असा मी तसा मी -- भाग-६

Submitted by अविनाश खेडकर on 15 February, 2012 - 15:13

तु जवळ नसलीस की
मनी शब्दांचा पुर येतो
तु समोर येतेस अन्
मी संवाद विसरून जातो.

****************************

काही काळ जायलाच हवा
मला नीट सावरायला
खोटं खोटं हसत
चारचौघात वावरायला.

****************************

मी आशेला मनात बोलवणं
केंव्हाच बंद केलय
आता आशेनं निराशेला
आपली सावली केलय.

****************************

माझ्या मनाचा तळ अजून
यमालाही लागला नाही
म्हणून बिचारा यम माझ्या
मनासारख वागला नाही.

*****************************

ती वादळी रात्र आता
चांगली लक्षात राहिली
त्या एकाच रात्रीत मी
किती दु:ख पाहिली.

*****************************
रात्रीची वेळ अन्
झुडपाची सावली
सावली साकारते
मनातली बाहुली.

****************************

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पहिली चारोळी खुप अनुभवलीय.दुसरी, तीसरी, पाचवी, सहावी ,छान.चौथी अफलातुन.

पहिली चारोळी खुप अनुभवलीय.दुसरी, तीसरी, पाचवी, सहावी ,छान.चौथी अफलातुन.>>>>>>>>>>>>>>
फालकोर पहिल्या चारोळीचा अनुभव सर्वानाच येतो पहिल्या प्रेमात नाही का?

माझ्या मनाचा तळ अजून
यमालाही लागला नाही
म्हणून बिचारा यम माझ्या
मनासारख वागला नाही.

हि विशेष आवडली. बाकी पण छान.

तु जवळ नसलीस की
मनी शब्दांचा पुर येतो
तु समोर येतेस अन्
मी संवाद विसरून जातो.

भल्तेच लाजाळू आहात.

छान आहेत तुमच्या चारोळ्या.

पहिली, दुसरी विशेष उल्लेखनीय.

------------------------------------------------------------
र्‍हस्व-दीर्घाकडे कृपया लक्ष द्यावे.

तु जवळ नसलीस की
मनी शब्दांचा पुर येतो
तु समोर येतेस अन्
मी संवाद विसरून जातो.

भल्तेच लाजाळू आहात.

छान आहेत तुमच्या चारोळ्या.>>>>>>>>>>>

साधनाजी लाजाळू वैगेरे काही नाही हो, तिच सौंदर्यच अस आहे कि नुसतच पहात राहावस वाटत.
मग बोलण विसरूनच जातो ना!