नमस्कार मित्रांनो !
मनोरंजनाच्या नावाखाली रिएलिटी शोच्या आडून आम्ही नेमका काय गोंधळ घालतो ते तुम्हाला माहीत आहेच. मी वेगळं काही सांगत नाही. सगळे रिएलिटी शोज गायन, नृत्य, टॅलेंट हंट, विनोद यासारख्या ठराविक साच्यात अडकले आहेत. थोडा पलिकडे जायचा विचार जर कुणी केलाच तर तो बिचारा पलिकडच्याच किनार्यावर राहतो.
माझ्या बर्याचश्या मिटींग्स मध्ये नेहमी एक मुद्दा मला प्रकर्षाने ऐकावा लागतो. तो म्हणजे 'लोकांना हेच हवं असतं.' मी जेव्हा इथले निरनिराळे बाफ वाचतो तेव्हा मग मला प्रश्न पडतो की जर लोकांना हेच हवं असतं तर मग इथे इतक्या तक्रारी का ? चॅनल्समध्ये बसून लोकांना काय हवय याचं ठाम मत मांडणार्या या अधिकार्यांना 'लोक' म्हणजे कोण अपेक्षित आहेत ? घरात कामाचा पसारा आवरत बसणार्या आणि त्यातून दोन घटका विरंगुळा शोधणार्या गृहीणी की पेंशनर्स ? बाकीच्यांच काय ?
'मास' आणि 'क्लास' असे दोन विभाग आधीच केले गेले आहेत. त्यातही मासला जे आवडेल ते क्लासला आवडेलच असं नाही आणि क्लासला जे आवडते ते मासला आवडूच शकत नाही हा एक वेगळा अट्टाहास.
मी इथे मास आणि क्लास या भानगडीत न पडता एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला रिएलिटी शो मध्ये काय पहायला आवडेल किंवा कोणत्या विषयावरचे शोज तुम्ही एन्जॉय करू इच्छिता ? यावर तुम्हा सर्वांची मते समजून घ्यायला हा धागा उघडतोय.
चला तर मग फक्त आणि फक्त या विषयावरच चर्चा करू, गप्पा मारू आणि शक्य झाल्यास काही ठाम मते सुद्धा मांडू. कदाचित उद्या तुमच्या मुळे एखाद्या नवीन विषयावरचा रिएलिटी शो जन्म घेऊ शकेल.
रिएलिटी शो - काय पहायला आवडेल ????
Submitted by कौतुक शिरोडकर on 16 February, 2012 - 11:50
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरुंधती, उत्तम सुचना. लहान
अरुंधती, उत्तम सुचना. लहान मुलांसाठी कोणत्याच चॅनेलवर सध्या कार्यक्रम नाही. मराठीत तर मुलांसाठी चॅनेल सुद्धा नाही.



किरण्या, अफाट कल्पना.
शाम, गाण्यावर आधीच अनेक कार्यक्रम आहेत. कवी/गीतकार स्पर्धक ??? फास्ट फुडसारख्या कविता किंवा गाणी नकोच. चव बिघडेल.
मामी, कर्तबगार व्यक्तींच्या ओळखी हा खरच चांगला विषय आहे.
लोला, लिंक्ससाठी धन्यवाद ! अमेझिंग रेस पहातो एकदा.
भाऊ, तुमची सुचना उत्तम आहे पण इथे रिएलिटी शो बद्दल आपण बोलतोय. तुम्ही म्हणताय ते डेली सोप किंवा फिक्शन साठी योग्य आहे.
मायबोलीवरच्या कविता सादर
मायबोलीवरच्या कविता सादर करण्यासाठी एक शो काढा..
<<<<<<< ha ha ha .......Rofl ....... !!
Big boss in neat n clean
Big boss in neat n clean format ?? Hmm .. Not sure if that 's going to work , big boss is all about bitching and gossips .. Marathi celebrities sadhe-sabby vagaire astilach yachi tari kay guarantee ? Rahul Mahanan , rakhi sawant , saie tamhankar , mohan joshi public chi names pan controversies madhe alich ahet .
रोडीज सारख्या कन्सेप्टमधे
रोडीज सारख्या कन्सेप्टमधे वरच्या सर्वाच्या सूचना आरामात वापरता येतील. उदा. एक टास्क कवितेचे रसग्रहण करा असा ठेवता येइल. पुढचा टास्क समुद्रकिनार्यावरचा एखादा गेम ठेवता येइल. अजून एका टास्कमधे ट्रेझर हंट
लोला, क्वीझ हा रीअॅलिटि शो बनवता येतो.. कौन बनेगा करोरपतीचे बदललेले रूप बघ म्हणजे लक्षात येइल.
