अतुल्य! भारत - भाग १८: हंपी, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 4 February, 2012 - 13:29

हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.

हंपी बद्दलची बहुतेक सारी माहिती पहिल्या प्रचि मध्ये दिली आहे.
चला तर आज ह्या साम्राज्याची एक छोटिशी झलक पाहुयात.

प्रचि १
हंपी चा ईतिहास

-
-
-
प्रचि २
विरुपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
विरुपाक्ष मंदिर पॅनो

-
-
-
प्रचि ५
कृष्ण मंदिर, प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२
विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह

-
-
-
प्रचि १३
कृष्ण मंदिराजवळील बाजार

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
कृष्ण मंदिर परिसर

-
-
-
प्रचि १६
उग्र नरसिंह

-
-
-
प्रचि १७
भूमिगत शिवमंदिर

-
-
-
प्रचि १८
हजारी राम मंदिर

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-
प्रचि २२
महानवमी डिब्बा

-
-
-
प्रचि २३
पुष्करीणी (पायर्‍यांची विहिर)

-
-
-
प्रचि २४
विहिरीला पाणी पुरविणारे पाट

-
-
-
प्रचि २५
विठ्ठल मंदिराला जाण्याचा रस्ता

-
-
-
प्रचि २६
विठ्ठल मंदिर

-
-
-
प्रचि २७
विठ्ठल मंदिर परिसर

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
दगडी रथ

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४
विठ्ठल मंदिरातले संगीतमय खांब. ह्या खांबांवर हात मारल्यावर ह्यातुन संगीत येते.

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०
विठ्ठल मंदिर पॅनो

-
-
-

प्रचि ४१
गनगित्ती जैन मंदिर

-
-
-
प्रचि ४२
कमल महाल

-
-
-
प्रचि ४३
गजशाळा

-
-
-

प्रचि ४४
तुंगभद्रा

-
-
-
प्रचि ४५
विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष.

-
-
-
----------------------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - बदामी, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल धन्स लोक्स...
-----------------------------------------

वरदा, नंदिनी, माधव, नितिनचंद्र...
अधिक माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद.

-----------------------------------------

रच्याकने, प्रचि १६ मधल्या नरसिंहाला 'योग' नरसिंह म्हणायचं बरं का. उग्र नाही. तो कमरेला आणि गुडघ्याभोवती योगपट्ट बांधून बसलाय म्हणून तो योगनरसिंह!>>>
धन्स वरदा. हा नरसिंह बर्‍याच नावांनी ओळखला जातो. उग्र नरसिंह, योग नरसिंह, लक्ष्मी नरसिंह... ईत्यादी.
सर्वात जास्त प्रचलित नाव उग्र नरसिंह असल्याने मी ते वापरले.

-----------------------------------------

आणि तुंगभद्रेच्या पल्याडच्या किनार्‍यावर विजयनगर साम्राज्याच्या आधीची राजधानी अनेगोंदी आहे ती नाही पाहिली? त्याचेही अवशेष बघण्यासारखे आहेत.>>>>
नाही. तेव्हढा वेळच नव्हता. Sad हंपी पहाण्यातच २ दिवस निघून गेले.

-----------------------------------------

आणि बदामीला जाणार असाल तर शेजारचीच ऐहोळे आणि पट्टडकल ही गावं मस्ट!!>>>
नक्कीच. बदामी झाल्यावर ऐहोळे, पट्ट्डक्कल, लाक्कुंदी असेच भाग आहेत. Happy

-----------------------------------------

धन्स गंधर्वा, पॅनोज फोटोज् स्टिच करून केले आहेत.

-----------------------------------------

धन्स डॅफोडिल्स. हा पहा मोठ्या गणपतीचा फोटो

-----------------------------------------

धन्स नंदिनी. हो ती विहीर म्हणजे पुष्करिणीच आहे.
तसा बदल केला आहे.
झब्बू ची वाट पहातोय.

-----------------------------------------

lampan, तुझ्या पण झब्बू ची वाट पहातोय.

-----------------------------------------

जयु, तसा मी गर्दी टाळण्याचा बराच प्रयत्न करतो. पण काही फोटोत नाईलाज होता म्हणुन एडिट केले आहेत.

