ईडन गार्डन, ऑकलंड

Submitted by दिनेश. on 10 February, 2012 - 14:24

ऑकलंड शहरातच एका टेकडीवर ईडन गार्डन ही बाग निर्माण केली आहे. इथे आधी दगडाची खाण होती. ती बंद पडल्यावर एका खाजगी संस्थेमार्फत ईथे उद्यान विकसित केले गेले आहे.

तिकिटाच्या ऐवजी आपल्याला बागेचा नकाशाच मिळतो. तिथे ऋतूमानानुसार वेगवेगळी फुले फुलतात. सध्या लिटिल किसेस नावाची देखणी फुले आहेत (जानेवारी २०१२ ) तिथे ट्यूलिप्स पण भरभरुन फुलतात (साधारणपणे संप्टेंबर मधे)

बागात व्यवस्थित आखलेल्या वाटा आहेत. आपण त्या मार्गे डोंगरावर जाऊ शकतो. चढ जरा तीव्र आहे.
पण तशा सूचना तिथे आहेतच. (तब्येत ठिक आहे ना ? पायात बूट आहेत ना ? वगैरे. तिथे अनवाणी चालण्याची फॅशन आहे. मी पण तिथे तसाच भटकायचो,)
वाटेत अनेक ठिकाणी विश्रामाच्या जागा आहेत. त्यांची योजना एवढी चपखल जागी आहेकि तिथून हलावेसेच वाटत नाही. वरती पोहोचल्यावर शहराच्या एका भागाचे विहंगम दृष्य दिसते.

तिथे मला एक ८ फूट वाढलेला तेरडा दिसला. फुले आपल्या तेरड्यासारखीच होती.

त्यांचा राष्ट्रीय वृक्ष पोहोतुकावा, त्यालाच ते क्रिसमस फ्लॉवर असेही म्हणतात कारण त्या सुमारास त्याला लाल फुलांचा बहर येतो. त्या दिवसात सगळीकडे तोच दिसतो. सध्या अर्थातच त्याचा बहर ओसरलाय.

बागेतच एक छोटेसे हॉटेल आणि स्वच्छतागृह आहे. दोन्हीही उत्तम आहेत.

इथे मी मोजकेच फोटो देतोय, फेसबुकवर बरेच टाकलेत. अवश्य बघा

http://www.facebook.com/media/set/?set=a.10150593360983470.409713.703983...

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8. पोहोतुकावा

9.

10. तेरडा

11.

12.

13.

14.

15.

16.

17.

18.

19.

20.

21.

22.

23.

24.

25.

26.

27.

28.

29.

30.

31.

32.

33.

34. गेटच्या बाहेर डोके काढून टाटा करणारी हि फुले, परत कधी येणार,,, असेच विचारत होती.

गुलमोहर: 

व्वा दिनेशदा...
फारच सुंदर आहे ही बाग...
आधी ईथे दगडांची खाण होती ह्यावर विश्वासच बसत नाहिये...

वा काय सुंदर फुले व घनदाट वृक्षराजी........... बाग असावी तर अशी......
मनापासून धन्यवाद दिनेशदा.......

दगडांच्या खाणीचं सोनं केलंय, केवळ कल्पकतेने !
दिनेशदा, तुम्हाला सलाम करून करून हात खिळखिळे व्हायची वेळ आलीय !! खाणीतला खजिना उघडून दाखवल्याबद्दल धन्यवाद.

धन्य ती फुले आणि धन्य दर्शनकरविता!

फुले तर सुंदरच आहेत. त्यामुळे आवडणारच. मात्र तुम्ही अगदी स्वर्गातून फेरफटका मारून येत आहात असेच वाटते आहे. तुमचे बहारीचे दिवस असेच निरंतर सुरू राहावेत हीच शुभेच्छा! त्यामुळेच तर आम्हालाही ही बहार दर्शनीय होते आहे. त्याखातर हार्दिक धन्यवाद!

धन्य ती फुले आणि धन्य दर्शनकरविता!

फुले तर सुंदरच आहेत. त्यामुळे आवडणारच. मात्र तुम्ही अगदी स्वर्गातून फेरफटका मारून येत आहात असेच वाटते आहे. तुमचे बहारीचे दिवस असेच निरंतर सुरू राहावेत हीच शुभेच्छा! त्यामुळेच तर आम्हालाही ही बहार दर्शनीय होते आहे. त्याखातर हार्दिक धन्यवाद!
>>>> नरेंद्र गोळे + १

दिनेशदा, तुमचा कॅमेरा कुठला आहे?