सध्या तरी वाहिन्यांच्या दृष्टीने जे नॉन फिक्शन आहे ते सर्व रीअॅलिटी शो असा सरळ हिशोब असतो.
कौतुक, एकपात्री सादरीकरणावर आधारित शो करता येइल. विभागवार उमेदवार निवडून मग फायनल. यामधे कथाकथन, भजन-कीर्तन, कवितावाचन, पोवाडा, वासुदेव, अशा सर्व लोककलांचा देखील राऊंड ठेवता येइल.
इतरांचे माहित नाही. पण मला
इतरांचे माहित नाही. पण मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जाणकारांच्या मुलाखती आवडतील. स्टुडीयोतल्या नाहीत तर त्यांच्या कार्यक्षेत्रात घेतलेल्या.
प्रयोगशील शेतकरी, ध्येयवेडे समाजसेवक, शून्यातून यशस्वी झालेले (फॉर दॅट मॅटर अयशस्वी झालेलेही चालू शकतील, अपयशामुळे त्यांच्या धडपडीची किंमत कमी नक्कीच होत नाही) उद्योजक, उदयोन्मुख खेळाडू. नव्या पिढीच्या जडणघडणीत ज्यांचं मोलाच योगदान आहे असे शिक्षक (चाटे सर नव्हेत
)
महाराष्ट्रातील फक्त
महाराष्ट्रातील फक्त "लोकनृत्यावर" आधारीत एखादा रीअॅलिटी शो. जसे वारली नृत्य, आदिवासी नृत्य, इ. इ. महाराष्ट्रातील विविध भागातील लोकनृत्य (खासकरून आदिवासी पाड्यातील) बघायला आवडतील. या निमित्ताने आपल्या या संस्कृतीची ओळख नव्याने होईल (हेमावैम :-))
बहुतेक सह्याद्री वाहिनीवर अशाच प्रकारचा एक शो पाहिल्याचे आठवतंय.
बहुतेक सह्याद्री वाहिनीवर
बहुतेक सह्याद्री वाहिनीवर अशाच प्रकारचा एक शो पाहिल्याचे आठवतंय.<<< shahir sablencha maharshtrachi lokdhara , shanta shelke 'ranjai' navacha show pan kaychya na ?
डिस्कव्हरी वर अद्भुत कल्पना
डिस्कव्हरी वर अद्भुत कल्पना येतात ज्यात मेकींग ऑफ आहे किंवा जगभरातल्या अद्भुत मानवी शक्ती असलेल्या लोकांच्या मुलाखती आहेत.
सध्या मायबोलीवर खुप वाद विवाद नसला तरी चर्चा आहे अंधश्रध्दा यावर. अनिस वाले आणि
(अ)अनिसवाले यांची मुद्यावर आणि संशोधन करुन पुन्हा एकदा चर्चा करता येईल.
बेवडे आणि मुक्तांगणचे लोक यावर चर्चा करता येईल.
थोडक्यात जिथे जिथे संघर्ष आहे त्यांची चर्चा होऊदे. वर्तमान पत्रातल्या बातम्या एकांगी आणि विकाउ असतात. सत्य तर चर्चेनेच उघड होउ शकते.
कौतुक, सगळ्यांच्या सूचनांचा
कौतुक, सगळ्यांच्या सूचनांचा विचार झाला, ते बघून खरेच खुप आनंद झाला.
मामी, श्याम बेनेगल यांची, भारत एक खोज हि अप्रतिम मालिका आता डिव्हीडी संचात उपलब्ध आहे. शबाना, ओम पुरी, नासिरुद्दीन, पल्लवी असे अनेक कलाकार त्यात होते. संगीत तर अप्रतिम होते. नेहमीची चकाचक पोषाखबाजी नव्हती त्यात. (वल्कले खरेच वल्कले वाटत होती.) संगीत त्या त्या प्रदेशानुसार होते. (शकुंतलेच्या भागातली गाणी, नाट्यसंगीताच्या धर्तीवर होती, आणि ती अजित कडकडे आणि फैयाज यांनी गायली होती.) आणि प्रत्येक कथा, १/२ भागात संपत असे.
