महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती

ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्रौपदी म्हणून पेनव्लोपी बरी. योग्य आहे सगळ्या दृष्टीने. Proud अँजी खूपच कडकडीत आहे.....

हिंदीत द्रौपदी म्हणून करीना चालून जाईल... जर दुर्योधन सैफ असेल तर.... Proud

Rofl

हे वाचलच नव्हत...... भन्नाट आहे Rofl

विशालदा Lol

वेस्टर्न महाभारतात शॉन कॉनरीला भीष्म पितामह करा.

बिपाशा चालेल का द्रौपदी म्हणून??? की फारच टकाटक वाटेल???

कर्ण - ऋतिक ठीक... जॉन पण चालेल..
कृष्ण - अमिरखान - मिश्किल Happy
दुर्योधन - शारुखखान - सदैव त्रासलेला चेहरा - पर्फेक्ट Proud
दु:शासन - सलमानखान - डोके न वापरणारा... शरीराने नुसता वाढलेला...
कुंती - हेमा मालिनी
भिष्म - बिग बी
अर्जुन - अजय देवगण

अर्जुन रामपाल कोण?
काजोल साठी कुठला रोल?? आणि ऐश्वर्या???

अमिताभ एका चित्रपटात इंद्र झालेला.... लयच पाप्याच पितर वाटत होत... Happy

देवच 5 महिन्याचा उपाशी आणि दुश्काळी प्रदेशातुन आलेला वाटत होता... Lol

<< अरे आमच्या टॉम हॅन्क्सकरता काही रोल आहे की नाही शिल्लक? >> हो, "Cast Away "मुळे त्याला वनवास व अज्ञातवास यांतल्या अभिनयाचा आयताच सरावही झालेला आहे ! Wink
<< वेस्टर्न महाभारतात शॉन कॉनरीला भीष्म पितामह करा. >> पण, जेम्स बाँडच्या रोलमधल्या त्याच्या कांही संवयी अजूनही डोकावतात त्याच्या अभिनयात; भीष्माच्या " ब्रह्मचर्य" वैशिष्ठ्याशी अगदींच विसंगत होईल तें ! Wink

शॉन कॉनरी, केवीन स्पेसी श्रीकृष्ण म्हणून बेस्ट पण आता ते म्हातारे झालेत!
त्यामुळे श्रीकृष्ण म्हणून विल स्मिथ

अरे वा
लोकांनी कल्पनेचे वारु तुफान दौडवलेले दिसते आहे.
हॉलिवूड महाभारत पण कमालच आहे. पेनेलोप क्रुझ छान आहे द्रौपदी म्हणून आणि टॉम हन्क्स कृष्ण असे फिट्ट आहेत.

<< ही कोन मान्सं? >> मराठी मान्सं सुचीवली तर कोन आयकायलाच मागंना; म्हनलं जरा फर्डी इंग्रजी नांवं शोधून फेकूं ह्येंच्या तोंडावर, मग येतील लायनीवर !!! Wink

>>कैकेयी कोण मग शेवटी ? <<
मला ठाऊक आहे (मंथरा सुद्धा), पण मी सांगुन या टाइमपास धाग्याचं "पानिपत" होउ देणार नाहि... Happy

रूपा गांगुली बघायची सवय झालिये डोळ्यांना ... एकदम सुटलेली विद्या बालन बघवणार नाही द्रौपदी म्हणून Sad

द्रौपदीच्या रोल साठी सनी लिऑन घ्यारे ...वस्त्रहरणाचा सीन जरा डीटेल मधे घेता येईल...शिवाय एकावेळी ५ नवरे ....तशी ती अनुभवी कलाकार आहे ...सहज जमेल तिला Rofl

मी ते आधी सनी देऑल वाचले........ डोळ्यासमोर डोल्ले शोले आले......
म्हटले सनी देओल जर द्रौपदी असेल तर वस्त्रहरणाच्या सीनमध्ये एखादा राजदरबाराचा खांब उखडून दु:शासनाच्या डोक्यातच घालेल Proud

पण गोडबोले... मला कृष्ण केले आहात तर मग आता मला साड्या घेऊन फिरावं लागणार......... Biggrin

द्रौपदी म्हणून विद्या बालन मोठी वाटत असेल तर हा पर्यय पण चांगला आहे.
ती बर्‍यापैकी ऑफ बिट् आणि आर्ट फिल्म्स करणारी 'माही गिल' ( देव डी, गुलाल, साहब बिवी और गँगस्टर वाली) .. एकदम पारंपारीक चेहरा आणि चांगलं अ‍ॅक्टिंग करते .
mahi-gill-7.jpg

क्वीन लतीफा = हिडींबा

बच्चन सुनबाई = मेनका (महाभारत तिथून सुरु होते म्हंटल. आणि वेगळी शकुंतला शोधायला नकोच.)

शिल्पा शेट्टी = माद्री (तिला बघून पंडू चळला ना )

मेक शिवाय काय करायचय, स्क्रीन वर छान वावरते नेहेमीच.. तब्बु सारखी दिसतेय मुव्हीज मधे थोडी पण फेमिनाइन व्हर्जन तब्बुचं :).

फेमिनाइन व्हर्जन तब्बुचं

मला नेहमी हाच प्रश्न पडायचा.. तब्बू सुदर आहे , पण काहीतरी खटकायचं जे सांगता येत नव्हतं. यू सेड इट ! मस्तच

माहीपण कधी कधी अतिसुंदर दिसते आणि कधी अगदीच ordinary ( पहा - देव डी). द्रोपदी जर वादातीत सुंदर होती तर माही नाही सुट करणार या रोलमधे.

दीपिका पदुकोणला घ्या द्रौपदी म्हणून... मी पाचही पांडवांचा एकाच पेमेंटमधे रोल करायला तयार आहे. या कानाचा त्या कानाला पत्ताही लागणार नाही.

गंगा कोण? हेमामालिनी.. पौराणिक पोषाखात ड्यान्स करायची सवय आहे... किंवा जयाप्रदा... भीष्माची आई.. पण भीष्म बच्चन ना? Happy

Pages