लाज

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2012 - 09:25

कपड्यातल्या मी ला
आज, मी अलगद सोडवलंय...

लाज टाकली!

गरज होती..

काती वर कपड्यांची पुटं
सक्त जडाऊ झाली होती...!
त्या पुटांनीच चार दिसात
उद्या माझा पिक्चर झोपला असता!

हे करताना,
कपड्याच्या आतून दडवलेले,
माझे काही दमदार पैलू मात्र दाखवावे लागलेत...

सगळेच सौदे मनासारखे कसे होतील?

झालेय मोकळी!
काहीशी सुटलेली- बरेच झेललेली...
स्वतःला टिकवत,
नवा जन्म स्वहस्ताने साकारलाय!

हे करण्यास भाग पाडलेल्यांनी
मात्र, उद्या येऊन
"तू पूर्वीची राहिली नाहीस" हे म्हणताना,

माझी लाज तेवढी पाहून जावी.

इति विद्या किंवा वीणा किंवा कॅटरीना किंवा..... एक नवा डर्टी पैलू.

तटी - हे विडंबन असेल तर मग कशाच... कवितेचं की ....... यावर लवकरच एक चर्चा घडणार. तयार रहा. Happy

पोस्टी तुमचेच कोण पुसतो ते काल समजलंच की>>> काय असंबद्ध बरळताय मंजो? मराठीही विसरले की काय आता?

सोडा विजय, मी म्हणालो ना, तुम्हाला नाही समजणार Light 1
लोकांना ह्या रचनेचा आनंद घेऊ द्यावा.
हेमाशेपो.

मी म्हणालो ना, तुम्हाला नाही समजणार>>> हो ना, माबोवरच्या मोजक्या सर्वज्ञांपैकी आपण एक आहात हे विसरलोच होतो

इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन यावा म्हणालो, तर इतक्यात एवढं?

मला वाटलं शिरोडकरांनीही एक वाहतं पान काढलं की काय.

इथे एवढं झालं? साधा चहा घेऊन यावा म्हणालो, तर इतक्यात एवढं?>>> Rofl

माबोपे कभी भी कुछ भी हो सकता है.

वरील काही "महानुभाव" प्रतिसादकर्त्यांसाठी माझ्या काव्य-खानावळीतल्या ताज्या मेन्युचे सँपल -

गुदगुल्या केल्या कुणी कुणाला
यांची मात्र खाज वाढली
"पेशा" करें कोई और
पण यांनी देखील लाज सोडली Proud

- नम्र टवाळ

Rofl

Pages