कंबोडियातील 'बान्ते सराई' - एक अपुर्व शिल्पकृती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे. जे कोरीवकाम फक्त लाकडावरचं केले जाते किंवा सोनार ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार घडवतो तशा स्वरुपाचे शिल्पकाम ह्या मंदीरावर झाले आहे. मंदिराचा एक अन् एक दगड उरत नाही ज्यावर कोरीवकाम आढळत नाही. बघुया 'बान्ते सराई'ची काही चायाचित्रे आणि वाचुया त्यावरची थोडीशी माहिती:

१) रावणाचे एक नाव विराट असेही आहे हे मला कंबोडियात कळते. विराट सितेचे हरण करतो आहे.. तिला पळवून नेतो आहे हा प्रसंग ह्या शिल्पकामात चितारलेला आहे. बाजूला विष्णुचे वाहन गरुड दाखवले आहेत. (पण माझ्यामते विष्णुचे वाहन शेषनाग ना? मला तिथे जी माहिती मिळाली ती गरुड विष्णुचे वाहन अशी होती.)
227275_1957254821678_1551964083_2070770_7540376_n.jpg

२) हा प्रसंग महाभारतातला आहे. कृष्ण आणि अर्जुन. पण हा प्रसंग गीता सांगण्याचा नाही की कुरुक्षेत्रावरील रणभुमीतील कौरवा-पांडवा ह्यांच्यामधील युद्धाचाही नाही.
226995_1957226780977_1551964083_2070655_2223471_n.jpg

३) इथे बघा शिवशकंर उमेसोबत कैलास पर्वतावर बसलेले आहे. वानरांनी रावणाला कैलास पर्वतावर जाऊ दिले नाही म्हणून रावणानी कैलास पर्वताला उचलून धरलेले आहे. शिवा एक अलगद धक्का देऊन कैलास पर्वत रावणाच्या अंगावर पाडतो. शिवाच्या शक्तीची प्रचिती आल्यानंतर रावण १००० वर्ष शिवाची आराधना करतो. नंतर तांडवनृत्य रचतो. बघा ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत. आपल्याला लहानपणी सांगितलेल्या आणि आपण वाचलेल्या पुराणकथांची इथे कित्ती कित्ती गरज भासते हे मला तिथे गेल्यानंतर कळले.
227198_1957207980507_1551964083_2070610_5582981_n.jpg

४) मंदिराच्या समोर बसलेला हा नंदी काळाच्या ओघात मोडून गेला आहे..!
227312_1957206860479_1551964083_2070606_5863003_n.jpg

५) रावणानी कैलाश पर्वत उचलला आहे...
227325_1957208620523_1551964083_2070612_4566850_n.jpg

६) मंदिराच्या चारी भिंतिवर सुंदर अप्सरा चितारलेल्या आहेत. बघा अधेमधे दगडांमधली रेघ दिसते आहे . हे दगड एकावर एक रचत नेत नेत मंदिर उभारले गेले आहेत. सिमेंट नाही.. खिळे नाहीत! आपण चित्र/ठोकळे जुळवण्याचा जिगसॉचा जसा खेळ खेळतो तसेच काहीसे हे काम वाटते.
228186_1957174219663_1551964083_2070565_1678028_n.jpg

७) ह्या शिल्पकृतीत इंद्र त्याचे वाहन त्रिमुखी हत्ती ऐरावतावर आरुढ झालेला आहे.

228265_1957231821103_1551964083_2070676_6393123_n.jpg

८) इथे पुर्वी शिवलिंग होते. इथल्या मुर्तींची बर्‍याच प्रमाणात चोरी झालेली आहे.
228292_1957205060434_1551964083_2070600_7443130_n.jpg

९) ह्या शिल्पावर देवता लक्ष्मी दाखवली आहे. बाजूला दोन हत्ती तिच्या गळ्यात फुलांचे हार घालत आहेत. आपल्याकडे दिवाळीच्या दिवसात बाजारात जे पोष्टर्स विकायला येतात. त्यात एक पोष्टर असेच असते ज्यात धनदेवतेला हत्ती हार घालत आहे. 229130_1957206220463_1551964083_2070604_3006832_n.jpg

