इंडियन पीनल कोड- सेक्शन १५३ अ

Submitted by नताशा on 13 February, 2012 - 08:05

मायबोलीवर अनेकदा चांगल्या चाललेल्या धाग्यांची वाट लावायला काही लोकांना आवडते. त्यांचे घिसेपिटे वाद म्हणजे
१. ब्राम्हण विरुद्ध मराठा
२. ब्राम्हण विरुद्ध इतर जातीजमाती
३. हिंदु विरुद्ध मुसलमान, ख्रिश्चन इ.
४. मराठी वि. इतर भाषिक
५. भारतीय वि. अमेरिकन
मायबोली हे एक सॅम्पल झाले. समाजात इतरत्रही हेच सुरु असलेले दिसते.
आत्ताच पानिपत-एक सल धाग्यावर "बकासुर" आयडीचा विघ्नसंतोषीपणा पाहिला अन राहावलं नाही. म्हणून गुगल केल्यावर हे सापडलं:
Indian Penal Code (IPC)
Section 153A. Promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc., and doing acts prejudicial to maintenance of harmony
1[153A. Promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc., and doing acts prejudicial to maintenance of harmony.—(1) Whoever—
(a) By words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise, promotes or attempts to promote, on grounds of religion, race, place or birth, residence, language, caste or community or any other ground whatsoever, disharmony or feelings of enmity, hatred or ill-will between different religious, racial, language or regional groups or castes or communities, or
(b) Commits any act which is prejudicial to the maintenance of harmony between different religious, racial, language or regional groups or castes or communities, and which disturbs or is likely to disturb the public tranquility, 2[or]
2[(c) Organizes any exercise, movement, drill or other similar activity intending that the participants in such activity shall use or be trained to use criminal force or violence of knowing it to be likely that the participants in such activity will use or be trained to use criminal force or violence, or participates in such activity intending to use or be trained to use criminal force or violence or knowing it to be likely that the participants in such activity will use or be trained to use criminal force or violence, against any religious, racial, language or regional group or caste or community and such activity for any reason whatsoever causes or is likely to cause fear or alarm or a feeling of insecurity amongst members of such religious, racial, language or regional group or caste or community,] Shall be punished with imprisonment which may extend to three years, or with fine, or with both.
Offence committed in place of worship, etc.— (2) Whoever commits an offence specified in sub-section (1) in any place of worship or in any assembly engaged in the performance of religious worship or religious ceremonies, shall be punished with imprisonment which may extend to five years and shall also be liable to fine.]
CLASSIFICATION OF OFFENCE
Para I
Punishment—Imprisonment for 3 years, or fine, or both—Cognizable—Non-bailable—Triable by any Magistrate of the first class—Non-compoundable.
Para II
Punishment—Imprisonment for 5 years and fine—Cognizable—Non-bailable—Triable by Magistrate of the first class—Non-compoundable.

बाकी आयपी अ‍ॅड्रेसनी व्यक्तीचे ट्रॅकिंग इ.इ. माहिती असेलच सर्वांना.

तेव्हा कुठल्याही जातीला/वंशाला/धर्माला जाहीर शिव्या देण्याआधी हे वाचा. कुणी वकील्/कायदेतज्ञ असतील इथे तर अजुन माहिती मिळेल.

गुलमोहर: 

बरं झालं हे इथे लिहिलेत... हिंदुत्वाचा धागा काढून मुसलमानाना झोडप, मुंजीचा धागा काढून ख्रिस्चन संतावर टिका कर, असले उंडगे धंदे लोक बंद करतील ही अपेक्षा.

उदयवन,
मला कायदेशीर मराठीत भाषांतर करता येणार नाही. गोषवारा टाकेन थोड्याच वेळात.
इथे कुणी वकील्/कायदेतज्ञ असल्यास मदत करा प्लीज.

चांगलं काम केलंय.

पण कायद्याची अंमलबजावणी हा भाग कुणाच्या अखत्यारीत येतो याचं भान असायला हवं. त्यानंतर त्याची सुनावणी. या दोन्ही ठिकाणी अपुरं मनुष्यबळ, अपु-या सुविधा आणि प्रलंबित केसेस, खटले यामुळं पुढे काय होईल याचाही विचार करायला हवा. दुर्दैवाने कायदे मोडणा-यांनाच याचं भान जास्त असतं.