दोस्तानो, हि तर सुरवात आहे. आणखी खजिना पुढेच आहे.
तिथे असताना मला एक बाब खास जाणवायची कि, बागेतील कमचारी आपल्या क्षेत्रावर मनापासून प्रेम करणारे असत. त्यामूळे बागेची निगा अत्यंत योग्य तर्‍हेने राखली जाते. शिवाय भेट देण्यार्‍या लोकातही शिस्त असतेच. कचरा कुठेही नसतो.

अतुल, माझा कॅमेरा साधा पॅनासॉनिकचा आहे (मॉडेल मग सांगतो.)
फेसबुकवरचे पण अवश्य बघा.

खूपच छान आहेत फोटो, मला दुसर्‍या व ६व्या फुलाचा रंग खूपच आवडला. प्रचि २३ मधली फुलं म्हणजे घोळक्याने गप्पा मारणारी फुलपाखरं वाटली Happy

साडेबारा वाजले आहेत आणि उन्हातूनच घरी आलो आहे, शिवाय ज्या कामासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो ते झाले नसल्याचा वैताग (अधिक कोल्हापुरी बेताल ट्रॅफिक सहन करणे) आलाच होता. त्यासंदर्भात अहवाल करण्यासाठी नेट सुरू केले आणि त्यासोबत हा फोरमही. समोर 'ईडन गार्डन्स' मधील गार्डन या शब्दाने जाणले की इथे सुरेख गारवा लाभणार...

....आणि झालीच ती जादू. वारंवार निसर्गाच्या या रमणीयतेकडे पाहून समाधान न झाल्याने त्यावर उपाय म्हणून परत एकदा सर्व प्रकाशचित्रे आणि ती जणू काही माझ्याकडेच पाहून हसणारी डोलणारी प्रसन्न फुले पाहिली. उन्हाचा तडाखा आणि न झालेले काम पार विसरून गेलो. इतके छान वाटते आहे की त्या अहवालातील माझी भाषाही आता अशी फुलासारखीच सौम्य होत जाईल यात संदेह नाही.

"हि फुले, परत कधी येणार,,, असेच विचारत होती." ~ सो पोएटीक !

धन्यवाद दिनेश.

[काहीसे अवांतर : क्रमांक ३३ चा फोटो जणू काही आमच्या पन्हाळ्याच्या 'तबकबागे'तीलच आहे की काय असा भास झाला. खूप साम्य आहे ऑकलंड फोटोत आणि तबकबाग मध्ये. अगदी ती दोन बाकेही तशीच आहेत.]

अशोक, अगदी..
इथे नोकरी मिळाली असती तर तिथेच थांबलो असतो. आपल्याकडची पण एखादी पडीक जागा अशी सुंदर करता आली पाहिजे. आणि राखता आली पाहीजे.

आता फेसबुक वरची लिंक पण टाकलीय. तिथे आणखी ५० फोटो आहेत.

दिनेशदा.. अव्वल फोटोज.. आत्ताच केरळला एका फ्लॉवर गार्डनमध्ये विविध फुले पाहिली.. तिथे फिरताना तुमची आठवण झालीच.. झब्बू देईन लवकरच.. Happy

यो, तिकडे काय फुले बघायला गेला होतास कि काय ? >> काय खेचताय बिचार्याची दिनेशदा Biggrin
Wink

अतुल, माझा कॅमेरा साधा पॅनासॉनिकचा आहे (मॉडेल मग सांगतो.) >> पण त्याच्या पाठचे हात आणि डोळे स्पेशल आहेत Happy

दिनेशदा - सर्व प्रचि अप्रतिमच्याही वरती आहेत, निसर्गाची तर कमाल आहेच पण असे गार्डन बनवणार्यांचीही आणि तुमच्या फोटोग्राफीचीही कमाल आहे एवढी सुंदर फुले काय शब्दच सुचत नाही खरच __/\__ Happy

मस्तच Happy

सुंदर, अप्रतिम या शब्दांच्या सुपर सुपर लेटीव्ह डिग्रीज ज्या काय असतील त्या सुद्धा फिक्या पडतील असे फोटोज आहेत.
भाऊ नमसकरांना १०००० टक्के अनुमोदन!!
स्वर्गाची झलक आम्ही अनुभवत आहोत असं मला वाटतंय.

Pages