Submitted by अज्ञात on 24 January, 2012 - 23:47
ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली
रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली
रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली
दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली
हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे
पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्याच छ्टा प्रतिमेच्या
मग वाट पहाणे आठवणे गत उरले
नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले
एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे
पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले
.........................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
शब्दश्रिमंत कविता.मस्त.
शब्दश्रिमंत कविता.मस्त.
शरपंजरी मरणे म्हणजे काय हे
शरपंजरी मरणे म्हणजे काय हे छान सांगितलेत.. पितामह भीष्म यांच्यानंतरही शरपंजरी मरणे अनेकांच्या नशिबी आलेय.. त्यालाही ही कविता समर्पक होऊ शकेल .
नेहमीच्या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त अशी आशयघन कविता. तुमच्या कविता हा माझ्यासाठी नेहमीच दहावीचा पेपर राहीलेल्या आहेत.
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता +
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता + १.
मरणाचा अर्थ विलक्षण
मरणाचा अर्थ विलक्षण परिणामकारक शब्दांत उलगडला आहे. वेदनांतून उमटलेली सर्व मरणं अशीच असतात काय हा एक प्रश्न उरतो.
प्रद्युम्नजी.. यू सेड
प्रद्युम्नजी.. यू सेड इट
शरपंजरचा अर्थ कसाही घेऊ शकू आपण
सुंदर !
सुंदर !
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता +
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता + १+१
फालकोरांचा मस्त प्रतिसाद.
तुमच्या कविता हा माझ्यासाठी नेहमीच दहावीचा पेपर राहीलेल्या आहेत.>>>>अज्ञातजीनी पेपर काढला असता तर मी उत्तिर्ण झालोच नसतो.
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता +
सुरेख ! शब्दश्रीमंत कविता + १.+ १.......
राहिल्या मागुती गंधखुणा
राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या
पापणीबंद सार्याच छ्टा प्रतिमेच्या
व्व्व्व्वाह!!!!!
शब्द काय सुरेख वापरलेत!!

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद.
सुंदर कविता ! थोड्या शब्दात
सुंदर कविता ! थोड्या शब्दात तुम्ही बरंच काही सांगता ! थोडं(च) कळतं पण न कळलेलंही छान वाटतं ! मी थोडा "जुनं तेच सोनं" मानणारा ओल्ड फॅशन्ड माणूस आहे. त्यामुळे मला आवडणार्या जुन्या कवींशी तुमचं साधर्म्य मला तुमच्या कवितांकडे खेचून घेतं.
शेवटचं कडवं अधिक चांगलं
शेवटचं कडवं अधिक चांगलं वाटलं.
शेरलॉक, आपल्या प्रति सादामुळे
शेरलॉक, आपल्या प्रति सादामुळे माझ्या कवितेचा एक नवा पैलु मला कळाला. आनंद वाटला. धन्यवाद.

उल्हासजी आपलेही आभार.
अज्ञात, बहोत खूब. लयीची
अज्ञात, बहोत खूब. लयीची वेगवेगळी मजा घेऊन येता तुम्ही प्रत्येकवेळी, ते ही वेगळा आशय, आगळी शब्दकळा घेऊन...
काय म्हणू? लिहिते रहा... ही तुमची नाही, आमची गरज आहे.
दाद, तुमच्या ह्या प्रतिसादाने
दाद, तुमच्या ह्या प्रतिसादाने विशेष भरून पावली माझी कविता असं वाटतंय.
सर्वांनी असाच लोभ असू द्यावा.