नेटवर चालणा-या जातीविषयक धाग्यांविषयी - सुरूवातीला मी देखील भयंकर अस्वस्थ होत असे. कायद्याचं काही भय आहे कि नाही असं वाटायचं. पण या चर्चेतून काही कन्सेप्टसही क्लिअर झाले. कायद्याचा वापर कसा न कधी करावा याचं तारतम्य असायला हवं. पोलीस देखील आधी प्रबोधन, मग समज आणि नंतर कारवाई याच क्रमाचा अवलंब करतात. न्यायालयात देखील वय, हेतू हे सगळं लक्षात घेतलं जातं. असं तर काही कुठंच लिहून ठेवलेलं नाही.. मात्र कायदे हे समाजासाठी आहेत, समाज कायद्यांसाठी नाही असा आपल्याकडे दृष्टीकोण आहे.. नाहीतर नॉर्वेत झालं तसं चाईल्ड प्रोटेक्शन सेंटरसारखी अतिरेकी अंमलबजावणी आपल्याकडेही झाली असती. यातून असंतोष भडकेल.. प्रबोधन कसं होईल ?

धन्यवाद अरुंधती.

किरण्यके,
भान नसतं म्हणूनच कायदे असतात नं?
गुन्हे दाखल करायला माझ्याकडेही वेळ नाही. इथे माझा उद्देश फक्त माहिती देणे हाच आहे. अनेकदा लोकांची भाषा बघता त्यांना असा काही कायदा आहे हे ही माहित नसावे, अशी शंका येते.

नताशा,

आपला हेतू स्तुत्य आहे. मात्र जिथे भारताचा कायदामंत्री कायदेभंग करतो, तिथे कायद्याला कोण धूप घालणार! सलमान खुर्शीद बघा काय बरळतोय! भारतीय राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर भेदभाव करायला सक्त मनाई आहे. सलमान खुर्शीद उघडपणे घटनाद्रोह करतो तो करतोच आहे, वर निवडणूक आयोगाला मानीत नसल्याचे सांगतोय.

काय अर्थ लावावा याचा?

आ.न.,
-गा.पै.

गा पै
अर्थ एवढाच की तो कायदा"मंत्री" आहे, त्यामुळे वाट्टेल ते बरळला तरी "सध्या" त्याचं कुणी काही वाकडं करु शकत नसेल. पण इथे लिहिणार्‍या "सामान्यानी" कायदा पाळावा, हेच बरे.
कुणी केलाच गुन्हा दाखल तर खुर्शीद येणार नाही वाचवायला.

सर्व जाति, धर्म, वंश, देश, वर्ण इत्यादींवरून आणि एकमेकांना संस्थळाच्या माध्यमातून जाहीर शिव्या घालणार्‍यांना अतिशय विनम्रतेने सांगावेसे वाटते की आपल्या अशा लिखाणामुळे संकेतस्थळावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. पर्यायी, जर आपण आपली भाषा व लिखाण अशाच प्रकारे चालू ठेवलेत तर त्याचा भुर्दंड संस्थळाला व संस्थळाच्या मालकांना भोगायला लागू शकतो. कारण अशा प्रकारची वक्तव्ये त्यांच्या संस्थळावरून प्रकाशित झाली. कारवाई प्रत्यक्षात होईल अथवा नाही हा मुद्दा गौण आहे. परंतु इथे मायबोलीसारख्या संस्थळावर (किंवा अन्य संस्थळांवर) आपल्या घरात बसून समस्त जगाला शिव्या देण्याच्या आविर्भावात ज्या प्रकारे एकमेकांच्या धर्म, जाती, वंश, राष्ट्रीयत्व इत्यादीं वर आक्षेपार्ह विधाने केली जातात त्यातून फक्त असंतोष वाढीस लागतोय. भावना दुखावल्या जात आहेत. बाकी काहीही साध्य होत नाही.

