इंडियन पीनल कोड- सेक्शन १५३ अ

Submitted by नताशा on 13 February, 2012 - 08:05

मायबोलीवर अनेकदा चांगल्या चाललेल्या धाग्यांची वाट लावायला काही लोकांना आवडते. त्यांचे घिसेपिटे वाद म्हणजे
१. ब्राम्हण विरुद्ध मराठा
२. ब्राम्हण विरुद्ध इतर जातीजमाती
३. हिंदु विरुद्ध मुसलमान, ख्रिश्चन इ.
४. मराठी वि. इतर भाषिक
५. भारतीय वि. अमेरिकन
मायबोली हे एक सॅम्पल झाले. समाजात इतरत्रही हेच सुरु असलेले दिसते.
आत्ताच पानिपत-एक सल धाग्यावर "बकासुर" आयडीचा विघ्नसंतोषीपणा पाहिला अन राहावलं नाही. म्हणून गुगल केल्यावर हे सापडलं:
Indian Penal Code (IPC)
Section 153A. Promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc., and doing acts prejudicial to maintenance of harmony
1[153A. Promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc., and doing acts prejudicial to maintenance of harmony.—(1) Whoever—
(a) By words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise, promotes or attempts to promote, on grounds of religion, race, place or birth, residence, language, caste or community or any other ground whatsoever, disharmony or feelings of enmity, hatred or ill-will between different religious, racial, language or regional groups or castes or communities, or
(b) Commits any act which is prejudicial to the maintenance of harmony between different religious, racial, language or regional groups or castes or communities, and which disturbs or is likely to disturb the public tranquility, 2[or]
2[(c) Organizes any exercise, movement, drill or other similar activity intending that the participants in such activity shall use or be trained to use criminal force or violence of knowing it to be likely that the participants in such activity will use or be trained to use criminal force or violence, or participates in such activity intending to use or be trained to use criminal force or violence or knowing it to be likely that the participants in such activity will use or be trained to use criminal force or violence, against any religious, racial, language or regional group or caste or community and such activity for any reason whatsoever causes or is likely to cause fear or alarm or a feeling of insecurity amongst members of such religious, racial, language or regional group or caste or community,] Shall be punished with imprisonment which may extend to three years, or with fine, or with both.
Offence committed in place of worship, etc.— (2) Whoever commits an offence specified in sub-section (1) in any place of worship or in any assembly engaged in the performance of religious worship or religious ceremonies, shall be punished with imprisonment which may extend to five years and shall also be liable to fine.]
CLASSIFICATION OF OFFENCE
Para I
Punishment—Imprisonment for 3 years, or fine, or both—Cognizable—Non-bailable—Triable by any Magistrate of the first class—Non-compoundable.
Para II
Punishment—Imprisonment for 5 years and fine—Cognizable—Non-bailable—Triable by Magistrate of the first class—Non-compoundable.

बाकी आयपी अ‍ॅड्रेसनी व्यक्तीचे ट्रॅकिंग इ.इ. माहिती असेलच सर्वांना.

तेव्हा कुठल्याही जातीला/वंशाला/धर्माला जाहीर शिव्या देण्याआधी हे वाचा. कुणी वकील्/कायदेतज्ञ असतील इथे तर अजुन माहिती मिळेल.

गुलमोहर: 

अगदी आज हा कायदा गुगल करेपर्यंत माझाही असा समज होता की हा कायदा फ्क्त उच्चवर्णीयाने इतर जातीला कमी लेखले तर त्या उच्चवर्णीयाविरुद्धच दाखल करता येतो. हे आजच कळलं की कुठल्याही जातीच्याने कुठल्याही जातीला शिव्या दिल्यास गुन्हा समजला जातो.
>>>
असा त्या कायद्याचा मुळी अर्थ होत नाही असे मत आहे. कोणत्याही जातीने कोणालाही शिव्या दिल्या तर तो गुन्हा होतो याचा परिप्रेक्ष्य वेगला आहे. ती साधी इन्सल्टची केस होते.त्यालाही आयपीसीलागू आहेच. पण १५३ नव्हे . तुम्ही १५३ अ च्या केसेस एकदा डोळ्याखालून घालाच. ब्राम्हण वर्गाविरुद्ध प्रकटन केल्याने तुमच्या भावना दुखावल्या तर त्या वैयक्तिक ! सम्पूर्ण समाजात विद्वेष पसरला असेल तर तो तुम्हाला सिद्ध करावा लागेल. १५३ अ खाली कन्व्हिकशन फार कमी आहे. त्यामुळे आपण फार मोठा शोध लावला आहे असा समज करून घेऊ नका तो एक साधा निरुपद्रवी सेक्शन आहे (आणि यूसलेसही) असे कुठलाही किरकोळ फौजदारी वकीलही तुम्हाला सांगेल....

