द्रविड रिटायर झाला, तेंडूलकर व व्हिव्हिएस लक्ष्मण कधी होणार?

Submitted by पुरोगामी on 13 March, 2012 - 05:53

द्रविड द वॉल स्वतहून रिटायर झाला.पण फॉर्मात नसुनसुद्धा व्हिव्हिएस लक्ष्मण व तेंडूलकर रिटायर होत नाहीत.त्यांनी रिटायर होउन तरूण व होतकरू खेळाडूंना जागा रिकामी केली पाहिजे.अनेक चांगले तरूण खेळाडू त्यांच्यामुळे कुजले आहेत.हा त्यांच्यावर अन्याय आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेंडुलकरचं महाशतक झाल्याशिवाय निवृत्त होऊ देणार नाहीत त्याला.

लक्ष्मण , कुंबळे आणि जवागल श्रीनाथ हे निवृत्तीनंतरच संघात जॉईन झालेले खेळाडू आहेत. त्यांचा प्रश्न नाही, तरी त्यातले दोघे हल्ली खेळत नाहीत.

देशात हजारो-लाखो बेरोजगार तरुण आहेत. नरेंद्र, तुम्ही रिटायर होऊन त्यांच्यासाठी एक जागा रिकामी का करत नाही? Wink Light 1 Proud

त्यांनी रिटायर होउन तरूण व होतकरू खेळाडूंना जागा रिकामी केली पाहिजे.अनेक चांगले तरूण खेळाडू त्यांच्यामुळे कुजले आहेत
----- हे १०० % मान्य आहे... हे तुम्ही म्हणायचे धाडस केले त्याबद्दल अभिनंदन.

१०० वे शतक झाल्यावर निवृत्त व्हावेच लागेल, म्हणुन जेवढी कारकिर्द वाढवता येईल तेव्हढी वाढवायची... जाहिरातींचा कोट्यावधींचा पैसा अडकलेला आहे म्हणुन क्रिडाप्रेमींना निमुट पणे सहन करावे लागते.

लक्ष्मण हा माझा आवडता खेळाडू आहे हे लपवून ठेवत नाही. त्याच्या शैलीदार खेळामुळे तो आवडतो असं नसून त्याच्या जिगरी खेळामुळे मी त्याचा फॅन आहे. राहुल द्रवीड आणि त्याच्यामधे झालेली ती जगप्रसिद्ध भागिदारी ज्यामुळे भारताने फॉलोऑन नंतर मॅचही जिंकली आणि सिरीजही, ही माझ्यामते भारतीय संघासाठी संजीवनी ठरली. लढायचं कसं याचं प्रशिक्षण देणारी ती खेळी होती. लक्ष्मणच्या बॅटीतून त्यानंतरही संघ प्रतिकूल परिस्थितीत असताना अशा अनेक जिगरी खेळ्या झाल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊनही तो लढला. काही वेळा अपयशीही ठरला. विशेषतः समोर ऑस्ट्रेलियन्स असताना त्याच्या बॅटीला धार चढत असे.

मात्र, तो दुर्दैवी खेळाडू ठरला. ज्या ज्या वेळी तो चांगला खेळला त्या वेळी अनाकलनीय कारणांसाठी त्याला डच्चू मिळाला. त्यानेच म्हटल्याप्रमाणे संघातलं त्याचं स्थान कधीच निश्चित नव्हतं. वन डे मधे तर त्याचा विचारही होत नव्हता. शेवटची चार पाच वर्षे त्याला संघात सुरक्षित वाटलं. ही असुरक्षितता हेच त्याचं बळ ठरलं असं म्हटलं तरी चालेल.

क्रिकेट हा असा खेळ आहे कि एखाद्या खेळाडूला आपण फिल्मस्टार प्रमाणे प्रेम देतो. त्याने दिलेलं योगदान लक्षात ठेवूनही आणि त्याच्यावरचा अन्याय लक्षात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं कि आता मात्र लक्ष्मणचं वय झालेलं आहे. त्याच्याचसारखा खेळाडू मिळेल असं नाही. कदाचित कमी दर्जेदार खेळाडू मिळेल. पण जो कुणी असेल त्याला स्थिरावायला, अनुभव घ्यायला संघात जागा उपलब्ध असायला हवी. नाहीतर आजही सुनील गावस्कर, कपिलदेव, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर हे खेळतच राहीले असते. हे महान खेळाडू निवृत्त झाल्यानंतरच संघात द्रवीड, तेंड्लकर, गांगुली, सेहवाग, लक्ष्मण, अजहर असे खेळाडू खेळू शकले हे लक्षात ठेवायला हवं. इथून पुढे एका खेळाडूच्या करिष्म्यावर जगण्याचे दिवस संपलेले आहेत. प्रत्येकाने किमान ४० धावा केल्या तर ४०० धावा होतात हे लक्षात ठेवून सांघिक खेळ करण्याला महत्व येणार आहे.

अर्थात हे खेळाडू प्रगल्भ आहेतच. लोकांनी कधी जातोस असं विचारण्यापेक्षा , का गेलास असं विचारावं असं टायमिंग साधण्याच भान त्यांना निश्चित असेल. नाहीतर रवी शास्त्रीला प्रत्येक मॅचला पब्लिक हाय हाय करायचं त्याला खूप वर्षे झालेली नाहीत. याच शास्त्रीने ऑडी कार जिंकली होती हे ही विशेष !