जिप्सी, महाराष्ट्रातील
जिप्सी, महाराष्ट्रातील लोकनृत्यांवर अप्रतिम मालिका, चारुशीला साबळे आणि शाहीर साबळे यांनी केली होती. काळ्या पांढर्या जमान्यातली ती होती. पण या नावाने आता मिळणारी सिडी (महाराष्ट्र कि लोकधारा ) भयानक आहे. म्हणजे गाणी शाहिरांच्या चमूने गायलेलीच आहेत पण सादरीकरण भयाण आहे.
मूळ भागाचे नृत्यदिग्दर्शन चारुशीलाचेच होते. ती स्वतः पण काही गाण्यांवर नाचली होती.
अशोक हांडे सादर करतात तोच
अशोक हांडे सादर करतात तोच कार्यक्रम का ? नेहमी हाऊसफुल्ल असतो
त्यांच्या दोन तीन कार्यक्रमांची नावं आठवताहेत
१. महाराष्ट्राची लोकधारा
२. सातशे खिडक्या आठशे दारं..
३. मंगलगाणी दंगलगाणी ( पूर्वी या कार्यक्रमाचं नाव हसायदान ते पसायदान असं होतं भौतेक )
<< कौतुक, सगळ्यांच्या
<< कौतुक, सगळ्यांच्या सूचनांचा विचार झाला, ते बघून खरेच खुप आनंद झाला. >>
दिनेशदा, अजून कोणाच्याही सूचनेचा विचार नाही झाला. सूचना काय आहेत तेव्हढ विचारल आहे फक्त.
कौतुक... जनमतचाचणीचा हा तुझा
कौतुक... जनमतचाचणीचा हा तुझा प्रयत्न एकदम झक्कास
वरचे सगळ्यांचे प्रतिसाद वाचता- वाचता एक कल्पना सुचली - "एक उनाड आठवडा"
म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात पारंगत आहात, सेलिब्रेटी आहात ते क्षेत्र सोडून अतिशय वेगळ्या एखाद्या क्षेत्रात परफॉर्म करायला लावायचे... आणि प्रत्येक आठवड्याला डोमेन बदलायचे
उदाहरणार्थ... अभिनेत्यांनी क्रिकेट कॉम्पीटीशन खेळायची, लेखक/कवी लोकांनी रेसिपी शो करायचा, राजकारणी लोकांनी डान्स परफॉर्मन्स द्यायचा, गृहिणींना कार्पोरेट वर्ल्ड रिलेटेड एखाद चॅलेंज द्यायच, टिपीकल शेतकरी लोकांना त्या आठवड्यासाठी एखादी बीपीओ सांभाळायला द्यायची किंवा ड्यूड कॉलेज स्टुडट्सना शेतीसंदर्भात काही टास्क द्यायचे!
थोडी कल्पकता वापरुन कार्यक्रम आखला तर बघायला खरच मजा येईल
अजुन एक
अजुन एक कल्पना.....
"प्रोजेक्ट फंडा"
म्हणजे इंटर कॉर्पोरेट स्पर्धा
प्रत्येक डोमेनमधले एखाद ट्फ चेलेंज स्पर्धक कंपन्यांना द्यायचे आणि planning, exicution, presentation, creativity, quality, teamwork अश्या क्रायटेरियावर डोमेन एक्स्पर्ट स्पर्धक संघाला जज करतील.
यात पण दर आठवड्याला/महिन्याला डोमेन बदलता येईल.
पण यामध्ये टास्क अस निवडायला हवं जे इतर लोक पण रिलेट करु शकतील.
उदाहरणार्थ
ऑटो: एखाद्या वाहनाची fuel efficiency वाढवणे
सिव्हिल: दिलेल्या मटेरिअलमध्ये एखादे अवघड आणि कल्पक स्ट्र्क्चर बांधणे
कॉमर्स: बजेटिंग्/टॅक्सेशन रिलेटेड एखादे टास्क
मॅनेजमेंटः एखाद्या "New To World" बिझनेससाठी मॉडेल बनवणे
इलेक्ट्रॉनिक्सः इमॅजनरी सुपरकूल गॅझेट डिझाईन करणे
मी असले कार्यक्रम पाहत नाही
मी असले कार्यक्रम पाहत नाही आणि बघणार देखील नाही बहुदा...

पण किल्ले-दुर्ग ह्या संबंधी काही करणार असशील तर मी यथाशक्ती मदत करीन रे कौतुका..
डोक्यात काही गोष्टी फिरू लागल्या आहेत..
कौतूक... फार पूर्वी 'दूरदर्शन
कौतूक...
