नमस्कार,
सुभाषितमाला वाचता वाचता एक दिव्य प्रकाशशलाका कुठून तरी निघाली आणि माझ्या कानातून आत गेली. तेव्हां त्या तेजाने जी झळाळी निर्माण झाली त्याने दिपून जाऊन डोळे बंद केले असता एक काव्य सुचले, ते जसेच्या तसे इथे अवलोकनार्थ देत आहे. त्या अवस्थेत काय लिहीले हे माझे मलाच माहीत नसल्याने जाणकारांची मदत हवी आहे.
वायुयान उड्डयनकेन्द्रं यानं इल्लम डल्लम
कारणे हेतु धूमशकटिकानिलयं आगमनम
गमनागमनस्थले शोधंशोधम दम्मम थक्कम
अंतिमत: योग्यम धूमशकटिका सापडम
अंतिमस्थानं आगमनं नवलमं अस्ति
बसयानं अंतिमस्थानं निकटं अस्ति
ग्रामे हरित क्षेत्रे प्रतियते हरित वस्ति
क्षेत्रपति हर्षे आनंदे खिदळति: बागडति:
ग्रामे बाला अतीव सुन्दरं अस्ति
क्षेत्रपति पृच्छति भवत: कति आयु वर्तते
भवान्/भवति कथम् अस्ति?
षोडषबाला सून्दरां अस्ति, लज्जति, हासति
पृच्छापश्चात विवाहवेदी क्षेत्रपति आरोहति
तव सर्वविधसौख्यार्थं कामयामि, जन वर्तति
विवाहपश्चात क्षेत्रपति हर्षेआनंदे अवस्थापयति
ज्येष्ठं वार्तालापे वर्तति..
विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!
- Kiran
एका दिव्य अंमलाखाली लिहीत
एका दिव्य अंमलाखाली लिहीत गेलो, लिहीत गेलो, लिहीत गेलो आणि लिहीत गेलो... >>>
तुम्हाला गावठी घेतली असे म्हणायचे आहे का ?
चालू द्या चालू द्या.. मी
चालू द्या चालू द्या.. मी लेफ्टतोय मी लेफ्टतोय
काय भुंग्ज ?
किरण.. तू पक्का टेस्ट प्लेयर
किरण.. तू पक्का टेस्ट प्लेयर निघालास रे
कवी विमानतळावर होता. त्याला
कवी विमानतळावर होता. त्याला योग्य रिपोर्टींग स्थान सापडत नव्हते. तो शोधून थकला. शेवटी ते सापडले
नंतर तो त्याच्या इच्छीत स्थळी पोहोचला. बसस्थानक जवळच होते. तो त्यात बसला आणि बस ग्रामीण भागातून गेली. तेथील लोक आनंदी होते. सारीकडे हिरवे हिरवे गार गालीचे होते.
कवीचे मन ते दृष्य पाहून आधीच आनंदी झाले होते त्यात ग्रामीण सुंदरी हसतांना दिसल्यावर त्या तरूण कवीचे काय होईल? तेथील जमीनदाराने कवीची चौकशी केली. त्याला तो कवि अविवाहीत आहे असे समजले.
त्यानंतर त्याचा विवाह तेथील एका तरूणीशी केला गेला. सारे जण आनंदी झाले.
>>विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>
हि ओळ काही समजली नाही ब्वॉ.
बाकी जे काही लिहीले आहे त्यामुळे मजा आली.
किरण.. तू पक्का टेस्ट प्लेयर
किरण.. तू पक्का टेस्ट प्लेयर निघालास रे
भुंग्ज
पहिला नोबॉल आठवून अजून हासतोय.. काय बरं ते ? काय बरं ?
जौ दे...
पाभे ___/\___ विवाहात्
पाभे
___/\___
विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>
हीच ओळी तेव्हढी समजली नाही यावर विश्वास बसत नाही.
(No subject)
(No subject)
त्या अवस्थेत काय लिहीले हे
त्या अवस्थेत काय लिहीले हे माझे मलाच माहीत नसल्याने जाणकारांची मदत हवी आहे.>>>>>>>>>> हे भन्नाट काव्य वाचुन जाणकारांची पण तीच अवस्था होउ शकते.
इदं काव्य संपुर्णम् वाह..
इदं काव्य संपुर्णम्
वाह.. मस्तम काव्यं, मस्तम प्रतिसादम्
हे भन्नाट काव्य वाचुन
हे भन्नाट काव्य वाचुन जाणकारांची पण तीच अवस्था होउ शकते.>> शकते? नव्हे झालीच आसणार
धन्यवाद दोस्तांनो
धन्यवाद दोस्तांनो
पहिल्या कडव्यात सिगरेट सापडत
पहिल्या कडव्यात सिगरेट सापडत नव्हती ती मिळाली
दुसर्या कडव्यात बस शेवटच्या स्टॉप ला गावाला पोहचली
तिसर्या.. गावातल्या पोरी सुंदर लाजर्या
चवथ्या: लग्न झालं पश्चाताप झाला...
कविता संपली वाचणार्याला महापश्चाताप झाला...
Mami >> +
Mami >> + 10000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
LOL
>>विवाहात् पूर्वं नेत्रे
>>विवाहात् पूर्वं नेत्रे आवृते कुरु तत्पश्चात् अर्धावृतं कुरु!>>
म्हणजे विवाहाच्या आधी डोळे पुर्ण झाकलेले होते, आणि नंतर ते अर्धे का होईना उघडले गेले. (अर्धसत्य कळाल्याने अर्धाच धडा मिळून अर्धेच डोळे उघडले असावेत).
बापरे हे काव्य पुन्हा वर
बापरे हे काव्य पुन्हा वर आलं???
(No subject)
सस्मित मी आणलं आत्ता
सस्मित
मी आणलं आत्ता
किरण ____/\____
किरण ____/\____
किरणजी, ही संस्कृत मिश्रीत
किरणजी, ही संस्कृत मिश्रीत मराठी कोणत्या शतकातील आहे हे कृपया सांगाल का?
व्हिनसजी पुन्हा त्या अवस्थेला
व्हिनसजी
पुन्हा त्या अवस्थेला पोहोचल्यावरच ते सांगणे शक्य होईल
(No subject)
अत्यद्भुतम लेखनम..केवलम
अत्यद्भुतम लेखनम..केवलम प्रभावितमस्मि.
अतः नमस्करोमि इदम प्रतिभावंतम.
अहो ब्यूटीफूलम एतद् फूलम .. :))
Pages