रिएलिटी शो - काय पहायला आवडेल ????

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 February, 2012 - 11:50

नमस्कार मित्रांनो !
मनोरंजनाच्या नावाखाली रिएलिटी शोच्या आडून आम्ही नेमका काय गोंधळ घालतो ते तुम्हाला माहीत आहेच. मी वेगळं काही सांगत नाही. सगळे रिएलिटी शोज गायन, नृत्य, टॅलेंट हंट, विनोद यासारख्या ठराविक साच्यात अडकले आहेत. थोडा पलिकडे जायचा विचार जर कुणी केलाच तर तो बिचारा पलिकडच्याच किनार्‍यावर राहतो.
माझ्या बर्‍याचश्या मिटींग्स मध्ये नेहमी एक मुद्दा मला प्रकर्षाने ऐकावा लागतो. तो म्हणजे 'लोकांना हेच हवं असतं.' मी जेव्हा इथले निरनिराळे बाफ वाचतो तेव्हा मग मला प्रश्न पडतो की जर लोकांना हेच हवं असतं तर मग इथे इतक्या तक्रारी का ? चॅनल्समध्ये बसून लोकांना काय हवय याचं ठाम मत मांडणार्‍या या अधिकार्‍यांना 'लोक' म्हणजे कोण अपेक्षित आहेत ? घरात कामाचा पसारा आवरत बसणार्‍या आणि त्यातून दोन घटका विरंगुळा शोधणार्‍या गृहीणी की पेंशनर्स ? बाकीच्यांच काय ?
'मास' आणि 'क्लास' असे दोन विभाग आधीच केले गेले आहेत. त्यातही मासला जे आवडेल ते क्लासला आवडेलच असं नाही आणि क्लासला जे आवडते ते मासला आवडूच शकत नाही हा एक वेगळा अट्टाहास.
मी इथे मास आणि क्लास या भानगडीत न पडता एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला रिएलिटी शो मध्ये काय पहायला आवडेल किंवा कोणत्या विषयावरचे शोज तुम्ही एन्जॉय करू इच्छिता ? यावर तुम्हा सर्वांची मते समजून घ्यायला हा धागा उघडतोय.
चला तर मग फक्त आणि फक्त या विषयावरच चर्चा करू, गप्पा मारू आणि शक्य झाल्यास काही ठाम मते सुद्धा मांडू. कदाचित उद्या तुमच्या मुळे एखाद्या नवीन विषयावरचा रिएलिटी शो जन्म घेऊ शकेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुक मस्तच धागा !!

महाराश्ट्रातल्या विद्यापीठांमधे युवा मोहोत्सव होतात ...त्यात बरेच काही हॅपनिंग असते ... नाटक , एकांकिका , लोकनृतय , वकृतुत्व ..बरेच बरेच काही ...त्याच्या तयारी साठी कॉलेजकॅम्पस जवळपास महिनाभर गाजत असतो ....
नाटकाची तालिम , डान्स नंतरच्या गप्पा , कोणा कोणाचे जुळुन येणारे डेटिंग , काही वाद ...काही भांडणे ....

कंप्लीट रीयालिटी !!

ह्यावर एखादा भन्नाट रीयालिटी शो होवु शकेल .

यासारखा एक कार्यक्रम पुर्वी येऊन गेलाय. मला त्या एंकरच नाव आठवत नाही. पण साधारण तीन शाळांचे तीन विद्यार्थी यात असत आणि मग वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारले जात. प्रश्न कधी कधी पास केले जात. रॅपिड फायर आणि क्विक बझर पण यात होते.>>>>

मराठीत अशा एका क्विझचे अँकरींग मला वाटते हर्षा भोगलेने केले होते. हिंदीत मला वाटते सिद्धार्थ बसुने असा एक कार्यक्रम केला होता.

>>रिअ‍ॅलिटी शोजमधे घरी बसून एखादं वाद्य शिकता येईल किंवा गायनाचे मुलभूत धडे मिळतील असे शोज पहायला आवडतील.

याच धर्तीवर एक सुचलं. सामान्य संगीत रसिकांना व तरुणांना शास्त्रीय संगीताबाबत आवड निर्माण होण्यासाठी त्याची तोंडओळख मग अमुक राग म्हणजे कसा ओळखावा वगैरे असा काही शो करता येईल.

सध्या eprasaran.com वर एकांकिका स्पर्धा घेतल्या जात आहेत. अमेरिकेतील मराठी लोकांना तरी हा उपक्रम खुपच आवडला आहे.

