे पर्स्पेक्टिव्ह आवडता टॉपिक. ते टेक्निक वापरून दुमजली घरं वगैरे काढून बघितली होती रात्र रात्र जागून.
आजही रोजच्या पाठीवरच्या सॅकमध्ये एक कोर्या पानांची वही आणि एक बॉलपेन नेहमी असते.
घरी निळ्या टोपणाची चपटी रंगपेटी आणि १-२-५ नंबरचे ब्रश.
पण महिने महिने हातही लागत नाही.
Pages