कंबोडियातील बाजार आणि गावकुस!
मी कंबोडियामधे २०११ ला अंकोरची मंदिरे बघायला गेलो होतो. मी कुठल्याही नवीन ठिकाणी जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा त्या त्या देशाचा भाजीबाजार, पहाटेचे जनजीवन, रात्री शहराची निरवानिरव, एखादे खेडेगाव आणि तेथील लोकांचा नित्याचा व्यवहार ह्या गोष्टी अनुभवण्याचा हौसेने प्रयत्न करतो. ह्याच माझ्या हौसेतून काढलेली काही छायाचित्रे मी तुम्हाला दाखवत आहे.
१) हा आहे पाम-गुळ. ही बाई हा गुळ झाडाच्या पानात छान गुंडाळूत आहे.

२) कमळाच्या (वॉटर लिलीच्या) पाकळ्या गळून पडल्यात की त्या जागेवर बीया येतात. मग त्याचे असे फळ तयार होते. अतिशय रुचकर असतात ह्या बीया. ओले मटार, शहाळातील मलई, ओल्या भुईमुगाच्या शेंगा हलक्याशा गोड असतात तशी काहीशी चव असते आतल्या बीयांची. ह्या बीया वाळल्यात की त्या भाजून फुलवायच्या. त्यालाचं तर 'फुल-मखणे' म्हणतात. आणि उत्तर भारतीय लोकांमधे पुजेला फुल-मखणे असतात.
३) कलिंगड विकणार्या कंबोडियन स्त्रिया
४) पामगुळ कढईत आटल्यानंतर तो घोटताना
५) हा गुळ आणि त्या बाजुला छोट्या छोट्या पानापासून तयार केलेल्या डब्या:

६) ताडाची, माडाची, पानतरुची इतकी विपुल झाडे आहेत .. मग अशा रोजच्या व्यवहाराला लागणार्या स्वैपाक घरातील वस्तू तिथे तयार होतात.
७) हे कसले फळ आहे माहिती नाही पण बहुतेक हे पामतरुचेच फळ आहे आणि ह्या फळाच्या रसापासून गुळ बनतो.
८) ही बाई ताजा गुळ विकत आहे. हा गुळ पामतरुपासून बनवलेला आहे. बाजूला कढई आहे. गुळ तयार झाला की लगेच ती तो गुळ पानापासून तयार केलेल्या डबीत ठेवते आहे.
९) ही बाई चिकू, केळी आणि लोंगॉन नावाचे हंगामी फळ विकते आहे.
१०) कढईतील हा रस आटवला जात आहे.
११) किती छान वाटतं ना परदेशात आपला गणोबा भेटला की!
१२) स्वतःच ह्या वस्तू घराच्या अंगणात बनवायच्या आणि स्वतःच त्या विकायच्या.
१३) खूप स्वस्त विकायला काही परवडत नाही कारण बघा रस आटून आटून कितकुसा झाला.
१४) कंबोडियातील जंकफुड
१५) परदेशात अशी ही जांभळ पाहिली की तो क्षण कसा अगदी सुखदायक जांभळा होतो. मी तर थेट झाडावर चढून जांभळे खाल्ली तिथे इतकी ती विपुल होती तिथे!
१६) मोड आलेले मुग
१७) चिंचेची पाने ही लोक कशी खात असतील भाजी करुन!!!!
१८) ह्या आणखी वेगळ्या भाज्या
१९) अहो ह्या बासर्या नाहीत. ह्याच्या आत शिजवलेला लगेच खात येईल असा स्टिकी-राईस असतो. ह्या भातामधे रेडबीन्स असतात.
वॉव बी. मस्तय हे.
वॉव बी. मस्तय हे.
सायो, रारंगढांग नाही ग केरळी
सायो, रारंगढांग नाही ग केरळी मैत्रिण. रारंगढंगमध्ये उल्लेख आहे का? बर्याच वर्षांपूर्वी वाचलं होतं.
नंदिनी, असा फरक आहे का? माहित नव्हतं. धन्यवाद.
वावावा... सुरेख फोटोज.. सुंदर
वावावा... सुरेख फोटोज.. सुंदर माहिती.. खूप मजा आली.. अजून माहिती आणी फोटोज च्या प्रतिक्षेत..

