एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यकर्ता कॉलेजकुमार >>> हा म्हणजे आभाळमाया मध्ये सुकन्या मोनेने केलेल्या कॅरॅक्टरचा मुलगाच ना? किती मोठा झालाय... पण काहीतरीच बंडल डायलॉग्ज दिलेत त्याला. प्रचंड कृत्रिम वाटते त्याची अ‍ॅक्टिंग. काव्यकुमारी, आजी सगळंच कृत्रिम वाटतं. पण तरीही मालिका बघायला खुप मजा यतेय.

मुक्ता आणि विनय यांचे संवाद मज्जेशीर! मुक्ताच्या ऑफिसमधली टिपिकल रोमॅन्टिक बाई फोनवरुन नवर्‍याला ते "मून मून" म्हणत असते आणि मुक्ता इरिटेट होते, तेंव्हा "आपल्याला ज्यातले कळत नाही त्यात आपण पडू नये" असे म्हणाली होती, तेंव्हा जामच हसू आले होते Lol सिरियलचा मूड विनोदी आहे, तो तसाच राहिला तरी खुप झालं. स्वप्निल-मुक्ता जोडी मला आवडते, ते कसे एकत्र येतात, कसे संवाद साधतात, याची उत्सुकता आहे.

टायटल साँग मात्र अजिबात नाही आवडलं. आवाज, संगीत, शब्द सगळंच सुमार. प्रत्येकवेळी ते आज्जीचं झिंग चिका गाणं ऐकायला बोअर होतं.

या सगळ्या मालिकेत फक्त स्पृहा जोशी मस्त दिसते...... तिच्यासाठी मालिका बघायचीच्ये... Wink

पण वेळ १०.३० करा ना राव... तसेही गुंतताची सवय होती..... राजवाडे सिरिअल ह्या १०.३० च्या स्लॉटलाच हव्यात. Happy

अज्ञानाबद्दल माफी असावी Happy ही 'स्पृहा जोशी' कोण?

टायटल साँग मात्र अजिबात नाही आवडलं. आवाज, संगीत, शब्द सगळंच सुमार. प्रत्येकवेळी ते आज्जीचं झिंग चिका गाणं ऐकायला बोअर होतं.>>>>>> अगदी अगदी. नशीब ऑनलाईन बघितल्यामुळे टायटल साँग पुढे ढकलता येतं Proud

मुक्ता बर्वे कधी कधी तिच्या बाबांशी फारच आगाऊसारखी बोलते नाही का?

आगाऊ असं बोलतो बाबांशी? Uhoh Proud
स्पृहा जोशी म्हणजे स्वप्नीलची ती कवयित्री बहीण दाखवलेली मुलगी. ती मला अग्निहोत्रपासून आवडते. ती त्यात कोण झाली होती हेच आठवत नाहीये.. क्रांतिकारक चळवळीतली कुणी... Uhoh

आगाऊ असं बोलतो बाबांशी? >>> हा हा हा ...:फिदी:
ओह.. ती का स्पृहा जोशी? तिला सारख्या कविता होत असतात Proud

अंजली, मी मालिकेचा एकही भाग पाहिलेला नाही अजून. पण बहुधा स्वप्नील जोशीची बहीण असणार ती (सख्खी किवा चुलत). मालिकेतलं नाव माहित नाही. जो भी है जैसे भी है....... अलग है.... Happy

अग्निहोत्रमधे होती ती.

दीपांजली,

खर्‍या आयुष्यातल्या तिच्या अचिव्हमेंटस बघाल या वयातल्या तर ती काय तिचे पालक पण आवडतील. Rofl

खर्‍या आयुष्यात पण्ण ती कवयित्री आहे, तिच्या काव्यसंग्रहांना पुरस्कारही मिळालेत.

थोडे गुगलून पहाच Wink

असेल खर्‍या आयुष्यात मोठी कवयित्री पण त्या सिरिअल मधे फारच इरिटेटिंग आहे तिचं कॅरॅक्टर .. किती ते ओव्हर अ‍ॅक्टिंग... पूर्वीच्या संगीत नाटकातल्या बायकां सारखी वागते Uhoh

अगं डीजे, तिचं 'पात्र'च इरिटेटिंग दाखवायचंय.. तिचा हीरो तर बघ, पोतं दाखवलाय मुरमुर्‍याचं. Lol मलाही तिचं पात्र नाही, ती आवडते.

<<राधाच्या बॉसच्या टेबलावर तिचा फोटो, पत्रिका असलेलं पाकिट काय करत होतं? मी हा एपिसोड पाहिला नाही. >>

राधाच्या बॉसला पण तिच्या लग्नाची काळजी आहे ना! तो ते पाकिट कुणा लग्न जमवणार्‍यांन पाठवणार होता.

