नवीन बुक स्टोअर सेट अप- समर्पक नाव योजावयाचे आहे

Submitted by बागेश्री on 11 March, 2012 - 13:24

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

माझी ताई स्वतःचे बुक स्टोअर एका नामांकित शॉपिंग मॉल मध्ये सुरु करते आहे.
त्या शॉप ची संकल्पना "क्रॉसवर्ल्ड" पद्धतीवर साकारलेली आहे, त्यासाठी एखादे छान समर्पक नाव योजायचे आहे.

माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा अनेक एकत्र आले तर एखादे छानसे नाव देता येईल Happy

तेवढ्यासाठी हा धागा...

प्लीज नावं सुचवा!

टीप: त्या शॉप मध्ये नवीन-जुने मराठी व इंग्रजी भाषेतील अधिकाधिक साहित्य वाचनास उपलब्ध असणार आहे, नाव जरासे आधुनिक (ट्रेंडी) पण अर्थपूर्ण योजायचे आहे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर पुस्तक केंद्र>>>>>

Rofl

ननंद की नणंद? की कंसात असलेला शब्द रद्दच झाला?

माझ्या एकटीच्या मेंदू पेक्षा>> सहमत आहे

'नेमदबूकवुईहॅवइट' - हे शीर्षक??

सर्वांचे मनःपूर्वक आभार, फ्रेंडस!
ताई, हा धागा वाचते आहे आणि काही नावं शॉर्टलिस्टही केली आहेत तिने.
ऑलरेडी लिगली रेजिस्टर नसलेले नावच तिला योजावे लागणार आहे Happy
रेजिस्ट्रेशन झाले की डिक्लेअर करेनच.

उप- समर्पक नाव >>> या धाग्याच्या शीर्षकातलं "उप- समर्पक" इतके दिवस झेपतच नव्ह्तं मला. आत्ता कळलं. ते शीर्षक असं आहे : "नवीन बुक स्टोअर सेट अप- समर्पक नाव योजावयाचे आहे" Rofl

मराठी:
दुकान ऑफ पुस्तक Happy
दुकान ऑफ बूक्स
पुस्तक मिळेल.
वाचत रहा
पुस्तकेच पुस्तके

विंग्रजी:
फुल्ल ऑफ बूक्स
बूक्स अँड मोअर

धेडगुजरी:
बूकपंढरी
बूक्सदेखो

BOOKED !!

काही ठरले का मग? ते डू-बुक आणि बुक-किंग मस्त आहे.. पण डू-बुक मराठी आहे त्यामुळे मर्यादित लोकांना समजेल... बुक-किंग अधिक समर्पक वाटतंय.. Happy

काय ठरले मग शेवटी???>> रेजिस्ट्रेशन लांबून पुढील महिन्यात ठरले आहे. कळवतेच! Happy

नावः
बुकस्टॉप
(लोगो म्हणून मस्त बस थांबा च्या पाटी प्रमाणे बनवता येईल) हे घ्या:
कल्पना यावी म्हणून डिझाईन दिले आहे. मधल्या खिडक्यांमध्येही ऊभी ठेवलेली पुस्तके दाखवता येतील..

book stop.JPG

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

ह्या धाग्यावर येऊन सुचवलेल्या नावांसाठी प्रत्येकाची मनःपूर्वक आभारी आहे.
आणि हे लिहीताना खूप आनंद होतो आहे, ताईंचे प्रचंड कौतुकही वाटते आहे-
दिनांक २२ मे रोजी, ताईच्या बुक-स्टोअरचं दणक्यात उद्घाटन झालंय!
तिने "WordPower" असं नामकरण केले आहे!

तर, हे वर्डपॉवर आहे, कोल्हापुरात!! Happy
सगळ्या कोल्हापुरच्या माबोकरांनी आवर्जुन भेट द्यावी (ईतरांनीही सवडीने जाणे करावे) व पुस्तकांचे कलेक्शन, स्टोअरची मांडणी कशी वाटली (ह्यात सर्व ताईने स्वतः जातीने लक्ष घातले आहे) हे निश्चितच कळवावे, ही विनंती Happy

पत्ता: वर्डपॉवर, ताराबाई पार्क, वामन हरी पेठे ज्वेलर्स दुकाना जवळ.