छान

अरुंधती कुलकर्णी +१

~ माझा इतिहासाचा थोडाफार अभ्यास असल्याने इथल्याच एका सदस्यमित्राने मला फोनकरून "काका, तुम्ही 'पानिपत' धागा पाहिला का ? नसल्यास जरूर वाचा आणि तुमचेही तिथे विचार नोंदवा' असे आग्रहाने सांगितले. उत्सुकतेने आज सायंकाळी ७.३० वाजता त्या धाग्याकडे गेलो आणि सुरुवातीचे काही प्रतिसाद [जे खरेच अभ्यासू आहेत] वाचल्यानंतर त्यापुढे प्रत्येक प्रतिसादाला ठेचकाळत पुढे जावे लागले. इतके वाचन, अभ्यासाच्या इतक्या सोयी, आदानप्रदानची आधुनिक साधने बोटाच्या एका टिचकीनिशी उपलब्ध....इतकी आबादीआबाद असूनही शेकडो वर्षाच्या ज्या शापाने या महाराष्ट्राला ग्रासले आहे त्याच जातिभेदाकडे हे इतके सुशिक्षित लोक कसे आणि का वळत असतील ? असे मनोमन विचारले. हा एक असा जटिल प्रश्न आहे की तो जर वेताळाने विचारला तर साक्षात विक्रमादित्यालाही त्याचे उत्तर देता येणार नाही.

इच्छा असूनही 'त्या' धाग्यात भाग घेतलेला नाही.

बाकी नताशा यानी दिलेला भारतीय संविधानाचा इशारा हा पुरेसा बोलका असूनही प्रश्न आहे तो त्याच्या प्रभावी 'अंमलबजावणी' चा. कायद्याला अनुलक्षून सर्वच बाबी होत राहात नाहीत हे या देशाचे दुर्दैव. पण अरुंधती म्हणतात त्याप्रमाणे इथल्या अ‍ॅडमिन यानीच या संदर्भात कठोर पाऊले उचलली पाहिजेत अन्यथा तेच जर दुर्लक्ष करीत असतील तर असे खाजगवत दिवसेदिवस फोफावतच जाईल हे नि:संशय.

अशोक पाटील

इतकी आबादीआबाद असूनही शेकडो वर्षाच्या ज्या शापाने या महाराष्ट्राला ग्रासले आहे त्याच जातिभेदाकडे हे इतके सुशिक्षित लोक कसे आणि का वळत असतील ? असे मनोमन विचारले. हा एक असा जटिल प्रश्न आहे की तो जर वेताळाने विचारला तर साक्षात विक्रमादित्यालाही त्याचे उत्तर देता येणार नाही. >> +1

आधी लिहिणार्‍याची जात इथे मायबोलीवरही बघीतली जाते. तो काय लिहितो हे पडते बाजूलाच. असो पण पाटील साहेब, आपण थांबायचे नाही, जे योग्य आणि पटेल ते लिहित राहायचे. नाहीतर दगडावर घण घालानारा हातोडाच नाहीसा व्हायचा अन हे दगड फुटणारच नाहीत.

प्रथमतः हे १५३ अ कलम म्हणजे सेक्शन हे इन्डियन पीनल कोडाचे आहे.टायटल्मध्ये म्हटल्याप्रमाणे भारतीय संविधानाचे नाही. संविधानात आर्टिकल्स =अनुच्छेद असतात. मायबोलीवर जातीधर्माबद्दल व्यक्त झालेली मते ही फारच मिळमिळीत असतात अगदी त्या कायद्याच्या कक्षेत न येण्याइतकी असतात. इतरत्र ज्या प्रचारी वेबसाईट्स असतात त्यावरचा मजकूर तर वाचवणार नाही इतका शिवराळ व विखारी असतो... शिवाय ही असली कलमे सिद्ध होण्यासाठी फार स्पष्ट पुरावे व चपखल युक्तिवाद करावा लागतो...
'आम्ही पुण्याचे बामण हरी ..' या घाशिरामातील ओळींमुळे ब्राम्हण मंडळी.च्या मनात लिहिणार्‍यांबद्दल जातीय /धार्मिक विद्वेष किंवा वैरभाव उत्पन्न होतो का? कसा होईल ? लिहिणारा ही ब्राम्हणच आहे.त्याना फार तर राग येईल पण त्याला वैरभाव कसे म्हणता येईल. झालाच तर फक्त त्या व्यक्तीबद्दल होईल , समाज अ‍ॅज सच , दोन समाजात वैरभाव निर्माण इथे कुठे निर्माण होतो? दलिताने दलिताला जातीवाचक उल्लेख केला तर तो गुन्हा नाही सवर्णाने केला तर गुन्हा कारण वैचारिक बैठक वेगळी. सवर्ण हा तुच्छतापूर्वक, अपमान करण्यासाठी रेसिस्ट वृत्तीने करतो.
१९९२ च्या दंगलीतील सामन्यातील लेखन त्यावरील खटला व त्यावरील युक्तीवाद वाचा म्हणजे कळेल हे कसे कठीण असते ते.

