अतुल्य! भारत - भाग १८: हंपी, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 4 February, 2012 - 13:29

हंपी म्हटले कि लहानपणी ईतिहासाच्या पुस्तकात पाहिलेला उग्र नरसिंहाचा पुतळा आठवायचा. हंपी ला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात होता. हा योग डिसेंबर २०१० मध्ये आला. हंपी कर्नाटकाच्या उत्तरेला आहे. इथले सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे होस्पेट.
हंपी तुंगभद्रा नदीच्या किनारी वसले आहे. सध्याचे हंपी म्हणजे पुर्वीचे विजयनगर (विजयनगर साम्राज्याची (१३३६-१५६५) राजधानी) आणि विजयनगर साम्राज्य म्हणजेच रामायणात उल्लेख असलेले किष्किंधा राज्य. इथे सर्वत्र विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष विखरुन पडले आहेत.
ईथे झालेल्या उत्खननात आदिमानवाने वापरलेली भांडी, भित्तीचित्रे ईत्यादी सापडली आहेत.

हंपी बद्दलची बहुतेक सारी माहिती पहिल्या प्रचि मध्ये दिली आहे.
चला तर आज ह्या साम्राज्याची एक छोटिशी झलक पाहुयात.

प्रचि १
हंपी चा ईतिहास

-
-
-
प्रचि २
विरुपाक्ष मंदिर

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४
विरुपाक्ष मंदिर पॅनो

-
-
-
प्रचि ५
कृष्ण मंदिर, प्रवेशद्वार

-
-
-
प्रचि ६

-
-
-
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२
विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह

-
-
-
प्रचि १३
कृष्ण मंदिराजवळील बाजार

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
कृष्ण मंदिर परिसर

-
-
-
प्रचि १६
उग्र नरसिंह

-
-
-
प्रचि १७
भूमिगत शिवमंदिर

-
-
-
प्रचि १८
हजारी राम मंदिर

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-
प्रचि २२
महानवमी डिब्बा

-
-
-
प्रचि २३
पुष्करीणी (पायर्‍यांची विहिर)

-
-
-
प्रचि २४
विहिरीला पाणी पुरविणारे पाट

-
-
-
प्रचि २५
विठ्ठल मंदिराला जाण्याचा रस्ता

-
-
-
प्रचि २६
विठ्ठल मंदिर

-
-
-
प्रचि २७
विठ्ठल मंदिर परिसर

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९
दगडी रथ

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-
प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४
विठ्ठल मंदिरातले संगीतमय खांब. ह्या खांबांवर हात मारल्यावर ह्यातुन संगीत येते.

-
-
-
प्रचि ३५

-
-
-
प्रचि ३६

-
-
-
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०
विठ्ठल मंदिर पॅनो

-
-
-

प्रचि ४१
गनगित्ती जैन मंदिर

-
-
-
प्रचि ४२
कमल महाल

-
-
-
प्रचि ४३
गजशाळा

-
-
-

प्रचि ४४
तुंगभद्रा

-
-
-
प्रचि ४५
विजयनगर साम्राज्याचे भग्नावशेष.

-
-
-
----------------------------------------------------------------------------------

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - बदामी, कर्नाटक.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

अप्रतिम!!!!
पॅनोरॅमिक फोटोज पण अशक्य.
छान मेंटेन केली आहेत सगळी ठिकाणं. कमी गर्दीचं आणि स्वच्छ वाटतय!! Happy

अप्रतिम फोटो!!! (नेहमीप्रमाणेच) Happy
काहि काही फोटो खल्लास आलेत. Happy

छान मेंटेन केली आहेत सगळी ठिकाणं. कमी गर्दीचं आणि स्वच्छ वाटतय!!>>>>+१
हा परीसर पहायला खरंच एक अख्खा दिवस हाताशी असला पाहिजे.

केवळ सुंदर. माझं अगदी मस्त स्मरणरंजन झालं Happy
रच्याकने, प्रचि १६ मधल्या नरसिंहाला 'योग' नरसिंह म्हणायचं बरं का. उग्र नाही. तो कमरेला आणि गुडघ्याभोवती योगपट्ट बांधून बसलाय म्हणून तो योगनरसिंह!