फार पूर्वी 'दूरदर्शन - राष्ट्रीय प्रसारण' मधे (सन १९८७-८८-८९) सिद्धार्थ बसू ने बर्याच सेलिब्रेटीजची एक क्वीझ-कॉम्पीटीशन घेतेलेली. त्यात सर्व-प्रकारचे स्टार्स, खेळाडू, राजकारणी, ऊद्योग-व्यावसायीक, वेग-वेगळ्या स्तरांवर यशस्वी ठरेलेली व्यक्ती-मत्वं इ.इ.इ. लोक होते. जे खरोखरच अभ्यासू आणी प्रामाणीक होते तेच पुढे-पुढे जिंकत गेले. पण नुसतेच प्रकाशात आलेले बाकीचे लोक सामान्य-ज्ञानाच्या बाबतीत किती पुढारलेले(?) होते, याची लोकांना/ प्रेक्षकांना जाणीव होत होती. शेवटी त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला. कार्यक्रम अनपेक्षीतपणे(?) बन्द झाला, आणी सिद्धार्थ बसू दूरदर्शन मधून बाहेर पडला... या धरतीवर एकादा कार्यक्रम करता येईल का?, याचा विचार कर...
त्याच प्रमाणे प्रणव रॉय सादर करायचे तो कार्यक्रम World This Week, त्याच धरतीवर विनोद दुआ सादर करायचे तो हिन्दी कार्यक्रम (नाव आठवत नाहिय)... असे कार्यक्रम जर एकादया चॅनेलने सुरु केले, तर सर्वांना त्याचा काहितरी फायदा होईल...
एक अशा शो हवा ज्यात चांगल्या जाहीरातींची आतली माहीती सांगितली जाईल...>>>... या धर्तीचा कार्यक्रम फार पूर्वी STAR TV वर (इतर प्रादेशीक खाजगी चॅनेल्स सुरु व्हायच्या अगोदर, थोडक्यात भारतात खाजगी चॅनेल्स बाल्या-वस्थेत होती तेव्हाची गोष्ट्...:स्मित:) श्री. भरत दाभोळकरांनी कित्येक आठवडे चालवला होता - The Dream Merchants असं त्याचं नाव होतं. कार्यक्रम पूर्णपणे ईंग्रजी मधे होता, पण खरोखर त्या मागे चालणारं काम काय आणी कशा प्रकारचं असतं याची अतिशय ऊत्तम माहीती दाभोळकरांनी दिलेली होती. सध्या खाजगी वाहीन्यांवर/ साठी काम करणारे बरेच तंत्रज्ञ याच कार्यक्रमाने प्रेरीत होऊन आले असावेत, अशी माझी भावना आहे. थोडक्यात असाच किंबहूना हाच कार्यक्रम मराठी भाषेतून परत आला तर येणार्या नव्या लोकांसाठी खरोखर मार्गदर्शक ठरेल... दाभोळकरां जवळ चौकशि करायला हरकत नसावी... :डोमा:...
मुशायरा - सवाल जबाब, कव्वाली
मुशायरा - सवाल जबाब, कव्वाली यासारखे काव्यात्म प्रश्नोत्तराचे कार्यक्रम ..
रियालिटी शोज..... काय पाहायला
रियालिटी शोज..... काय पाहायला आवडेल??????
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कौ, तुला केव्हाच सांगितलय, मला तुझ्या रियालिटी शोमध्ये पार्टिसिपेंट झालेलं बघायला आवडेल

टीव्ही ऑफ करायची सोय आहेच पण)
(कदाचित इतरांना ते बघवणार नाही
फक्त ते लहान मुलांच्या कार्यक्रमात टाकू नकोस मला
महाराष्ट्राची
महाराष्ट्राची लोकधारा>>>>>नाही नाही महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम नाहे. दुसराच एक कार्यक्रम आहे यात लोकनृत्याच्या स्पर्धा होतात आणि एक गृप विजयी ठरवला जातो. नाव आठवल्यावर लिहितो.
कौतुक, मी एक रिअॅलिटी शो
कौतुक,
मी एक रिअॅलिटी शो सुचवतोय....
हा शो फक्त राजकीय लोकांसाठी ठेवायचा.... म्हणजे राजकीय पक्षांचे पदाधिकारी अथवा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी.
