मी ही कधी जिच्या प्रेमात होतो

Submitted by -शाम on 5 March, 2012 - 23:42

मी ही कधी जिच्या प्रेमात होतो अशी ही pencil_0.jpg000.jpg

बरं झालं ना लवकर सावरलो Wink

गुलमोहर: 

तितकी सुंदर नाहीत पण मोह आवरतो कुठे?
<<<<<<<<<<

सुंदर का नाहीत, आहेत की सुंदर
मोह का आवरलात, चांगल्या गोष्टींचा मोह आवरू नये
अजुन प्रेमात पडा की तुमच्या "पेन्सिलीच्या"
कोण अडवतय तुम्हाला .........

अरे वा श्याम - सुंदरच आहे तुझी चित्रकला........ अजूनही काही चित्रं असतीलच की - ती ही टाक इथे......

नर्गिस सुंदरच आलीय अगदी...

अ‍ॅशही गोड,

काजोल थोडी अजून सुधारीत हवी होती Happy

अफलातुन आहेत्...........सहीच....... Happy

>>>बरं झालं ना लवकर सावरलो <<<

मुळीच नाही!
हे असं सोडायचं नसतं. अजुन काही पहायला आवडेल,
सगळीच चित्र सुंदर आहेत.
नरगीस तर अप्रतिम.

हे घ्या तुम्हाला मी गुण देते १०० पैकी किती ते

१. अ‍ॅश - ७५% ( भुवया सोडुन बाकी सर्व एकदम परफेक्ट)
२. काजोल - हम्म ५०% ( ५०% कळते की ती काजोल आहे, पण अजुन improvement हवी
३. नर्गिस - ८५% ( चेहरयात थोडी अजुन सुधारणा हवी,बाकी उत्तम जमले आहे चित्र)
४. मला बापडीला हिचे नावच आठवत नाही, त्यामुळे हिचे चित्र कितपत जमले मी कसे सांगु Sad
५. हम-सनम - ६०% ( अ‍ॅश थोडी बरी जमली आहे, पण सलमान इतका नाही जमला - कुछ तो कमी है जरुर )

क्या बात है!!!!

सुंदर का नाहीत, आहेत की सुंदर
मोह का आवरलात, चांगल्या गोष्टींचा मोह आवरू नये
अजुन प्रेमात पडा की तुमच्या "पेन्सिलीच्या"
कोण अडवतय तुम्हाला ......>>>>>+१

चांगली आहेत की चित्रे !

फक्त शेवटच्या फोटोतला सलमान थोडासा 'रणबीर कपूर' दिसतोय. आधी मला वाटले या दोघांचा सिनेमा कधी आला म्हणून. Happy

मस्त ! तुमच्या कलेचे खरच कौतुक, कधी नव्हे ते मला नर्गीस सुंदर वाटली Wink जोक्स अपार्ट खरच जमलीत Happy

शाम,

इथल्या फोटोवरून काजोल तरुणपणीची मदर तेरेसा वाटते. Light 1

मला चित्रकलेतील काहीही कळत नाही. त्यामुळे कृपया गैरसमज नसावा. Happy

आ.न.,
-गा.पै.

व्वा .. Happy

सुंदरच आहेत की ही चित्र!!!

नर्गिसचे चित्र जास्त आवडलं...

पेन्सिलीशी परत जमवुन टाका हो Wink