सुखी वैवाहिक आयुष्याचा यशस्वी मंत्र ( कृपया रसग्रहण करा )

Submitted by Kiran.. on 30 January, 2012 - 10:37

नमस्कार,
सुभाषितमाला वाचता वाचता एक दिव्य प्रकाशशलाका कुठून तरी निघाली आणि माझ्या कानातून आत गेली. तेव्हां त्या तेजाने जी झळाळी निर्माण झाली त्याने दिपून जाऊन डोळे बंद केले असता एक काव्य सुचले, ते जसेच्या तसे इथे अवलोकनार्थ देत आहे. त्या अवस्थेत काय लिहीले हे माझे मलाच माहीत नसल्याने जाणकारांची मदत हवी आहे.

वायुयान उड्डयनकेन्द्रं यानं इल्लम डल्लम
कारणे हेतु धूमशकटिकानिलयं आगमनम
गमनागमनस्थले शोधंशोधम दम्मम थक्कम
अंतिमत: योग्यम धूमशकटिका सापडम

अंतिमस्थानं आगमनं नवलमं अस्ति
बसयानं अंतिमस्थानं निकटं अस्ति
ग्रामे हरित क्षेत्रे प्रतियते हरित वस्ति
क्षेत्रपति हर्षे आनंदे खिदळति: बागडति:

ग्रामे बाला अतीव सुन्दरं अस्ति
क्षेत्रपति पृच्छति भवत: कति आयु वर्तते
भवान्/भवति कथम् अस्ति?
षोडषबाला सून्दरां अस्ति, लज्जति, हासति

पृच्छापश्चात विवाहवेदी क्षेत्रपति आरोहति
तव सर्वविधसौख्यार्थं कामयामि, जन वर्तति
विवाहपश्चात क्षेत्रपति हर्षेआनंदे अवस्थापयति
ज्येष्ठं वार्तालापे वर्तति..
विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!

- Kiran

एका दिव्य अंमलाखाली लिहीत गेलो, लिहीत गेलो, लिहीत गेलो आणि लिहीत गेलो... >>>

तुम्हाला गावठी घेतली असे म्हणायचे आहे का ?

कवी विमानतळावर होता. त्याला योग्य रिपोर्टींग स्थान सापडत नव्हते. तो शोधून थकला. शेवटी ते सापडले

नंतर तो त्याच्या इच्छीत स्थळी पोहोचला. बसस्थानक जवळच होते. तो त्यात बसला आणि बस ग्रामीण भागातून गेली. तेथील लोक आनंदी होते. सारीकडे हिरवे हिरवे गार गालीचे होते.

कवीचे मन ते दृष्य पाहून आधीच आनंदी झाले होते त्यात ग्रामीण सुंदरी हसतांना दिसल्यावर त्या तरूण कवीचे काय होईल? तेथील जमीनदाराने कवीची चौकशी केली. त्याला तो कवि अविवाहीत आहे असे समजले.

त्यानंतर त्याचा विवाह तेथील एका तरूणीशी केला गेला. सारे जण आनंदी झाले.

>>विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>

हि ओळ काही समजली नाही ब्वॉ.

बाकी जे काही लिहीले आहे त्यामुळे मजा आली.

किरण.. तू पक्का टेस्ट प्लेयर निघालास रे

भुंग्ज
पहिला नोबॉल आठवून अजून हासतोय.. काय बरं ते ? काय बरं ?
जौ दे... Proud

पाभे

___/\___

विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>

हीच ओळी तेव्हढी समजली नाही यावर विश्वास बसत नाही. Proud

त्या अवस्थेत काय लिहीले हे माझे मलाच माहीत नसल्याने जाणकारांची मदत हवी आहे.>>>>>>>>>> हे भन्नाट काव्य वाचुन जाणकारांची पण तीच अवस्था होउ शकते.

हे भन्नाट काव्य वाचुन जाणकारांची पण तीच अवस्था होउ शकते.>> शकते? नव्हे झालीच आसणार Wink

पहिल्या कडव्यात सिगरेट सापडत नव्हती ती मिळाली
दुसर्‍या कडव्यात बस शेवटच्या स्टॉप ला गावाला पोहचली
तिसर्‍या.. गावातल्या पोरी सुंदर लाजर्‍या
चवथ्या: लग्न झालं पश्चाताप झाला...

कविता संपली वाचणार्‍याला महापश्चाताप झाला... Happy

Mami >> + 10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

LOL Lol Lol Lol

>>विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>
म्हणजे विवाहाच्या आधी डोळे पुर्ण झाकलेले होते, आणि नंतर ते अर्धे का होईना उघडले गेले. (अर्धसत्य कळाल्याने अर्धाच धडा मिळून अर्धेच डोळे उघडले असावेत). Happy

अत्यद्भुतम लेखनम..केवलम प्रभावितमस्मि.
अतः नमस्करोमि इदम प्रतिभावंतम.
अहो ब्यूटीफूलम एतद् फूलम .. :))

Pages