अनेक जण 'त्या' धाग्यावर मूक वाचक आहेत हे जाणतो. दुर्दैवाने काही मोजक्या प्रतिसादांमुळे इतर अनेक जणांचे मत तिथे येत नाही हे दुर्दैव...

@ श्री.बाळू जोशी ~

नताशा याना आयपीसी चे कलम असेच म्हणायचे आहे असे त्यांच्या धाग्यातील इंग्रजी मजकुरावरून समजतेच. कदाचित इंडियन पीनल कोडचे भाषांतर त्या धाग्याच्या धगीत भारतीय संविधान असे त्यानी केले असावे. मात्र ते देण्यामागील त्यांची भावना योग्यच आहे. असो.

आपण रास्तपणे म्हटल्याप्रमाणे असली कलमे सिद्ध होणे हे फार किचकट काम आणि तितकेच पैसा+वेळखावू असतात. कित्येक वेळा अर्ज करणार्‍याच्या मागेच ससेमिरा लागतो. रात्री १० नंतर सार्वजनिक ठिकाणी कर्ण्यावरून गाणी वाजवुन शांतता भंग करू नये असा थेट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. एका स्थानिक फालतू दादाच्या नातवाच्या बारशाच्या रात्रीचे बारा वाजले तरी कर्ण्यावरून दंगा चालला असताना शेजारील अपार्टमेन्टमधील एका आजारी जोडप्याने पोलिस चौकीवर फोन करून तक्रार केली तर तिथला ड्युटीवरील हवालदार "इथे येवून अर्ज द्या' असे म्हणत फोन दाणदिशी ठेवतो. त्यामुळे अशा पीनल कोडचे प्रयोजन फक्त कायद्याच्या पुस्तकासाठीच आहेत की काय अशी शंका येऊ लागते.

त्यामुळेच मी इथल्या अ‍ॅडमिन यांची या बाबतीतील भूमिका प्रभावी ठरेल हा आशावाद व्यक्त केला होता.

@ केदार ~

लिहिणार्‍याचीही प्रथम जात पाहिली जाते हे वाचून मला शॉक बसला. मी तसा काहीसा नवा असल्याने अगदी थेट खर्‍या नावानेच इथे वावरतो व काही प्रमाणात विविध धाग्यावर भागही घेत आलो आहे. पण हे ठामपणे सांगू शकतो की माझी मते आणि माझा धर्म+जात यांचा एकमेकाशी धुळीच्या कणाइतकाही संबंध नाही. जो काही अभ्यास, अनुभव आणि त्या अनुषंगाने मनी तयार झालेली विविध विषयाबाबतची भूमिका इतक्या शिदोरीवर मी इथे आलो आहे. पण उद्या "हा पाटील आम्हाला काय शिकवितो ?" असे जर कुणी एखाद्या ऐतिहासिक/धार्मिक/संस्कार विषयावरील माझ्या मताबद्दल म्हणू लागला तर ते मला निश्चित क्लेशदायक होईल.

अर्थात तुम्ही म्हणता तसे योग्य आणि पटेल तसे लिहित राहायचे हेही योग्यच आहे म्हणा, अन्यथा "मायबोली" कस्तुरीच्या बागेत केंदाळ वाढतच जाईल.

