मराठी भाषा दिवस २०१२- लहान मुलांचे कार्यक्रम

Submitted by संयोजक on 7 February, 2012 - 13:54

आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्‍या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्‍या, आयुष्यभर साथ करणार्‍या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्‍या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !

१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली
१) मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट चालेल. (पारंपरिक, स्वरचित, वाचलेली, ऐकलेली, अनुवादित कुठलीही गोष्ट चालेल)
२) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
४) ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
५) ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा
६) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
७) वयोगट: २-१२ वर्षे

२. चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी
खालीलपैकी कुठल्याही एका चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्ट सांगायची अथवा लिहायची आहे.

चित्रसंच १
साधूबुवा, यज्ञ, राजा, लांबनाक्या टोमॅटो, सैनिक

चित्रसंच २
दोन मित्रं, धबधबा, ससुला, शेतातील घर

चित्रसंच ३
मुलगा, ढग, सायकल (दुचाकी), जंगलातला रस्ता

चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर

chitrakatha45.jpgनियमावली

१) वरीलपैकी एका संचातील चित्रांना एकत्र गुंफून मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली अथवा लिहून पाठवलेली स्वरचित गोष्ट चालेल. छोट्या दोस्तांनी त्यात आपल्या मनाने अजून चित्रं काढली तरी चालणार आहे. असे करताना दिलेल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या संचातील चित्रं त्यात वापरायची नाही. कळलं ना?
२) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपले नाव आणि मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा.
अथवा
३अ) पाल्याने वरीलपैकी एका चित्रसंचावर गोष्ट रचून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीली असता, स्कॅन करुन पालक पाठवू शकतात. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
पाल्याच्या हस्ताक्षरातील गोष्ट स्कॅन करुन sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
अथवा
४) वयोगट: ३-१४ वर्षे
५) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे

आपल्या काही शंका असतील लहान मुलांच्या कार्यक्रमाबाबत तर त्या इथे जरुर विचाराव्यात!

विषय: 

संयोजक,
तुम्हाला २३ फेब्रु ला सानिकाची गंमत गोष्टी साठी प्रवेशिका पाठवली आहे ती मिळाली की नाही हे कृपया बघाल का?
तोषवी.

अगो धन्स. मामी मी पण बुचकळ्यात पडलेले. गोट्या कसा म्हणुन.
असो," आम्ची "(वय -साडेतीन वर्षे) पण गोष्ट रोज बदलते आहे. एक तयार झालेली पण रेकॉर्डिंग करायला घेतले की बोलतच नाही. काय करावे? (:विचारात पडलेली बाहुली:)

नमस्कार संयोजक,
नेहमीच्या गंमतगोष्टीसाठी आत्ताच प्रवेशिका पाठवलेली आहे. कृपया पोचपावती द्यावी. ध्वनीमुद्रण सुमारे चार मिनीटांचे झाले आहे Sad
काही अडचण वाटल्यास कृपया संपर्क साधावा ही विनंती.

चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टीसाठी प्रवेशिका पाठवायची आहे, आज किती वाजे पर्यंत प्रवेशिका स्विकारणार आहात? ते सांगाल का प्लीज....
गंमतगोष्टीसाठी पाठवलेली (मी अनन्या या आयडीवरून) प्रवेशिका मिळाली का? नसेल तर परत पाठवू का?

संयोजक,
श्रीयाची प्रवेशिका पाठवली आहे. गोष्ट थोडी मोठी झाली आहे, जर नियमात बसत नसेल तर समजु शकते. पोच देणार का?

Pages