मुळ्याचे पराठे..

Submitted by सुलेखा on 13 February, 2012 - 00:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मोठे मुळे किसलेले..
[साधारण २ वाट्या किस भरेल..]
३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या..
१ इंच आले किसलेले..
मीठ चवीनुसार..
१ चमचा धनेपुड..
फोडणी साठी----
२ चमचे तेल,१/२ चमचा जिरे,बडीशोप १/२चमचा,हळद पाव चमचा..
२ वाट्या कणीक १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट,१ चमचा तेल,मीठ,१/२ चमचा ओवा घालुन भिजवुन घेणे..
पराठे तळायला तेल/तूप्/बटर काहीही चालेल..
बुंदी रायत्यासाठी---
घट्ट दही २ वाटी ..व २वाटी पाणी घालुन मिक्स करुन घ्यावे..
एक वाटी बुंदी..[खारी किंवा अर्धी खारी व अर्धी तिखट अशी घेतली तरी चालेल.ही बुंदी एक वाटी कोंबट पाण्यात भिजवुन ठेवावी]
रायत्याच्या फोडणीसाठी--
तेल २ चमचे,जिरे अर्धा चमचा,हिंग पाव चमचा,मीठ पाव चमचा,तिखट अर्धा चमचा,मिरे पुड्-जाडसर अर्धा चमचा,कोथिंबीर १ चमचा चिरलेली..

क्रमवार पाककृती: 

मुळ्याचे सारण--
कढईत तेलाची फोडणी करुन त्यात जिरे तडतडले कि गॅस बंद करावा .लगेच बडीशोप,हळद ,हिरव्या मिरच्या घालुन एकदा परतावे.मुळ्याचा किस,धनेपुड ,किसलेले आले घालुन पुन्हा परतावे..आता मंद गॅसवर कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी ..मीठ घालावे पुन्हा परतुन किसातील पाणी आळेपर्यंत गॅसवर ठेवावे.
[मावे त करायचे असेल तर मावे च्या भांड्यात किस ठेवुन त्यावर तयार फोडणी --गॅसवर केलेली--ओतावी .धनेपुड घालुन मिक्स करावे व भांड्यावर झाकण ठेवुन मावेत २मिनिटे ठेवावा..पुन्हा परतावे मीठ घालावे आता झाकण न ठेवता पुन्हा १ मिनिट ठेवावे..किसातले पाणी आळले असेल्..मिश्रण थंड करायला ठेवावे..]
बुंदी रायते--
दह्यात पाणी घालुन घुसळुन घ्यावे.. त्यात भिजवलेली बुंदी ,मीठ घालुन चमच्याने ढवळुन घ्यावे..
तेलाची फोडणी करावी. जीरे घातले कि गॅस बंद करावा त्यात हिंग्,हळद घालावे आता बुंदी रायते ठेवलेल्या भांड्यात तिखट एकाच जागी घालावे व त्यावर ही तयार गरम फोडणी ओतावी.असे केल्याने तिखटाचा लाल तवंग रायत्यावर येतो..चमच्याने एकदाच हळुवार ढवळावे भरडलेली मिरेपुड व कोथिंबीर घालावी..रायते तयार आहे..
पराठे..
कणकेचा पोळीएवढा गोळा घेवुन त्यात मुळ्याचे सारण भरुन पिठीवर लाटावा व तव्यावर छान भाजुन घ्यावा..
हे पराठे तेला-बटर शिवाय /कोरडेच भाजुन घ्यावे व आयत्या वेळेला तव्यावर तेल/बटर सोडुन गरमागरम वाढता येतात..
गरम पराठे बुंदी रायत्याबरोबर छान लागतात..

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणापुरते पोटभरीचे होतात..
अधिक टिपा: 

भोपाळला असताना आजुबाजुला पंजाबी,सरदार मिलीटरी व व्यावसायीक लोकांच्या कॉलनीत रहात होते..त्यांच्याकडे सकाळी असे वेगवेगळे भरवा पराठे[मेथी,पालक्,मुळा,पनीर्,मटर यांचे कॉम्बीनेशन्चे]व रायता हा सकाळचा भरपेट नाश्ता करायचे.. दह्यात काकडी किसुन/पुदीना चिरुन त्यात मीठ,जिरे-मिरेपुड घालुन रायते करायचे ..