मला कुठल्याही कलाकाराला त्याची कला घडवताना बघायला आवडेल. शिल्पकार, मूर्तीकार, चित्रकार कुणीही.
एखाद्या श्रमजीवीचा दिवस कसा जातो, ते बघायला आवडेल. सामाजिक कार्यकर्ते, त्यांचे व्यवहार प्रत्यक्ष बघायला आवडतील.
खेळाडूंचा सराव, नाटकाच्या तालमी, बॅकस्टेज, चित्रीकरण, पर्वतारोहण...
अर्थातच हे सगळे तूमच्या व्याख्येत बसत असले तरच.

पण...
स्पर्धकांना दिलेले गुण, ते देताना होणारी त्यांची घालमेल, परिक्षकांचे उर्मट शेरे, त्यांनी केलेले स्पर्धकांचे अपमान, एखाद्या स्पर्धकाला घरी पाठवणे, स्पर्धकांनी एकमेकांवर केलेली चिखलफेक, एखाद्या स्पर्धकांचे रडणे, समर्थकांनी जुलमाच्या करारावर वाजवलेल्या टाळ्या, निवेदकाचा आगाऊपणा, नृत्याच्या नावाखाली केलेली सर्कस, अंगविक्षेप... अजिबात म्हणजे अजिबात आवडणार नाही. आणि याच कारणासाठी मी असले कार्यक्रम बघणे कधीचेच सोडून दिलेय.

मुलांसाठी एखाद्या विशिष्ट एरीयापुरत्या ट्रेझर हंटसारख्या स्पर्धा घेता येतील. स्काऊट गाईड मधे फक्त गाठी आणि खुणांची वर्णनं होती. तेच प्रत्यक्षात उतरवुन!

दक्षिणा आणि आगाऊला अनुमोदन.

नविन संशोधक शोध. एखादा शोध जर कुणी लावला असेल लोकल लेव्हल वर आणि इतर दबावांमुळे जर वाव मिळू शकत नसेल, आणि खरच जर का सर्वमान्य होण्यालायक असेल तर त्या दृष्टीने काहि प्रयत्न.

खालील कल्पना रिअ‍ॅलीटी शो साठी सुट होणार नाहि बहुदा तरिही....

डिस्कव्हरीवर जशी वेगवेगळ्या विषयावर माहिती देतात उदा. पक्षी, प्राणी, अवकाश, सागरी जीवन तश्या प्रकारची एखादी माहितीपर धारावाहिक. उदा. भारतात आढळणार्‍या पक्षांच्या प्रजाती, मराठीत अवकाशावर माहिती, समुद्रातील, जमिनीवरील वनस्पती, त्यची मुलभूत माहिती आणि इतर उपयोग. वाचनासाठी पुष्कळ साहित्य उपलब्ध असलं तरिही जर प्रत्यक्ष टि.व्हि. संचावर उपलब्ध झालं तर माहिती प्रॅक्टिकली समजेल आणि समजायला सोपा जाईल.

कौतुक, तुला हे मराठी चॅनल्साठी अभिप्रेत आहे असे समजून लिहत आहे. Happy

उदयवन, तुम्ही जो कार्यक्रम सुचवला आहे तसा कार्यक्रम सीएनबीसी (स्टोरीबोर्ड-अनुराधा सेनगुप्ता) आणि एन डी टीव्ही प्रॉफिट वर चालू आहे. मी कायम बघते, अत्यंत उत्तम कार्यक्रम आहेत. ज्याना जाहिरातीमधे इंटरेस्ट असेल त्यानी जरूर बघा.

नृत्याच्या कार्यक्रमामधे बूगीवूगीचा फॉरमॅट चांगला होता. एका genre मधल्या चार पाच जणाचे डान्स आणि एक विजेता. पुढल्या एपिसोडमधे दुसरे डान्सर्स. उगाच आम्ही टॅलंट खोजत आहोत वगैरे आव नाही. शिवाय नृत्ये अगदी सहज करता येण्यासारखी होती. हल्ली नृत्य कमी आणि कोरीओग्राफी जास्त (त्यातही स्टोरीटेलिंग) असा मामला असतो.
जुना सारेगामाचा फॉरमॅट पण चांगला होता (१३ एपिसोड वाला.) परीक्षक दर वेळेला वेगळे असायचे त्यामुळे तेच तेच बघून कंटाळा यायचा नाही.

