कॉल करीन तेव्हा ये

Submitted by pradyumnasantu on 24 January, 2012 - 00:38

प्रेम, निसर्ग, श्रद्धा यांचे दर्शन घडविण्याइतकेच समाजातील घातक प्रवृत्तींवर झोत टाकणे हे कवींचे कर्तव्य आहे. निष्पाप मुलींना बदनाम करून व आधुनिक गॆजेट्स् वापरून वेडीवाकडी चित्रे समाजात प्रसृत करून फायदा उकळण्याच्या कॊलेजकुमारांकडूनच घडणा-या हीन कर्मांच्या बातम्या अलिकडे फार वाचनात येताहेत. असल्या नामांकीत बालकांना त्यांच्या पालकांनीच भररस्त्यांत जोड्यांनी पुजायला हवे.
हा प्रक्षोभक विषय जास्तीतजास्त संयमाने हाताळण्याचा मी प्रयत्न केला आहे.

कॉल करीन तेव्हा ये!!

घाबरु नको, घे हे सरबत गोड
काळजी मनातील सोड
ठाऊक मला, कोरड पडली घशाला
लाव ते पेय ओठाला
नाहीस एकटी तू, साथीदार माझा भारी
पडलेला बेडवरी
तो हँडीकॅम कॅमेरा, टीपणार खेळ बघ सारा,
त्या शृंगाराच्या धारा
घे आता घोट शेवटचा, आणि निरोपही बुद्धीचा
ड्रगभरले सर्बत हे पाडील विसर शुद्धीचा
असशील अल्पवयीन, परी देह तुझा रंगीन
मनसोक्त आता भोगीन
साथीदार हँडीकॅम, तो करील जे चित्रण
रसिकांकडे त्याचे करेन मी वितरण
मागणी येउद्या तुजला, लाखांचा करीन सौदा
विकुनी देह हा तुझा श्रीमंत मी होईन यंदा
*
सांगतो तुला मी आता, महिन्यापूर्वी जे घडले
ते आपोआप ना झाले, होते मी घडवलेले
कॊलेजातून तू येताना, अकस्मात मवाली आले
ते होते मीच पाठवले
सोडविले तावडीतुन त्यांच्या, मी नाटक तसेच केले
घेउन घरी तुझ्या नेले
विश्वास तुझ्या घरच्यांचा, मिळविला गोड बोलून
अन कॆश तयाला केले तुज येथे आज आणून
*
चल चढव आता, चढव भराभर कपडे
मन भरले बघुन ते रुपडे
तू जा आता घरला आपुल्या लौकर
ये लगेच मग, कॊल तुला केल्यावर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शहारा आणणारे वास्तव. वृत्तपत्रातल्या या संदर्भातल्या बातम्या चीड आणतातच पण खरं सांगायचं तर अप्रत्यक्षपणे ही परिस्थिती निर्माण करायला वृत्तपत्रे अथवा टीव्ही, सिनेमेच नाही तर केवळ आधुनिकतेच्या हव्यासापायी अथवा मुलीला आपला जोडीदार आपणच निवडू द्यावा, आपण त्यात ढवळाढवळ करू नये अशा भोंगळ आणि घातक विचारसरणीचे पालकही जबाबदार असतात असं दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं. मुलीला फसवणूक होण्याच्या परिस्थितीकडं आपणच ढकलतो आहोत हे ते विचारात घेत नाहीत. बुभुक्षित जनावरे माणसातही असतात. त्यांच्यापासून केवळ सावध रहा अशा सूचना देवून भागत नाही. मुलीचे अशा संभाव्य प्रसंगापासून रक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी कडक, कटु निर्णय घेऊन तो लादणेही आवश्यक असते.

राहिला प्रश्न असे करणार्‍या नराधमांचा. भर चौकात त्याना चाबकाने फोडून काढायची नक्कीच आवश्यकता वाटते.

या ज्वलंत समस्येकडं लक्ष वेधून घेणारी समर्थ कविता.

विषय ज्वलंत आहे पण कवितेचा प्रभाव नाही पडत.कदाचित आधीच्या तुमच्या तिन्ही कवितांचा परिणाम असावा.तीनचा शो 'हेराफेरी' बघावा आणि लगेचच सहाचा शो 'रुदाली 'असावा, असं काहिसं झालं.

>>> प्रेम, निसर्ग, श्रद्धा यांचे दर्शन घडविण्याइतकेच समाजातील घातक प्रवृत्तींवर झोत टाकणे हे कवींचे कर्तव्य आहे.