ब्राम्हण समाजाविरुद्ध (किंवा कोणत्याही : म्हणजे आपण भैयांबद्दल अपमानास्पद विनोद करतो)लिखाण केल्यामुळे माझ्या भावना दुखावल्या म्हणून तुम्ही १५३ अ खाली केस दाखल करा असे एखाद्या वकीलाला सांगितले तर तो (मनातल्या मनात)हसतच सुटेल पण फीच्या लोभाने हरणारी केस राणा भीमदेवी थाटातच दाखल करील.

ऑर्कुटवर एकजण संजय राऊत यांच्या नावाने प्रोफाईल बनवून इतरांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायचा. ज्यांच्या युक्तीवादापुढे काही बोलणे अशक्य आहे त्यांना मुख्य करून टार्गेट केले जायचे. हे महाशय त्या कम्युनिटीवरचे एक माननीय हिंदुत्ववादी निघाले. एकदा चुकून कोणत्या प्रोफाईलने आपण लॉग इन झालो आहोत याचा विसर पडल्याने ते उघडकीस आले. ती भाषा झोपडपट्टीत वापरल्या जाणा-यांना खाली मान घालावी लागेल इतकी जहरी आणि घाणेरडी होती. बरं ते सदस्य पण ज्येष्ठ ! सगळे गप्पच बसले. त्यावेळी कुणी लगेच गुन्हे दाखल केले नाहीत. अयोध्या प्रकरण जोरात असताना सर्वत्र या भाषेचा मुक्त संचार चालू होता याची आठवण ठेवायला हवी. त्या वेळी या फाटक्या तोंडाच्या लोकांबद्दल समाजात जे मत खराब झालं ते झालंच.

नेटवर अशा प्रकारच्या शिवीगाळीची सुरूवात माझ्या पाहण्यात तरी याच लोकांनी केलेली आठवते. त्यावेळी उपहास, शिवीगाळ या सर्वांना उत्तर कसं द्यायचं याचं इतरांना ज्ञान नसल्याने बरेच लोक गप्प बसणं पसंत करायचे. आरक्षणावरचे विनोद, मागासवर्गीय डॉक्टरकडे गेल्याने मृत्यू होण्याचे भय वगैरे पोस्टी टाकताना कुणालाही १५३ ची तेव्हा आठवण झाली नसावी. हिरव्या रंगावरचे विनोद, मुस्लीम अनुनय यावरचा उपहास या पोस्टस तर आता पाठ झाल्यात. आपसात एकमेकांना +१ देणे, एकमेकांना एसेमेस पाठवून, फोनाफोनी करून धागे चालवणे, कुठे खुट्ट झाले कि झुंडीने जाऊन उपहासगर्भ जहरी लिखाण करणे यात कोण आघाडीवर होते आणि आहे हे सर्वांना माहीत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक नव्या बॅचकडे याच पद्धतीचे लिखाण असते आणि जोर ओसरल्यावर ते थंड होते. काही लोक तर यांच्या भयाने फेक प्रोफाईल बनवूनच चर्चेत सहभागी होताना दिसतात. आणि फेक प्रोफाईल म्हटल्यावर ते कसे वागेल याची गॅरण्ती नसते. मुळात त्या व्यक्तीच्या मतांचा आदर झाला असता, तो कसा मूर्ख आहे अशा झुंडशाहीने पोष्टी पडल्या नसत्या तर इतक्या चित्रविचित्र नावाचे प्रोफाईल्स अशा चर्चेत सहभागी झालेच नसते.