अशोक पाटील

पाटील साहेब

नेटवर लिहीणा-या पिढ्या येत असतात. अपुरे आणि एकांगी ज्ञान संपूर्ण समजून त्यातून ठिणग्या पडत असतात. बरेचदा अर्ध्या कच्च्या वयाचे असल्याने प्रतिक्रिया कशा स्विकाराव्यात याचे ज्ञान नसते. आपल्याला शिकवलेय तेच संपूर्ण असा विश्वास असतो. मग भडक प्रतिक्रिया होतात. त्याच वेळी संयत प्रतिक्रिया देणारे सदस्य उठून दिसतात आणि त्यांची मतं मांडण्याची पद्धत प्रभावी ठरताना दिसते. शक्यतो असेच सदस्य संतुलित आणि अभ्यासू मतं मांडताना दिसतात. बरेचदा ही मतं त्या क्षणी स्विकारली जात नाहीत, पण त्यांच्या मताने प्रभावित केलेलं असतं. काही जण ते स्विकारतातही, तर काही दुराग्रही निघतात ते बाजूला फेकले जातात. पण काही वर्षात नेटवर मत कसं मांडायचं हे सर्व जण शिकलेले असतात. ही पिढी थोडी प्रगल्भ होते आणि लिहीनाशी होते...सुरूवातीला मला किती येतंय आणि बाकिचे किती मूर्ख हा अभिनिवेश गळून पडलेला असतो.

पुढे ??

दुसरी पिढी येते आणि ते चालूच रहातं.

म्हणूनच मी म्हटलं होतं त्यांना धाकाची नाही तर प्रबोधनाची गरज आहे. कारवाई केव्हां प्रभावी ठरू शकते ? जेव्हा आपण करतोय ते चुकीचं आहे हे माहीत असूनही ते काम चालूच ठेवलं जातं तेव्हाच..
माझ्या पहिल्या पोस्टला हेच संदर्भ होते आणि आहेत.

अशोक पाटील, अहो, आपल्या समाजाचंच प्रतिबिंब आहे मायबोली. त्यामुळे सर्व प्रकारचे लोक आहेतच. समाजात प्रत्यक्षात जशी बहुतेकांच्या मनात सुप्त जातीयवादी जाणीव असते ती इथेही असणारच. हे चांगलं नाही हे आपल्याला वाटतं पण सगळ्यांनाच ते मान्य असेल असं नाही. मीही इथे नेहमी असतेच असं नाही. पण आता हळूहळू लक्षात येतंय की काही जण फक्त काड्या टाकायचं काम करतात तर काही जण पूर्वग्रहाचे चष्मे दूर करायलाच तयार नाहीत. आपण सरळ दुर्लक्ष करायचं. आणि आपलं म्हणणं ठामपणे मांडायचं. सगळेच असे नाहीत इथे. अनेकजण तुमच्यासारखेच चर्चा करण्यात, दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यात खरोखरचे उत्सुक असतात. Happy

असे जर कुणी एखाद्या ऐतिहासिक/धार्मिक/संस्कार विषयावरील माझ्या मताबद्दल म्हणू लागला तर ते मला निश्चित क्लेशदायक होईल. >>> कैकदा अनुभवले आहे इथेच, जातीवाचक शिव्या सहित. तरीही पिंड सुटत नाही. तुमच्यासारखी समविचारी पाहून आनंद होतो. पण सगळे लिहिणारे तसेच नसतात, काही खरचं चर्चा करू पाहतात. पण इथे शिक्केवाटपही लवकर होतं हे ही खरे. Happy

त्यामुळेच मी इथल्या अ‍ॅडमिन यांची या बाबतीतील भूमिका प्रभावी ठरेल हा आशावाद व्यक्त केला होता. >>> इथली आचारसंहिता, तुम्ही काय लिहिता हे तुम्हालाही कळायला पाहिजे अशी ओपन आहे. प्रत्येक गोष्टीत लक्ष देणे खरेच होत नाही त्यांनापण. लिहिणार्‍याने किमान विचार करून लिहिने अपेक्षित असते. तसे होत नाही. मग विरोधी मत येतात. पण त्यात गोची काय होते की जो अशानां विरोध सारखा करू पाहतो, त्यालाही तो "ह्या बाजूचा पक्षपात करतो" असा शिक्का मात्र बसतो. मग तुम्ही प्रत्यक्ष जिवनात कितिही समतोल असा.

असो हे सर्व लिहिण्याचे कारण तुम्ही लिहित जा. अभ्यासू मत असेल अन ते विरोधी असेल तरी मग आवडतेच.