१०) मी वर कृष्ण आणि अर्जुनाचे एक शिल्पचित्र दिले आहे. पुर्ण प्रसंग खूपच रसभरीत आहे तो असा: अर ऐरावतावर आरुढ इंद्र आहे. इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. अग्निला स्वतःची शक्ती परत मिळवायची असते म्हाणून ती खांडव वनाला आग लावू पहाते पण इंद्र मात्र दरवेळी पाऊस पाडून ती अग्नि विझवून टाकतो. कारण खांडव वनात इंद्राचा मित्र नाग तक्षक राहत असतो. म्हनून अन्गि कृष्ण आणि अर्जुनाची मदत घेतो. बाणाच्या सहाय्यानी अर्जुन पाऊस अडवतो. खांडववनाला आग लागून नाग तक्षक आणि त्याचे इतर मित्र लगेच खांडव वन सोडून पळून जातात. (प्रश्न पडतो मग लाक्षग्रहाला जेंव्हा आग लागते तेंव्हा खांडव वन त्यात नष्ट होते. ती कथा नि ही कथा दोन्ही वेगळ्या.)

229545_1957231141086_1551964083_2070672_4070504_n.jpg

१०) कृष्ण क्रुर कंसाचा वध करतो आहे...
230355_1957236101210_1551964083_2070692_6432338_n.jpg

११) हे चित्र राजवाड्यातील आहे. इथे कृष्ण क्रुर कसांचा वध करतो आहे.
230470_1957235261189_1551964083_2070689_4957118_n.jpg

१२) हा मंदिराचा काही भाग. डाव्या नि उजव्या बाजुला यक्ष हे द्वारपाल आहेत. तसेच वानेर, सिंह, गरुड हेही काही ठिकाणी द्वारपाल म्हणून दाखवले आहेत.
230680_1957248901530_8158129_n.jpg

१३) हा प्रसंग किशकिंधमधील वालि आणि सुग्रीव ह्यांच्या लढाईतील आहे. वालि सुग्रीवाचे राज्य लुटतो आणि त्याची पत्नी तारा बळकावतो. सुग्रीव श्रीरामाची मदत मागतो. खालि बघा वालि नि सुग्रीव ह्यांचे युद्ध सुरु आहे. बाजूला राम धनुष्य घेऊन बाण सोडतो आहे. श्रीरामाच्या बाजूला लक्ष्मण आहे. दुसर्‍या बाजुला सुग्रीवाची बायको तारा भयभीत झालेली दिसते आहे. दगडांमधील रेघा पण स्पष्ट दिसत आहेत.
230860_1957252901630_1551964083_2070762_8323064_n.jpg

१४) ही आणखी एक अप्सरा:
246695_1957238301265_1551964083_2070702_4563360_n.jpg

१४) इथे मयुरावर आरुढ कुबेर आहे (पण कुबेराचे डोके मात्र चोरीला गेलेले आहे).
246820_1957255101685_1551964083_2070772_7812777_n.jpg

१५) काळाच्या ओघात मंदिरे कसेबसे असे टिकून आहे. सबंध मंदिर जंगलानी वेढलेले आहे. जेंव्हा सापडले तेंव्हा मंदिराच्या अंगावर झुडपे झाडे वेली सगळे काही होते. बहुतेक त्यांनीच मंदिराचे जतन केले असावे.
246877_1957178139761_1551964083_2070575_4423338_n.jpg

१६) जवळून घेतलेले एक छायाचित्र. बहुतेक प्रत्येक शिल्पकृतीत झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी, माणसे, अलंकार दाखवलेले आहेत.
246975_1957225020933_1551964083_2070649_4246491_n.jpg

१७) इथे अगदी ठळकपणे दिसत आहे की कृष्णानी कंसाचा शेवटी वध केला..(लहानपणी वाईटांचे असे वध वगैरे झाले की फार मजा यायची महाभारत रामायण ऐकताना नि बघताना.)
247175_1957237101235_1551964083_2070696_7850119_n.jpg

१८) इंद्र आणि ऐरावताचा जवळून घेतलेला फोटू:
247294_1957176819728_1551964083_2070572_1318026_n.jpg

१९) वालि-सुग्रीव युद्ध..
248485_1957254101660_1551964083_2070766_3410191_n.jpg

२०) कुबेर ... मयुर त्याचे वाहन...
248495_1957239341291_1551964083_2070707_7429042_n.jpg

