एक होते कुसुमाग्रज (९): ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'.- एक दृकश्राव्य कार्यक्रम (rar)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 11:23

२७ फेब्रुवारी, महाकवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जो आज सन्मानाने ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. खुद्द पु. लं. नी म्हणले आहे ‘फलज्योतिषी माणसाचे जन्मनक्षत्र पाहतात. मला त्या शास्त्रातले अजिबात गम्य नाही. त्यामुळे माझे जन्मनक्षत्र मला ठाऊक नाही. परंतु माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या ‘विशाखा’ नक्षत्रावर..’

कुसुमाग्रजांनी आपल्या असामान्य प्रतिभेने अनेक पिढ्या प्रभावित केल्या आहेत... आम्हीही त्यातलेच एक.
कुसुमाग्रजांनी आपले आत्मचरित्र कधीच लिहिले नाही पण त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली वेगवेगळी श्रद्धास्थाने, प्रेरणास्थानं त्यांच्या अनेक लेखांतून डोकावतात.

Title slide for MB.jpg

आज कुसुमाग्रज जन्मशताब्दी सांगता दिनाच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण करत Expressions Unlimited सादर करत आहे दृकश्राव्य कार्यक्रम.... कवी कुसुमाग्रज ते नाटककार वि. वा. शिरवाडकर हा जीवनप्रवास ....कुसुमाग्रजांच्या शब्दात.... ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'...

वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग १)

वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग २)

वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ३)

वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ४ )

वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ५ - अंतीम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी ! अजून ऐकतेय..... भारीच एकदम !
बाप रे केव्हढ काम केलय रार ! नमस्कार बाई तुला / तुम्हाला ( आदरार्थी म्हणायलाही आवडेल पण आत्ता तरी बहुवाचक वापरलेय Wink ) ! रच्याकने Expressions Unlimited बद्दल थोडं लिही ना ... कोण कोण, काय काय ,कसं अन कधी केलत हे सगळं. तेही लिही ना. आवडेल वाचायला Happy

छान Happy

stutya upkram.pahila bhag awadla.nemke kay challey he kalayla wel lagla .surwat ankhi kahi sopya boli wapratil havi jyane jast lokanna eikawese watel.
Manasi

खूप सुंदर.. कविता ऐकतांनाच अशी मनात भिनते आहे. फार आवडले. आणि "expression unlimited" बद्दल आणि या प्रवासाबद्दल वाचायला अगदी आवडेल

धन्यवाद रार.
एक से बढकर एक आहे हे सर्व.
खूपच आवडलं.
---------------------------------------------
अवल यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन.

कार्यक्रम ऐकलात्/पाहिलात आणि आवडल्याचं आवर्जुन सांगीतल्याबद्दल सगळ्या ग्रुपतर्फे तुमचे मनापासून आभार.
खरं तर वेळात वेळ काढून कार्यक्रम ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानायला हवेत...तुम्ही सगळे का धन्यवाद देताय ! Happy
कार्यक्रमाबद्दल, अनुभवाबद्दल आणि Expressions Unlimited बद्दल लिहिते एक-दोन दिवसात.

परत एकदा कार्यक्रम ऐकल्याबद्द्ल धन्यवाद.