शाळकरी मुलासाठी क्विझ कॉन्टेस्ट याची खरंच गरज आहे. या वयोगटाच्या प्रेक्षकासाठी कार्यक्रम नाहीच आहेत. बालचित्रवाणी-किलबिल-आर्ट अ‍ॅटॅक सारखे कार्यक्रम नक्कीच चांगले चालतील तसंच १५ वर्षावरील मुलाना संगणकविषयक एखादा प्रोग्राम स्वत: बनवणे वगैरे करता येइल.

तसंच रोडीज टाईप अ‍ॅडव्हेन्चर बेस्ड प्रोग्राम देखील चांगला चालेल (अर्थात मायनस बीप बीप :फिदी:) यामधे महाराश्ट्रातील विविध गड किल्ले, सागरी किनारे यांचा लोकेशन म्हणून वापर करता येइल.

करिअर गाईडन्स!
फक्त नुकत्याच ग्रॅज्यूअ‍ॅट झालेल्यांसाठी नाही, तर कुठल्याही वयाच्या लोकांसाठी.
हे सुचवण्यामागचे कारण सांगते, "अवेरनेस"- ज्याची कमतरता भारतात नक्कीच आहे, सर्वच वयातील लोक अगदी हौसेने इंटरनेट सर्फिन्ग करून स्वतःचे ज्ञान वाढवतीलच असे नाही- दूरदर्शन हा सहज उपलब्ध आणि आवडीचा प्रकार असल्याने त्याचा वापर करणे सुयोग्य.

मी काल्-परवा काही डेमो अटेंड केले, अत्यंत उच्च दर्जाच्या टेक्नॉलॉजीच भारतातही डेव्हलोप होत आहेत, अर्थातच त्यात एक्स्पर्टीज लागतात- अगदी प्रोक्युरमेंट पासून ते लॉजिस्टीक्स पर्यंत सगळे काही करण्यास, सर्वांच्याच रिक्रुट्मेंट जाहीराती येत नसतात त्यात आपल्याला अमुक- अमुक प्रोडक्ट जन्मास येऊ पाहते आहे ह्याचीच मुळात माहिती नसते, त्यामुळे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा थेट वापर करून आपली "लाईफ बेटरमेंट" ची संधी नक्कीच दवडते- हे झाले फक्त टेलीकॉम चे, कितीतरी विविध क्षेत्रे आहेत, दूरदर्शानाच्या माध्यमाने ह्या विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी थेट गाईडन्स मिळवून देऊ शकतात, अर्थात इंटरॅक्टीव सेशन्स असतील तर फार फायदेशीर!

कोणतीही प्रश्नमंजूषा घ्यायच्या आधी स्पर्धकांची साधी प्राथमिक परिक्षा घ्या. ई टिव्हीवर अतुल कुलकर्णी एक शो करायचा, ज्यात साध्या प्रश्नांचीही उत्तरं स्पर्धकांना यायची नाहीत. लाजिरवाणं वाटतं ते. शाळकरी मुलं एकदम तेज असतात, बोर्नव्हिटा क्विझ सारखा प्रकार हिट होईल एकदम.

स्टुडियोच्या बाहेर पडून केलेला कोणताही शो- पण ह्याला भक्कम स्पॉन्सरर लागेल Happy

मराठी पाऊल मध्ये कितीतरी लोककला सादर झाल्या. केवळ लोककलांना प्राधान्य देणारा शो. आणि ह्याचा आस्वादच फक्त. स्पर्धा नको.

मागे मांडलेली 'स्वच्छ बिग बॉस'ची कल्पना कमर्शियली एकदम व्हायेबल आहे खरंच Happy

<< नंदिनी छान आहे पोष्ट तुझी.. >> सहमत !
दुसर्‍या कोणत्यातरी "शो"च्या धर्तीवर आपला शो बेतावा हा विचार म्हणजे आपल्याच कल्पकतेवर आपणच अविश्वास दाखवल्यासारखं होतं असं नाही वाटत ? हें 'ब्रेन स्टॉर्मींग' आहे असं समजून भन्नाट , ओरिजिनल कल्पना बिनधास्त मांडाव्यात; कदाचित त्यातूनच या धाग्याला अभिप्रेत असलेलं नाविन्यपूर्ण [ व इतराना अनुकरणीय वाटेल असं ] कांहीतरी मिळून जाईल !

कौतूक प्रवासात असल्याने लिहीता आले नाही.....

2) घरांची माहीती...: यात आपण सेलेब्रीटींची घर दाखवू शकतो... त्यांनी घर कसे ऊभारले.... ईंटेरीअल कसे आहे.. कुणाकडून करून घेतले...घरातले लोक कोण आहेत.....