चालायचंच. आपला तो बाब्या हेच खरं.. हा प्रकार कसा आहे माहीतिये का.. आमच्याकडे आहे ते ज्ञान, तुमचे मत म्हणजे अपुरी माहिती.. तुम्ही काहीही म्हणा आम्ही म्हणू तेच बॅलन्स्ड ! जिथे आपल्याला +१ मिळण्याची गॅरण्टी जास्त तिथे मग दुसरी बाजू ऐकून घेण्याचीही गरज नाही. सगळे एकमेकांना सामील. आम्ही शिकवू तीच गीता, तुमच्यावर मात्र आमचे इग्नोरास्त्र ! आमची तेव्हढी उच्च अभिरूची.. तुमची आवड काय बाई थर्डक्लास !! आमचे विनोद तेव्हढे दर्जेदार.. तुमची मात्र हीन अभिरूची. आम्ही झोडपू ते अगदी योग्य, तुम्ही झोडपाल तर अन्याय ! अरण्यरूदन आहे हे .. दुसरं काही नाही. दुर्लक्ष करण्यालायक प्रकार ! हे सर्वांनाच लागू आहे. कुणा एकाला नाही.

अशा धाग्यांवर पहिली पोस्ट न टाकणे हाच सर्वोत्तम उपाय असतो हे मुद्दाम सांगावंसं वाटतंय. एकतर सत्य हे प्रत्येकाच्या नजरेत वेगळं असतं. गुजरात दंगलीत कोण दोषी हे आज नीट सांगता येत नाही तिथं इतिहासात काय झालं होतं यावर ठाम असणं हे अशक्य कोटीतलं काम आहे. इतिहासात शक्यता असतात आणि त्या शक्यतांचा आदर करून सोडून देणं हे शिकायला हवं. जिथं इतिहासकारांमधे एकवाक्यता नाही, त्यांच्या हेतूंबद्दल निरनिराळी मतं आहेत तिथं आमचंच खरं असं म्हणणं हे वेळ वाया घालवण्याचं लक्षण आहे. त्यापेक्षा वाचावे, नेटवर खजिना आहे त्यातून पडताळून पहावे आणि आपले मत आपल्याकडेच ठेवावे हा चांगला मार्ग आहे. पण हा मार्ग प्रचारी थाटाच्या लोकांना पसंत पडणे शक्य नाही. त्यांनाच जास्त हौस असते आणि अन्याय झाला म्हणून बोंब ठोकण्याची सवयही.

ज्यांनी कायम दुस-यांच्या मताचा आदर केला आहे, करत आलेले आहेत ते नेहमीच आदरास पात्र राहीलेत.. मग ते कुठल्या जातीचे आहेत हे पाहीलं जात नाही. उलट अशा लोकांमुळेच त्या त्या समाजाची इमेज टिकून राहते. सगळेच असे नसतात हा मेसेज जात राहतो. दुस-याशी तुम्ही सहमत असाल नसाल.. पण त्याच्या मताचा आदर करत असाल तर तुमच्याही मताचा आपोआपच आदर होईल. जाणते लोक वाचत असतात आणि ते ठरवत असतात. काही तर फक्त वाचून आपले मत बनवत असतात. आपल्यावर अन्याय झाला असं प्रत्येकालाच वाटत असलं तरी तटस्थ नजरेतून पाहणा-याने ते ठरवणं हे महत्वाचं.

राहता राहिला प्रकार बदनामीचा तर आजपर्यंत तीनच केसेसमधे पोलिसांकडून गुन्हे दाखल झालेत. एक बाळासाहेब ठाकरेंच्या बदनामीचा, दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा आणि तिसरा महात्मा गांधी कि नेहरू यांच्या बदनामीचा. पैकी बाळासाहेब ठाकरेंच्या बदनामीबद्दल एक जण आत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा आरोप ज्याच्यावर ठेवला त्याची न्यायालयाच्या आदेशाने पोलीस माफी मागून मोकळे झालेत आणि तिसरा आरोपच सिद्ध होत नाहीये अजून.

