धक्के

Submitted by जो_एस on 24 April, 2009 - 05:44

गझलां मधून साऱ्या धक्के चिकार झाले
पृथ्वी वरी म्हणूनच भूकंप फार झाले

पाणी कपात आता, अन् वीजही कपातच
या यंत्रणेत इथल्या सारे पसार झाले

हल्ला तसा अचानक, कोणी पळून गेले
लढलेत जे इमानी, सारेच ठार झाले

वचनास जागण्याची ना चाडही कुणाला
होताच काम त्यांचे सारे पसार झाले

कळले न आज मजला विपरीत काय झाले
होकार कालचे ते सारे नकार झाले

सरड्या परी बदलते हे रंग या जगाचे
पाहून खेळ सारे मीही हुशार झाले

"मजला असेच वाटे", म्हणतात पीळगावी
नखरे महागुरूंचे, भलते भिकार झाले

देवा कळे न तुजही? हे भक्त की कसाई
जीवावरी बळींच्या सारे उदार झाले

सुधीर

गुलमोहर: 

छान जमलीय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

"हल्ला तसा अचानक, कोणी पळून गेले
लढलेत जे इमानी, सारेच ठार झाले

वचनास जागण्याची ना चाडही कुणाला
होताच काम त्यांचे सारे पसार झाले

कळले न आज मजला विपरीत काय झाले
होकार कालचे ते सारे नकार झाले"

आवडले.

यातल्या पहिल्या शेराच्या धर्तीवर माझा एक मत्ला आहे

"वाजतात चौघडे, जायचे लढायला,
शूर वीर बेरकी लागले पळायला!"

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

>देवा कळे न तुजही? हे भक्त की कसाई
जीवावरी बळींच्या सारे उदार झाले
क्या बात है!!
__________________________
***हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूं है
अब तो हर वक्त यही बात सताती है हमे..***

अलका, विजय, शरद, योग
मित्रांनो
धन्यवाद

सुधीर

धक्के - छान

देवा कळे न तुजही? हे भक्त की कसाई
जीवावरी बळींच्या सारे उदार झाले

हा शेर खुप आवडला...

गणेश
प्रतीसादाबद्दल अभारी आहे

सुधीर

सुधीर मित्रा.. छान गजल!
उदार मलाही खूप आवडला. Happy

'हल्ला' आवडला. शरद, तुमचाही शेर आवडला.

    ***
    Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

    माणक्या, स्लार्टी

    धन्यवाद

    सुधीर

    फारच सुरेख जमली आहे..कविता/गझल..

    खालील ओळींचा अर्थ नाही समजला..

    "मजला असेच वाटे", म्हणतात पीळगावी
    नखरे महागुरूंचे, भलते भिकार झाले

    ----------------------------------------------------
    If you follow all the rules, you miss all the fun!
    http://www.mokaat.blogspot.com/