आणखी डिटेल पत्ता, ताईकडून कळताच नोंदवेन त्याशिवाय तिने परवानगी देताच वर्डपॉवर चे फोटोही डकवेन.

पुन्हा एकदा, सर्वांचे खूप आभार फ्रेंडस! Happy

वर्ड पॉवर..

हं, ते मराठी बोला, मराठी पाट्या लावा करत मायबोलीवर इतस्ततः खिंकाळणारे घोडे अजुन निषेधाला कसे आले नाहीत ?

बागेश्री...

मी कोल्हापूरचा आहे आणि या शहरात नित्य दिनी वेगवेगळी मॉल्स ओपन होत असताना कुणीतरी पुस्तकाचे दुकान सुरू करीत आहे ही अत्यंत समाधान देणारी बाब आहे.

ताराबाई पार्क हा खूप सर्वार्थाने समृद्ध समजला जाणारा कोल्हापूरातील भाग असून येथील पुस्तकप्रेमी रहिवाशांना पुस्तकांसाठी शहराच्या मुख्य भागातील दुकानांकडे येणे भाग होते. 'वर्ड पॉवर' ने पुस्तकांच्या विक्रीत आवश्यक ते वैविध्य ठेवले तर येत्या काहीच महिन्यात त्याचे बस्तान या भागात नक्कीच बसेल.

मी आणि माझे मित्र जरूर 'वर्ड पॉवर' ला भेट देणार.....(तुमच्या ताईना विचारुन पत्ता : "सासने ग्राऊंड एरिया" याचा उल्लेख करायला सांगणे....हे मैदान कोल्हापूरकरांना माहीत असते....वामन हरी पेठें पेढी याच मैदानाच्या परिसरात आहे.)

शुभेच्छा अर्थात आहेतच.

अशोक पाटील

अशोकजी

कोल्हापूरला आलो कि पहाटे फिरायला मी येत असतो या भागात ( त्या वेळी दुकानात शिरायचा प्रयत्न केला तर पोलिसांना आवडणार नाही असं वाटतंय )

अक्षर शहा....

पोलिस बिचारे कशाला अडवतील जर तुम्ही पुस्तकांच्या दुकानात शिरणार असाल तर ??.....हां, अगर वामन हरी पेठे दुकान के आसपास भी मंडराओगे तो कुछ और बात | Proud Proud

मच्या ताईना विचारुन पत्ता : "सासने ग्राऊंड एरिया" याचा उल्लेख करायला सांगणे....हे मैदान कोल्हापूरकरांना माहीत असते....>> नक्कीच अशोकजी, माहितीसाठी आभारी आहे Happy

सर्वांचे धन्यवाद.. Happy

नमस्कार माय्बोलीकरानो ……

ह्या धाग्यात प्रश्न विचारतेय म्हणून माफ करा …नवीन धागा कसा काढायचा हे शोधण्याचा बरेच प्रयत्न केला …पण कस ते अजूनही काळात नहिये मह्नुन इथेच माझा प्रश्न विचारतेय … जाणकारांनी ह्या प्रश्नाचा नवीन धागा बनवला तर खूपच मदत होईल

मी आणि मैत्रीण मिळून एक ट्रवेल कंपनी सुरु करतोय, पण आम्ही फक्त वुमन किंवा सोलो वुमन travellers , ह्यांच्यासाठी टूर्स अर्रेंज करणार आहोत …… तर आता बरेचसे काम सुरु झालेय, पण नाव काही अजून छान मिळत नाहीये ….

प्लीज छानसे नाव सुचवा ……. नाव जरा इंग्लिश असेल तर उत्तम… भारतभर सगळ्या बायकाना समजावे आवडावे असे पण काहीतरी मस्त

Unsuitable for Ladies: An Anthology of Women Travellers नावाचे एक स्त्रियांच्या प्रवासवर्णनांचे कलेक्षन आहे त्यावरुन

Unsuitable for Ladies - डेडिकेटेड टू वीमेन ट्रॅव्हेलर्स असे ठेवू शकता

Wayward Women

Pages