मराठी भाषा दिवस २०१२- लहान मुलांचे कार्यक्रम

Submitted by संयोजक on 7 February, 2012 - 13:54

आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्‍या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्‍या, आयुष्यभर साथ करणार्‍या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्‍या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !

१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली
१) मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट चालेल. (पारंपरिक, स्वरचित, वाचलेली, ऐकलेली, अनुवादित कुठलीही गोष्ट चालेल)
२) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
४) ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
५) ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा
६) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
७) वयोगट: २-१२ वर्षे

२. चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी
खालीलपैकी कुठल्याही एका चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्ट सांगायची अथवा लिहायची आहे.

चित्रसंच १
साधूबुवा, यज्ञ, राजा, लांबनाक्या टोमॅटो, सैनिक

चित्रसंच २
दोन मित्रं, धबधबा, ससुला, शेतातील घर

चित्रसंच ३
मुलगा, ढग, सायकल (दुचाकी), जंगलातला रस्ता

चित्रसंच ४
विमान, धावपट्टी, मोठ्ठा फुगा, बर्फातील घर

chitrakatha45.jpgनियमावली

१) वरीलपैकी एका संचातील चित्रांना एकत्र गुंफून मराठी भाषेत मुलांनी सांगितलेली अथवा लिहून पाठवलेली स्वरचित गोष्ट चालेल. छोट्या दोस्तांनी त्यात आपल्या मनाने अजून चित्रं काढली तरी चालणार आहे. असे करताना दिलेल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या संचातील चित्रं त्यात वापरायची नाही. कळलं ना?
२) अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०१२
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपले नाव आणि मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
ध्वनिमुद्रण असल्यास audio file sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
ध्वनिचित्रमुद्रण असल्यास youtube.com इथे फाईल upload करुन त्याचा दुवा sanyojak@maayboli.com इथे पाठवावा.
अथवा
३अ) पाल्याने वरीलपैकी एका चित्रसंचावर गोष्ट रचून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीली असता, स्कॅन करुन पालक पाठवू शकतात. पाठवताना आपला मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
पाल्याच्या हस्ताक्षरातील गोष्ट स्कॅन करुन sanyojak@maayboli.com इथे पाठवावी
अथवा
४) वयोगट: ३-१४ वर्षे
५) सादरीकरणाचा कालावधी: १- ३ मिनिटे

आपल्या काही शंका असतील लहान मुलांच्या कार्यक्रमाबाबत तर त्या इथे जरुर विचाराव्यात!

विषय: 

माझ्या लेकिला सांगितल्या पासुन खुप खुश झाली आहे .. आता लवकरच चित्रिकरण करुन स्पर्धे साठी पाठवते .. मला आधी यु टूब चे मेंबर व्हावे लागेल का ?

मी गौरी,
हो तुम्हाला युट्युबवर व्हिडीयो चढवावा लागेल आधी. Happy

मोनाली/ पौर्णिमा,
हरकत नाही. पाल्य दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो.

हितचिंतकांनी लक्षात आणून दिल्यानुसार टंकलेखनाचा ३ब हा विकल्प काढुन टाकला आहे याची कृपया नोंद घ्यावी. Happy
भर मुलांच्या मराठी भाषेतील सादरीकरणावर आहे. लेखी अथवा ऑडियो/व्हिडीयो सादरीकरण.

संयोजक , टंकलेखन जर काढून टाकल असेल तर वयोगट पण चेंज करायला पाहिजे ना. कारण ३ वर्षाच बाळं स्वतःच्या हाताने गोष्ट कस लिहिणार? Happy
उगाचच चुका काढायच्या म्हणुन नाही पण टेक्निकल मुद्दा वाटला म्हणुन लिहिले.

सीमा, आपण कृपया खालील नियम वाचाल का? Happy
३) पालकांनी पाल्याचे गोष्ट सांगतानाचे ध्वनिमुद्रण/ ध्वनिचित्रमुद्रण करुन पाठवायचे आहे. पाठवताना आपले नाव आणि मायबोली आयडी, पाल्याचे नाव आणि वय नमूद करावे.
ज्या मुलांना लिहिता येणं शक्य नाही पण कल्पनाशक्ती लढवून गोष्ट तयार करता येईल ते वरील पद्धतीने सादर करू शकतात.

सॉरी संयोजक. मी मग टंकलेखनाचाच विचार करत होते.तसदी बद्दल क्षमा असावी.

२. चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्टी
खालीलपैकी कुठल्याही एका चित्रसंचावर आधारित स्वरचित गोष्ट सांगायची अथवा लिहायची आहे.

माझ्या मुलीने विचारले की या चित्रात मुलगी का नाही. (एका चित्रात आहे.) बहुतेक म्हणजे उर्वरित ३ चित्रे ही पुरुष प्रधान आहेत, हे त्यानंतर माझ्या लक्षात आले.
हे काही मुद्दाम झाले असेल असे नाही. कारण आपल्याला स्त्री पात्रांची सवयच नाही.