एक आहे मात्र.. पोलीस आपल्या घरी आलेले मध्यमवर्गियांना आजही धक्कादायकच आहे. म्हणून काळजी घेण्यात तोटा काहीच नाही.

'मायबोली'पुरतंच बोलायचं तर जिथं जिथं १५३-अ च्या कक्षेत बसेल असं लिखाण दिसतं, तिथं तिथं इतर कोणताही प्रतिसाद न देतां फक्त " ******** ह्यांची वरील दि.***ची पोस्ट/ प्रतिसाद - आयपीसी कलम १५३-अ ? " , एवढंच कटाक्षानं लिहावं. त्यामुळे असं लिखाण बंद नाही झालं तरी त्याला आळा बसेल, अशी आशा करूंया !

नताशा, तुला एक हजार मोदक बक्षिस Happy बरं झाल हे नेमके ते इथे दिलेस Happy याची आवश्यकता होतीच/आहेच.
अर्थाऽऽत, बाजोचे मतास देखिल (प्रामाणिकपणेच, अन बरेचदा देतो तसे) अनुमोदनच Happy

बायदिवे, तो मुन्जीच्या धाग्यावर ख्रिश्चन्नान्ना कुणि शिव्या दिल्यात? मी तर नै बोवा. मूळात तो मुन्जीचा धागाच "ब्राह्मणान्ना" अप्रत्यक्षरित्या शिव्या घालण्यासाठि व हिन्दु धर्मातील एका संस्कारबद्दल टीका करण्यासाठी, जेणेकरुन बुद्धिभेद व्हावा, याकरता होता. हे ख्रिश्चन मधेच कुठुन कुणी आणले? त्या"रानडुकराची" मेख दिसते ही!
असो.

>>>>परंतु आजकाल सर्वत्र "ब्राम्हण" या जातीविरुद्ध जी "घाऊक" आणि खोटारडी भाषा सर्रास वापरली जातेय, ती बघता मला तरी वाटायला लागलंय की गुन्हे दाखल करायचीच वेळ आलीय. <<<<
भावना पोचली, किम्बहुना, अशीच भावना तुमचे मनात निर्माण व्हावी इतपत परिस्थिती निर्माण करणे हेच तर "बामणान्विरुद्ध जिथेतिथे गरळ" ओकणार्‍यान्चे उद्दीष्ट आहे. अन त्याला बळी पडू नये. ब्राह्मण म्हणून तुम्ही बाकी समाजापासून जितके फटकुन रहाल, तितके त्यांना हवेच आहे.
बामणान्ना विशिष्ट हेतूने शिव्या घालणार्‍यान्ना मोजक्यान्ना वगळून, बाकि सर्व समाज आहे त्या जातीधर्मासहित आपलाच आहे, व तो आहे म्हणून आपणही आहोत, हे विसरु नये, व यांचे "दिग्दर्शनाचे" उत्तरदायित्व असे गुन्हे दाखल वगैरे करुन कधीच साध्य होणार नाही, फक्त "त्यान्ना" अपेक्षित असलेली "तेढ" वाढतच जाईल, अपप्रचारास अधिक कोलितं दिल्यासारखे होईल. असे होत होत, समाजाच्या दिग्दर्शनाचे उत्तरदायित्व तुम्ही तुमच्याच चूकिच्या आवेशात जाऊन सोडून द्यावे, हेच तर यान्ना अपेक्षित आहे. तेव्हा थंड डोक्याने, पण सुनिश्चितपणे, केवळ त्यांचे युक्तिवादाचा प्रतिवाद करीत, पण, "आदर्शवत" जीवन जगणे हेच ब्राह्मणी कर्तव्य आहे. कारण आजही, बाकी समाज ब्राह्मणान्कडे "सूप्त" अपेक्षेने बघतो आहे.
असो. सांप्रत काळी मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय का? की दिवसाढवळ्या स्वप्ने बघतोय?