फार लोकांना... बच्चन चे घर आतून कसे आहे.. याची फार उत्चसूक्ता असेल....

यातून लोकांना त्यांची माहीती ही मिळेल त्याच बरोबर काही इंटेरीअल चे टीप्स सुध्दा....

अंबानी चे घर सुध्दा स्वप्नावतच असेल...

उदयवन, एन्डीटीव्ही गूड टाईम्सवर असा एक प्रोग्राम होता. तसेच हा प्रोग्राम माहितीपर होइल, रीअ‍ॅलिटी शो नव्हे.

कौतुका, हेडरमधे रीअ‍ॅलिटी शोची व्याख्या दे आधी. Wink

दिवे घ्या सर्वानी. Happy

हे कधी लागतात कार्यक्रम..?

मुख्य चॅनल्स वर नसल्याने बहूदा लक्श दिले नसेल कोणी.... Happy

शाळकरी मुलांसाठी प्रश्नमंजूषा - हे हवंच आहे मराठीत.

पूर्वी तुषार दळवी असा एक कार्यक्रम सादर करायचा, बहुतेक सह्याद्रीवर. तसाच कार्यक्रम, जरा झकपक आणि जरा अधिक काठिण्यपातळी असलेला असा बघायला आवडेल. (मी सध्याचा एकही रिअ‍ॅलिटी शो बघत नाही.)

एकांकिका स्पर्धेची कल्पनाही उत्तम आहे.

आणखी एक सुचलं

कवितेचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे काही प्रसिद्ध कवी कविता कशी करावी याचं मार्गदर्शन करतील. वृत्त, मात्रा, म्हणजे काय याचं मार्गदर्शन.

दुसर्‍या कोणत्यातरी "शो"च्या धर्तीवर आपला शो बेतावा हा विचार म्हणजे आपल्याच कल्पकतेवर आपणच अविश्वास दाखवल्यासारखं होतं असं नाही वाटत ? >> ह्यावर नुकतीच वृत्तपत्रात चर्चा वाचली एक. हे मराठी बिग बॉसला उद्देशून असेल तर- उलट मराठी लोक ह्या कार्यक्रमाला एक दर्जा देतील, बिग बॉसकडे सध्यातरी एक सवंग चीप कार्यक्रम म्हणून पाहिलं जातं. आणि परदेशी शो जसाच्या तसा उचलला तर कल्पनेवर अविश्वास वगैरे. आपल्याकडे तो शो एक खराखुरा फॅमिली एन्टरटेनर करण्याची क्षमता आहेच. असो. प्रत्येकाचा दृष्टीकोन.

प्रोग्राम असे हवेत ज्यांना जाहिराती आणि प्रायोजक मिळतील. इथेच तर दर्जा आणि पैसा ह्यांचा मेळ घालायचं कौशल्य पणाला लागतं. ई टीव्हीवर अनेक वेगळे शो झाले- ते व्यवसायाच्या दृष्टीने कसे होते, हे तो चॅनेलच सांगू शकेल.

मिलिंद गुणाजी नको... पण त्याच प्रकारची साहसी क्रीडा स्पर्था रिआलीटी शो म्हणून दाखवता येईल...
अशाच प्रकारची स्पर्धा पुण्यात एन्ड्युरो-३ या नावाने दरवर्षी भरवली जाते. सायकलींग, ट्रेकिंग आणि बोटींग अशा तीन प्रकारात ही स्पर्धा होते. एक संघ अशा पद्धतीने यात सहभागी होता येते. सह्याद्रीच्या दर्याखोर्यातून या स्पर्धेचा मार्ग जातो पण विशेष म्हणजे वाटेत कचरा करणारे, किंवा निसर्गाला हानी पोहचावणार्या स्पर्धकांचे मार्क कापले जातात. त्यामुळे अतिशय आव्हानात्मक ही स्पर्धा फार चांगल्या पद्धतीने पार पडते.
याच धर्तीवर सेलिब्रिटींची स्पर्धा घेता येईल. ठराविक अंतराचे सायकलिंग, ट्रेकिंग आणि बोटींग करून त्यांना वेळेत पोचावे लागेल. मग त्यासाठी ते कसे डावपेच आखतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. त्यांची पूर्वतयारी पासून एपिसोड दाखवता येतील. या निमित्ताने साहसी क्रीडाप्रकाराबद्दल लोकांची रुची वाढेल.

कवितेचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे काही प्रसिद्ध कवी कविता कशी करावी याचं मार्गदर्शन करतील. वृत्त, मात्रा, म्हणजे काय याचं मार्गदर्शन.>>> माबोचा अनुभव पाहता याच्याइतका हाणामारीने भरलेला दुसरा शो नसेल, १००% सुपरहीट!!!

दुसर्‍या कोणत्यातरी "शो"च्या धर्तीवर आपला शो बेतावा हा विचार म्हणजे आपल्याच कल्पकतेवर आपणच अविश्वास दाखवल्यासारखं होतं असं नाही वाटत ? >> असं जनरली नसतं. मुळात आपण जी कल्पना म्हणतो ती आजवर कुठेनाकुठे कदाचित वेगळया स्वरूपात का होइना वापरून झालेली असते. त्यामुळे ओरिजिनेलिटीचा मुद्दा वेगळा काढला तरी दर्जा आणि कंटेंटचा मुद्दा कायम राहतो.

मास्टरशेफ हा प्रोग्राम वेगवेगळ्या देशामधे सादर केला जातो. प्रत्येक देशाप्रमाणे त्याचे कंटेंट बदलते. भारतात जेव्हा हा प्रोग्राम लाँच केला तेव्हा अक्षय कुमारला जज म्हणून घ्यावं लागलं होतं. कारण आपली सेलीब्रीटीप्रिय जनता. दुसर्‍या सीझनला त्यानी मुद्दाम विकास खन्ना या कमी प्रसिद्ध पण जास्त गुणी जजला घेतलं. आणि पहिल्या सीझनपेक्षा जास्त रेटिंग मिळवलं.

कल्पना कितीही दरिद्री असली तरी प्रेक्षकांची अचूक नाडी ओळखून व त्याचप्रमाणे प्रोग्रामची ऑऊटलाईन आखून यशक्स्वी प्रोग्राम बनवता येतो. याचे चांगले उदाहरण म्हणजे आदेश बांदेकरचा होम मिनिस्टर हा प्रोग्राम.

एका जोडप्याला घेऊन मुलाने किंवा मुलीने काहीतरी गमतीदार गोष्टी आपल्या पार्टनर साठी प्लान करायच्या त्याच्या / तिच्या अपरोक्ष, नंतर नंतर सेलेब्रीतीस ना घेऊन पण हे अस दाखवता येईल

दिनेशदा ना अनुमोदन

एखादा कलाकार, खेळाडु, राजकारणी, चित्रकार, आपला दिवस कसा घालवतो, हे बघणे मनोरंजक असेल.

डेरेक ओब्रायन सुरेख क्विझ घ्यायचा. मी न चुकता पहायचे. त्याने नंतर एक क्वीझ ची साईट पण काढली होती. तीच्यावर खुप छान माहिती होती.

लहान मुलांच्या च्यानल वर असे कार्येक्रम अपेक्षित आहेत.

डेरेक ओब्रायन >> आठवलं तोच तो Happy

चँप्या, उत्तम सूचना. अशी स्पर्धा घ्यावीच.

पण गुणाजी बरोबर ट्रेक ही कल्पना सुद्धा छान आहे. तो फेमस आहे. त्याची मदतच होईल.

(अर्थात दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे असावेत)

>>एका जोडप्याला घेऊन मुलाने किंवा मुलीने काहीतरी गमतीदार गोष्टी आपल्या पार्टनर साठी प्लान करायच्या त्याच्या / तिच्या अपरोक्ष, नंतर नंतर सेलेब्रीतीस ना घेऊन पण हे अस दाखवता येईल
अशा प्रकारचा एक शो बहुतेक स्टार प्लस वर झाला होता. गृहिणींना आठवडाभर रिसॉर्टवर पाठवून त्यांच्या नोकरी/धंदा करणार्‍या नवर्‍यांना आठवडाभर घर सांभाळायला लावायचं (स्वयंपाक, मुलांचं संगोपन, सगळंच) अशी संकल्पना होती. मस्त होता तो प्रोग्राम. अशा प्रकारचा कार्यक्रम मराठीत आला तर बहार येईल!!

<< ते व्यवसायाच्या दृष्टीने कसे होते, हे तो चॅनेलच सांगू शकेल. >> या क्षेत्राच्या व्यावसायीक गणितांबद्दल मी खरंच अनभिज्ञ आहे. शीर्षकातल्या " काय पहायला आवडेल ??? " एवढ्यापुरतंच मला काय वाटतं तें लिहीलं, इतकंच.

Pages