आणि तुंगभद्रेच्या पल्याडच्या किनार्‍यावर विजयनगर साम्राज्याच्या आधीची राजधानी अनेगोंदी आहे ती नाही पाहिली? त्याचेही अवशेष बघण्यासारखे आहेत.

आणि बदामीला जाणार असाल तर शेजारचीच ऐहोळे आणि पट्टडकल ही गावं मस्ट!!

मस्त!

नुसत्या शिळांच्याही काही प्रचि चालल्या असत्या.

ऐहोळे बद्दल वरदाला अनुमोदन - तिथे एक छोटेसे पोस्ट ऑफिस आहे आणि त्यांचा खास कॅन्सलेशन छप्पा तिकीटावर (किंवा कार्डावर वगैरे) मिळतो.

चंदन, नेहमीप्रमाणेच मस्त फोटो. मी कित्येकदा गेलेली आहे हंपीला.

कर्नाटकातील बहुतेक ऐतिहासिक ठिकाणं ही चांगलीच स्वच्छ ठेवलेली अस्तात. महाराष्ट्र सरकारला कधी सुचणार देव जाणे.(त्या खिद्रापूरचा रस्ता सुधारा आधी)

वरदा, त्या नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीचीपण मूर्ती होती ना? याला लक्ष्मीनरसिंह पण म्हणतात ना? (की तो वेगळा?) या मूर्तीबद्दल अजून माहिती देऊ शकशील का?

त्या विठठल मंदिरामधले संगीत खांब पूर्वी वाजवून बघितले आहेत. आता तिथे जाऊ देत नाहीत. त्या मंदिरात विठ्ठल नाही, तो पंढर्पुरात गेला आहे.

ती विहीर म्हणजे पुषकरिणी आहे ना?

आगामी आकर्षणाच्या प्रतिक्षेत. मी माझ्या वाकड्यातिकड्या फोटोंचा झब्बू जरूर देणार. Happy

अतिशय सुंदर प्रचि. आवडलीत.
<<वरदा>> प्रचि ४१ मधील जैन मंदिरासमोरचा खांब म्हणजे भग्न मानस्तंभ का?

कर्नाटकातील बहुतेक ऐतिहासिक ठिकाणं ही चांगलीच स्वच्छ ठेवलेली अस्तात. महाराष्ट्र सरकारला कधी सुचणार देव जाणे>>>>>>अगदी अगदी. Happy

चंदन, मस्स्स्स्तं आलेत फोटोज. परत १दा जायची इच्छा उफाळुन आलिये.
नंदिनी, झब्बुची धम़की देउ नकोस हां .. माझ्याकडे ब्येक्कार फोटोज आहेत Proud

नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत सगळे फोटो. कृष्णधवल केलेले तर जास्तच आवडले.

प्रचि १४ तर महान आहे. त्या मधल्या घुमटीत कोणी गायक आपली कला सादर करतोय आणि घाटांवर बसून लोक त्याचे गायन ऐकताहेत असेच वाटले मला.

नृसिंहाच्या मांडीवर सहसा हिरण्यकशपु असतो ना? या मूर्तीत तो नाहीये. वरदा जास्त माहिती देणार का? Happy

त्या मंदिरात विठ्ठल नाही, तो पंढर्पुरात गेला आहे. >> काय अख्यायिका आहे ती? दुर्गाबाईंनी पैसमध्ये दिली आहे तीच का?

लंपन, तुला टूक टूक. तुझ्याकडे हंपीचेच फोटो असतील. माझ्याकडे बदामी आणि पट्टदकल्लचे पण आहेत.

माधव, हिरण्यकश्यपू मारताना नरसिंह म्हणजे उग्रनरसिंह. अशी मूर्ती साधारणपणे तळ्याच्या काठी असते. वरदा म्हणतेय की हा उग्र नाहीये. पण मला आठवतय एकदा गाईड म्हणाला होता की याच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती, पण आता मूर्ती विद्रूप झाली आहे. ते नक्की काय भानगडे? वरदा...

