माझ्या मना

Submitted by पाषाणभेद on 28 January, 2012 - 09:18

माझ्या मना

माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना

उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना

न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना

दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना

होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?

असेल का रे स्थिती तिची अशीच
माहीती का तुला? तू मला सांग ना!

- पाषाणभेद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना
.स्वमनाला विचारलेला निरागस प्रश्न व त्यामगची व्यथा सुस्पष्ट अधोरेखित झाली आहे. अतिशय सुंदर

तिची आठवण पण काढू नको म्हणता आणि परत तिची स्थिती कशी असेल ते सांगण्याची काकुळती दाखवता हे जरा विसंगत होतय हो. की मनाच्या सैरभैर अवस्थेचं ते निदर्शक आहे?