कवी मंडळींवर जबाबदारी वाढली आहे.
ज्वलंत विषय आहे. अन वेगळ्याच विषयावरची कविता.

फालकोर ह्यांच्याशी सहमत. माझ्या दृष्टीने खालील कारणे असावीत,

१. मुळात ही कविताच वाटत नाही, खूपच गद्य झालीय.
२. कवीला खूप काही सांगायचे आहे परंतू विचार विस्कळीत असल्यासारखे वाटले.
३. विषय जितका ज्वलंत असतो तितकी कविता अंगावर आली पाहिजे ते होत नाही असे वैयक्तिक मत.

धन्यवाद!!

वरचे सर्व प्रतिसाद वाचले ......मला दोन गोष्टी समजल्या ......
१) कोणी काहीही म्हणो कविता चांगली झालीय
२) चांगलि झालिय कविता कुणी काहिही म्हणो

प्रेम, निसर्ग, श्रद्धा यांचे दर्शन घडविण्याइतकेच समाजातील घातक प्रवृत्तींवर झोत टाकणे हे कवींचे कर्तव्य आहे. निष्पाप मुलींना बदनाम करून व आधुनिक गॆजेट्स् वापरून वेडीवाकडी चित्रे समाजात प्रसृत करून फायदा उकळण्याच्या कॊलेजकुमारांकडूनच घडणा-या हीन कर्मांच्या बातम्या अलिकडे फार वाचनात येताहेत. असल्या नामांकीत बालकांना त्यांच्या पालकांनीच भररस्त्यांत जोड्यांनी पुजायला हवे.
हा प्रक्षोभक विषय जास्तीतजास्त संयमाने हाताळण्याचा मी प्रयत्न केला आहे.
______________________________________________________

जोड्यांनी पुजायला हवे या तीन शब्दानंतरच कविता संपल्यासारखी झाली. पुढे जे लिहिले आहे ते केवळ याच उतार्‍याचे काव्यरूप असणार हे समजल्यामुळे झालेली निराशा लपवणे चुकीचे ठरेल

विजय दिनकर पाटीलजी: फालकोर ह्यांच्याशी सहमत. माझ्या दृष्टीने खालील कारणे असावीत,
१. मुळात ही कविताच वाटत नाही, खूपच गद्य झालीय.
२. कवीला खूप काही सांगायचे आहे परंतू विचार विस्कळीत असल्यासारखे वाटले.
३. विषय जितका ज्वलंत असतो तितकी कविता अंगावर आली पाहिजे ते होत नाही असे वैयक्तिक मत.

सुदैवाने तुमच्या तीन्ही मुद्द्यांवर मी कविता लिहीण्यापूर्वी विचार केला होता.
१) कवितेचा विषय इतका रूक्ष व प्रक्षोभक आहे की तो काव्यात्मक करणे प्रशस्त वाटले नाही. ड्रग पाजून कट रचून एका मुलीला बरबाद करण्याचा इरादा रूक्ष शब्दांतच व्यक्त व्हावा असे मला वाटले.
२) मला खूप काही सांगायचे नव्हते. फक्त जे बातम्यांतून वाचले ते सर्वांपुढे ठळक करून मांडायचे होते. जसे वर्गात शिक्षक एखादा शब्द अन्डरलाईन करतात तसे.
३) कविता अंगावर न यावी हा तर मूळ उद्देश होता. एरवी मी तरुणाच्या ऐवजी मुलीच्या दृष्टीकोनातून कहाणी मांडली असती. मी २५/३० वयोगटात असतो तर कदाचित तो पर्याय घेतला असता, पण आज वयाच्या ६४ व्या वर्षी अधिक मॅच्युअर्ड रितीने लिहावे व रसिकांनी ते तसे स्वीकारावे असे वाटले.
आपल्या क्षमतेबद्दल मला आदरच आहे. व आपल्या अनेक कवितांवरील प्रतिसादांत तो व्यक्तही झाला आहे. माझ्या पुढील कविता आपल्या पसंतीस उतराव्यात याचा जरूर प्रयत्न करीन.

>> प्रेम, निसर्ग, श्रद्धा यांचे दर्शन घडविण्याइतकेच समाजातील घातक प्रवृत्तींवर झोत टाकणे हे कवींचे कर्तव्य आहे.......

प्रद्य्म्नजी मी तुमच्या या माताशी पूर्ण्पणे सहमत आहे. आणि कर्णिकांना पण १००% अनुमोदन. मुलींना वाटेल तितके स्वातंत्र्य दिल्याने घडणारे प्रकार समाजात सतत दिसताहेत. बाकी कवितेबद्दल मी काही बोलणार नाही.