ती आख्यायिका मलादेखील नीट ठाऊक नाही. एकदा वाचलय की यवनी आक्रमणाच्या भितीने मूर्ती नेऊन पंढरपुरात लपवली. एकदा वाचलय की पुंडलिकाच्या हाकेला ओ देऊन विठ्ठल गेला तो तिथेच आहे. एक मात्र खरं की कर्नाटकामधे देखील विठठल भक्ती पुष्कळ आहे. पुरंदरदासांच्या वगैरे रचना ऐकल्य्वार ते जाणवतं.

विठ्ठलाचा मांडलीक राजा (नाव नाही आठवत आहे आता) त्याला भेटायला येणार असतो. म्हणून विठ्ठल घरी सेवकाकडून निरोप पाठवतो की त्याच्या भोजनाची जय्यत तयारी कर . सेवक घरी येईपर्यंत राणी (पदुबाई) आणि तिच्या दासींचे जेवण झाले असते अणि ती सेवकाहाती उलट निरोप पाठवते की ती तयारी करणार नाही. पण ती सगळी तयारी करून ठेवते. इकडे विठोबाला तो निरोप मिळताच तो तिला शाप देतो. त्या रागाने पदुबाई मरते आणि तिच्या अस्थी समुद्रात वाहून जातात. घरी आल्यावर त्याला पदुबाईने केलेली तयारी दिसते आणि त्याला खूप दु:ख होते. दु:खभरात तो सन्यास घेतो आणि आपले राज्य सोडून निघून जातो.

तो मांडलीक राजा विठोबाला आणि पदुबाईला आईवडिलांच्या स्थानी मानत असतो. त्याला जेंव्हा हे कळते तेंहा त्याला आपल्यामुळे हे सर्व घडले असे वाटते आणि तो खूप कष्टी होतो. मग तो तपश्चर्या करून आपल्या आईच्या अस्थी सागराकडून मिळवतो आणि चंद्रभागेत विसर्जीत करतो. त्यातून एक कमळ उगवते. विठोबा फिरत फिरत त्या ठिकाणी येतो आणि ते कमळ तोडतो. त्यातून पदुबाई रुक्मीणीरुपाने प्रकटते. आपल्याच शापामुळे विठोबा तिच्याशी परत संसार करू शकत नाही पण तो मग पढरपुरातच रहातो.

अशी काहीशी अख्यायिका आहे.

प्रची. फोटो मस्तच,

१९९१ साली बळ्ळारीकडे जाताना गोल घुमट आणि परत येताना हंपीला जाण्याचा योग आला.

तत्पुर्वी पु. ना ओक यांच्या भेटीचा योग आला होता.
http://en.wikipedia.org/wiki/P._N._Oak

प्राचीन वास्तुकला आणि भारतातील मंदीरे याबाबत बोलताना ते म्हणाले होते की हंपी सारख्या प्राचीन वास्तु मुस्लीम देशात आहेतच कुठे ? ज्या वास्तु आज मुसलामानी वास्तुकला म्हणुन ओळखल्या जातात त्या मुळच्या हिंदुंच्या वास्तु आहेत.

कोणीही मुसलमान दगडावर मृअत व्यक्तीचे दफन करत नाही. याचे एकमेव कारण मृतदेहाचे डीकाँपोझीशन मातीतच होऊ शकते अस असताना ताजमाहाल घ्या किंवा गोल घुमट. इथे ताजा मृतदेह पुरला जाऊ शकत नाही कारण त्याच्या खाली दगड आहे.

मग ह्या वास्तु मुस्लीम आक्रमकांनी ताब्यात घेऊन त्याचे मंदिर हे स्वरुप बदलताना कोणाच्या तरी अस्थी आणुन तिथले शिवलिंग काढुन त्या ठिकाणी कबर बांधली आहे.

या वास्तुच्या आजुबाजुला तुम्हाला अनेक हिंदुना पुज्य असलेल्या मुर्ती/चिन्हे भग्न अवस्थेत मिळतील.

गोल घुमटाच्या पुढे एक वस्तु संग्रहालय आहे ज्याची पायरी म्हणजे एका भग्न हत्तीची पाठ आहे हे पहायला मिळाले.

गोल घुम्टापासुन साधारण १०० किलोमीटर अंतरावर हंपी आहे जी भारतीय वास्तु कलेची साक्ष आहे अस असताना गोल घुमट कोणा मुस्लीम राजाने बांधले हा दावा पचत नाही.

Pages