स्पृहा जोशी झीवरच्या लहान मुलांच्या एका मालिकेतही होती (तिच्या लहानपणी)
बरीच उद्योगी आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, वृत्तपत्रात सदरलेखन (लोकसत्तात कॉलेज कट्टा), अभिनय ....

अग्निहोत्रमध्ये स्पृहा शरद पोंक्षेच्या (नक्षलवादी चळवळीतल्या) बहिणीची मुलगी होती- पेशाने वकील. नंतर नीलची केस तीच लढवते. (त्या सुमारास राजवाडेंनीही सिरियलीत अवतार घेतला होता. तेव्हा त्यांचं आणि तिचं काही कनेक्शन जुळवतायेत की काय असा अशुभ संशय आला होता पण देवकृपेने तोवर मालिकच संपली)

स्पृहाची पर्सनॅलिटी छान आहे. मला अग्निहोत्रमध्ये आवडली होती.

इथे मालिकेवे इंग्रजी वर्णन दिले आहे- त्यावरून मालिका नक्की पुढे कशी सरकणार आहे काही अंदाज लागला नाही.. ते दोघे स्वभावाने अगदी विरूद्ध आहेत आणि एकमेकांना आवडत नाहीत. ह्याभोवतीच सर्व शब्दखेळ/ कोट्या/ प्रसंग आणि पात्र फिरणार आहेत का? Uhoh

कालचा भाग खुप आवडला. जीन्यावर बसुन बापलेकीचे संवाद चाललेले त्यात मुक्ताने खुप छान अभिनय केला.

आशू, अग्निहोत्रमध्ये वकील होती ती म्हणजे क्रांतिकारकच Wink तिच्या आईच नाव क्रांती बहुदा.

तिच्या काव्यसंग्रहांना पुरस्कारही मिळालेत.>> म्हणून तू तिचा इतका पुरस्कार करतोयस? Wink

(फक्त) सायकल चोरीला गेली हे झेपलं नाही. एवढ्या मोठ्या घरात सायकल [नीट मावली असती] ठेवता आली नसती? शिवाय सायकल घरात असती आणि जर राजवाडेंनी हिंदी शिनेमापासून स्फुर्ती घेतली असती तर कदाचित लग्नाची मुलगी सायकलवर बसून 'मैने प्यार किया' स्ल्मान खान स्टाईलमध्ये गाणं वगैरे गाऊ शकली असती Proud

रैना, >>>पण भाट्यांनी ज्या काही कपड्यांच्या घड्या घातल्यात त्यावरुन त्यांना कपड्यांच्या घड्याही नीट घालता येत नाही हे सिद्ध झाले. काय त्या गुंडाळ्या <<< Biggrin
साधना, >>>कालचा भाग खुप आवडला. जीन्यावर बसुन बापलेकीचे संवाद चाललेले त्यात मुक्ताने खुप छान अभिनय केला.<<< हो गं Happy

तो पाकिटाच्या अदलाबदलीचा भाग कोणीच कसा नाही बघितला ?
(मी पण नाही बघितला)
इथे कोणी छुपा स्टोरी रायटर तर नाही अवतरला ?

तो पाकिटाच्या अदलाबदलीचा भाग कोणीच कसा नाही बघितला ?>>>
अवनी,
तो परवाचा भाग होता. राधा(मुक्ता)चे वडिल(विनय) त्या आधीच्या भागात राधाच्या बॉसला ऑफिसमध्ये येऊन भेटतात आणि लेक मुलगा पहायला तयार नाही, म्हणून तुम्ही तरी काहीतरी समजवा, असं सांगतात ना? ती गोष्ट तिचे बॉस सिरियसली घेतात आणि राधाची पत्रिका आणि फोटो तयार करुन घेऊन एका मध्यस्थी करणार्‍या बाईंना (क्षेत्रमाडे बाई) पाठवण्यासाठी एका पाकिटात भरुन ठेवतात त्यांच्या टेबलवर. त्याच वेळी त्यांच्या कॉम्युटरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करायला एक टेक्निशियन तिथे येतो, जो घना(स्वप्निल) चा मित्र असतो. त्याच्याही जवळ एक डिट्टो पाकिट असते, जे घनाचे असते. (घना आणि तो पार्टनर्स असल्याने कॉमन बॅग असावी त्यांची) तर त्या पाकिटात घनाने परदेशातल्या कुठल्याशा नोकरीसाठी करायचा अर्ज भरुन ठेवलेला असतो.
हा टेक्निशियन पार्टनर पाकिटांची आदलाबदल करतो. घना नंतर बॅग घेऊन घरी जातो आणि आईजवळ ते पाकिट देतो- तो अर्ज कुरियर करायला सांगतो. आई पाकिट उघडून बघते, तर तिला सुखद धक्का बसतो. तिला वाटतं, की त्याच्यावर टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम म्हणून लेकाने स्वतः मुलगी बघितली लग्नासाठी..