२१) नंदीवर बसलेले आहेत शिव आणि पार्वती. पण कंबोडियामधे पार्वतीला उमा हेच नाव आहे.
248832_1957177659749_1551964083_2070574_1476178_n.jpg

२२) इथे बघा कोण कोण द्वारपाल आहेत. सिंह, वानेर आणि यक्ष हे द्वारपालाचे काम करत आहेत.
248873_1957207420493_1551964083_2070608_8303432_n.jpg

२३) जमा झालेले पर्यटक..
248896_1957175619698_1551964083_2070569_163862_n.jpg

२४) मंदिर आणि द्वारपाल..
250005_1957233981157_1551964083_2070683_5250410_n.jpg

जर हे चित्र आवडले असतील तर मग 'बान्ते सराईवरची' ही सात भागांची सर्वाधिक छान चित्रफित बघा: http://www.youtube.com/watch?v=Cb99mpJytsw&feature=related

विष्णु हा शेषनागावर क्षीरसागरात झोपतो पण विनितेचा मुलगा गरुड (धाकटा अरुण हा सुर्याचे वाहन)
हा विष्णुपुराणाप्रमाणे विष्णुचे वाहन आहे.
आपल्या आई विनिताला कद्रु या सवतीच्या (जिची मुले शेष, वासुकी) ताब्यातुन सोडवताना गरुड देवांकडुन अम्रुत आणतो. यावेळी अडवणार्या विष्णुला तो त्याचे वाहन बनण्याचे वचन देतो असे काहिसे आहे.

विष्णु हा शेषनागावर क्षीरसागरात झोपतो पण विनितेचा मुलगा गरुड हा विष्णुपुराणाप्रमाणे विष्णुचे वाहन आहे. >> हेच लिहायला आले होते. Happy

आपल्या आई विनिताला कद्रु या सवतीच्या (जिची मुले शेष, वासुकी) ताब्यातुन सोडवताना गरुड देवांकडुन अम्रुत आणतो. यावेळी अडवणार्या विष्णुला तो त्याचे वाहन बनण्याचे वचन देतो असे काहिसे आहे. >> नविन माहिती मिळाली. धन्स. Happy

मग विष्णुचा शेष नाग तो हाच का?

बी खुपच मस्त प्रची व माहिती.

निलिमा आणि मोनालि,

तुमच्यामुळे मला योग्य ती माहिती मिळाली. धन्यवाद.

धन्स बी. खरे तर निलिमा ने अगदी डिटेल्मधे लिहीलेय.

माझ्या मुलाच्या दशावताराच्या सीडी मधे अगदी सुरुवातीला म्हणजे पहिल्याच अवताराच्या (मत्यावताराच्याही) आधीच विष्णु गरुडावर बसुन पृथ्वीवर येउन सर्व प्राणीमात्र व जीव सृष्टी (सँपल्स) गोळा करायची सुचना देतो. मग स्वतः मत्स्यावतार घेउन ती नौका प्रलयातही पार लावतो असे दाखवले आहे.

निलिमा - विनिताला कद्रु या सवतीच्या (जिची मुले शेष, वासुकी) ताब्यातुन सोडवताना गरुड देवांकडुन अम्रुत आणतो. यावेळी अडवणार्या विष्णुला तो त्याचे वाहन बनण्याचे वचन देतो असे >>> हा नक्की कोणता काळ मग? विष्णुचे अवतार सुरु व्हायच्याही आधी हे झालेले का?

आणि मग हेच शेष व वासुकी नंतर मदत करतात ना.

शेष नाग विष्णुचे आसन व वासुकीनेच समुद्र मंथनात मदत केलेली ना कुर्मावतारात? मग विनिता व कद्रु शत्रु का? व त्या कोणाच्या पत्नी होत्या? (सवती असे म्हटले आहे वर म्हणुन विचारते)

सुरेख फोटो आणि माहीती 'बी' !

बहुदा ते दुसरे चित्र (कृष्णार्जुनाचे) हे खांडववनदाहनाच्या वेळचे असावे.
तुम्ही 'अंगकोर वाट' ला भेट दिलीय का? असेल तर तिथलेही फोटो टाका ना?

मग विनिता व कद्रु शत्रु का? व त्या कोणाच्या पत्नी होत्या? (सवती असे म्हटले आहे वर म्हणुन विचारते)>>>>

@मोनालीप...