या घाशिरामातील ओळींमुळे ब्राम्हण मंडळी.च्या मनात लिहिणार्‍यांबद्दल जातीय /धार्मिक विद्वेष किंवा वैरभाव उत्पन्न होतो का? कसा होईल ?>>> बाजो या घाशीराम मधल्या ओळींमुळे नसेल कदाचित पण मायबोली व इतर वेबसाईट्सवरील काही पोस्टस मुळे अर्धवट वाचणार्‍यांचा व एकूणच 'आपल्या डोक्यातील समज खरा ठरवणारे लेखन लगेच पटण्याचा' (Confirmation Bias) जो प्रकार असतो त्यामुळे काही नवीन वाचकांमधे एखाद्या जातीविरूद्ध द्वेष निर्माण होऊ शकतो. इतर वेबसाईट्सवरील लेखांवरच्या प्रतिक्रिया वाचल्या तर ते सहज दिसते.

गेली काही वर्षे ब्राह्मणांविरूद्ध जितक्या घाऊक पद्धतीने व शिवराळ भाषेत इंटरनेटवर व पुस्तकांमधे लिहीले गेले आहे तितके इतर कोणाबद्दलही मी तरी वाचले नाही.

हिंदुत्त्ववाद्यांच्या लेखांतही मोहम्मद रफी, अबुल कलाम, झहीर खान, मौलाना आझाद, खान अब्दुल गफारखान हे लोकही वाईट होते असे कधीच येत नाही. अगदी 'सामना' तील लेखांतही नाही.

'ब्राह्मणांनी असे केले' सारखे शंभर एक उल्लेख मायबोलीवरही सहज सापडतील. तेथे तसे लिहीणार्‍या कोणीही आपण एखाद्या जातीतील सर्व लोकांचा तेथे घाउक द्वेषात्मक उल्लेख करतोय याचा विचार केलेला दिसत नाही.

उपहासगर्भ लिखाण आणि त्यातून ध्वनित होणारे अप्रत्यक्ष अर्थ.. अशी शैली असणा-या काही खास टोळ्या असतात. मग सेक्युलर, स्युडो सेक्युलर, आरक्षण असे कैक मुद्दे सुरूवातीला नेटवर मांडले जात होते. त्या वेळी यांच्याप्रमाणेच सगळे असतात असा समज इतरांचा झालेला असणे शक्य आहे. पण मी नेटवर संतुलित मतं मांडणारी जी मोजकी मंडळी आहेत त्यांनाच मानतो.

अवधूत खरमाळे हे एक नाव आहे. मायबोलीवर डी ज्ञानेश पाटील ( ज्ञानेश हा आयडी ) हे देखील असेच आहेत. गप्प राहणे वेगळं आणि संतुलित मत मांडणे वेगळं. गेली सहा वर्षे यांची मतं वाचत आलोय. ती मांडण्याची पद्धत अनुकरणीय आहे. त्यांच्यापुढे झुंडी देखील निष्प्रभ पडताना पाहील्या. मुळात त्यांच्या पोस्टमधे जय पराजय ही भावनाच दिसत नाही. जे लॉजिकल असेल ते स्विकारायचं.. बस्स

गेली काही वर्षे ब्राह्मणांविरूद्ध जितक्या घाऊक पद्धतीने व शिवराळ भाषेत इंटरनेटवर व पुस्तकांमधे लिहीले गेले आहे तितके इतर कोणाबद्दलही मी तरी वाचले नाही.
>> +१
आम्हाला लहानपणापासून शिकवले गेले की कुणाची "जात" काढायची नाही, तो गुन्हा आहे. कारण आम्ही सो कॉल्ड उच्चवर्णीय. परंतु आजकाल सर्वत्र "ब्राम्हण" या जातीविरुद्ध जी "घाऊक" आणि खोटारडी भाषा सर्रास वापरली जातेय, ती बघता मला तरी वाटायला लागलंय की गुन्हे दाखल करायचीच वेळ आलीय.
अगदी आज हा कायदा गुगल करेपर्यंत माझाही असा समज होता की हा कायदा फ्क्त उच्चवर्णीयाने इतर जातीला कमी लेखले तर त्या उच्चवर्णीयाविरुद्धच दाखल करता येतो. हे आजच कळलं की कुठल्याही जातीच्याने कुठल्याही जातीला शिव्या दिल्यास गुन्हा समजला जातो. हे वाचून काही वेळ विचारच करत बसले की इतरांना हे माहीत नव्हते का? जर होते तर त्याचा कधी कुणी उल्लेख का केला नसेल? दर आठवड्याला तर माबोवरच हा कायदा आठवावा असे प्रसंग येत असतात. का ब्राम्हणाला शिव्या देणे यात काहीही ऑफेन्सिव्ह कुणाला वाटतच नाही? किंवा वाटले तरी स्युडो-सेक्युलरिसम चे बळी आहेत?