असं आहे सगळं Proud

कालचा भाग खुप आवडला. जीन्यावर बसुन बापलेकीचे संवाद चाललेले त्यात मुक्ताने खुप छान अभिनय केला.>>> अनुमोदन! Happy

शिवाय इला भाटे आणि मोहन जोशी यांचे प्रेमाविषयीचे प्रेमळ हितगुजही आवडले. Happy

कालचा भाग एकंदरीत फार आवडला.

मलाही आवडला कालचा भाग. त्या जिन्यावरच्या प्रसंगात मुक्ताचा अभिनय आवडला. एकुलत्या एक मुलीची व्यथा कि आपलं लग्न झाल्यावर बाबांचं कसं होणार हे नीट कळतंय तिच्या वागण्यातून.

तो ज्ञाना की कोण इला भाटेचा पुतण्या तो हरिश्चंद्राची फॅक्टरी मधला बाबाराय ना? Happy आवाज फुटलाय आणि खूप उंचही दिसतो.

पुढील भागातील झलकमधे दाखवले ना स्वप्निल जोशी ला तिची नोज रिंग नाही आवडत म्हणजे घरी नाही आवडणार असं सांगतो, वाटलंच होतं Proud

मला इला भाटे आवडते बुवा. तिचा रोल कदाचित इरिटेटींग वाटेल पण तिच काम आवडल मला. मला ती आजी पण आवडली. न आवडणारा म्हणाल तर मला स्वप्नीलच आहे. कदाचित फू बाई फू पासून तो नाही आवडत मला. विनय आपटे हळवा कधी पाहिला नाही सो आवडला एकदम. Happy
स्पृहाच कॅरॅक्टर इइइइ आहे पण तिने काम भारी केलय. एकंदरित थोडी ओव्हर अ‍ॅक्टिंग अपेक्षित असावी.

गुगली.
राधा आणि घनश्याम यांनी लग्न करायला होकार दिलाय. तूर्तास लग्न करा लग्न करा या ब्यादीपासून सुटकेची सोय म्हणून लग्न करायचे ठरवलेले असावे. पुढे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात याची ष्टोरी दाखवतील(?)
तोपर्यंत घरच्यांनी आता नातवंडं हवं अशी डिमांड नको करायला!

मला इला भाटे आवडते बुवा. तिचा रोल कदाचित इरिटेटींग वाटेल पण तिच काम आवडल मला. >>>> मला इला भाटे नेहमीच आणि खुप्प्प्प्प्प्प आवडते.
मला ती आजी पण आवडली.>> तिची ओव्हरअ‍ॅक्टिंग जरा नव्हती आवडली मला, पण गोडच आहे आज्जी Happy
विनय आपटे तर हळव्या रोलमध्ये जामच खुलतोय. वडिल मुलीचं नातं किती गोड दाखवलंय यात.
कालचा भागही मस्त! "सारखे इकडे बघू नका" असं राधा एसेमेस करुन सांगते, त्याचं फार हसू आलं. Lol

आणि हो! तो राधावर एकतर्फी प्रेम करणारा कार्टून किती मस्त अ‍ॅक्टिंग करतो Lol
राधाचा बॉसही लै भारी. त्याची बोलण्याची पद्धत फारच मनोरंजक आहे.

ए, मी ही एकच सिरियल बघते, ती पण नवीन आहे, इन्ट्रेस्टिंग वाटतेय म्हणून आणि पोस्टी फक्त सिरियल्सवरच तर आहेत, त्याला कितीसा वेळ लागतो? दिवसातून १-२ पोस्टी फक्त...गप्पांच्या पानांवर रेंगाळायचे ठरवले, तर मात्र वेळही भरपूर जातो आणि कामही होत नाही आणि सगळ्या पोस्टी वाहून जातात, तो भाग वेगळाच... Wink Proud

स्वप्निल जोशी त्या जिन्स मधे कोंबून भरलाय असं वाटत होतं Happy
कसा काय होकार झालाय दोघांमधे? कळत नाही. काय बोलले ते आपल्यालाही दाखवायला पाहिजे ना Proud

>>स्वप्निल जोशी त्या जिन्स मधे कोंबून भरलाय असं वाटत होतं
तो आज काल कोणत्याही कपड्यांमधे असाच दिसतो. Happy Happy लग्नाळू मुलगा म्हणून अजिबात शोभत नाही.
वल्ली आणि त्या अजुन एका काकूचं काम कोणी केलयं. मी नाही ओळखलं त्यांना. ती तिसरी काकू नाखूश दिसते आहे लग्न ठरलं म्हणून. मग ती खलनायिका होणार का काय?? Happy
आणि हो तो समस पाठवलेला सीन मस्त होता.

Pages