कुठल्यातरी घोड्याचा रंग ओळखण्यावरुन विनीता आणि कद्रु यांच्यामध्ये एक पैज लागली होती. जी हरेल ती दुसरीची दासी बनणार अशी ती पैज होती. विनीतेचे म्हणणे होते की घोडा पांढर्‍या रंगाचा आहे, तसा तो होताही. पण कद्रुने डोके चालवले, तिने आपल्या काळ्या रंगाच्या सर्पपुत्रांनी त्या घोड्याला गुंडाळून टाकले आणि घोडा काळ्या रंगाचा आहे असे सिद्ध केले. त्यामुळे विनितेला कद्रुचे दासीपण स्विकारावे लागले. नंतर गरुडाने देवांशी युद्ध करुन नागांना अमृत आणुन दिले आणि त्याबदल्यात आईची म्हणजे विनितेची दास्यत्वातून मुक्तता केली अशी कथा आहे. याच युद्धा दरम्यान आडव्या आलेल्या विष्णुला आपल्या आईची मुक्तता करण्यासाठी अमृत हवे आहे हे सांगून त्याबदल्यात जन्मभर त्याचे वाहन म्हणून राहण्याचे वचन दिले. अशी कथा आहे पुराणात.

गंमत म्हणजे या दोघीही सख्ख्या बहिणी आणि कश्यप ऋषींच्या पत्नी. या दोघींसह दक्ष प्रजापतीने आपल्या एकुण १३ कन्यांचा कश्यप ऋषींशी विवाह लावून दिला होता. अदिति, दिति, कद्रु, दनु, अरिष्टा, सुरसा, सुरभी, विनीता, ताम्रा, क्रोधवसा, इडा, खसा आणि मुनी अशा त्या १३ भगिनी.
यापैकी देव हे अदितीचे पुत्र...
राक्षस/दानव हे दिती आणि दनुचे पुत्र...
गरुड आणि अरुण हे विनीतेचे (विनतेचे ?) पुत्र...
आणि नाग, सर्प हे कद्रुचे पुत्र मानले जातात. Happy
मानव ?

'बी' बहुदा ते दुसरे चित्र (कृष्णार्जुनाचे) हे खांडववनदाहनाच्या वेळचे असावे.>> कशावरुन असे वाटले तुला? कारण तिथे वन जळते आहे असे कुठेच दिसत नाही. कदाचित तुमचे बरोबरही असेल. तू तुझे निरिक्षण सांग.

अंगकोर वाटचे फोटो टाकायचे आहेत. नक्की टाकेन.

एक अंदाज..
म्हणजे बघ ना, मागे झाडी आहे. चित्रात दिसणारे पशु बघ. त्यांचे चेहरे सिंहांचे चेहरे रथाकडे आहेत, तर हरणे बावरल्यासारखी दिसताहेत. त्यावरुन मी हा अंदाज बांधला. कदाचित चुकीचाही असु शकेल.
अंगकोर वाटचे फोटो नक्की टाक.

मी ख्मेर साम्राज्याच्या "वॉटर मॅनेजमेंट सिस्टम' बद्दल ही खुप ऐकले आहे. ती जगातली एक आदर्श पद्धती होती असे मानले जाते. त्याबद्दल काही माहिती देवु शकशील का?

मी ख्मेर साम्राज्याच्या "वॉटर मॅनेजमेंट सिस्टम' बद्दल ही खुप ऐकले आहे. ती जगातली एक आदर्श पद्धती होती असे मानले जाते. त्याबद्दल काही माहिती देवु शकशील का?
>> विशाल, तू खूपच छान प्रश्न विचारलास. मी नक्की जेंव्हा इथे चित्र टाकेन तेंव्हा तुला विपु करुन सांगेन आणि तू विचारलेली माहिती सचित्र देईन.

मस्त फोटो, आणि वर्णन पण! बी, खरंच फक्त तुझ्यामुळेच ही शिल्पकला पाहायला मिळाली. किती सुंदर कला आहे. कितीही वेळा पाहीले तरी समाघान होत नाही. खुप खुप धन्यवाद!