-----------------------------------------

शमा, मी हे फोटोज् canon 550D ने काढलेले आहेत.

आले आले, नरसिंहाची माहिती घेऊन आले मी Happy (दोन दिवस ऑनलाईन नव्हते)

नरसिंह मूर्तींचे काही प्रकारः

विदरण नरसिंह - म्हणजे हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह

केवल नरसिंह - एकटाच, वैष्णव आयुधांसकट

स्थौण नरसिंह - खांबातून प्रकट होताना

लक्ष्मीनरसिंह - मांडीवर लक्ष्मी घेऊन बसलेला

योगनरसिंह - योगपट्ट बांधून बसलेला

कधीकधी हिरण्यकश्यपूशी युद्ध करताना दाखवतात.

नितिनचंद्र, पु.ना. ओक प्रकरणात प्लीज फारसं लक्ष घालू नका. त्यात खरंच फारसा काही अर्थ नाही. आणि हंपी प्राचीन नाही मध्ययुगीन आहे. १५व्या शतकातलं.
मुस्लिम देशात कोण म्हणतं असे भव्य प्राचीन अवशेष नाहीत म्हणून? भरपूर आहेत. अगदी हंपीपेक्षाही भव्य आहेत. आपल्याला माहित नसतं एवढंच.
भारतीय स्थापत्यशास्त्राला घुमट आणि कमान (ट्रू आर्च - विथ की स्टोन) ही मुस्लिम स्थापत्यशास्त्राकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची, स्थापत्यशास्त्राची पत कमी होत नाही काही. ही अशी देवाणघेवाण जगभर चालूच असते.

वरदा माहितीबद्दल धन्यवाद. पण नरसिंह बहुतेक लक्ष्मीनरसिंहपण होता.

मार्को, मी बदामीला झब्बू देइन. हंपीचे फोटो आता माझ्याजवळ नाहीत.

वरचा मोठा गणपती आहे ना तसे दोन गणपती आहेत. एक कडलीकाळ गणेश आणि एक सासवीकाळ गणेश. (हरभर्‍या डाळीचा गणपती आणि मोहरीचा गणपती) हे दोन्ही गणपती किमान ८-१० फूटी आहेत आणि मोनोलिथ आहेत (बहुधा)

आता यवढ्या मोठ्या गणपतीला इतकी चिमुकली नावे का दिली आहेत कुणास ठाऊक?

अप्रतिम फोटो ,
तिथल्या कलाकरीचे मस्त दर्शन घडवलेस

गजशाळेच्या आतिल भागाचे फोटो आहेत का ???

धन्स लोक्स..

मार्को, मी बदामीला झब्बू देइन.>>>
नक्कीच. मी वाट पाहिन.

गजशाळेच्या आतिल भागाचे फोटो आहेत का ???>>>
आहेत पण ते काही खास इंटरेस्टिंग नाहियेत. फक्त नुसत्या मोठ्या खोल्या आहेत.

वरदा, त्या नरसिंहांची फ्रिक्वेन्सी आणि उदाहरणे पण देता येतील का?
इथे किंवा इतरत्र.

मार्को पोलो, मि मिस केला असते हे फोटो मला वाटले हा जूनाच धागा वर आला आहे.

अमेझींग फोटोग्राफी. नं ८, ११, १२, १४ अंह सगळेच फोटो अप्रतीम आहेत.

केवढी प्रचंड मंदिरे आहेत व परिसरही केवढा मोठा - किती व्याप्ती आहे या एकंदर परिसराची - कोणी सांगू शकेल का ?
सर्व प्र चि अप्रतिम.

काही वर्षा पूर्वी पट्टडकलम आणि ऐहोले ला भेट देण्याचीसन्धी मिळाली परन्तू हम्पी ला भेट देता आली नाही. आज सर्व छायाचित्रे पाहून परत भेटीची खूप इच्छा झाली. धन्यवाद!!

शशांक,
हा पुर्ण परिसर साधारणपणे ५ किमी च्या व्यासात येईल.

अतुलनीय,
झब्बूची वाट पहातोय.

Pages