इंद्र जिमि जंभपर (मराठी अनुवाद)

Submitted by चैतन्य दीक्षित on 19 February, 2012 - 05:20

इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास,
गर्वयुक्त रावणास, रघुकुलपति तो बली ।

वायु जसा मेघाला, शंभु जसा मदनाला,
आणि कार्तवीर्याला* राम विप्ररूप तो ।

वणवा जाळी द्रुमांस, चित्ता फाडी मृगांस,
मारी गजपुंगवास जैसा वनराज तो ।

तेज तमाच्या नाशा, कृष्ण जसा वधि कंसा,
म्लेंच्छांच्या ह्या वंशा, शिवराजा काळ हो ।

(* कार्तवीर्य= सहस्रार्जुन, मूळ काव्यात 'सहसबाह')

- चैतन्य दीक्षित

मूळ काव्य-

इंद्र जिमि जंभ पर, बाडव सुअंभ पर
रावण सदंभ पर, रघुकुलराज है |
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर
जो सहसबाह पर राम द्विजराज है |
दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुण्ड पर जैसे मृगराज है |
तेज तम-अंस पर, कन्ह जिमि कंस पर
त्यो मलीच्छबंस पर सेर शिवराज है |
- कविराज भूषण

गुलमोहर: 

सुरेख, सफाईदार रचना.
शक्य तर कवितेसोबत मूळ रूपात 'इन्द्र जिमि जंभपर' दिली तर ज्याना ती माहित नाही अशा वाचकाना रेडी रेफरन्स मिळेल.

मुकुंदजींना अनुमोदन.

अनुवादाबद्दल मुळ कविता दिल्यावर लिहीतो चैतन्य.

चैतन्य,
मस्तच केलास अनुवाद.... अगदी त्याच मूळच्या लयीत ठेक्यात वाचता येतंय.

-------------------------------------------------------------------------------------------------

मूळ कवितेबाबतच्या कर्णिकजींच्या सूचनेला अनुमोदन.

इंद्र जिमि जृंभपर ! बाडव सुअंभपर !रावण सदंभपर !रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !संभु रतिनाह पर !ज्यो सहसवाह पर !राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !चिता मृगझुंड पर !भूषण वितुंड पर !जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !कन्न्ह जिमि कंस पर !त्यों म्लेंच्छ बंस पर !शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!शेर शिवराज है !!शेर शिवराज है !!शेर शिवराज है !!

... कवीराज भूषण.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मूळ कविता दिल्याबद्दल सेनापती यांचे विशेष आभार.

-चैतन्य

चैतन्य.. अनुवाद सुंदरच झाला आहे.. जमल्यास वर दिलेले मूळ काव्य धाग्यात समाविष्ट कर. Happy

आणि हो कवी भूषण यांच्या शिवबावनी मधील सर्व काव्यांचे असे अनुवाद वाचायला आवडतील.. हवी असल्यास सर्व मूळ काव्ये मी देऊ शकीन.. Happy

धन्यवाद !

सेनापती, तुमच्या सूचनेप्रमाणे मूळ काव्य समाविष्ट केले आहे.
शिवबावनीमधली इतर मूळ काव्ये दिलीत तर नक्की प्रयत्न करेन.

-चैतन्य.

स्टार प्रवाह वरच्या 'राजा शिवछत्रपती' साठी शीर्षक गीत म्हणून हेच वापरलं होतं.

अनुवादासाठी आपले आणि मूळ काव्यासाठी सेनापतींचे अनेक आभार Happy

वाचताना, ऐकताना एक वेगळाच जोश येतो Happy

चैतन्य अप्रतिम अनुवाद झालाय. मूळ काव्यातला जोश अगदी १०० टक्के उतरलाय यात, सगळ्या ओळींचे भाषांतरही आहे आणि अगदी त्याच चालीत म्हणताही येतोय.

कोदंडधारी आणि परशुधारी रामांना कविराजांनी मस्त गुंफलय त्यांच्या काव्यात आणि दोन्ही शिवांना पण Happy मूळ रचना इतकी मनात रुतलेली आहे आणि आता तुझा अनुवाद पण.

अनुवाद असावा तर असा. + १.

संपर्कातून मेल केली आहे. स्मित आता लवकरात लवकर सर्व काव्यांचे अनुवाद आम्हाला उपलब्ध करून दया.. स्मित वाट बघतोय. >>> सेनापतींना अनुमोदन Happy
धन्यवाद रे भाऊ !

वाह बुवा ! मला मुळ काव्य हवे होते, आता दोन्ही मिळाले (मुळ काव्य आणि अनुवाद). देव मुक्त हस्ताने गुण वाटत होता तेव्हा जन्माला आलात काय ? Wink

सुंदर अनुवाद!

पहिल्या कडव्याचा दुसरा चरण जरा कमजोर वाटतो आहे.
त्याकरता मी पुढील पर्याय सुचवतो:

इंद्र जृंभकासुरास, वडवानल सागरास |
गर्वो न्नत रावणा, जसा श्री राम भासतो ||

Pages