मजा आली खूप बघताना. बी, तुझी
मजा आली खूप बघताना. बी, तुझी वाक्यंही छान आहेत प्रत्येक फोटोवर.
बी सुरेख फोटो, जांभळं पाहून
बी सुरेख फोटो, जांभळं पाहून तोंडाला पाणी सुटलं. शेवटची कधी खल्ली आहेत आठवत पण नाहीये आता.
सुंदर फोटो. छान आहे मार्केट.
सुंदर फोटो. छान आहे मार्केट. प्रत्येक गोष्ट निसर्गाच्या जवळची वाटते. गुळ बांधायला पण पानांच्या डब्या, भात ठेवायला पोकळ बांबु. हिरवं गार मार्केट. सुंदर. तरीही गरीबी लपत नाही.
सगळ्या बायकाच दिसत आहेत. विकणार्या पण बहुतेक मुलीच आहेत. कंबोडिया चा मुख्य व्यवसाय काय? जसा थायलंड चा पर्यटन आणि त्या अनुशंगाने आलेले व्यवसाय उदा. गाईड, टी शर्ट फॅक्टर्या, वॉटर गेम्स, वहानं चालवणे, नाईट लाइफ इ. तसा ह्यांचा मुख्य उद्योग काय?
सविस्तर लिहीलेत तर मजा येइल. तुमची शैली छान आहे.
छान फोटो
छान फोटो
चांगली माहीती अन फोटो बर, तू
चांगली माहीती अन फोटो
इत्क्या त्या मला आवडल्यात )
बर, तू तो गुळ चाखलास की नाही?
(मी जर तुझ्यासारखा परदेशात फिरत अस्तो, तर मला वर दाखविलेल्या हस्तकलेच्या खरेदी केलेल्या वस्तु आणायला एक कण्टेनर लागला अस्ता
अतिशय नाविन्यपूर्ण (नॉव्हेल)
अतिशय नाविन्यपूर्ण (नॉव्हेल) अदाकारी........ खूपच सुंदर, भावणारी....
वा प्रचि व लेख छानच
वा प्रचि व लेख छानच
सुंदर फोटो. आणखी बघायची
सुंदर फोटो. आणखी बघायची इच्छा.
फोटो आवडले...
फोटो आवडले...
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त!
मस्त!
मोहन की मीरा:सगळ्या बायकाच
मोहन की मीरा:सगळ्या बायकाच दिसत आहेत. विकणार्या पण बहुतेक मुलीच आहेत. कंबोडिया चा मुख्य व्यवसाय काय? जसा थायलंड चा पर्यटन आणि त्या अनुशंगाने आलेले व्यवसाय उदा. गाईड, टी शर्ट फॅक्टर्या, वॉटर गेम्स, वहानं चालवणे, नाईट लाइफ इ. तसा ह्यांचा मुख्य उद्योग काय? >>>>
मीरा, मला स्त्रिया जास्त आवडतात म्हणून मीच बहुतेक नकळत त्यांचेच चित्र जास्त घेतले असावे
मी जिथे उतरलो होतो अर्थात सियाम रिप शहरात तिथली नाईट लाईफ अतिशय सुरेख होती. कंबोडियामधले सरकार अजून प्रगत नाही. त्यामुळे युरोपियन राज्यकर्त्यांची तिथे मजा होते. बर्याच वाहनांना अजून तिथे नंबर्स देखील मिळालेले नाहीत तरीही ते वाहन रस्त्यावर पळताना दिसतात. वॉतर गेम्स, फॅक्टर्या असे काही दिसले नाही तिथे मला. भरपुर प्रमाणत पर्यटक असतात आणि वर्षभर त्यांची येजा सुरुच असते. तेंव्हा महत्त्वाचे उद्योग हे पर्यटकांशी निगडीत दिसतात. टोलेजंग हॉटेल्स दिसतात. नाना तर्हेचे रेस्टॅरंट दिसतात. शेती उत्पादन भरपुर आहे.
बी खुप सुंदर फोटो आहेत, तिकडे
बी खुप सुंदर फोटो आहेत, तिकडे सर्व व्यवहार बायकांच्या हातात असतात का..?
७ नं. वाले ताड गोळे आहेत!!
७ नं. वाले ताड गोळे आहेत!! खूप सही लागतात, बेंगलोर, कलकत्ता, मुंबई ई. ठीकाणी मिळतात भारतात ही.
सधारण ३ गोळे निघतात एका फळातुन. खूप पाणी असतं त्यात. सोलुन खावे लागतात.
>> मी कुठल्याही नवीन ठिकाणी
>> मी कुठल्याही नवीन ठिकाणी जेंव्हा फिरायला जातो तेंव्हा त्या त्या देशाचा भाजीबाजार, पहाटेचे जनजीवन, रात्री शहराची निरवानिरव, एखादे खेडेगाव आणि तेथील लोकांचा नित्याचा व्यवहार ह्या गोष्टी अनुभवण्याचा हौसेने प्रयत्न करतो.
अगदी छान सवय आहे ही. परदेशात प्रसिध्द ठिकाणे सारेच पाहतात. तिच संग्राहलये, कारंजे, पेक्षणिय इमारती. त्यातील जिवंत माणसे कोण पाहतो हो?
अगदी छान!!
अगदी छान!!
म्हणाला तशी त्याला विशेष चव
म्हणाला तशी त्याला विशेष चव नसते. (तशीपण नुसत्या भाताला चव नसते.) पण हा भात चिकट असतो. त्याबरोबर माशाचा अथवा मटणाची ग्रेव्हीटाईप काहीतरी बनवतात. खाली फोटो देत आहे. याचे नाव मात्र मी विसरले.
>>>
तमालेस हा मेक्सिकन प्रकार भाताचा असाच करतात.
मला वाटते चव नाही तर रॅपचा सुवास भाताला यावा व कुठेही खायला सुलभ म्हणुन अशा प्रकारे
रॅप करतात.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
अप्रतीम सफर घडवलीस धंन्यवाद
अप्रतीम सफर घडवलीस
धंन्यवाद बी
सुधीर
मस्त मस्त ! पुढच्या फोटोच्या
मस्त मस्त ! पुढच्या फोटोच्या प्रतिक्षेत .
छान आलेत फोटो बी. आवडले
छान आलेत फोटो बी.
आवडले
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आता ईंडोनेशियाचे फोटो टाकायला मला हुरुप आला. वेळ मिळाला की ते काम करेन.
इन्द्रधनु, मला फळ आणि भाज्या
इन्द्रधनु, मला फळ आणि भाज्या विकायला जास्त करुन स्त्रियाच दिसल्यात. पुरुष इतर फिरती कामे करत असावीत.
झकास्सच
झकास्सच
धन्स सर्वांचे
धन्स सर्वांचे
Pages