माहितीचा स्रोत: 
माझे शेजारी..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खुप दिवसांपासुन मुळ्याच्या पराठ्यांची कृती हवी होती, धन्स सुलेखा दी... Happy

छान आहे रेसिपी. धणे-बडिशेप घालून पहाणार.
मी मुळ्याचे पाणी पिळून काढते आणि ते पीठ मळायला वापरते. नाहीतर मग मुळा परतताना थोडे मुगाच्या डाळीचे पीठ घालते. पाणी आटवत बसावे लागू नये म्हणून. मुळ्याला फार पाणी सुटते.

सायो,मी या आधी मुळा किसुन त्यात मावेल तितकी कणीक्,थोडेसे बेसन घालुन पराठे करत असे.पण मग शेजारणीने केलेल्या पध्दतीचे आवडले ती म्हणायची कच्ची मुली "बाद्दी"करती है जी..[वातुळ्]डकार आती है सारे दिन.त्या ५-६ पंजाबी-सरदार कुटुंबांमुळे त्यांच्या-आपल्या पदार्थांच्या पद्धतींची देवाण्-घेवाण झाली.तु लिहीलेली कृति ही छान आहे आवडली.

आजच हे सारण करून ठेवलंय , संध्याकाळी पराठे करेन . सारण सॉलिड चविष्ट आहे , मुळ्याची चव अजिबात जाणवत नाहीये , हे माझ्यासाठी फार महत्वाचे आहे Proud

स्वाती,तुम्हाला आवडले त्याबद्दल धन्यवाद.असेच माइनमुळ्याचेही छान लागतात्.फक्त लहान लहान असल्याने किसत बसावे लागते.फु.प्रो असेल तर मेहनत कमी..उसगावात माइनमुळे फारमर्स मार्केट ला हमखास मिळतात..

सुलेखा काकू , परवा मुळ्याचे पराठे केले आणि सारण उरल्याने काल पुन्हा एकदा केले , सॉलिड यम्मी झाले होते Happy . मुलीने सुद्धा पुन्हा पुन्हा मागून खाल्ले Happy . खूप खूप धन्यवाद Happy .

कालच केले मी हे पराठे. मस्त जमले. मी कणकेत ओवा घालायला विसरले. बडीशोपेचा स्वाद खूप आवडला.
रेसिपी बद्दल धन्यवाद. तुमच्या रेसिपीज फार छान असतात.

आज हे पराठे करून बघितले. सारणाची भाजी पहिल्यांदा इतकी कोरडी झाली नव्हती,त्यामुळे सारण कव्हरच्या बाहेर येऊन लाटण्याला चिकटत होतं. मग परत मी भाजी बर्‍यापैकी परतून कोरडी केली. तेव्हा मग नीट लाटता आले. पण सर्वांना खूप आवडले. मुळ्याचा 'तो' वास अजिबात येत नव्हता.
धन्स गं इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल.

खूप छान झाले होते हे पराठे. कोणाला चक्क ओळखताही आले नाहीत की मुळ्याचे आहेत . Thank you very much Sulekha for this recipe.

कधीपास्न ठरवलं होतं करेन शेवटी मुहुर्त लागला. मस्त लागतात. आधी धांदरटपणे रेस्पि वाचल्यामुळे सारण थंड करायचं लक्षात नव्हतं. मग पटकन भांडं बाहेर थंडीत ठेऊन वेटींग टाइम कमी केला Proud
माझे पराठे नॉर्मली फुटून सारण बाहेर येतं तसंच ़ झालं, म्हणून पुर्ण पोळी लाटून अर्ध्यात सारण घालून दुमडून थोडंसं हळूवार लाटलं. सोबतीला दही आणि लोण्चं. यमी यमी.

आभार्स Happy