यात स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
प्रत्येक एपिसोड मध्ये,
एक ग्रामपंचायत सदस्य्,जिल्हापरिषद सदस्य्,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक्,आमदार्,खासदार,पक्षीय तालुकाध्यक्ष्,जिल्हाध्यक्ष्,शाखाप्रमुख्,विभागप्रमुख्,शहर प्रमुख्,जिल्हाध्यक्ष यांचा उपलब्धतेप्रमाणे अंतर्भाव करावयाचा .
भारताची राज्यघटना,
नागरीकांचे अधिकार,
लोकप्रतिनिधींचे अधिकार्,कामे,मर्यादा,
अर्थ्,आरोग्य्,सार्वजनिक बांधकाम्,विद्युत आदि विविध विभागातील समस्या,कामे,एकमेकांतील समन्वय,
आपल्या विभागातील समस्या
आदिंविषयी रोखठोक प्रश्न विचारुन .. शेवटी एक काल्पनिक समस्या निर्मून्,तिचे निवारण सदर लोकप्रतिनिधी कसे करेल या विषयी प्रश्न विचारायचे..... व जो लोकप्रतिनिधी सर्वात चांगली व बिनचूक उत्तरे देईल त्यास विजेता घोषित करुन पुढच्या फेरीत पात्र ठरवावे.
१०/२०/२५ एपिसोड नंतर महाअंतिम सोहळा घ्यावा.
या मुळे लोकप्रतिनिधी किती पाण्यात असतात हे कळेल.... व आपण किती पाण्यात आहोत हे दाखवण्यासाठी ते अभ्यासही करतील.
ह्या विषयाची व्याप्ती व खोली खरंच फार असून स्पर्धक लोकप्रतिनिधीला मी किंवा माझे अनुयायी ,मी विजेता न ठरल्यास कोणता ही विध्वंस्/नासधूस करणार नाही असे प्रतिज्ञापत्र घेवून सहभागी करवावे लागेल हे नक्की.
माझ्या डोक्यात प्रश्नावली व कार्यक्रमाचा प्लॅन तयार आहे. हवा असल्यास फोनवर किंवा इथेच विस्तृत स्वरुपात मांडतो.
राजकीय विश्लेषक्,ज्येष्ठ पत्रकार्,राज्य शास्त्राचे प्राध्यापक्,संसदेतील ज्येष्ठ आजी/माजी आदरणीय सदस्य यांस जजेस म्हणून नेमता येतील.
नंदिनी, तुमच्या दोन्ही
नंदिनी, तुमच्या दोन्ही कन्सेप्ट विचार करण्याजोग्या आहेत.
स्वरूप तुमच्या कल्पना पण छान आहेत. त्यांचा पसारा मोठा आहे पण त्यात मनोरंजन आहे.
डॉक, तुम्ही तर मला सगळ्याच राजकीय पक्षांच्या हिटलिस्टवर टाकताय. पण असा एखादा कार्यक्रम नक्कीच हिट होईल यात शंका नाही.
'रिअल स्टिंग ऑपरेशन' शो ,
'रिअल स्टिंग ऑपरेशन' शो , भ्रष्टाचारी लोकांचं स्टिंग ऑपरेशन.
अर्थात शो कमर्शिअल / मसालेदार करण्याच्या नादात व्हिक्टिम्सच्या भावनांचा बाजार्/दुरुपयोग नसावा.
रिअॅलिटी शो चे नाव "खरा
रिअॅलिटी शो चे नाव "खरा घासु" (पाठांतर करणार्या मुलांना आमच्या वेळी दिलेले नाव)
पाच वेग-वेगळ्या घरातले अत्यंत घासु आणि (nerd type) ची मुले मुली निवडायची.
यांना ५ उत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन द्यायचे.
त्यांच्या घासुगिरीच्या कॉम्पीटिशन ठेवायच्या. कविता उलटी पाठ पहिला कोण करतो?
एकपाठी कोण इत्यादी.
शेवटी सर्वात जास्त मार्क्स परिक्षेत कोण मिळवतो हे पहायचे.
चकित करण्यासाठी कधी कधी मजा म्हणुन त्यांच्या इतर स्पर्धा पण ठेवाव्यात.
धमाल येइल.
कौत्या... फार सुंदर धागा चालु
कौत्या...
फार सुंदर धागा चालु केलास. "काय पहायला आवडेल ????" असं प्रेक्षकांना कोणाला तरी विचारावंस वाटलं हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
खुप छान मित्रा...
कारनामे निर्मलबाबांचे ही
ही मालिका पहायला आवडेल.
मस्तंय हा धागा. हटके एकदम.
मस्तंय हा धागा. हटके एकदम.
Pages