बुंदि रायते

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 September, 2007 - 06:22

लागणारा वेळ १० मिनिटे

१ वाटि दहि
१ वाटि खारि बुंदि
१ छोटा कांदा चिरुन
२ चमचे कोथिंबिर
१ चमचा चिरलेले आले
२ चमचे साखर
पाव चमचा काळे मिठ
चवि नुसार साधे मिठ
पाव चमचा लाल तिखट

प्रथम दह्यात थोडे पाणि टाकुन जरा घट्ट्च घुसळुन घ्यावे. मग त्यात काळे मिठ, साधे मिठ, साखर, लाल तिखट टाकुन हलवावे. नंतर राहिलेले सर्व जिन्नस टाकावे. जर बुंदि कडक आवडत असेल तर ति आयत्या वेळेवर टाकायचि. खुपच छान लागते. पराठा, पुलाव सोबत अधिक छान लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगू तुमची डिश चांगली आहे पण स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर पूर्ण जेवण होईल असे दोन पदार्थ जे तीस मिनीटात बनवून होतील असे देणे आवश्यक आहे. नियम वाचा आणि अजून एक डिश लिहून टाका म्हणजे झाले Happy

लागणारा वेळ १५ मिनीटे

२ वट्या कणिक
प्रत्येकी २ छोटे चमचे किसलेले गाजर, बिट, कोबी
१ चमचा आल, लसुण, मिरची पेस्ट
२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
चवी पुरते मिठ,
१ चमचा साखर
पाव चमचा ओवा
मळण्या पुरते तेल, पाणी
साजुक तुप
चीज किसुन सजवण्यासाठी

वरील साजुक तुप आणि चीज सोडुन सर्व जिन्नस एकत्र करुन चांगले मळुन घ्या. थोड जाडसरच ठेवा. मग पराठे लाटुन मध्यम गॅसवर भाजा, वरुन साजुक तुप सोडा. झाल्यावर वरुन चिज हवे असल्यास पसरवा व बुंदी रायत्यासोबत वाढा.

हे पराठे करायला सोपे, पौष्टीक व दिसायला आकर्षक होतात कोबी, गाजर, बिट न आवडणारी मुले व माणसेही हे पराठे ताव मारुन खातात.