आवांतर

मग लहानपण आठवले तर त्यातही मला कुठे स्त्री प्रधान प्रमुख कथापात्र आठवेना.
प्रमुख लेखकांनी तसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. (कदाचित काही सन्माननीय अपवाद असतीलही पण मला सहजतेने आठवत नाहीत हे ही खरे)
उदा.
भा रा भागवत

फास्टर फेणे
नंदू (यांत्रिक माणूस, नंदूने रचले मनोरथ, मोत्याची शिकार)
गिरीशिखरांचे गुपित,
हवाई हुकुमशहा,
साता समुद्राचा सुलतान,
बादशाही जासूद
एका चिन्याचा जमालगोटा

शैलजा राजे
धडपड्या दिलिप
चिमखडे हेर
गुप्तहेर क्षितिज

कुमुदिनी रांगणेकर
चंद्रलोकीचा चंदर
चतुरसिंगांच्या करामती

वगैरे वगैरे
सर्व पात्रे पुरुष प्रधान आहेत. असे का असावे असा मला प्रश्न पडला.त्यात पूरक स्त्री पात्रे आहेत पण ती पूरक आहेत, मुख्य नाही.
हे इतर भाषांमध्ये पण असेच आहे का?
मला पुर्व भारतातल्या, मिझो, नागा, वगैरे लोक कथांबद्दल आता कुतूहल वाटते आहे...

इतरांना या विषयी काय वाटते?

निनाद Happy अवांतर पण चांगला मुद्दा आहे. आणि मलाही असे कधीकधी वाटायचे. ( इथल्या चित्रांबद्दल नव्हे तर इतर गोष्टींबद्दल )

संयोजक,
तुम्हाला ८ फेब्रु. ला दोन इमेल केल्या आहेत त्या मिळाल्या की नाही हे कृपया बघाल का?

निनाद, मुलगी प्रमुख व्यक्तिरेखा असलेले एक पुस्तक पटकन आठवले ते म्हणजे ना.धों.ताम्हनकरांचे 'चिंगी'. गोट्या आणि खडकावरला अंकुरपेक्षा मला 'चिंगी' कायमच जास्त आवडलेले आहे Happy पण तुमचे निरीक्षणही बरोबरच आहे. मुलीची व्यक्तिरेखा प्रमुख असलेली पुस्तके संख्येने कमीच आहेत.
ह्या धाग्यावर अवांतर प्रतिसाद दिल्याबद्दल दिलगीर आहे. पण 'चिंगी' ची आठवण काढयावाचून राहवेना Happy

संयोजक,
गट क्रमांक १ साठी(कोणतीही गोष्ट) वेळेचे बंधन १-३ मिनिटे हे आहे पण आमची गोष्ट साडे चार मिनिटे होत आहे. आणि तीच सांगायची आहे असा हट्ट आहे. वय ४ वर्षे ४ महिने Sad
काय करता येईल. काटछाट करून बसवायला लावू का?

अगो+१.
याशिवाय मला आठवत असलेलं पुस्तक म्हणजे 'झोपाळू चिंगा'. आणि रपुन्झेल, सिंडरेला इत्यादी विसरले का? Happy

अगो, अगदी. चिंगी बद्दल लिहायलाच आले होते. तिची आठवण झालीच. तिच्या धाकट्या भावाचे नाव आठवते का?

मुग्धानंद, गोट्या.

निनाद, अगो, मंजूडी, खरंच की मराठीत 'चिंगी' व्यतिरीक्त कोणी बालनायिका आठवतच नाहीये. इंग्रजी बालसाहित्यात मात्र अनेक पुस्तकं आहेत ज्यात स्त्री-व्यक्तीरेखा महत्त्वाच्या आहेत, नायिका आहेत.

विझार्ड ऑफ ओझ मधली डोरोथी, अ‍ॅलिस इन वंडरलॅन्ड मधली अ‍ॅलिस, नॅन्सी ड्र्यु, ज्युनि बी जोन्स, हैडी, अ‍ॅगाथा ख्रिस्तीची मिस मार्पल इ.

मंजूडी रपुन्झेल , सिंडरेला या नायिका असल्या तरी तसे त्यांचे काही कर्तुत्व नाहीच आहे. एक राजपुत्र मिळवणे याव्यतिरिक्त.

धन्यवाद संयोजक.

संयोजक,
गट क्रमांक १ साठी(कोणतीही गोष्ट) वेळेचे बंधन १-३ मिनिटे हे आहे पण आमचीही गोष्ट साधारण पाच मिनिटांची होत आहे काटछाट केली तर गोष्टीतली मजाच निघुन जात आहे काय करावे??
गोष्ट बदलायला माझी लेकही तयार नाही..... Sad

तिच्या धाकट्या भावाचे नाव आठवते का? >>> मुग्धानंद, चिंगीच्या धाकट्या भावाचे नाव 'बट्या'.
( मामी, गोट्या नव्हे गं Happy )

मुदत वाढवल्याबद्द्ल अनेक धन्यवाद! आधी दिलेली मुदत पुरणार असं वाटत नव्हत,तेच लिहायला इथे आले तर ही खुशखबर मिळाली Happy

अहो निनाद, तुम्ही लिहीलेत, त्यातिल "तपशील" बरोबर आहे, पण तो सर्व विषयच, जरा घासुन पुसुन लिहीलात, तर तिकडच्या त्या "लिन्गनिरपेक्ष ओळखीच्या" परिसंवादात चपखल बसेल. बघा विचार करुन, अन पटले तर द्या धाडून एक लेख तिकडे Happy

Pages