असेही अनेक "ब्राम्हणच" लोक आहेत ज्यांना एखाद्या म्हणीत आलेली एखादी जात खटकते (जे बरोबर आहे) पण वेळोवेळी जे खोटारडे आरोप "ब्राम्हणां"विषयी होत असतात, त्याला त्यांचा विरोध नाही. ही स्युडो मान"सिक"ता मला तरी झेपत नाही. ब्राम्हणांच्या घोडचुका आहेत अन वेळोवेळी त्या कबुलही केल्या गेल्या आहेत. पण आंतर्जालावरील प्रत्येक काथाकुटावर प्रत्येक इतरजातीय व्यक्तीच्या समाधानासाठी/समधानापर्यंत प्रत्येक ब्राम्हणाने माफी मागणे जर अपेक्षित असेल, तर ते हास्यास्पद आहे.

हे गुन्हे सिद्ध होणे कठीण असेल कदाचित पण तरी मी जे मत मांडतेय ते कायद्याला धरुनच आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे. तसंही प्रॉपर्टीच्या/घटस्फोटाच्या इ. केसेस मध्ये हाच प्रॉब्लेम आहे. पण तरी कमीत कमी अपील करायची संधी आहे, हे कमी नाही.

बाजो, मी ते "इंडियन पीनल कोड्"चे चुकीचे भाषांतर केले होते. चुक दुरुस्त करतेय.

अगदी आज हा कायदा गुगल करेपर्यंत माझाही असा समज होता की हा कायदा फ्क्त उच्चवर्णीयाने इतर जातीला कमी लेखले तर त्या उच्चवर्णीयाविरुद्धच दाखल करता येतो.

'तो' हा कायदा नव्हे.. हा जनरल कायदा आहे, सर्वान्ना लागु आहे.. ' तो' स्पेशल अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट आहे.. तो याच्यापेक्षा कडक आहे आणि मागासवर्गिय लोकांच्या हिताचे रक्षण करणारा आहे.

आम्हाला लहानपणापासून शिकवले गेले की कुणाची "जात" काढायची नाही, तो गुन्हा आहे. कारण आम्ही सो कॉल्ड उच्चवर्णीय.

काय सांगताय! इथे उच्चवर्णीय लोक मुंजीवर धागा काढून ख्रिश्चनाना शिव्या देतात .. आणि पानिपताच्या धाग्यावर कुणीतरी म्हटलं की लढणारे लोक कमी होते आणि धार्मिक तीर्थयात्रा करणारे ब्राह्मण जास्त होते.. तर लगेच आय पी सी १५३.. !!!! Proud सगळा विनोदच !

आणि "लगेच" नव्हे बरं.. २-३ वर्षापासून आंतर्जालावरचे ब्राम्हणद्वेषी लेख्/टवाळक्या बघितल्यानंतर एक दिवस जेव्हा माझी सहनशक्ती संपली तेव्हा १५३सी चा शोध घेण्याचे कष्ट घेतलेत.
तो पानिपतावरचा प्रतिसाद म्हणजे निव्वळ योगायोग किंवा ट्रिगर!
पानीपतावर सैन्यापेक्षा यात्रेकरु जास्त होते हे मान्य नसायला काय झालं? पण त्यासोबत "पानिपताची हार म्हणजे ब्राम्हणांनी इतर समाजावर केलेला अन्याय" वगैरे फाटे फोडण्याआधी well established facts/संदर्भ द्यावेत एवढीच अपेक्षा होती/आहे. असल्यास मान्य करुच की. पण बकासुराने तिथून थेट कलटी मारलीय.
ब्राम्हणांनी केलेल्या अनेक चुका मान्य आहेतच.(हे प्रत्येक वेळी लिहिणार नाही यापुढे). पण प्रत्येक गोष्टीला त्याच चष्माने बघणे हे कुठले लॉजिक??

Pages