रवी शास्त्री महान खेळाडू? :एतेन:
१०० चेंडू खेळून कुथत कुथत ३५ धावा करायच्या त्यातसुद्धा 'चपाती' शॉटवर मिळाला तर एखाददुसरा चौकार ही महान खेळाडूची लक्षणे अजिबातच नव्हती.
गावस्करने शास्त्रीला सपोर्ट केला नसता तर शास्त्रीची पुण्याई रणजीपुरतीच राहिली असती.

लक्ष्मण रेषेबाहेर तसाही आलेलाच आहे, त्याला अजुन ढकलण्यात काय अर्थ आहे?

रवी शास्त्री हा माझ्या लेखी अत्यंत डोकेबाज खेळाडू - जेव्हा ज्या गोष्टी ची गरज ( त्याला) होती तेव्हा ते ते त्याने यशस्वी पणे केले आहे -
उदा -
१. Champion of Champions
2. युवराज च्या आधी ६ चेंडूवर ६ षट्अ कार - यावरून कळेल की ठरवून 'टुकु-टुकु' खेळला.
३. एकमेव कसोटी मधे भारताचे नेतृत्व - आणि ती कसोटी जिंकून दाखवली.

खरोखर कर्णधार व्हायच्या लायकीचा खेळाडू - अत्यंत धूर्त. दुर्दैवाने तसे झाले नाही.

युरी, पोस्ट आवडली. लक्ष्मण कडे बघून सध्या असे वाटते की निवृत्त व्हायची वेळ आलेली आहे - त्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध अपयशी ठरल्यामुळे जास्त. पण त्याचे ऑस्ट्रेलियाविरूद्धचे यश जेव्हा त्यांनी त्याला आक्रमक बोलिंग केली तेव्हाचे जास्त आहे. २००४ मधे त्याला "चोक" केला होता तेव्हा फारसे काही करू शकला नव्हता तो, आणि बहुधा २००८ मधल्या भारतातील सिरीज मधेही,नीट लक्षात नाही.

पण कोणास ठाऊक? अजून एक दोन वर्षे क्रिकेट असेलही त्याच्यात. प्रत्येक सिरीजमधले सातत्य हा त्याचा गुण कधीच नव्हता. पण तो मधेच जेव्हा अत्यंत गरज असेल तेव्हा बरोबर खेळून जातो - हे २००३ पासून बर्‍याचदा दिसलेले आहे. आणि मग लोक जागे होतात. पण हे विसरतात की त्याआधी एखादी सिरीज तो फेल गेलेला असतो. या इतकी वर्षे दर्जेदार बोलिंग विरूद्ध खेळलेल्या खेळाडूंना एक दोन सिरीज मधे अपयश आले तर त्यावरून 'ते संपले' हे ठरवता येत नाही.

त्यामुळेच मग अशा वेळेस ऑस्ट्रेलियन स्टाईलने हाकलावे ही आपली पद्धत नाही. त्यांना करू दे. त्यांनी पॉण्टिंगला केले म्हणजे ते बरोबर आहे असे नाही. 'खुद लक्ष्मण' ठरवू शकतो की त्याने अजून खेळायचे की नाही. त्याने तेवढा हक्क कमावलेला आहे.

त्याने अजून खेळायचे ठरवले तर २-३ महिन्यांनी मधे जेव्हा लंका सिरीज असेल तेव्हा टेस्ट लाईन-अप मधे सचिननंतर दुसरे हुकमी नाव लक्ष्मणच. बाकी कोणी नाही, अजूनतरी.

द्रविड रिटायर झाला, तेंडूलकर व व्हिव्हिएस लक्ष्मण कधी होणार?
>>>>>>>> व्हायचे तेव्हा होतील. तुम्ही नका चिंता करु.

अनेक चांगले तरूण खेळाडू त्यांच्यामुळे कुजले आहेत >>>>>>>> ते कसे बुवा???
रवी शास्त्री महान खेळाडू?>>>>>>>> Lol

फारेण्डा, त्यांनी पाँटिंगला हाकललं कारण त्यांच्याकडे बेंच स्ट्रेंग्थ भरपूर आहे आणि योग्य माणसांना निवडण्याची समज देखील. आपले असातत्यशील इडलीडोसा निवडसमिती अध्यक्ष श्रीयुत कृष्णम्म्हाचारी श्रीखांथ यांच्यात योग्य संघ निवडण्याची समज आणि नि:पक्षपातीपणा दोन्ही नाही. दुर्दैवाने. म्हणून मग we have to carry a lot of dead wood in the team.

एकदिवसीय सामन्यात भारताने एकूण १३ वेळा प्रतिपक्षाच्या ३००+ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे. हा विश्वविक्रम आहे.

सचिन यातील ८ सामने खेळला होता व त्याची कामगिरी अशी होती.

(१) ४१ धावा (२६ चेंडूत)
(२) ३९ धावा (३० चेंडूत)
(३) २६ धावा (२५ चेंडूत)
(४) १४ धावा (१९ चेंडूत)
(५) ९४ धावा (८१ चेंडूत) {या सामन्यात तो 'सामनावीर' होता}
(६) २ धावा (३ चेंडूत)
(७) ८ धावा (८ चेंडूत)
(८) ५२ धावा (४८ चेंडूत)

म्हणजे यातल्या ४ सामन्यात तो चांगला खेळला होता, ३ सामन्यात फ्लॉप होता व एका सामन्यात बरा खेळला.

http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?batting_fieldin...