वाढदिवसाच्या शुभेच्छा - देवकाका.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 28 January, 2012 - 07:57

मायबोलीचे एक ज्येष्ठ आदरणीय सदस्य श्री. प्रमोद देव्,आपल्या सगळ्यांचे देवकाका आज एक्सष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. देवकाकांना वाढदिवसाच्या मन्;पूर्वक शुभेच्छा. ...

devkaka_1.jpg

जालनीशी,जालवाणी,जालरंगी,देवकाका
लाजवी उत्साह तरुणांना प्रसंगी ,देवकाका

गीत संगीतातल्या असती लवंग्या शेकड्यांनी
मायबोलीचा फटाका हेच जंगी,देवकाका

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

काका,
आजवरच्या सुरेल वाटचालीबद्दल अभिनंदन व पुढील सुरेल वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा!
दे "ताली" Happy

*श्री. प्रमोद देव साहेब,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला आयुरारोग्य व दीर्घायुष्य लाभो! हिवाळी अंकातील(डिसें २०१२) आपल्या नवनवीन उपक्रमांमुळे आपला नव्याने परिचय झाला. आपला उत्साह खरोखरच उदंड!

* डॉ. कैलास गायकवाड,
फोटो आणि अत्यंत समर्पक काव्य आपण मायबोलीवर टाकल्याने देव साहेबांची एकसष्टी झाल्याचे समजले. तसेच त्यांचे फोटोदर्शन घेता आले. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद!
------ शशिकांत गोखले, सोलापुर

आपल्या सगळ्यांच्या भावना पोचल्या! कालपासून शुभेच्छांमध्ये सचैल न्हात आहे...
आपल्यासारख्याच सगळ्यांच्या भावनांना हा लेख अर्पण केलाय.
http://purvaanubhava.blogspot.com/2012/01/blog-post_29.html

Pages