डुबकीवाले आलु आणि कचोडी...

Submitted by सुलेखा on 27 January, 2012 - 03:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१/२ किलो बटाटे..
अर्धी वाटी सायीचे घटट दही..
१ लहान चमचा अमचुर पावडर..
३ ते ४ मिरच्या बारीक चिरुन..
१ ईंच आले किसलेले..
मीठ चवीनुसार..
लाल काश्मिरी ति़खट १ लहान चमचा [भाजी ला रंग येण्यासाठी]
[लाल भडक रंग येण्यासाठी रोगनजोश ही वापरतात..ही दालचीनी सारखी कांडी[मूळ] असते..तयार भाजीच्या रसात डुबवतात ..त्याने रंग लालभडक येतो ..]
फोडणीसाठी अर्धी वाटी साजुक तुप..
पंच फोडण १ १/२ चमचा..
१/२ चमचा हळद..
कचोडी--
२ वाट्या कणीक १चमचा तेल व पाव चमचा मीठ घालुन पुरीसारखी भिजवुन घ्यावी..
अर्धी वाटी मुग डाळ अर्धा तास पाण्यात भिजवुन २ मिरच्या ,पाव चमचा जिरे घालुन पाणी न घालता जाडसर वाटुन घ्यावी.
त्यात घालायला १ चमचा धने-जिरे पुड..'
कचोडी तळायला तेल..यातलेच चमचाभर तेल मुगडाळ परतायला घ्यायचे आहे..
चिरलेली कोथिंबीर..
काकडी,गाजर,टोमॅटो व हिरवी मिरचीचे सलाद..

क्रमवार पाककृती: 

१ चमचा तेलाच्या फोडणीत जिरे घालुन वाटलेली मुगडाळ मंद आचेवर परतुन घ्यावी..झाकण ठेवुन एक वाफ आणावी मीठ,धने-जिरे पुड घालावे..परतुन घ्यावे..थोडीशी कोथिंबीर घालावी..थंड करण्यासाठी दुसर्‍या भांड्यात काढुन ठेवावी..
बटाटे उकडुन त्याची साले काढुन ते तळहातावर दाबुन,कुस्करुन घ्यावे..
दही ,अमचुरव एक चमचा तुप एका वाटीत चमच्याने कालवुन घ्यावे..
फोडणी साठी तुप गरम करायला ठेवावे
अर्धे तुप एका वाटीत काढुन ठेवावे..या गरम तुपात काश्मिरी तिखट घालुन एकदा छान ढवळावे..
फोडणी मधे पंचफोडण ,हळद घालुन गॅस बारीक करुन मिरच्याचे तुकडे ,किसलेले आले घालावे..एकदा परतुन त्यात दही मिश्रण घालुन परतावे..
कोथिंबीर घालावी लगेच कुस्करलेले बटाटे घालुन मिश्रण छान परतावे..
रसदार भाजी करण्यासाठी पाणी घालावे..
एक उकळी आली कि त्यात काश्मिरी तिखट घातलेले तुप टाकावे.व एकदा भाजी ढवळावी..
वरुन कोथिंबीर घालावी..
आता कचोडी बनवायची..
नेहमीच्या साध्या /तिखट/ओवा/मेथी/पालक ,अशा कोणत्याही पुर्‍या चालतील पण ही कचोडी वाली पुरी असली तर तोपासु..यात विशेष मेहनत नाहीये व फार चिकित्सा /कलाकुसर पण नाहीये.
पुरीपेक्षा मोठी लाटी घेवुन त्यात पाव चमचा मुग डाळीचे मिश्रण भरायचे..थोडीशी पिठी लावुन पुरीसारख्या आकारात लाटायचे..गरम तेलात या कचोडया तळायच्या..
डुबकीवाल्या आलु बरोबर गरम कचोडी सोबत भरपुर सलाद..बनारसच्या थंडीतला हा एक खास मेनु आहे..
अजुन एक याच्या बरोबर तिखट शेव तोंडी लावायला असली तर स्वाद जास्तच वाढतो..
.

.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ३ जणांचे "जेवण" होते..
अधिक टिपा: 

बनारस च्या गजमल गलीत मिळणारी" डुबकेवालली आलु-कचोडी "खुपच झन्नाट असते..फोडणीत लाल तिखट ही घालतात..त्यामुळे तिखट प्रेमी तिखट-पुड घालु शकतात..
कांदा-लसुण विरहीत पंच फोडण ची ही भाजी , वेगळेपण जाणवणारी"विशेष चवीची भाजी" आहे..

माहितीचा स्रोत: 
बनारस गजमल गली...
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्विता,
पंचफोडण म्हणजे मोहोरी,मेथी,जिरे,बडीशोप व कलोंजी [कांद्याचे बी] अशा पाच वस्तुंची फोडणी..

सुलेखा, ही पाकृ देखील भन्नाट! मागे निंबुडाने गंगाकिनारेवाले डुबकीवाले आलू ची रेसिपी दिली होती इथे, ती थोडी वेगळी आहे. त्यात पुदिनाही आहे. परंतु ही रेसिपी देखील मस्त वाटतेय. करून बघण्यात येईल अवश्य. Happy थँक्स.

अरुंधती,साधी बटाटा भाजी पण किती तरी प्रकारानी करतात.
त्याबरोबर पोळी/र्फुलका/पराठा/पुरीच्चे ही विविध प्रकार आहेत.ही भाजीची रेसिपी खरंच खुप मस्त आहे..घरात सहज उपलब्ध जिन्नस वापरुन करता येते..[कलोंजी नसली तरी चालतेकाएकतर आपल्याकडे तिचा वापर कमी]

जे कुणी करून बघतील त्यांनी कृपया फोटु टाकण्याचे करावे. तेवढेच दृष्टीसौख्य! आणि जमलेला पदार्थ कसा दिसतो हे माहित असलं की स्वतः करताना जरा सोपं जातं Happy

काल केले होते डुबकीवाले आलू. धन्यवाद सुलेखा, इतकी मस्त, नॉस्तॅल्जिक रेसिपी दिल्याबद्दल. मला अगदी उत्तरेतील बाजारांत, ढाब्यांवर किंवा रेल्वे स्टेशनावर चाखलेल्या पूरी-सब्जीची आठवण झाली! तूप दिलेल्या प्रमाणापेक्षा खूप कमी वापरले. लाल रंगाचा आटापिटा केला नाही. त्यामुळे भाजी पिवळ्या रंगाचीच दिसतेय. केली तेव्हा बाजूला छान लाल तवंग दिसत होता. हे तिचे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरचे रुपडे. (फोटो क्वालिटीबद्दल माफी!)

अरुंधती,
काश्मीरी तिखट वापरले तर आपोआप्च रंग येतो.हे तिखट लाल रंग येण्यासाठी छान असते ..कमी तिखट खाणार्‍यासाठी व लाल रंग ही येण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे..
चव छान च आली असणार ..या भाजीला रस मात्र जास्त हवा..अर्थात डब्या साठी भाजी असली तर तु केलीस तशीच हवी..फोटो छान आहे गं..

मी आजच ही भाजी आणि कचोडी केली. मस्त झाले होते सगळे. आई ला पण खुप आवडले. धन्यवाद सुलेखा.