माझ्या दादाची कला भाग - शेवटचा

Submitted by श्वेता १६०३ on 4 February, 2012 - 12:49

प्रचि ०१
Copy of 19.jpg
प्रचि ०२
Copy of 18.jpg
प्रचि ०३
Copy of 16.jpg
प्रचि ०४
Copy of 14.jpg
प्रचि ०५
Copy of 13.jpg
प्रचि ०६
Copy of 12.jpg
प्रचि ०७
Copy of 11.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाग शेवटचा... तुम्ही टाकलेला शेवटचा... आता त्यांचे त्याना स्वतःला मेंबर होऊन इथे चित्रे टाकायला सांगा... Happy

खूप खूप सुंदर. सगळे भाग पाहिले. अप्रतीम आहेत सगळीच चित्रं. खूप सुंदर कला आहे हातात.

सर्व चित्रे बघितली, अप्रतिम आहेत.
त्यांना मायबोलीवर लिहायला सांगा ना. चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.

क्या बात है... अप्रतिम आहेत. खरच त्यांनी, लिहावंही. चित्रकारांची म्हणून एक लेन्स असते. त्यातून त्यांना दिसणारं जग... नुस्तं दिसणारच नाही तर, पंचेद्रियांमधल्या इतर इंद्रियांचे अनुभवही त्यांना "त्याच वेगळ्या लेन्समधून दिसतात".
उदा. हातात ढोल घेऊन वाजवणार्‍या वादकाच्या वाद्नातली लय जी आधी त्याच्या अंगप्रत्यंगातून सांडते ती, त्यांना "दिसते"... ती टिपण्याची त्यांची कुवत..
मजा येईल.

चित्रं खरोखर अप्रतिम आहेत.

सगळीच चित्र अप्रतिम आहेत !!! जबरदस्त डिटेलिंग Happy (ही ७ आणि आधीचे सगळे भाग)

(फक्त एकच - बहुतेक चित्रांतल्या माणसांच्या अंगावर पांढरेच शर्ट दिसतात. ते बघायला थोडं ऑड वाटलं.)

सगळीच चित्र अप्रतिम आहेत Happy
चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.>>>>>+१

श्वेता, सगळे भाग पाहिले. अतिशय सुरेख आहेत चित्रं.

या भागातलं प्रचि०३ फार आवडलं. उजेड आणि सावल्यांच्या तिरप्या रेषा, ते काळे पांढरे रंग जमून गेलेत अगदी. अप्रतिम. एकदम जिवंत.

इथे शेअर केल्याबद्दल आभार आणि दादाला अनेक शुभेच्छा.

(फक्त एकच - बहुतेक चित्रांतल्या माणसांच्या अंगावर पांढरेच शर्ट दिसतात. >> खरंच की. हे वाचल्यावरच लक्षात आलं!

वा! अप्रतिम. सर्व चित्रे फार फार सुरेख आहेत.
पर्स्पेक्टीव्ह, डिटेलिंग, छायाप्रकाश सर्वच अगदी अफलातुन.
तुम्ही टाकलेली आधीची चित्रे दिसत नाहीयेत. प्लिज ती दिसतील अशी कराल का?

या चित्रांसाठी कुठले माध्यम वापरले आहे? ( आधी कुणी विचारले असल्यास माहित नाही )

धन्यवाद
जयु ,सावली ,एम.कर्णिक |,स्मिताके ,केदार,रोहित ..एक मावळ, के अंजली,विनार्च,अल्पना,वेताळ_२५ ,मो,ललिता-प्रीति, मामी,श्री,दाद,दिनेशदा,सेनापती ,जागोमोहनप्यारे |,आर्च , गोगो.

सगळीच चित्र एक से एक आहेत Happy
अँगल्स, डिटेलिंग, शेडिंग सगळच सुंदर जमलय!
चित्रांबद्दल जास्त माहिती त्यांच्या शब्दात वाचायला खुप आवडेल.>>>>>+१
तुमच्या दादाला अनेक शुभेच्छा!

अगं काय म्हणावे?
निव्वळ अप्रतिम आहेत सारी..
प्रत्येक चित्रातले बारकावे बखुबीने चितारलेत!

ग्रेटच !