नवी सुरुवात

Submitted by जोतिराम on 2 March, 2012 - 23:43

गाईल अंतरीच्या
शब्दामधुन गाणी
ती कालच्या दु:खाची
सोडुन ती कहाणी

मी शोधलाच आता
हा मार्ग हा सुखाचा
सोडुन त्या खुणांची
टाकुन निशानी

दिसले मला न होते
सत्यामधील खोटे
खोट्यामुळेच वाही
डोळ्यांमधुन पाणी

धुतलेत अक्ष आता
पुसलेत अष्क आता
गाण्या नवीन गाणी
सोडुन ती कहाणी

सोडुन ती कहाणी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जोतिरामः कल्पना खूप छान आहे. पण लेखनातील चुका थोडा रसभंग करतात असे वाटते. खुणा, निशाणी, कहाणी, खोट्याळे वगैरे जर दुरुस्त झाल्या तर मजा येईल.

सतीश सर
माफी असावी.
मला शुद्ध मराठी येत नाही

सांभाळुन घ्या.
कच्च्या मराठीतल्या पक्क्या कविता....

स्वॉरी....
---- जोतीराम...