बी ने छान फोटो टाकले आहेत. मी पण हे सर्व बघून आले. कंबोडियात मंदिरे बघताना फार चालावे लागते व जिने चढ उतर करावी लागते. त्यामुळे हे बांते श्राई मंदिर मला खूप आव्डले छोटेखानी व छान आहे. अंकोर वट मंदिर महा प्रचंड आहे व सर्व शिल्पांची पॅनेल बघून समजून घ्यायला तीन चार तास ला गतात. ही बाहेरची लेव्हल आहे. व मग आत पुढे मंदीर आहे. मी सर्वात शेव टच्या लेव्हलच्या खाली परेन्त गेले. वर जायचा मार्ग बंद होता त्या दिवशी. पण अप्रतिम आहे. कंबोडियात लै भले मोठे नारळ शाहाळी मिळतात दमल्यास ते पाणी जरूर प्यावे व व्यवस्थित ब्रेक्स घ्यावेत. विक्रेते व गाइड खूप हॅरेस करू शकतात. ता प्रोम मंदिर लै भारी आहे. त्यात झाडे उगवली आहेत.
सर्व लोक त्यात जावे फोटो घेतात. मेनली चायनीज झुंडी!!!. शांतता हरवून जाते. सर्व मंदिरात सेल्फी स्टिकने सेल्फी घेणारे पब्लिक खूप दिसते.
बांते साम्रे, चिओ साइ तेवडा ह्यांचे मी लक्षात राहाण्यासाठी बंटी साम्रे व चिउताई सेवडा असे नामकरण केले. बांते साम्रे मंदिर ही खूप मोठे आहे. मागच्या दारातून निघून एलिफंट टेरेस नावाच्या भागात जाता येते. तिथे पण शिल्पे मस्त आहेत. इथे खूपच वर खाली चालावे लागते व वाटेत मोठ्या मुंग्या आहेत. कंबोडियात सुरेख व भरगच्च जंगले स्वच्च्छ रस्ते व एकंदर सुकून वातावरण आहे. चांगले थाइ जेवण मिळते. एकंदरीत दिवस भर मंदीरे बघणे गाइडचे ऐकणे मग रूम वर येउन शावर घेउन नाइट मार्केट, रिव्हर मार्केटच्या चक्करा मारणे, फूट मसाज घेणे इत्यादि करता येते. नाइट मार्केट मध्ये भारतीय जेवण मिळते तसेच थाई, इटालिअन, अमेरिकन( के एफ सी ) उपलब्ध आहे.
किडे खायला लागत नाहीत. चांगल्या बेकर्‍या आहेत. ता प्रोमला जाताना पहिल्यांदा भर पावसात भिजलो. मजा आली.

तिथे लँड माइन व्हिक्टिम्स एका जागी संगीत वाजवत बसतात ते काही दिवसांनी असह्य होते. तोनले साप तळे व वसाहत, वॉर म्युझीअम ह्या जागा बघून तिथे झालेल्या युद्धाची व हत्याकांडांची मन विषण्ण करून टाकणारी माहिती मिळ ते व हे निरप राध विक्टिम बघून आपण काय मदत करू शकतो असे दु:ख होते. भूत काळाशी फारसे कने क्ट नसणारी तरूण उत्साही रस रशीत अमेरिकन मुलेमुली, चिनी तरूण तरूणी ह्यांच्यासाठी अंकोर विजिट हे एक साहस आहे. ते फिट असल्याने सर्वत्र उत्साहाने फिरत असलेले दिसतात. एका मुलाक डे सामानात घेतलेली व्हिएत नामी शेतकर्‍याची त्रिकोणी बांबूची टोपी बघून काय वाटले ते सांगता येत नाही. तिथे सर्वत्र अमेरिकन डॉलरच चालतो व फूट मसाज घेतल्यास एक डॉलर टिप देणे अपेक्षित असते. ते ही नोट कॉइन घेत नाहीत व कुठेच लोकल करन्सी घेत नाहीत.
बारकी शेंब्डी मुले पण तू फॉ व दॉला करत मागे मागे येतात स्टिकर विकायला. इतक्या रौद्र गंभीर मंदिरांच्या पायाशी ही जगायची धड्पड पाहून जीव कासावीस होतो व आपणही ह्या मशीन चा एक भागच आहोत हे लक्षात येते.

अरेच्च्या, हा धागा नजरेतुन सुटला होता वाटते... Sad असेल, तेव्हा २०१२ मध्ये बॅन होता नेटवर काही काळ. असो.
ही माहिती फोटोसहित इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रतिक्रियांसहित निवांत वाचुन काढेन. Happy

Pages