ओल्या हळदीचे लोणचे ( फोटो सहित )

Submitted by प्रिति १ on 8 February, 2012 - 03:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/४ किलो ओली हळद, त्याच्या निम्मी आंबे हळद ( मिळाल्यास ), ४-५ हिरव्या मिरच्या, ८-९ लिंबू,
४ ईंच आल्याचा तुकडा, १ चमचा लोणच्याचा मसाला, १ चमचा तिखट, फोडणीचे साहित्य, ( हिंग, मोहरी
व २ चमचे तेल ) अंदाजे मीठ.

क्रमवार पाककृती: 

१/४ किलो ओली हळद आणावी. आंबे हळद पण कधी कधी बाजारात मिळते. ती पण अर्धा पाव आणावी.
दोन्ही स्वछ धूवुन एकतर त्याचे बारीक तुकडे करावेत किंवा किसुन घ्यावी. मी ओ. हळद किसुन घेतली.आंबे हळ्द मला मिळाली नाही. हात एकदम पिवळे पिवळे होतात. Happy
मग आले पण किसुन घ्यावे. ४ लिंबु कापुन त्याच्या बारीक बारीक फोडी कराव्यात. मिरच्या पण बार्रीक चिरुन घ्याव्यात. उरलेले ४-५ लिंबु घेऊन त्याचा रस घ्यावा. हे सगळे मिक्स करून त्यात १ चमचा लोणच्याचा मसाला घालावा. नसल्यास १ चमचा तिखट घालावे. व नंतर नेहमीसारखी फोडणी तयार करून ( हिंग, मोहरी ) घालुन गार झाल्यावर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
थोडे थोडे लागते.
अधिक टिपा: 

हे लोणचे काही दिवस मुरवत ठेवावे. मगच ते खुप मस्त लागते. वेगळ्या चवीचे असे हे लोणचे आहे.
दिसायला पण केशरी रंगाचे ,रंगीबेरंगी असे दिसते.

माहितीचा स्रोत: 
एक स्नेही.
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओल्या हळदीच्या लोणच्याचे फोटो टाकत आहे. P1060520.JPG

बाकीचे साहित्यः-
P1060521.JPG

साले काढल्यावर :-
P1070523.JPG

हळद किसल्यावर :-
P1070524.JPG

लिंबु, मिरची चिरल्यावरः_
P1070525.JPG

लिंबाचा रस :-
P1070527.JPG

सगळे साहित्य मिक्स केल्यावर :-
P1070529.JPGP2020538.JPG

कधी येतेस माझ्या घरी चव बघायला ? लोणचे मुरले पण आहे. तुझी वाट बघतेय. Happy ( लवकर ये बहिणाबाईंना घेऊन )

छान

शोभा, तुझं काहीच चुकलं नाही ग...
उलट या निमित्ताने काहोईना तुझे माझ्याकडे येणं होईल. हो की नाही? मी तुला आणण्याचे काम प्रज्ञाकडे
देते म्हणजे तु आलीसच समज लवकरात लवकर .:)

दिनेशदा, पुढच्या वेळी खरच तुम्ही माझ्या घरी आलात तर मला खुपच आनंद होईल.हेच आमंत्रण समजा. Happy

सगळ्यांना धन्स... Happy
सुलेखा, ज्यांना जरा वेगळी चव पण आवडते, त्यांना नक्की आवडेल... मला खुप आवडते हे लोणचे...