समाजाला द्वेषाचे राजकारण कधीच मान्य होत नाही.. मग ते विशिष्ट जातीविरूद्ध असो, धर्माविरूद्ध असो किंवा परराज्याविरूद्ध असो. द्वेषाचे राजकारण करणारे लाटेमधे अल्पकाळ यशस्वी होतात, पण लाट विरल्यानंतर समाजाच्या मनातून तेच उतरतात.

त्यामुळे आपण फार मोठा शोध लावला आहे असा समज करून घेऊ नका तो एक साधा निरुपद्रवी सेक्शन आहे (आणि यूसलेसही) असे कुठलाही किरकोळ फौजदारी वकीलही तुम्हाला सांगेल....
>> शोध लावायला मी काही शास्त्रज्ञ नाही. मला माहीत नव्हते, ते कळले म्हणून शेअर केले. इतकेच. इथेही अनेकाना माहीत नसावे अशी परिस्थिती आहे म्हणून इथे सगळ्याना सांगण्याचा अट्टाहास.
बाळु जोशी, आपण वकील आहात का? असल्यास मी आपले वरचे मत या लेखात समाविष्ट करीन. नसल्यास एखाद्या वकीलास ठरवू द्या काय ते. माहिती देण्याने इथे कुणाचे काही नुकसान होत नाहीये ना?

आपला तो बाब्या हेच खरं>> माझ्या बाबतीत तरी हे खरं नाही. दुसर्‍याविषयी "संदर्भहीन" विषारी लेखन करणे मला मान्य नाही. हे "दुसरे" मुस्लीम्/मराठा/ब्राम्हण्/ख्रिश्चन कुणीही असोत.
जिथे गरज नाही, तिथे जात्/धर्म आणु नये एवढी साधी अपेक्षा आहे. जास्त आहे का?

समाजाला द्वेषाचे राजकारण कधीच मान्य होत नाही.. मग ते विशिष्ट जातीविरूद्ध असो, धर्माविरूद्ध असो किंवा परराज्याविरूद्ध असो. द्वेषाचे राजकारण करणारे लाटेमधे अल्पकाळ यशस्वी होतात, पण लाट विरल्यानंतर समाजाच्या मनातून तेच उतरतात.
>> +१

आपला तो बाब्या हेच खरं>> माझ्या बाबतीत तरी हे खरं नाही. दुसर्‍याविषयी "संदर्भहीन" विषारी लेखन करणे मला मान्य नाही. हे "दुसरे" मुस्लीम्/मराठा/ब्राम्हण्/ख्रिश्चन कुणीही असोत.
जिथे गरज नाही, तिथे जात्/धर्म आणु नये एवढी साधी अपेक्षा आहे. जास्त आहे का?...अपेक्षा योग्य आहे,पण
आरक्षणावरचे विनोद, मागासवर्गीय डॉक्टरकडे गेल्याने मृत्यू होण्याचे भय वगैरे पोस्टी टाकताना कुणालाही १५३ ची तेव्हा आठवण झाली नसावी. हिरव्या रंगावरचे विनोद, मुस्लीम अनुनय यावरचा उपहास या पोस्टस तर आता पाठ झाल्यात. हे जेव्हा घडत असते तेव्हासुध्द्दा proactively विरोध करा नाही तर आपल्या तो बाब्या असे लोकांना वाटणारच.

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
दादोजी कोंडदेवांचं जे रेखाचित्र (sketch) शालेय पुस्तकांत बघितलं त्यात त्यांचा वेष सर्वसामान्य मावळ्यासारखाच असल्याने व त्यांच्या ज्ञातीचा उल्लेख पाठ्यपुस्तकात नसल्याने ते ब्राह्मण आहेत हेच मुळात त्यांसंबंधीचा वाद ब्रिगेडने उकरून काढल्यावर समजलं. अर्थात शिवाजीमहाराजांच्या गुरूंपैकी एक म्हणून त्यांच्याविषयी तेव्हाही तेवढाच आदर होता आणि आताही तेवढाच आहे.

Pages